Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

6 September Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेल्या युद्धा करिता ओळखला जातो. सन १९६५ साली झालेल्या युद्धाच्या वेळी काश्मीर हे पाकिस्तानात विलीन व्हावे ही सुप्त इच्छा १९४७-४८च्या युद्धानंतरसुद्धा पाकिस्तानने जोपासली होती आणि काश्मीर पादाक्रांत करण्याची संधीच पाकिस्तानचे नेते शोधीत होते. याशिवाय अजून काही मुद्दे या युद्धास कारणीभूत होते. या युद्धात भारतीय सेनेने मोठ्या शर्तीने हे युद्ध केले.

याव्यतिरिक्त आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्ती, निधन वार्ता आणि महत्वपूर्ण घटना या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 6 September Today Historical Events in Marathi

6 September History Information in Marathi
6 September History Information in Marathi

६ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 September Historical Event

  • सन १९६५ साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत युद्धाला सुरुवात झाली.
  • सन १९६५ साली भारत पाकिस्तान यांच्यात सीमेच्या रक्षणासाठी झालेल्या युद्धात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या बलिदानांच्या स्मरणार्थ पाकिस्तानमध्ये संरक्षण दिन हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • 6 सप्टेंबर 1968 रोजी स्वाझीलँडला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले.
  • सन २००८ साली डी. सुब्बाराव यांची भारतीय रिजर्व बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ६ सप्टेबर पासून आपला पदभार सांभाळला.
  • सन २०१९ साली भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वात पहिले ५० गाडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावे करणरे पहिले यष्टीरक्षक बनले.
  • सन २०१९ साली आपत्ती व्यवस्थापनेबद्दल आयोजित “IT एक्सिलेंस अवार्ड” ओडिसा राज्याने जिंकला.

६ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८८९ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता व बॅरिस्टर तसचं, सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू शरत चंद्र बोस यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माता व धर्मा प्रोडक्शनचे संस्थापक यश जोहर यांचा जन्मदिन.
  • सन १९६८ साली सेवानिवृत्त पाकिस्तानी क्रिकेटपटू व कर्णधार सईद अनवर यांचा जन्मदिन.
  • सन १९७१ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व सलामीवीर फलंदाज देवांग गांधी यांचा जन्मदिन.

६ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९०७ साली नोबल पारितोषिक विजेता प्रख्यात फ्रेंच कवी आणि निबंधलेखक सुल्ली प्रुडहोमी(Sully Prudhomme) यांचे निधन.
  • सन १९६३ साली मद्रास सरकारतर्फे राष्ट्रीय कवी पदवी ग्रहण करणारे प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक कवी तसचं, जपानी ग्रंथांचे कन्नड भाषेत भाषांतर करणारे महान भाषांतरकार मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. यांना कन्नड भाषेव्यतिरिक्त अन्य २५ भाषेचे ज्ञान होते.
  • सन १९७२ साली प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतातील सरोद वादक व संगीतकार, शिक्षक उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचे निधन.
  • सन २००९ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व पंजाब राज्याचे माजी तेरावे मुख्यमंत्री हरचरण सिंह ब्रार यांचे निधन.

मित्रांनो, वरील लेख आपणास स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे तरी आपण या लेखाचे महत्व समजून वाचन करावे व इतरांना सुद्धा हा लेख पाठवा. धन्यवाद

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved