Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २२ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

22 October Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून अश्या काही घटना जाणून घेणार आहोत ज्या आपल्या इतिहासात घडून गेल्या आहेत.  आजचा दिवस हा बऱ्याच अश्या महत्पूर्ण घटनांचा साक्षीदार असा दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या राष्ट्राला भाक्रा हे धारण अर्पण केलं होत. तसचं, मित्रांनो, आजच्या दिवशी आपल्या देशाच्या अंतरीक्ष संस्थेने स्वदेश निर्मित पहिले चांद्रयान १ हे प्रक्षेपित केलं होत. याशिवाय, आनखी काही महत्पूर्ण घटना आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २२ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 22 October Today Historical Events in Marathi

22 October History Information in Marathi
22 October History Information in Marathi

२२ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 October Historical Event

  • इ.स. १७९७ साली पॅरिस देशातील आंद्रे जॅक्कस गार्नेरिन हे बलूनच्या साह्याने १००० मीटर उंच जाऊन तेथून खाली उडी मारून पॅराशूटच्या साह्याने जमिनीवर उतरणारे पहिले मानव बनले.
  • इ.स. १८६७ साली नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया ची पायाभरणी करण्यात आली.
  • इ.स. १८७८ साली सेलफोर्ट येथे ब्राऊंटन आणि स्वींटन संघा दरम्यान पहिला रग्बी सामना खेळला गेला.
  • सन १९६३ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाक्रा धरण भारताला अर्पण केलं.
  • सन १९६४ साली फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांनी नोबल पुरस्कार घेण्यास नकार दिला.
  • सन १९६८ साली अपोलो ७ हे अंतरीक्ष यान पृथ्वीच्या सुमारे १६३ फेऱ्या पूर्ण करून अटलांटिक महासागरात सुरक्षितपणे उतरले.
  • सन २००८ साली भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान १)  चे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून केले होते.
  • सन २०१६ भारतीय कबड्डी संघाने भारतातील अहमदाबाद येथे आयोजित कबड्डीचा विश्व कप जिंकला.

२२ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १६८८ साली इतिहासातील सर्वात शक्तिशाली इराणी राज्यकर्ते नादिर शाह यांचा जन्मदिन
  • इ.स. १८७३ साली गोस्वामी तुलसीदास यांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी उर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्मदिन.
  • सन १९०० साली भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानी अश्फाकुल्ला खान यांचा जन्मदिन.
  • सन १९०३ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचा जन्मदिन.
  • सन १९४२ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुबीर सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली भारतीय वंशीय अमेरिकन लेखक आणि वैकल्पिक-वैद्यकीय सल्लागार दीपक चोप्रा यांचा जन्मदिन.

२२ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 October Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १६८० साली मेवाड येथील सिसोदिया राजवंशाचे शासक महाराणा राज सिंह यांचे निधन.
  • इ.स. १८९३ साली पंजाब येथील शीख साम्राज्य शासक महाराज रणजितसिंह यांचे छोटे पुत्र व  शेवटचे शीख सम्राट महाराज दुलीप सिंह यांचे निधन.
  • सन १९३३ साली भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे देश विदेशातील प्रचारक, प्रवर्तक व भारतीय राजकीय नेता तसचं, सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे बंधू विठ्ठल भाई पटेल यांचे निधन.
  • सन १९५४ साली भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील बंगाली भाषिक कवी, लेखक, कादंबरीकार आणि निबंधकार जीवनानंद दास यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved