Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

वैदिक गणित काय आहे?

वैदिक गणित ही प्राचीन गणित सोडवण्याची पद्धत आहे. वैदिक गणितातील सूत्रांचा उपयोग करून आपण गणितातील मोठे मोठे हिशोब अचूक व जलद गतीने करू शकतो. स्वामी भारती कृष्ण तीर्थ जी यांनी वैदिक गणिताचा अभ्यास अथर्ववेदतून केला व तो जगा समोर मांडला. स्वामी कृष्ण तीर्थ जी नी वैदिक गणितावर एक पुस्तक लिहिले त्यामध्ये १६ सूत्र आणि १३ उप-सूत्र आहे.

वैदिक गणित काय आहे? – Vedic Maths in Marathi

Vedic Maths in Marathi
Vedic Maths in Marathi
वैदिक गणिताची संपूर्ण अभ्यास १६ सूत्र आणि १३ उप-सूत्र मध्ये समाविष्ट आहे. श्री भारती कृष्ण तीर्थ यांना वैदिक गणिताचे जनक मानले जाते. १९११ ते १९१८ या कालखंडात श्री जगद्गुरू शंकराचार्य स्वामी भारती कृष्णा तीर्थजी हे संन्यासी जीवन जगत होते या काळात त्यांनी वेदांताचा अभ्यास केला आणि वैदिक गणिताचे १६ सूत्र शोधून काढले. वैदिक गणिता वर श्री कृष्ण तीर्थजी आणखी अभ्यास करणार होते पण त्याच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाला आणि १९६० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

वैदिक गणिताचे महत्त्व – Importance of Vedic Maths

  1. वैदिक गणिताच्या मदतीने आपण गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ इत्यादी गणितातले प्रकार सहज सोडवू शकतो.
  2. वैदिक गणिताचा उपयोग करून आपण गणितातील हिशोब १० ते १५ पटीने जलद गती ने करू शकतो.
  3. तुम्ही वैदिक गणिताचा उपयोग करून गणित करायची गती वाढवू शकता आणि उत्तर पण अचूक येते.
  4. वर्ग १ला ते १२वी पर्यंत सर्वच वर्गाचे विद्यार्थी म्हणजे जिथे जिथे अंकगणिताचा वापर येतो तिथे वैदिकगणिताचा उपयोग करू शकतो.
  5. वैदिक गणित जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला पाळे फक्त ९ पर्यंत पाठ करावे लागतील. तुम्हाला जास्त पळे पाठ कार्याची गरज नाही कारण वैदिक सूत्रांचा उपयोग करून तुम्ही मोठे मोठे गणित short cut method ने तुम्ही सोडवू शकता.
  6. वैदिक गणिताचे ज्ञान असेल तर तुम्हाला हिशोब करताना बोटावर मोजत बसण्याची गरज राहणार नाही आणि कागदावरचे rough work सुद्धा कमी होणार.
  7. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यास वैदिक गणित मदत करते.
  8. तर्क शक्तीचा विकास होण्यात वैदिक गणित मदत करते.
  9. वैदिक गणित शिकण्यास सोपी आणि गमत शीर आहे.

सर्व विध्यार्थिनी वैदिक गणित का शिकावे? – Vedic Maths for Kids

आपण सर्व स्पर्धेच्या जगात जगतो. आजकाल कोणत्याही शासकीय नोकरीसाठी आपल्याला स्पर्धा परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत गणिताचा विषय असतो आणि या विषयाला कमीत कमी एकूण परीक्षेच्या २०% ते २५% गुण असतात.स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा उपयोग केला तर आपले उत्तर बरोबर येते पण आपला पुष्कळ वेळ खर्च होतो. त्यामुळे उरलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ मिळत नाही.पण जर आपण वैदिक पद्धतीचा उपयोग करून गणित सोडवले तर आपले उत्तर लवकर व अचूक येते आणि आपला बराच वेळ वाचतो. हा उरलेला वेळ आपण दुसरे प्रश्न सोडवण्यासाठी वापरू शकतो. गणित हा स्पर्धा परीक्षेचा सर्वाथ जास्त गुण प्राप्त करून देणारा विषय आहे फक्त त्याला वैदिक गणिताचे सूत्रे वापरून सोडवले तर आपल्याला नक्कीच चांगले गुण मिळतील.

वैदिक गणितातील सूत्रे – Vedic Maths Sutras

१६ मुख्य सूत्रांची यादी – 16 Sutras of Vedic Maths

सूत्र १एकाधिकेन पूर्वेण
सूत्र २निखिलं नवत: चरमं दशत:
सूत्र ३उर्ध्व-तिर्यग्भ्याम
सूत्र ४परावार्त्या योजयेत
सूत्र ५शून्यं साम्यासमुच्चये
सूत्र ६शून्यंमन्यत
सूत्र ७संकलन व्यवकलनाभ्याम
सूत्र ८पुराणापुराणाभ्याम
सूत्र १चलनकलनाभ्याम
सूत्र १०यावदूनम
सूत्र ११व्यष्टिसमष्टि:
सूत्र १२शेषाण्यङ्केन चरमेण
सूत्र १३सोपान्त्यद्वयमन्त्यम्
सूत्र १४एकन्युनेन पूर्वेण
सूत्र १५गुणितसमुच्चयः
सूत्र १६गुणक समुच्चयः

१३ उप-सूत्रांची यादी – 13 Sub Sutras of Vedic Maths

सूत्र १आनुरुप्येण
सूत्र २शिष्यते शेषसंज्ञः
सूत्र ३आद्यं आद्येन् अन्त्यम् अन्त्येन
सूत्र ४केवलैः सप्तकं गुण्यात्
सूत्र ५वेष्टनम्
सूत्र ६यावदूनं तावदूनम्
सूत्र ७यावदूनं तावदूनीकृत्य वर्गं च योजयेत्
सूत्र ८अन्त्ययोर्दशकेऽपी
सूत्र १अन्त्ययोरेव
सूत्र १०समुच्चयगुणितः
सूत्र ११लोपनस्थापनाभ्याम्
सूत्र १२विलोकनम्
सूत्र १३गुणितसमुच्चयः समुच्चयगुणितः
निष्कर्ष:-शालेय दिवसात आपल्याला गणित विषय नेहमी कठीण जातो कारण आपले गणिताचे पाळे पाठ नसतात त्यामुळे गणित सोडवताना आपल्याला बरेच अडचणी जातात. पण जर आपण शालेय जीवनातच जर वैदिक गणिताची सूत्रे आपण शिकून घेतली तर आपल्याला ९ च्या पुढे पाळे पाठ करण्याची गरज राहणार नाही.आणि आपल्या मनातून गणिताची भीती सुद्धा निघून जाणार. शालेय जीवनात जर आपण वैदिक गणित शिकलो तर पुढे चालून आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा देऊ तेव्हा आपल्याला नकीच त्याचा फायदा होणार.

वैदिक गणिता बाबतीत नेहमी विचारले जाणारे प्रश्न – Maths Questions and Answers

१. वैदिक गणित काय आहे? (What is Vedic Maths?) उत्तर: वैदिक गणित ही गणितातील आकडेमोड करण्याची प्राचीन पद्धत आहे.२. वैदिक गणित कोणी शोधले? (Who Invented Vedic Maths?) उत्तर: जगद्गुरू शंकराचार्य स्वामी भारती कृष्णा तीर्थजी महाराज यांनी वैदिक गणित वेदांचे अध्यन करताना शोधून काढले.३. वैदिक गणित कोणत्या वर्गासाठी उपयोगी आहे? उत्तर: वैदिक गणित ३ री ते १२ वी वर्गाच्या विध्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.४. वैदिक गणिताचे सूत्र वापरून आपण गुणाकार आणि भागाकार करू शकतो का? उत्तर: हो वैदिक गणिताचे सूत्र वापरून आपण गुणाकार आणि भागाकार पण सहज करू शकतो.५. वैदिक गणित अबकॅस पेक्षा उपयोगी कसे उपयोगी आहे? उत्तर:
स्पर्धा परीक्षे मध्ये तुम्हाला परीक्षा केंद्रावर कोणत्यापण प्रकारचे मोजण्याचे यंत्र नेण्याची अनुमती नसते त्यामुळे स्पर्धा परीक्षाच्या विध्यार्थ्यानसाठी वैदिक गणित हे अबकॅस पेक्षा जास्त उपयोगी आहे.
Editorial team

Editorial team

Related Posts

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती
Career

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

by Editorial team
January 26, 2024
महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन
Career

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

by Editorial team
January 26, 2024
MS Excel म्हणजे काय?
Career

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

by Editorial team
November 9, 2023
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved