Thursday, May 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

मूठभर गहू.. एक शिकवण देणारी बोधकथा

Marathi Bodha Katha 

जीवनात मनुष्याला कधी ना कधी जबाबदारी सांभाळावी लागतेच. मग ती परिवाराची असो किंवा कामाची असो, कमी संसाधनामध्ये मोठे कसे बनता येईल याकडे आपण लक्ष्य द्यायला हवे, जेणेकरून आपण कोणाला दोष न देता जीवनात पुढे जाऊ शकणार. आजच्या लेखात आपण अशीच छोटीशी एक स्टोरी पाहणार आहोत जी आपल्याला जीवनात एक शिकवण देऊन जाईल. तर चला पाहूया ही छोटीशी कथा.

जबाबदारीची जाणीव करून देणारी एक बोधकथा – Story in Marathi for Child

Story in Marathi for Child
A story in Marathi for Child

एका गावात एक श्यामलाल नावाचा व्यक्ती राहत असतो घरचा श्रीमंत असतो, त्याला तीन मुले सुध्दा असतात, श्यामलाल च्या पत्नीचे निधन झालेले असते, आणि तो आपल्या मुलांच्या सोबत राहत असतो, श्यामलाल चे मुलं सुध्दा त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत सुखाने संसार करत असतात, पण श्यामलाल त्याच्या पत्नीच्या निधनानंतर एकटा पडलेला असतो आणि त्याला नेहमी एक चिंता येत असते की आपण मेल्यानंतर आपली संपत्ती कोणाच्या नावावर करावी. म्हणून तो थोडा विचारात असतो. पण एक दिवस त्याला यावर कल्पना सुचते आणि तो त्याच्या तीनही मुलांना आपल्या जवळ बोलावतो. तेही त्यांच्या मुलांना आणि पत्नीला घेऊन.

श्यामलाल चे तीनही मुले तेथे येतात, तेव्हा तिन्ही मुले श्यामलाल ला विचारतात की तुम्ही आम्हाला येथे कशासाठी बोलावले आहे, त्यावर श्यामला त्यांना म्हणतो की पोरांनो मी चार–पाच वर्षांसाठी तीर्थयात्रेला जात आहे, हे सांगत त्याने प्रत्येक मुलाच्या हातावर एक मूठ गहू ठेवले. आणि सांगितले की जोपर्यंत मी तिर्थयात्रेवरून परत येणार हे गहू मला तुम्ही परत करायचे.

आणि हे बोलून श्यामलाल दुसऱ्या दिवशी तीर्थयात्रेला निघून गेला आता तिन्ही मुले आपापल्या घरी मूठभर गव्हावर विचार करू लागले. सर्वात मोठ्या मुलाने आपल्या पत्नीला म्हटले की म्हातारपणात या थेरड्याची बुध्दी भ्रष्ट झाली, मूठभर गहू चार पाच वर्ष सांभाळायला सांगतो आहे याचा काय फायदा होईल असे म्हणत मोठ्या मुलाने त्या मूठभर गव्हाच्या दाण्यांना बाहेर फेकून आला.

तेच दुसऱ्या मुलाने त्याच्या पत्नीला म्हटले म्हाताऱ्याने दिलेल्या गव्हाला दळणाच्या गव्हात टाकून त्या गव्हाला दळायला घेऊन जा आणि त्याच्या मस्त पोळ्या बनवून जेवायला वाढ. असे सांगितल्यावर त्याच्या पत्नीने त्याने सांगितल्या प्रमाणे त्या मूठभर गव्हाच्या दाण्यांना दळणात मिसळून दळायला घेऊन गेली आणि त्या कणकीच्या पोळ्या करून जेवायला वाढले.

तेच तिसऱ्या मुलाने वडिलांनी दिलेल्या दाण्यांना स्वतः जवळ ठेवले आणि त्याने पत्नीला सांगितले की आपल्या वडिलांनी आपल्याला मूठभर गहू देऊन गेले आपण त्यांना हेच गहू मोठ्या प्रमाणात परत करू. आणि त्याने दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन त्या गव्हाची पेरणी केली,बरेच दिवस निघून गेले पेरलेल्या गव्हाला दाणे आले तिसऱ्या मुलाने ते उगलेले दाणे परत दुसऱ्या वर्षी शेतात पेरले, त्यांनंतर दुसऱ्या वर्षी एक पोते भरून शेतात गहू निघाले, याच एक पोते गव्हाला त्या मुलाने परत पुढच्या वर्षी शेतात पेरले, आणि त्या वर्षी शेतात त्या मुलाला बरेच गव्हाचे पीक आले, त्या पिकाला आणायला त्याला बैलजोडी घेऊन जावे लागले. त्यांनंतर त्याच्या पुढच्या वर्षी परत त्याने त्या गव्हाला पेरले आणि यावर्षी त्याच्याकडे गव्हाचे एक गोदाम भरले होते. आणि यावर्षी श्यामलाल त्याच्या तिर्थयात्रेवरून घरी येणार होता.

आणि काही दिवसांनी श्यामलाल घरी येतो. आणि तिन्ही मुलांना जवळ बोलावून विचारतो की मी दिलेले गव्हाचे दाणे मला परत करा. तेव्हा दोन भाऊ कोणतेही उत्तर देत नाही तेव्हा तिसरा मुलगा श्यामलाल ला गोदामाजवळ घेऊन जातो आणि गव्हाच्या पोत्यांनी भरलेल्या गोदामकडे बोट दाखवत म्हणतो की हे आहेत तुमचे मूठ भर गहू. श्यामलाल ते पाहून थक्क होतो आणि तिन्ही भावांच्या समोर बोलतो की, मुलांनो मी हे सर्व तुमची परिक्षा पाहण्यासाठी केले होते कारण मला पाहायचे होते की तुमच्यापैकी माझ्या संपत्तीला कोण व्यवस्तीत सांभाळू शकतो. आणि या परीक्षेत मूठभर गव्हाचा योग्य उपयोग लहान मुलाने केला आणि त्या मुलाजवळ स्वतःच्या तिजोरीची चावी श्यामलाल देतो, आणि त्याच वेळी सर्व संपत्ती त्याच्या नावावर करतो.

तर या गोष्टीवरून आपल्याला एवढे शिकायला मिळाले की जीवनात जबादारी कश्या प्रकारे पार पाडावी. मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हाती असते. कमी संसाधनांचे कारणे देऊन जबादारी पासून पळ काढू नये प्रयत्न प्रामाणिक असले की यश सुध्दा आपल्याला अवश्य मिळते.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आवडली असणार आपल्याला ही स्टोरी आवडली असल्यास या स्टोरी ला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

Value Based Story in Marathi
Marathi Stories

पाहायचा दृष्टीकोन कसा यावर बरेचश्या गोष्टी अवलंबून असतात. अशीच एक मजेदार गोष्ट

Value Based Story in Marathi बरेचश्या गोष्टी दृष्टिकोनावर अवलंबून असतात, आपला एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी दृष्टिकोन कसा ठेवतो, हे महत्वाचे आहे...

by Vaibhav Bharambe
August 5, 2020
Marathi Story on Life
Marathi Stories

जीवनातील दुःख बाजूला सारून नवीन रित्या जीवन जगण्याची उमेद जागवणारी कथा

Marathi Story on Life आयुष्यात अनेक वाईट प्रसंग नेहमी समोर येतात, आणि आपल्याला त्यांचा सामना सुध्दा करावा लागतो, पण या...

by Vaibhav Bharambe
August 1, 2020
Marathi Story on Stress Management
Marathi Stories

तणावापासून मुक्त करेल ही छोटीशी स्टोरी! एकदा वाचूनच पहाच…

Marathi Story on Stress Management देशात आज बरेच लोक तणावाचे शिकार होऊन स्वतःचा जीव सुध्दा देण्यास मागे पुढे पाहत नाहीत,...

by Editorial team
July 31, 2020
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved