Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

आपल्यातील शक्तीला ओळखण्यासाठी एक नवीन प्रेरणा देणारी कथा

Gharichi Marathi Gosht

एकदा जंगलात अचानक जोराचे वादळ सुरू होते, जंगलातील सर्व पक्षी चहूकडे किलबिल करत उडून जातात, प्राणी इकडे तिकडे सैरावैरा धावत असतात, जोराचा वारा सुटलेला पाहून सर्व प्राणी आणि पक्षी जंगलात संकटापासून वाचण्यासाठी सहारा शोधत असतात. याचदरम्यान आकाशात उंच उडणारी घार सुध्दा आपल्या घरट्याला पायांच्या पंजात घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते, पण त्याचवेळी घाईत असणाऱ्या घारीच्या पायातील घरट्यातून एक अंडे खाली निसटते, घारी ला वाटतं की घरट्यातून पडलेले अंडे आता जमिनीवर पडून फुटले असेल आणि ते त्याकडे दुर्लक्ष करून घरट्यातील बाकी अंड्यांना घेऊन उडून जाते.

पण त्या घारीच्या घरट्यातून पडलेले अंडे खाली जमिनीवर न पडता, ते एका कावळ्याच्या घरट्यात पडते. काही वेळा नंतर जंगलातील वातावरण सुध्दा शांत होतं, आणि सगळीकडे प्राण्यांची रेलचेल सुरू होऊन जाते. पण जेव्हा कावळा त्याच्या घरट्यात येऊन पाहतो तर एक जास्तीचे अंडे त्याला दिसते पण तो विचार करतो आधी आपल्या मोजण्यात काही तरी गडबड झाली असेल, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून अन्न शोधण्यासाठी बाहेर उडून जातो, तेच त्यादरम्यान त्या घरट्यात असणाऱ्या अंड्यांमधून पिले जन्म घेतात, त्या घरट्यात असलेल्या घारीच्या अंड्यातून सुध्दा एक पिल्लू बाहेर येते. तेवढ्यात कावळा तेथे येतो आणि आपल्या घरट्यातील पिल्लांना पाहून आनंदित होतो.

आपल्यातील शक्तीला ओळखण्यासाठी एक नवीन प्रेरणा देणारी कथा – Best Marathi Motivational Story

Marathi Motivational Story
Marathi Motivational Story

 

पण त्याच्या घरट्यात त्याला एक पिल्लू दिसत जे इतरांपेक्षा वेगळं असतं. पण त्याकडे लक्ष न देता तो सर्व पिलांना घरट्यात खायला काहीतरी घेऊन जाण्यासाठी अन्नाच्या शोधात बाहेर जातो. आणि खायला काहीतरी घेऊन परत येतो. असेच काही दिवस जातात. आता वेळ असते ते पिलांना प्रशिक्षण देण्याची मग त्या सर्व पिलांना कावळा त्याच्या प्रकारे सुरुवातीला प्रशिक्षण देत असतो, सुरुवातीला कसे चालावे? आकाशात कशी झेप घ्यावी? ह्या सर्व गोष्टीला शिकवले जाते.

पण जेव्हा घारीच्या पिलाला कावळा उडायचे कसे हे शिकवत असतो तेव्हा घारीचे पिल्लू कावळ्याने सांगीतल्यापेक्षा उंचीवर उडत असते, तेव्हा त्या पिल्लाला कावळा म्हणतो जास्त उंचीवर उडायचे नाही, कारण वरती आपल्या साठी योग्य वातावरण नाही, असे सांगून त्याला उंच उडण्यासाठी कावळा मना करतो, आणि त्यामुळे घारीचे पिल्लू कावळ्याने सांगितलेल्या उंचीवरच उडतो, असे बरेच दिवस होत निघून जातात. घारीचे पिल्लू कावळ्याने सांगितलेल्या गोष्टींना मानत जात असतो. आणि त्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतो. एक दिवस ते घारीचे पिल्लू त्याच्या पेक्षा उंचीवर उडणारे पक्षी पाहतो, तेव्हा तो कावळ्याला विचारतो, की एवढ्या उंचीवर हे सर्व कसे काय उडत आहेत?

तेव्हा कावळा उत्तर देतो की, ते पक्षी उंचीवर उडण्यासाठी बनलेले आहेत, आपण नाही!  हे ऐकून त्या पिल्लाचे मन नाराज होते आणि तेथून तो निघून जातो, असेच बरेच दिवस जातात आता ते घारीचे पिल्लू मोठे झालेलं असतं, एक दिवस त्या घारीच्या पिल्लाला उडताना एक घार पाहते तेव्हा वरती उडणारी घार विचार करते की हा पक्षी दिसायला आपल्या सारखा आहे, तरी सुध्दा एवढ्या खाली का उडतो आहे? तेव्हा वरून ती घार खाली त्याच्याकडे उडत येते, आणि त्याला विचारते की तू खाली का उडत आहेस? तेव्हा तो सांगतो की मला इथं पर्यंतच उडता येत! मी ह्यापेक्षा उंच उडण्यासाठी बनलेलो नाही आहे. हे ऐकून उंच उडणारी घार म्हणते की, अरे! तू एक घार आहेस तू सुध्दा उंच आकाशात उडू शकतोस, फक्त एक वेळ प्रयत्न तर करून पहा!

पण ते घारीचे पिल्लू म्हणते, नाही! मला सांगितले आहे की, मी फक्त एवढ्याच उंचीवर उडू शकतो आणि जर जास्त उंचीवर उडायचा प्रयत्न केला तर मी खाली पडून मरण पावू शकतो! कारण मी उंच उडण्यासाठी बनलेलो नाही आहे. हे ऐकून घार त्याला म्हणते,

“पण एक वेळ प्रयत्न तर करू शकतो ना”

आणि त्याला  आकाशात उंच घेऊन ती घार उडते. सुरुवातीला घारीचे पिल्लू थोडेशे डगमगते, थोडेसे भीते सुध्दा, पण काही वेळा नंतर आकाशात एक उंच भरारी घेते. आणि नेहमी साठी आकाशात उंचच उंच उडत राहते. आपल्या आजूबाजूला सुध्दा नेहमी आपल्याला एकच गोष्ट ऐकायला मिळते की जीवनात काही तरी मोठे काम करणे आपल्या जमणार नाही, जसे

“जेवढे चादर आहे तेवढेच पाय पसरवायला हवे”

अश्या प्रकारे भरपूर लोक आपल्या आजूबाला बोलताना दिसतील पण आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे ती गोष्ट करा. कारण लोक नाव ठेवतच असतात चांगले केले तरीही आणि वाईट केले तरीही. म्हणून आपणही एक घारीच्या पिल्लासारखे जीवनात उंच उडण्यासाठी बनलेले आहात, हे विसरू नका, आपण ते सर्व करू शकता जे एका यशस्वी व्यक्तीने केले आहे. फक्त प्रयत्न प्रामाणिक ठेवा यश एक दिवस हमखास मिळेलच.

आशा करतो आपल्याला लिहिलेली ही स्टोरी आवडली असेल आपल्याला लिहिलेली ही स्टोरी आवडली असेल तर या स्टोरी ला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Value Based Story in Marathi
Marathi Stories

पाहायचा दृष्टीकोन कसा यावर बरेचश्या गोष्टी अवलंबून असतात. अशीच एक मजेदार गोष्ट

Value Based Story in Marathi बरेचश्या गोष्टी दृष्टिकोनावर अवलंबून असतात, आपला एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी दृष्टिकोन कसा ठेवतो, हे महत्वाचे आहे...

by Vaibhav Bharambe
August 5, 2020
Marathi Story on Life
Marathi Stories

जीवनातील दुःख बाजूला सारून नवीन रित्या जीवन जगण्याची उमेद जागवणारी कथा

Marathi Story on Life आयुष्यात अनेक वाईट प्रसंग नेहमी समोर येतात, आणि आपल्याला त्यांचा सामना सुध्दा करावा लागतो, पण या...

by Vaibhav Bharambe
August 1, 2020
Marathi Story on Stress Management
Marathi Stories

तणावापासून मुक्त करेल ही छोटीशी स्टोरी! एकदा वाचूनच पहाच…

Marathi Story on Stress Management देशात आज बरेच लोक तणावाचे शिकार होऊन स्वतःचा जीव सुध्दा देण्यास मागे पुढे पाहत नाहीत,...

by Editorial team
July 31, 2020
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved