• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 16, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

शेवटचे मुगल शासक बहादूर शहा जफर

Bahadur shah zafar

भारतातील शेवटचे मुगल शासक म्हणून बहादूर शहा जफर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येतो. सन १८३७ ते १८५७ साला पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या उठावा पर्यंत ते शासक पदी होते. बहादूर शहा जफर यांचा शासन काळ फारच संकटमय राहिला आहे. ज्यावेळेला ते मुगल साम्राज्याचे शासक बनले त्यावेळी मुगलांची शक्ती फारच दुर्बल झाली होती.

शिवाय, भारतात इंग्रजांच्या “ईस्ट इंडिया कंपनीने” आपला पाया रोवला होता. इंग्रजानी भारतात स्थापण केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीमुळे त्यांचा भारतात सत्ता स्थापण करण्याचा पाया मजबूत झाला होता. या कंपनीच्या अधिकाराखाली इंग्रजांनी सर्व भारतावर राज्य करण्यास सरुवात केली.

व्यापाराच्या उद्देशाने इंग्रज भारतात आले होते, परंतु त्यांनी भारतातील सत्तेचा अभ्यास केला आणि त्यानंतर आपले साम्राज्य पसरविण्यास सुरवात केली. इंग्रजांनी वारसाहक्क आणि शासक पदाचा खालसा केला होता. त्यामुळे शासक पदावर असलेल्या मुगल बहादूर शहा जफर हे केवळ नाममात्र शासक बनले.

शिवाय, त्यांना ईस्ट इंडिया कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या रकमेतूनच(पेन्शन)  आपला खर्च भागवा लागत होता. सन १८५७ साली झालेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेला बहादूर शहा जफर यांनी इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याकरता क्रांतिकारी आणि विरोद्रोही याचं एका सम्राटा सारख नेतृत्व केलं.

या उठावादरम्यान भरतातील हिंदू आणि मुस्लीम यांच्या एकजुट शक्तीचे प्रमाण देण्यात आले. या उठावत बहादूर शहा जफर यांनी आपलं नियोजन व्यवस्थित केलं नाही परिणामी, त्यांचा इंग्रजांकडून पराभव करण्यात आला. यानंतर इंग्रजांनी त्यांना पकडून रंगून या ठिकाणी निर्वासित केलं.

इंग्रजांनी निर्वासित केलेल्या रंगून या ठिकाणीच बहादूर शहा जफर यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला होता. बहादूर शहा यांच्या कारकिर्दीत उर्दू शायरीचा मोठ्या प्रमाणता विकास झाला होता. बहादूर शहा जफर स्वत: एक प्रख्यात शायर आणि कवि होते. त्यांच्या उर्दू शायरी आणि त्यांच भारताप्रती असलेल प्रेम याकरता देशात आजसुद्धा त्याचं नाव घेतलं जाते.

बहादूर शहा जफर यांनी साहित्यिक क्षेत्रांत देखील आपले योगदान दिलं आहे. ते एक राजनेता आणि कवि असण्याबरोबर संगीतकार तसचं, सौंदर्यानुरागी(देखणे)  व्यक्ती होते. तसचं, त्यांना सुफी संताची उपाधी सुद्धा देण्यात आली होती. चला तर जाणून घेऊया महान  कवि आणि शायर असलेले मुगल शासक बहादूर शहा जफर यांच्या बद्दल काही विशेष बाबी:-

भारतातील शेवटचे मुगल शासक बहादूर शहा जफर – Bahadur Shah Zafar History In Marathi

Bahadur shah zafar

बहादूर शहा जफर यांच्या बद्दल माहिती – Bahadur Shah Zafar Information

पूर्ण नाव (Name)मिर्जा अबू जफर सिराजुद्दिन महम्मद बहादूर शहा जफर
जन्म (Birthday)२४ अक्टोबर १७७५ दिल्ली
मृत्यू (Death) ७ नोव्हेंबर १८६२, रंगून,बर्मा
आईचे नाव (Mother Name)लालबाई
वडिलांचे नाव (Father Name)अकबर शहा द्वितीय
पत्नी (Wife Name)
  • अशरफ महल,
  • अख्तर महल बेगम,
  • जीनत  महल ,
पुत्र (Children Name)
  • मिर्जा मुगल,
  • मिर्जा जवान बख्त,
  • मिर्जा शहा अब्बास,
  • मिर्जा खिज्र सुल्तान,
  • मिर्जा फतेह-उल-मुल्क बहादूर बिन बहादूर,
  • मिर्जा दारा बख्तमिर्जा उलुघ ताहिर

बहादूर शहा जफर यांचा जन्म, तसचं त्यांचे प्रारंभिक शिक्षण आणि जीवन – Bahadur shah zafar Biography

बहादूर शहा जफर यांचा जन्म २४ अक्टोबर १७७५ साली लाल बाई या हिंदू धर्मीय महिलेच्या पोटी झाला होता.  त्यांना बहादूर शहा द्वितीय च्या नावाने सुद्धा ओळखले जात असे. बहादूर शहा जफर यांनी सुरवातीला उर्दू, अरेबिक आणि पर्शियन शिक्षण घेतलं. याच बरोबर त्यांनी घोड्स्वारी, तिरंदाजी इत्यादी गोष्टींचे ज्ञान घेतले.

लहान पणापासूनच बहादूर शहा जफर यांना कविता, साहित्य, सुफी, संगीत आदीच्या प्रती खूप आकर्षण होतं. ते लहानपणापासूनच इब्राहीम जोक आणि असद उल्लाह खान गालिब यांच्या कविता वाचत असतं.

बहादूर शहा जफर यांचा विवाह – Bahadur shah zafar Marriage

बहादूर शहा जफर यांचा चार वेळा विवाह झाला होता.  त्यांच्या चार बेगमपैकी जफर यांची सर्वात प्रिय बेगम जीनत महल होती. जीनत महल सोबत बहादूर शहा जफर यांचा विवाह नोव्हेंबर १८४० साली झाला होता.

बहादूर शहा जफर यांचा शासन काळ – Bahadur shah zafar Reign

बहादूरशहा जफर यांचे वडिल अकबर शहा द्वितीय यांच्या मृत्यूनंतर सन १८३७ साली ते  मुगल सिहासनाच्या गादीवर बसले. ज्यावेळेस बहादूर शहा गादीवर आले होते, त्यावेळेस मुगलांची शक्ती खूपच कमकुवत झाली होती. लाल किल्ल्या व्यतिरिक्त त्याचं कोणतच साम्राज्य शिल्लक राहील नव्हतं.

दिल्लीवर सत्ता असलेल्या बहादूर शहा यांच्याकडे शासन करण्यासाठी फक्त दिल्लीजवळील शाहजाबाद किल्लाच  बाकी राहिला होता बहादूर शहा जफर यांना उत्तराधिकारी बनवायची त्यांच्या वडिलांची (अकबर) मुळीच इच्छा नव्हती. अकबर यांना आपल्या दुसरा मुलगा मिर्जा जहांगीर यांना उत्तराधिकारी बनवायचं होतं.

परंतु, त्यावेळेस मिर्जा जहांगीर यांनी इंग्रजांन सोबत युद्ध पुकारले होते. परिणामी त्यांना बहादूर शहा जफर यांना गादीवर बसवावं लागलं.  बहादूर शाह जफर एक अपात्र शासक होते. त्यांना राजकारणाची फारशी आवड नव्हती. बहादूर शहा राज्यकारभार सांभाळण्यास पात्र नाही, हे इंग्रजांनी देखील हेरलं होते.

यामुळे इंग्रज  बहादूर शहा जफर यांची फारशी भीती बाळगत नसतं. त्यांच्या कारकिर्दीत संगीत आणि साहित्य कलेला जास्त महत्व दिलं गेलं. तसचं, सर्व धर्मांचा ते समानतेणे सन्मान करत असतं.

१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक बहादूर शहा जफर – Bahadur shah zafar

१८५७ साली इंग्रजांनी चालविलेल्या अत्याचारी धोरणांखाली भारतीय नागरिक पूर्णपणे दबले गेले होते. त्यांच्या या वाढत चालेल्या अत्याचारा विरुद्ध आणि भारतातून इंग्रजांना हुसकावून देण्यासाठी भारतातील काही महान क्रांतीकारांनी, विद्रोकानी तसचं, रजा महाराजांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले.

या बंडाच्या प्रमुखपदी राजा- महाराजांनी मुगल बहादूर शहा जफर यांच्या नावाची निवड केली. कारण, त्यावेळेस केंद्रीय नेतृत्व करणाऱ्या शासकाची आवश्यकता होती, जे हिंदू आणि मुसलमान यांना एकत्रित करून त्यांना इंग्रजांन विरुद्ध लढण्यास प्रवृत्त करू शकतील. असे करणे फक्त बहादूर शहा जफर यांनाच शक्य होतं.

या बंडाच्या दरम्यान बहादूर शहा जफर यांनी एका धाडसी नायकाप्रमाणे क्रांतीकारकांना पूर्णपणे सहयोग दिला आणि इंग्रजांच्या विरूद्ध विद्रोह केला. सन १८५७ साली झालेल्या बंडाच्या बेळेस बहादूर शहा यांनी आपला मुलगा मिर्जा मुगल यांना सरसेनापती(कमांडर इन चीफ)  बनवलं होतं.

या स्वातंत्र्य उठावात बहादूर शहा यांचा पराभव झाला होता. कारण, या उठावाला सुरवात करण्याआधी त्यांनी कोणत्याच प्रकारचे नियोजन केले नव्हते. शिवाय उठाव ठरलेल्या दिवसाच्या आधीच करण्यात आला होता. या पराभवा नंतर इंग्रजांनी मुगल बादशहा बहादूर शहा जफर यांना आणि त्यांच्या परिवारातील अनेक सदस्यांना कैद करून तुरुंगात कोंडल होतं.

बहादूर शहा जफर यांचा मृत्यू – Bahadur shah zafar Death

१८५७ च्या पराभवानंतर इंग्रजांनी भाहादूर शहा जफर यांना कैद करून रंगून येथे पाठवण्यात आलं. त्याच ठिकाणी कैदेत असतांना बहादूर शहा जफर यांनी ७ नोव्हेंबर १८६२ आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूबरोबरच भारतातील मुगलांच्या जवळपास ३०० वर्षांपासून करत असलेल्या साम्राज्याचा अस्त झाला. 

यानंतर भारताला १९४७ साला पर्यंत इंग्रजांच्या गुलामीत राहावं लागलं. बहादूर शहा जफर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा देह रंगून जवळील “श्वेडागोन पगोडा” येथे दफन करण्यात आला. यानंतर काही वर्षांनी त्याठिकाणी त्यांची दर्गा बनविण्यात आली.

बहादूर शहा जफर यांना लोक एक सुफी संत मानत असतं. त्यामुळेच आजसुद्धा सर्व धर्मांचे लोक त्यांच्या स्मारकावर श्रद्धापुर्वक फुल अर्पण करतात.

एक कवि आणि शायर म्हणून प्रसिद्ध होते शेवटचे मुगल शासक बहादूर शहा जफर – Bahadur shah zafar as a Poet

बहादूर शहा जफर एक शासक असण्याबरोबर चांगले कवि पण होते. त्यांची साहित्यिक प्रतिभा प्रशंसनीय होती.  इतकेच नव्हे तर,  मोठ मोठे विद्वान कवि देखील त्यांच्या शेरो-शायरीचे प्रशंसक होते. त्यांनी लिहिलेल्या गजल आणि शायऱ्या आज आपल्याला मुशायऱ्यात ऐकायला मिळतात.

बहादूर शहा जफर यांच्या दरबारातील दोन मुख्य शायर मोहम्मद गालिब आणि जौक यांना शायर लोक आजसुद्धा आदर्श मानतात. बहादूर शहा जफर स्वत:ला एक महान शायर मानत असतं. त्यांच्या अधिकतर गजल या विशेष करून जीवनातील वास्तव आणि प्रेमावर आधारित आहेत.

त्यांनी आयुष्यातील शेवटच्या दिवसात रंगून येथे पुष्कळ गजल लिहिल्या होत्या. त्यांनी लिहिलेल्या शायरींन बद्दल विशेष सांगायचं म्हणजे,  कैदीत असतांना बहादूर शहा यांना गजल लिहिण्याकरता लेखणी देण्यात आली नव्हती. कविवर्य तसचं, शायरीची आवड असलेल्या बहादूरशहा जफर यांनी तुरुंगात जळलेल्या आगपेटीच्या काड्यांच्या साह्याने भिंतीवर गजली लिहिल्या. बहादूर शहा जफर हे फार काही महत्वकांक्षी राजे नव्हते.

परंतु, स्वभावाने ते खूपच दयाळू आणि दानशूर व्यक्ती होते. त्यांनी आपल्या जीवनात दुसऱ्या कुठल्या धर्माची कधीच अवहेलना केली  नाही. सर्वच धर्मांचा त्यांनी आदर केला होता.

सन १८५७ साली झालेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या  उठावाच्या वेळेला त्यांनी दिलेल्या योगदाना बद्दल सन १९५९ साली त्यांच्या नावाने “ऑल इंडिया बहादूर शहा जफर एकेडमी” ची स्थापना करण्यात आली. याशिवाय, दिल्ली शहरातील एका रस्त्याच्या मार्गाला बहादूर शहा जफर यांचे नाव देण्यात आले आहे. इतकेच नाही तर भारतातील अंतिम मुगल शासक म्हणून त्यांच्या जीवनावर आधारित काही हिंदी-उर्दू चित्रपट बनविण्यात आली आहेत.

जफर महल – Zafar Mahal

“जफर महल” ही मुगलांच्या शासन काळातील निर्मित शेवटची इमारत आहे. या इमारतीची निर्मिती शेवटच्या मुगल शासक म्हणजेच “बहादूर शहा जफर” यांनी केली होती. “जफर महल” भारताच्या दिल्ली शहरात स्थित आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळी अकबर द्वितीय आणि बहादूर शहा जफर यांनी या “जफर महल” च्या प्रवेश द्वाराची निर्मिती केली.

“जफर महल” दिल्लीच्या मेहरुली भागात बांधलेलं आहे. ‘मेहरुली’ हे एक रमणीय ठिकाण असुन, या ठिकाणी पर्यटक भ्रमंती करण्यासाठी तसचं, शिकार करण्याकरिता येत असतात. निसर्गतःच सुंदर असलेल्या “मेहरुली” या ठिकाणी बहादूर शहा जफर यांनी “जफर महल” तसचं, काही “दर्गा” बांधून त्या ठिकाणच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकली आहे.

प्रवेश द्वाराच्या नजीक आलेला घुमट जवळपास पंधराव्या शताब्दीत बनविण्यात आला आहे. शिवाय, महलाचा बाकीचा भाग पश्चिमी रचनाकारांच्या मतांनुसार बांधण्यात आलेला आहे. मुगल काळात मुगल शासक आणि त्यांचे पूर्ण कुटुंब महलाच्या बाल्कनीत उभे राहून संपूर्ण शहराचं दृश्य पाहत असतं. “मेहरूल” मधील सुंदर बागीच्यांच दृश्य तर महालाच्या खिडकीतूनच दिसत असे. बहादूर शहा जफर यांच्या कारकिर्दीत “फुल वालो की सैर” या नावाचा उत्सव तीन दिवस साजरा करण्यात येत होता.

या उत्सवादरम्यान जफर आपल्या परिवारा सोबत “मेहरुली” येथील तीर्थ स्थान “ख्वाजा बख्तियार काकी” यांच्या दर्गा वर  जात असतं. वस्तुतः “जफर महल” ची निर्मिती ही जफर यांचे वडिल ‘अकबर शहा द्वितीय’ यांच्या द्वारे करण्यात आली  होती. परंतु, या महालाचे प्रवेशद्वार “बहादूर शहा जफर” यांनी निर्माण केले.

शिवाय, त्यांनी या महलाचे नाव बदलून त्या महालाला “जफर महल” हे नाव दिलं.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ बहादूर शहा जफर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा भारतातील शेवटचे मुगल शासक बहादूर शहा जफर  – Bahadur Shah Zafar History in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved