जे होतं ते चांगल्यासाठी होतं! एक आशावादी विचारांनी भरलेली छोटीशी कथा जी प्रत्येकाने वाचावी

Akbar Birbal Story in Marathi

दैनंदिन जीवनात आपल्या सोबत बऱ्याच अश्या गोष्टी घडतात ज्या आयुष्यात आपल्याला नकोश्या वाटतात, पण आपल्या मनाप्रमाणे जर जीवनाचे चाकं फिरले असते तर मग गोष्टच वेगळी असती पण तसे काहीही होत नाही. आणि जीवनात अनेक वेळा सुखाचा आणि दुःखाचा डोंगर पार करत राहावे लागते, जीवनात कधी हसावे तर कधी रडावे लागते. पण आपल्या जीवनात आपण एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन चाललात तर आपल्याला कोणत्याही समस्येवर लगेच समाधान काढता येईल.

तर आपण आजच्या लेखात अशीच एक छोटी स्टोरी पाहणार आहोत, ही स्टोरी बऱ्याच लोकांनी अगोदर कुठे तरी ऐकली,वाचली किंवा पाहिली असेलच परंतु आजच्या लेखात आपण त्या स्टोरी ला पुन्हा एकदा एका नव्या दृष्टीकोनाने पाहणार आहोत. तर चला पाहूया प्रेरणा देणारी एक छोटीशी स्टोरी. अकबर आणि बिरबलाच्या कथांपैकी ही एक छोटीशी स्टोरी आहे, जी आपल्याला जीवनात प्रत्येक परिस्तिथी मध्ये जगायला नेहमी एक प्रेरणा देईल. आणि जगण्याची आशा कायम ठेवेल.

अकबर-बीरबल यांची कहाणी – Akbar Birbal Story in Marathi with Moral

Akbar Birbal Story in Marathi
Akbar Birbal Story in Marathi

राजा अकबर यांचे मोठे साम्राज्य असते, त्यांच्या राज्यात प्रजा सुखी,आनंदी आणि सलोख्याने नांदत असते. अकबर च्या राज्यात एक चतुर व्यक्ती असतो आणि तो असतो बिरबल. कोणत्याही निर्णयावर विचार विमर्ष करण्यासाठी अकबर बिरबलाचा सहारा घेत असतो. आणि बिरबल सुध्दा मोठ्या सकारात्मकतेने प्रत्येक परिस्तिथीला योग्यरित्या पडताळून त्यावर आपले मत मांडत असतो, त्यामुळे अकबर आपल्या सोबत बिरबलाला कुठेही घेऊन जात असतो.

एक प्रकारे बिरबल एक असे पात्र असते जो प्रत्येक परिस्तिथी ला सकारात्मक दृष्टिकोनाने पाहत असतो. आणि त्यांनंतरच निर्णय घेत असतो. एक दिवस काय होते, अकबर आणि बिरबल जंगलात शिकारीसाठी जाण्याचे ठरवतात. अकबर आपले काही सैनिक आणि बिरबल ला सोबतीला घेऊन शिकारीसाठी जंगलात जातो. प्रजेच्या हिताविषयी गप्पा मारत मारत अकबर बिरबल जंगलात बरेच आतमध्ये निघून जातात.

त्यांनंतर अकबर शिकारीसाठी आपल्या मयानीमधून तलवार काढणार असतोच त्याचवेळी तलवार त्याच्या हाताच्या अंगठ्याला लागून अंगठ्यातून रक्त येण्यास सुरुवात होते. तो कावरा बावरा होतो कारण त्याला इजा झालेली असते पण जेव्हा बिरबल राजाची अशी अवस्था पाहतो तेव्हा तो म्हणतो, महाराज काळजी करू नका.

