जाणून घ्या 7 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

7 November Dinvishes

७ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देशविदेशांत काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या याशिवाय काही प्रसिध्द व्यक्तीचे जन्मदिवस सुध्दा ह्या दिवशी येतात,  त्याचबरोबर आजच्या तारखेला निधन पावलेल्या व्यक्तींची माहिती आपणाला देणार आहोत , चला तर मग बघूया आजचा दिनविशेष

जाणून घ्या 7 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 7 November Today Historical Events in Marathi

7 November History Information in Marathi
7 November History Information in Marathi

7 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 November  Historical Event

 • १८७६ साली आजच्याच दिवशी प्रसिध्द कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी पच्छिम बंगाल येथील कांतल पाडा ह्या गावी सुप्रसिध्द ‘वंदे मातरम’ ह्या गीताची रचना केली होती.
 • फ्रेंक्लीन डी रूजवेल्ट १९४४ साली आजच्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून चौथ्यांदा नियुक्त झाले होते.
 • १९४४ साली जॉर्डन या देशाचे संविधान पारित करण्यात आले होते.
 • ग्वाटेमाला या ठिकाणी २०१२ साली भीषण भूकंप झाला होता ज्यात ५२ लोक मृत्युमुखी पडले होते.
 • काश्मीर येथील प्रसिध्द कवी रहमान राही यांना २००८ साली ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
 • अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने १९९६ साली आजच्याच दिवशी मार्स ग्लोबल सर्वेअर चे प्रक्षेपण केले होते.
 • तत्कालीन सेवियत संघाने १९६८ साली परमाणु परीक्षण केले होते.
 • श्रीलंकेची तत्कालीन राष्ट्रपती चंद्रिका कुमारतुंगाने २००३ साली आणीबाणी ची घोषणा मागे घेतली होती.
 • तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती बील क्लिन्टन यांनी १९९८ साली भारत व पाकिस्तान या दोन देशांवर लावलेल्या निर्बंधावर सूट देण्याची घोषणा केली होती.

7 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • महान क्रांतिकारी बिपिनचंद्र पाल यांचा १८५८ साली जन्म झाला होता.
 • राजनीतीचे मर्मज्ञ कार्यकर्ता पंडित विश्वंभर नाथ यांचा १८३२ साली जन्म होता.
 • सुप्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी हिचा १८६७ साली जन्म झाला होता.
 • वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकट रामन (सी.व्ही.रमण) यांचा १८८८ साली जन्म झाला होता.
 • शेतकरी नेते तसेच संसद सदस्य एन जी रंगा यांचा १९०० साली जन्म झाला होता.
 • प्रसिध्द भारतीय कवी व साहित्यकार चंद्रकांत देवताळे यांचा १९३६ साली जन्म झाला होता.
 • दक्षिणात्य चित्रपट सृष्टीचे सुप्रसिध्द नट कमल हसन यांचा १९५४ साली जन्म झाला होता.

7 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 November Death / Punyatithi / Smrutidin

 • मुघल शासनाचे अंतिम शासक बहादूर शाह जाफर यांचा १८६२ साली रंगून येथे मृत्यू झाला होता.
 • भारताचे प्रसिध्द राजनीती मर्मज्ञ, सामाजिक कार्यकर्ता अश्विनी कुमार दत्त यांचा १९२३ साली मृत्यू झाला होता.
 • प्रसिध्द वैद्य व राष्ट्र सेवक जीवराज मेहता यांचे १९७८ साली निधन झाले होते.
 • भारतीय हरित क्रांतीचे जनक सी सुब्रमन्यम यांचे यांचे २००० साली निधन झाले होते.
 • पद्मभूषण सन्मान प्राप्त समाज सेविका तारा चेरियन यांचे २००० ह्या वर्षी निधन झाले होते.
 • निर्देशक व कवी बाप्पादित्य बंदोपाद्ध्याय यांचे २०१५ या वर्षी निधन झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here