जाणून घ्या २९ जून रोजी येणारे दिनविशेष

29 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आजचा दिवस हा आपल्या देशांत राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कारण, राष्ट्रीय सांख्यिकीय प्रणालीच्या स्थापनेत आपले अमुल्य योगदान देणारे प्रा. पी. सी. महालनोबीस यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने आजचा दिवस हा राष्ट्रीय  सांख्यिकीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जाणून घ्या २९ जून रोजी येणारे दिनविशेष – 29 June Today Historical Events in Marathi

29 June History Information in Marathi
29 June History Information in Marathi

२९ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 June Historical Event

 • इ.स. १६१३ साली इंग्लंड देशातील महान नाटककार शेक्सपिअर (William Shakespeare) यांच्या लंडन स्थित ग्लोब नावाच्या थियेटरला आग लागल्याने जमीनदोस्त झाले.
 • इ.स. १७५७ साली बंगालचे नवाब मीर जाफर यांनी बंगाल, बिहार आणि ओडिसा प्रांताचे राज्य सांभाळले.
 •  सन १९७६ साली सेशेल्स देशाला इंग्लंड देशापासून स्वातंत्र्य मिळालं.
 • सन १९९६ साली मेक्सिको देशांत आयोजित फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाने जिंकला.
 • सन २००१ साली पं. हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 • सन २००१ साली ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 • सन २००७ साली आय फोन म्हणून प्रसिद्ध असलेला ॲपल कंपनीचा पहिला स्मार्ट फोन बाजारात विक्रीस उपलब्ध झाला.

२९ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 29 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८६४ साली प्रख्यात बंगाली शिक्षक, न्यायशास्त्रज्ञ, वकील व गणितज्ञ आशुतोष मुखर्जी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९३ साली प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिव सांख्यिकीशास्त्रज्ञ तसचं, भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे सदस्य पी. सी. महालनोबीस यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८७१ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, नाटककार, वाड्मय समीक्षक व विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्मदिन.
 • सन १९०१ साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक तसचं, काकोरी व दक्षिणेश्वर बॉम्बहल्ला प्रकरणांचे सुत्रदार राजेंद्र लाहिरी यांचा जन्मदिन.
 • सन १९०८ साली बडोदा प्रांताचे राजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नातू व बडोदा प्रांताचे शेवटचे सत्ताधीश महाराज प्रतापसिंह राव गायकवाड यांचा जन्मदिन.
 • सन १९२२ साली रोमानियन वंशीय सर्बियन कवी वास्को पोपा (Vasko Popa)यांचा जन्मदिन.
 • सन १९३४ साली महाराष्ट्रीयन मराठी नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता व लेखक कमलाकर सारंग यांचा जन्मदिन.

२९ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 June Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८७३ साली एकोणिसाव्या शतकातील महान बंगाली भाषिक कवी आणि नाटककार व बंगाली नाटकाचे प्रणेते मायकल मधुसूदन दत्त यांचे निधन.
 • इ.स. १८९५ साली ‘डार्विनचा बुलडॉग’ म्हणून प्रसिद्ध असलेले इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ थॉमस हेनरी हक्सले(Thomas Henry Huxley) यांचे निधन.
 • सन १९६१ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि भारताचे पहिले संरक्षणमंत्री सरदार बलदेव सिंह यांचे निधन.
 • सन १९६६ साली प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ,  सांख्यिकीशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसांबी यांचे निधन.
 • सन १९८१ साली महाराष्ट्रीयन मराठी कथा-कादंबरीकार, लेखक दि.बा.मोकाशी यांचे निधन.
 • सन १९९३ साली सर्वपरिचित आळंदीचे कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक व लेखक विष्णुबुवा जोग यांचे निधन.
 • सन २००० साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी भाषिक कादंबरीकार व माजी भूदल प्रमुख कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन.
 • सन २०१० प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, विचारवंत वक्ते, तसचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन.
 •  सन २०१६ साली प्लास्टिक कलेसाठी प्रसिद्ध भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार तसचं, कालिदास सन्मान प्राप्त कलाकार के.जी. सुब्रमण्यम यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top