जाणून घ्या २९ मार्च रोजी येणारे दिनविशेष

29 March Dinvishesh

या लेखाच्या माध्यमातून आपण २९ मार्च या दिवशी घडलेल्या संपूर्ण घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या दिनी इतिहासात घडलेल्या ऐतिहासिक घटना तसचं, आधुनिक काळात केले गेलेले काही शोध, व्यक्ती विशेष जन्मदिन, मृत्युदिन आदी घटना (29 March Today Historical Events in Marathi) आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २९ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 29 March Today Historical Events in Marathi

29 March History Information in Marathi

२९ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 March Historical Event

 • इ.स. १५६१ साली मुघल बादशाहा अकबर यांनी मालवा प्रांताची राजधानी ‘सारंगपूर’ येथे हल्ला करून तेथील सुलतान बाजबहादूर यांचा पराभव केला.
 • सन १८४९ साली ब्रिटीश शासनाने पंजाब राज्यावर ताबा केला.
 • इ.स. १८५७ साली बराकपुर येथील इंग्रजांच्या छावणीत कार्यरत असलेले क्रांतिकारक मंगल पांडे यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांवर गोळीबार करून स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात केली.
 • सन १९५४ साली भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेली संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘भारतीय लोक प्रशासन संस्था’ ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे प्रथम अध्यक्ष टी. एन. चतुर्वेदी होते. तसचं, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहे.
 • इ.स. १९६८ साली अहमदनगर जिल्हातील राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ होते.
 • सन १९८२ साली एन. टी. रामराव यांनी दक्षिण भारतातील आंद्र्प्रदेश व तेलंगाना राज्यात सक्रीय असलेल्या ‘तेलगु देसम पक्षाची’ स्थापना केली. या पक्षाचे विद्यमान अध्यक्ष चंद्रबाबू नायडू असून,  तसचं, त्यांनी आंध्रप्रदेश प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद देखील भूषविल आहे.
 • इ.स. २००४ साली भारतीय क्रिकेटपटू व फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी मुलतान या ठिकाणी पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ३०९ धावा काढून अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय फलंदाज बनले. या सामन्यात त्यांनी दोन त्रिशतक झळकावली.
 • सन २००४ साली आयर्लंड देशाने कामाच्या ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली. अश्या प्रकारची बंदी लागू करणारे ते जगातील पहिले राष्ट्र ठरले. २९ मार्च या तारखेपासून सार्वजनिक आरोग्य (तंबाखू) अधिनियमांतर्गत बंद असलेल्या कार्यलयाच्या परिसरात धूम्रपान करणे बेकायदेशीर ठरले आहे.

२९ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 29 March Birthday/ Jayanti/ Birth Anniversary

 • इ.स. १८६९ साली दिल्ली शहराचे रचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्मदिन.
 • सन १९१३ साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेता हिंदी भाषिक कवी व लेखक भवानी प्रसाद मिश्रा यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९१८ साली अमेरिकन व्यापारी व उद्योजक तसचं, वॉलमार्टचे संस्थापक सॅम्युअल मूर वॉल्टन यांचा जन्मदिन.
 • सन १९२६ साली अर्थशास्त्रज्ञ, प्राचार्य व मराठी विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण उर्फ बाळ गाडगीळ यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२८ साली भारताचे परराष्ट्र सचिव तसेच, दिल्ली, अंदमान आणि निकोबार या केंद्र्शाशित प्रदेशाचे माजी उपराज्यपाल. याचप्रमाणे त्रिपुरा, गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे माजी राज्यपाल रोमेश भंडारी यांचा जन्मदिन.
 • सन १९२९ साली भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक व लेखक-नाटककार उत्पल दत्त यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९३० साली राजकारणी, तसचं, मॉरिशस देशाचे माजी अध्यक्ष आणि पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्मदिन.
 • सन १९३९ साली प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व हास्यकलाकार सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९९८ साली भारतीय व्यावसायीक गोल्फ खेळाडू अदिती अशोक यांचा जन्मदिन.

२९ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 March Death/ Punyatithi/ Smrutidin

 • इ.स. १५५२ साली शिखांचे दुसरे गुरु गुरु अंगद देव यांचे निधन.
 • सन १९६३ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार व राष्ट्रकवी सियारामशरण गुप्त यांचे निधन.
 • इ.स. १९६४ साली इतिहास संशोधक शंकर नारायण जोशी उर्फ वत्स जोशी यांचे निधन.
 • सन १९९७ साली भारतीय सांस्कृतिक कार्यकर्ता व लेखक पुपुल जयकर मेहता यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here