Home / History / चला जाणुन घेउया या अक्षरधाम मंदिराबाबत – Akshardham Mandir Information

चला जाणुन घेउया या अक्षरधाम मंदिराबाबत – Akshardham Mandir Information

Akshardham Mandir Information in Marathi

अक्षरधाम मंदीर हे भारतातील प्रसिध्द मंदीर आहे. हे दिल्लीतील एक प्रमुख आकर्षण मानले जाते. दिल्लीत येणारे 70% पर्यटक अक्षरधाम मंदिरात नक्कीच येतात.

हे जगतील विशालकाय मंदिरापैकी एक आहे यास स्वामीनारायण मंदिर असेही म्हणतात. याचा विशालकाय आकार स्वतःमध्ये एक आदर्श मानल्या जातो.

Akshardham Mandir Information in Marathi

चला जाणुन घेउया या अक्षरधाम मंदिराबाबत – Akshardham Mandir Information

अक्षरधाम किंवा स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे हे भारताची राजधानी दिल्ली येथे आहे. एक प्रसिध्द साहित्यीक आणि सांस्कृतिक केंद्र सुध्दा आहे. या मंदिरात आपणास हिन्दू धर्माच्या संस्कृतिचे साक्षात दर्शन घडते.

या मंदिरास डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी 6 नोव्हेंबर 2005 रोजी शासकीय रूपात उघडले होते. हे मंदिर यमुना नदीच्या तटावर स्थित आहे, हे मंदिर वास्तुशास्त्र व पंचरात्र शास्त्र यांच्या कठोर नियमानुसारच बनले आहे. या मंदिराच्या परिसरात अभिषेक मंडप, वॉटर शो, थीम गार्डन आणि तीन भव्य प्रदर्शनी व सहजआनंद दर्शन व निलकंठ दर्शन आणि संस्कृति दर्शन असे विविध भाग आहेत. स्वामी नारायण मंदिरा प्रति भक्तांचा विश्वास आहे की येथे ईश्वराचा वास आहे.

अक्षरधाम मंदिराचा इतिहास – Akshardham History

अक्षरधाम मंदिराची निर्मीती BAPS या संस्थेने केली आहे. बोचासनवासी श्री अक्षर पुरूषोत्तम स्वामीनारायण संस्था असे त्या संस्थेचे नाव आहे. आज हे मंदिर दिल्लीतील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. आज तर अक्षरधाम मंदिरा शिवाय दिल्लीचा विचारही होउ शकत नाही. आज हे मंदिर भारतिय हिन्दू धर्माचे एक मोठे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. येथील 3 प्रदर्शनीमध्ये देशभरातील हिन्दु धर्मीय कला, संस्कृति आणि साहित्याचे प्रदर्शन केले जाते.

अक्षरधाम मंदिराची वास्तुकला – Akshardham Temple Architecture

स्वामीनारायण अक्षरधाम काॅम्पलेक्सचे मुख्य आकर्षण अक्षरधाम मंदिर आहे. हे मंदिर 141 फुट उंच व 316 फुट रूंद आणि 350 फुट लांबीचे आहे. या मंदिरात ठिकठिकाणी नंदादिप व फुलांनी व पशु व इतर पवित्र चिन्हांनी सजवलेले आहे.

या मंदिरास मुख्यतः राजस्थानी गुलाबी दगडांनी व त्याचे चटईक्षेत्र पांढ.या इटालीयन मार्बल ने बनवले आहे. याची निर्मीती हिन्दु धार्मिक शिल्पशास्त्राच्या नियमानुसार करण्यात आली आहे. हिन्दुशिल्प शास्त्रानुसार यात धातुचा उपयोग वज्र्य केला आहे. यात स्टील आणि कॉक्रिटचाही वापर करण्यात आलेला नाही.

या मंदिरात 234 आभुषित केलेले खांब आहेत, 9 घुमट आणि 20,000 साधु संतांच्या प्रतिमा आहेत. मंदिराच्या खालच्या भागात गजेंद्र पीठ आहे तसच हत्तीस श्रध्दांजली देणारा एक स्तंभ ही आहे. हिन्दु साहित्य आणि संस्कृति मधे याचे विशेष महत्व आहे. यात 148 विशाल हत्तीची प्रतिमा बनवलेली आहे.

मंदिराच्या मध्यभागी विशाल घुमटाखाली 11 फुट उंचीची स्वामीनारायण भगवानांची अभयमुद्री मधील बैठी मुर्तिही आहे. स्वामीनारायण मंदिरातील प्रत्येक मुर्ती ही पंच धातुंनी बनलेली आहे. या मंदिरात राम – सिता, राधा – कृष्ण, शिव – पार्वती आणि लक्ष्मी – नारायण यांच्या मुत्र्या ही स्थापीत केल्या आहेत.

अक्षरधाम मंदिराबाबत रोचक माहिती – Facts About Akshardham Temple

 • अक्षरधाम मंदिरातील एक महत्वाचे आकर्षण म्हणजे गार्डन ऑफ इंडिया होय. हे एक विशाल हिरव्या गवताचे लॉन्स असनु येथे देशातील काही महत्वाच्या महापुरूषांच्या सैनिकांच्या, बालविरांच्या, महान महिलांच्या कास्य मुत्र्या आपले स्वागत करतांना दिसतात.
 • हे मंदिर एका विशाल सरोवराने घेरलेले आहे ज्यास नारायण सरोवर म्हणतात.
 • सरोवराजवळ 108 गोमुख सुध्दा बनविले आहे.
 • नारायण सरोवरात देशातील 151 विशाल सरोवर व नद्यांचे पाणी सोडले आहे.
 • या मंदिरात एक आकर्षक म्युझीकल कारंजा सुध्दा आहे. याचा शो दररोज सायंकाळी 5.15 ते 5.30 मिनीटांपर्यंत होतो.
 • येथे एक आकर्षक गार्डन आहे ज्याचे नाव कमलबाग असे आहे.
 • गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड मध्ये या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.
 • हे विश्वातील विशाल हिन्दु मंदिरांपैकी एक मंदीर आहे.
 • हया मंदिराला बनवण्याकरता 5 वर्षांचा कालावधी लागला. 11000 कारागिरांनी आणि असंख्य कामगारांनी येथे आपले श्रमदान दिले.
 • हे मंदिर भारतिय इतिहास आणि संस्कृतिचे दर्शन करवणारे मुख्य केंद्र आहे.
 • अक्षरधाम मंदिरात एक विशाल यज्ञकुंड आहे जो जगातील सर्वात विशाल यज्ञकुंड मानल्या जातो.
 • मंदिरात एक विशाल फिल्म स्क्रिन पण आहे ज्यावर स्वामीनारायण यांच्या जीवनाविषयी माहिती दाखविली जाते.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी अक्षरधाम मंदीर चा इतिहास बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा अक्षरधाम मंदीर  – Akshardham Temple History in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट: अक्षरधाम मंदीर – Akshardham Temple History  या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Shaniwar Wada Information in Marathi

पुण्यातील शनिवारवाडयाची रहस्यमय कहाणी

Shaniwar Wada Information in Marathi गड, किल्ले, वाडे, राजपाट मिळवणं आणि मिळाल्यानंतर त्या आपल्या ताब्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *