जाणून घ्या ४ जुलै रोजी येणारे दिनविशेष

4 July Dinvishes

मित्रानो, आम्ही या लेखाच्या माध्यमातून आपल्याकरिता आजच्या दिनी इतिहासात घडलेल्या ऐतिहासिक घटना, तसचं, आधुनिक शोध, विशेष व्यति जन्मदिन आणि मृत्युदिन आदी घटनांची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा लेख खूप महत्वाचा आहे. तरी आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे.

जाणून घ्या ४ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 4 July Today Historical Events in Marathi

4 July History Information in Marathi
4 July History Information in Marathi

४ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 July Historical Event

 • .इ.स. १७७६ साली अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र घोषित केले.
 • इ.स. १७८९ साली इस्ट इंडिया कंपनीने मराठा शासक पेशवा आणि निजाम शासक यांच्याबरोबर टिपू सुलतान यांच्या विरुद्ध खिलाफत ची संधी केली.
 • इ.स. १८२६ साली अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिनी अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ऐडम्स(John Adams) व अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन(Thomas Jefferson) यांचे निधन झाले.
 • सन १९०३ साली मोटार कार स्पर्धेत भाग घेणाऱ्या डॉरोथी लेव्हीट(Dorothy Levitt) या पहिल्या इंग्लिश महिला ठरल्या.
 • सन १९९५ साली टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरव्हेव रेडिओ तेलीस्कोपचे (GMRT) चे संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. सरकारचा बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • सन १९९७ साली अमेरिकेचे पाथ फाईफाइंडर हे मानवरहित यान मंगळ ग्रहावर उतरले.
 • सन १९९९ साली भारतीय लष्कर दलाच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील टायगर हिल्स हा महत्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

४ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८७२ साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व राजकारणी कॅल्विन कूलिज(Calvin Coolidge) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९७ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सदस्य व भारतीय तेलगु क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू यांचा जन्मदिन.
 • सन १९१२ साली जयपूरच्या अत्रोली घराण्यातील ज्येष्ठ गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्मदिन.
 • सन १९१४ साली महाराष्ट्रीयन भावगीत कवी व लेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील यांचा जन्मदिन.
 • सन १९१६ साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री नसीम बानो यांचा जन्मदिन.
 • सन १९२६ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक व लेखक विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्मदिन.
 • सन १९६२ साली अमेरिकेच्या माजी व्यावसायिक टेनिसपटू पाम श्राइवर यांचा जन्मदिन.
 • सन १९८३ साली भारत वंशीय ब्रिटीश पत्रकार, प्रसारक आणि बीबीसी मिडियाचे संचालक अमोल राजन यांचा जन्मदिन.

जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 July Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १७२९ साली मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख (नौदल प्रमुख) सागर सम्राट क्न्होजी आंग्रे यांचे निधन.
 • इ.स. १८२६ साली अमेरिकन राजकारणी व लेखक तसचं, अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ऐडम्स(John Adams) यांचे निधन.
 • इ.स. १८२६ साली अमेरिकन राजकारणी, मुत्सद्दी, वकील, रचनाकार, तत्ववेत्ता व संस्थापक तसचं, अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन(Thomas Jefferson) यांचे निधन.
 • इ.स. १८३१ साली अमेरिकन राजकारणी, वकील, मुत्सद्दी आणि संस्थापक पिता व अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मुनरो(James Monroe) यांचे निधन.
 • सन १९०२ साली भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे महान भारतीय तत्त्वज्ञ, तसचं, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य व आपल्या गुरुंची स्मृती चिरंतन राहावी याकरिता ‘रामकृष्ण मिशन’ ची स्थापना करणारे महान वेदांतवादी आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांचे निधन.
 • सन १९३४ साली नोबल पारितोषिक पुरस्कार प्राप्त पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी(Marie Curie) यांचे निधन.
 • सन १९६३ साली  भारतीय स्वातंत्र्य सेनानी व भारताच्या तिरंगी ध्वजाचे रचनाकार पिंगली वेंकैया यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top