“जे होते ते चांगल्या साठी होते”

अकबर ला जखमेमुळे प्रचंड राग आलेला असतो. तो म्हणतो बिरबल मला एवढी इजा झाली आणि तू म्हणतो जे होते ते चांगल्या साठी होते. मी तुला एवढा जवळचा समजले आणि तू माझ्या झालेल्या इजेवर अश्याप्रकारे प्रतिक्रिया देतो. राजाला या गोष्टीचा राग येतो आणि तो सोबत असलेल्या सैनिकांना रागात सांगतो की बिरबल ला पकडून महालात घेऊन जा आणि तुरुंगात टाका, आणि उद्या सकाळी याला फाशी देऊन द्या.

सैनिक बिरबल ला घेऊन महालाकडे रवाना झाले आणि अकबर जंगलात शिकारीसाठी निघून जातो. समोर शिकारीला जाता जाता अकबराला काही आदिवासी लोक पकडतात, आणि त्यांच्या समूहाच्या ठिकाणी अकबरला घेऊन जातात. कारण त्यांच्या येथे एक उसत्व सुरू असतो आणि त्या उसत्वाच्या निमित्त त्यांच्या वनदेवीला एका बळीची आवश्यकता असते, म्हणून ते आदिवासी अकबरला पडकून घेऊन गेलेले असते. जेव्हा अकबरचा बळी देण्यासाठी देवीपुढे त्याला घेऊन गेल्या गेल्या जाते तेव्हा आदिवासी लोकांपैकी काही वरिष्ठ आदिवासींची नजर अकबरच्या अंगठ्या कडे पडते तेव्हा ते अकबरचा देवीला बळी देण्यासाठी नकार देतात आणि अकबर ला तेथून सोडून देण्यात येते.

कारण ज्या व्यक्तीला अगोदरच जखम झालेली असेल, त्या व्यक्तीची बळी देवीला दिल्या जात नसते. अशी आदिवासींची मान्यता होती. अकबर ला मोकळे सोडल्या नंतर तो जंगलात धावत सुटला आणि डोळ्यात होते अश्रू, कारण आज त्याचा जीव वाचला होता तो फक्त त्याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे. आणि तो रडत महालाकडे धावत होता कारण त्याने रागात एक निर्णय घेतला होता तो म्हणजे बिरबल ला सकाळपर्यंत फाशी देण्याचा.

तो पायी चालत सकाळपर्यंत महालात पोहचला, आणि तेव्हा बिरबलला फाशी लागणारच होती तेवढ्यात राजा अकबर तेथे पोहचला आणि त्याने फाशी थांबवण्यासाठी आदेश दिला, आणि बिरबल ला म्हणाला की मला क्षमा कर कारण तू योग्य म्हणत होता जे सुध्दा होते ते चांगल्या साठी होते, आणि घडलेली सर्व गोष्ट तो त्याला सांगतो आणि म्हणतो आज मी त्यामुळेच जिवंत आहे, आणि मी एवढा निर्दयी होतो की तुला फाशी द्यायला चाललो होतो.

यावर बिरबल तुटक्या फुटक्या आवाजात म्हणतो नाही महाराज जे होते ते चांगल्या साठीच होते, यावर अकबर म्हणतो वेडा आहेस का बिरबल, आता मी जर वेळेवर पोहचलो नसतो तर तुझा बळी गेला असता त्यावर बिरबल म्हणतो, पण मी तुमच्या सोबत जर शिकारीला तेथे आलो असतो तर त्या आदिवासींनी माझी बळी देवीला दिली असती ! म्हणून जे होते ते चांगल्या साठीच होते.

याचप्रमाणे आपल्या जीवनात सुध्दा बऱ्याच परिस्थिती अश्या घडतात की आपल्याला वाटत असतं की माझ्यासोबत असेच का झाले पण मी आपल्याला सांगू इच्छितो की तेव्हा त्या वेळी आपल्याला ते आपल्या सोबत अयोग्य झालेलं वाटत असेल पण ते आपल्या भविष्यासाठी चांगले असते.

आशा करतो आपल्याला लिहिलेली आजची छोटीशी स्टोरी आपल्याला आवडली असेल आपल्याला जर लिहिलेली छोटीशी स्टोरी आवडली असेल तर या स्टोरी ला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी आणि स्टोरींसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top