जीवनात उंच उडण्यासाठी आवश्यकता असते ती कला-कौशल्याची! अशीच एक रंगीबेरंगी फुग्यांची बोधकथा

Marathi Bodh Katha

लहानपणी शाळेत किंवा आजी आजोबांनी घरी आपल्याला बरेचश्या गोष्टी ऐकवल्या असणार, आणि आपण त्या गोष्टींना ऐकून जीवनात त्या गोष्टींचे पालन सुध्दा केलेलं असेलच, आजच्या लेखात सुध्दा आपण एक छोटीशी गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला जीवनात एक छोटीशी प्रेरणा देणार, जी जीवनात अश्या वेळी कामात येईल जेव्हा आपण काही गोष्टींमुळे हताश निराश किंवा उदास होणार.

एक भरपूर वस्ती चे गाव होते, त्या गावचे क्षेत्रफळ बरेच दूर पसरलेले होते, दाट वस्तीच्या या गावात नेहमी एक हवा भरलेले फुगे विकणारा व्यक्ती यायचा, आणि आपले फुगे विकायचा, हा त्याचा व्यवसायच होता, यावर तो त्याचा परिवार चालवत असे. त्याच्या जवळ वेगवेगळ्या रंगांची फुगे होती, लाल, पिवळा, काळा, नारिंगी, आणखीही बरेच प्रकारचे.

रंगीबेरंगी फुगे! प्रेरणा देणारी एक बोधकथा – Inspirational Balloon Seller Story in Marathi

Balloon Seller Story
Balloon Seller Story

याप्रकारे तो त्या गावात आणि जवळील काही इतर गावांमध्ये सुध्दा आपल्या फुग्यांची विक्री करायचा, जेव्हा त्याच्या फुग्यांची विक्री होत नसे तेव्हा तो त्याच्या फुग्यांमधून एखादा फुगा हवेत सोडायचा आणि हवेत सोडलेला फुगा खूप उंचीवर जायचा, आणि त्या फुग्याला पाहून गावातील लहान मुले आनंदित होऊन फुगे विकणाऱ्या जवळ जाऊन फुगे विकत घ्यायची, अश्या प्रकारे त्याचा व्यवसाय चालत असे.

एक दिवस फुगे विकणारा एका यात्रेत फुगे विकायला गेला, सोबत बरेच रंगीबेरंगी फुगे होते, यात्रा सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात भरलेली होती, पण त्याच्या फुग्यांची विक्री पाहिजे तशी होत नव्हती, पण त्याला माहिती होते आपल्या फुग्यांची विक्री वाढविण्यासाठी काय करावे लागते तर, त्याने त्याची कल्पना आठवली त्याने लगेच आपल्या फुग्यांच्या गुच्छातून एक फुगा हवेत सोडला, तो फुगा खूप उंच उडाला, एवढा उंच उडाला की संपुर्ण यात्रेच्या लोकांना तो फुगा दिसू लागला.

या उडणाऱ्या फुग्याला पाहून त्याच्याजवळ बरीच गर्दी जमा झाली. आणि बरेचशे फुगे विकल्या सुध्दा गेले. त्यांनंतर त्याच्या कडे एक मुलगा येतो आणि विचारतो की तुम्ही जो फुगा हवेत सोडला, त्याचा रंग लाल होता, म्हणून तो आकाशात उडाला का? तुमच्या जवळ असणारा गुलाबी रंगाचा फुगा सुध्दा हवेत उडू शकतो का? अश्या प्रकारचे बरेचशे प्रश्न तो त्या फुगे वाल्याला विचारू लागला. तेव्हा फुगेवाला त्याला म्हणाला की

“फुग्याचा रंग त्याला हवेत उडवत नाही तर फुग्याचा आत मध्ये भरलेली हवा त्याला उंच उडवते”

मग तो फुगा कोणत्याही रंगाचा का असेना. यावर तो मुलगा म्हणाला म्हणजे तुमच्याजवळ असणारे सर्वच रंगाचे फुगे हवेत उडतात, त्यावर फुगेवाला म्हणाला हो सर्वच उडतात, हे ऐकून त्या लहान मुलाने त्याला आवडणाऱ्या रंगाचा फुगा विकत घेतला आणि तेथून निघून गेला. या गोष्टीवरून आपल्याला हे समजतं की आपल्या जीवनात यश हे माणसाचा रंग, रूप, पाहून मिळत नसतं, त्यासाठी आपल्यात सामर्थ्य असणे महत्त्वाचे आहे. जवळ जवळ त्या फुग्यासारखेच ज्याचा रंग कोणताही असो पण जर त्यामध्ये हवा भरलेली आहे तरच तो आकाशात उंच जातो.

तर जीवनात आपण कसे दिसता, यापेक्षा महत्वाचे आहे आपण यश मिळविण्यासाठी किती परिश्रम करता, कारण यश रंग, रूप, जात, पात पाहून येत नाही तर आपल्या मध्ये असणारे कला-कौशल्य पाहून येतं. म्हणून नेहमी प्रामाणिक पणे प्रयत्न करत रहा यश एक ना एक दिवस नक्की मिळेलच.

आशा करतो आपल्याला लिहिलेली छोटीशी गोष्ट आवडली असेल आणि या गोष्टीमधून एखादी प्रेरणा मिळाली असेल, आपल्याला जर ही स्टोरी आवडली असेल तर या स्टोरीला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा, माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top