मराठा साम्राज्याचे पराक्रमी लढवय्ये बाजीप्रभू देशपांडे

Baji Prabhu Deshpande Mahiti

मराठा साम्राज्याचे लढवय्ये शूर योद्धे म्हणून आज इतिहास बाजीप्रभू देशपांडेंचे नाव अत्यंत आदराने आणि गौरवाने घेत आहे.

त्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली.

हजारो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगायला हवा या प्रेरणेने शिवाजी महाराज विशाळगडी पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंड अडवून धरली होती.

असे प्रामाणिक पराक्रमी धैर्यवान सैनिक प्राणापलीकडे लढले म्हणून आज डोळ्यांनी हे स्वराज्य आपल्याला पहाता आले.

Baji Prabhu Deshpande

मराठा साम्राज्याचे पराक्रमी लढवय्ये बाजीप्रभू देशपांडे – Baji Prabhu Deshpande in Marathi

बाजीप्रभू देशपांडे हे मुळात पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील पिढीजात देशपांडे!

हिरडस मावळचे वतनदार असलेल्या बादलांचे ते दिवाण होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू मधील शौर्य, पराक्रम, प्रशासकीय कौशल्य पाहून या अष्टपैलू व्यक्तीमत्वाला स्वराज्याच्या कार्याकरता आपलंसं करून घेतलं.

बाजीप्रभू देशपांडेनी देखील स्वराज्यासाठी आपली स्वामी निष्ठा महाराजांना अर्पित केली.

बाजीप्रभू हे शूर लढवय्ये होते तद्वतच स्वामिनिष्ठ…त्यागी…करारी…अत्यंत प्रामाणिक आणि आमिषाला बळी न पडणारे असे सैनिक होते.

इतिहासात अजरामर झालेली घोडखिंडीतील लढाई – Battle of Pavan Khind

अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवरायांनी विजापूरच्या फौजेचा धुव्वा उडविला आणि बराचसा विजापूरचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर लागलीच पन्हाळगड जिंकला.

एकीकडे हे करत असतांना दुसऱ्या बाजूस नेताजी पालकरांच्या सैन्याने विजापूरवर हल्ला चढविला. त्यावेळी सिद्दी जोहर हा विजापूरचे नेतृत्व करीत होता.

त्याने आपल्या सैन्याच्या मदतीने कोल्हापूर नजीक पन्हाळगडाला वेढा दिला व काही सरदार, सैनिक आणि शिवाजी महाराजांना गडावर स्थानबद्ध केले. हा वेढा बाहेरून फोडण्याकरता नेताजी पालकरांनी आणि सैनिकांनी बराच लढा दिला पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले.

आता एक साहसी, धाडसी आणि धोकादायक मार्ग निवडल्या गेला.

छत्रपती शिवराय, बाजीप्रभू देशपांडे आणि निवडक मावळे सिद्दी जोहरने घातलेला वेढा आतून फोडून काढतील आणि विशाळ गडाकडे प्रस्थान करतील.

यावेळी महाराज मावळ्याचा वेश धारण करतील, महाराज निसटले हे जेंव्हा सिद्दी जोहर ला समजेल तेंव्हा तो पाठलाग करेल त्यावेळी शिवा न्हाव्याल्या मेण्यात बसवून सैन्यासमवेत वेढ्याबाहेर काढायचे ठरले. हा शिवा न्हावी बराचसा महाराजांसारखा दिसायचा. त्याला महाराजांचे कपडे घालण्यात आले.

Baji Prabhu Deshpande Mahiti

भयंकर पाऊस कोसळत होता…आषाढ पौर्णिमेची 1660 सालची ती रात्र कुणाकरता काळरात्र ठरणार हे येणारा काळच ठरविणार होता.

महाराज आपल्या 500-600 मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडें समवेत सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटले. विशालगडाच्या दिशेने ते कूच करते झाले, जोहरच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. मेण्यात बसलेले महाराज आहेत असे समजून त्यांना माघारी आणण्यात आले.

शिवा न्हाव्याला याची पूर्ण कल्पना होती कि ज्यावेळेस आपले पितळ उघडे पडेल त्यावेळी आपला जीव जाणार हे निश्चित…तरी देखील शिवा न्हावी शांतपणे शत्रूच्या स्वाधीन झाला.

त्याच्या बलिदानाने मराठी सैन्याला पुढे जाण्याकरता जास्त कालावधी मिळाला.

शत्रूला आपली चूक झाली हे समजण्यात वेळ लागला आणि ज्यावेळी त्यांना त्यांची झालेली चूक लक्षात आली तेंव्हा त्यांनी पुन्हा सैन्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

मोगलांची फौज पाठलाग करते आहे हे बाजीप्रभूंच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही,  आणि त्याचवेळी त्यांनी आपल्या फौजेचे दोन भाग केले.

बाजीप्रभूंनी अर्ध्या फौजेसह शिवरायांना विशालगडावर पाठवले आणि अर्ध्या सैन्यासह भाऊ फुलाजी प्रभुंसमवेत स्वतः बाजीप्रभू शत्रूला घोडखिंडीत अडविणार होते. ज्याक्षणी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचतील त्यावेळी गडावरून तोफेचे तीन बार उडविण्यात यावे, त्यानंतर बाजीप्रभूंनी सैन्यासह घोडखिंड सोडून विशाळ गडाकडे कूच करावे अशी रणनीती ठरविण्यात आली होती.

आखलेल्या रणनीती नुसार महाराज अर्ध्या सैन्यासह गडाकडे निघाले आणि बाजीप्रभू देशपांडेनी आपल्या मावळ्यांसह घोडखिंड गाजविण्यास सुरुवात केली.

कुठे मोगलांचे 10,000 सैन्य आणि कुठे मराठ्यांचे अवघे 300 सैनिक तरीदेखील बाजीप्रभूंच्या नेतृत्वात तीनशे मावळे शत्रूला रोखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत होते.

सिद्दी जोहरचे सैन्य बाजीप्रभूंनी तब्बल 18 तास घोडखिंडीत रोखून धरले होते.

बाजीप्रभू दांडपट्टा चालविण्यात तरबेज होते, त्या बळावर त्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

बाजीप्रभू नखंशिखांत रक्ताने माखले, तरीदेखील शत्रूला आस्मान दाखवीत होते. इतके बलाढ्य सैन्य देखील बाजीप्रभूंच्या स्वामिनिष्ठे पुढे थिटे ठरले.

शिवाजी महाराज आपल्या तीनशे मावळ्यांसह विशाळगडावर गेले परंतु त्याठिकाणी देखील त्यांना सिद्दी जोहरच्या सूर्यराव सुर्वे व जसवंतराव दळवी यांच्याशी लढून गड आपल्या ताब्यात घ्यावा लागला.

महाराज सुखरूप गडावर पोहोचले…त्यावेळी गडाचा ताबा घेण्यात आला व त्याक्षणी तोफांचे हवेत तीन बार उडविण्यात आले.

बाजीप्रभू देशपांडेंचे बलिदान – Baji Prabhu Deshpande Death

आपले महाराज गडावर सुखरूप पोहोचल्याची वार्ता बाजीप्रभूंच्या कानी पोहोचली आणि त्यांनी आतापर्यंत रोखून धरलेला श्वास अखेर सोडला…

या वीर…पराक्रमी…साहसी शुरविराने प्राण सोडला…

बाजीप्रभू देशपांडेंच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंड न्हाऊन निघाली…पावन झाली.

छत्रपती शिवरायांच्या उपस्थितीत, बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी यांच्यावर विशाळगडी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशालगडावर या शुरविरांची समाधी बांधण्यात आली. कोल्हापूर जवळच्या पन्हाळगडावर बाजीप्रभू देशपांडेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

घोडखिंड झाली पावनखिंड – Pavan Khind

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लढवय्या शूरवीरांच्या स्मरणार्थ घोडखिंडीचे नाव बदलून ”पावनखिंड” असे केले.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबियांना ‘मानाचं पान’ देऊन सन्मानित करण्यात आलं.

घोडखिंडीचा ऐतिहासिक लढा आणि बाजीप्रभू देशपांडेंची स्वामीनिष्ठा याचे गारुड आजतागायत मराठी जनसामान्यांवर कायम आहे…

यावर बरंच लिखाण देखील झालं आहे 1929 साली ‘बाजीप्रभू देशपांडे’ या बाबुराव पेंटर यांनी काढलेल्या चित्रपटाने देखील इतिहासातील या स्मृतींना उजाळा देण्यात आला होता…

लक्ष्य दया: तुमच्या जवळ बाजीप्रभू देशपांडे बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा “बाजीप्रभू देशपांडे – Baji Prabhu Deshpande Information in Marathi हा लेख आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook Page लाइक करायला सुधा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here