• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Mantra

भुलाबाईचे संपूर्ण गाणे

Bhulabai Song Marathi

आपल्या महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील काही भागातील प्रसिद्ध लोक कथागीत महोत्सव म्हणजे भुलाबाई हा होय. भाद्रपद पौर्णिमेपासून शरद पौर्णिमेपर्यंत चालणारा हा महोत्सव सुमारे एक महिना साजरा केला जातो.

भुलाबाई या महोत्सवाच्या निमित्ताने लहान मुली आपल्या घरी मातीचे घरकुल करून बाहुल्याची स्थापना करतात. तसचं, रोज संध्याकाळी मैत्रिणींसोबत एकत्र जमून सामुहिकपणे गाणी म्हणतात.  या लेखाच्या माध्यमातून भुलाबाई या महोत्सवानिमित्त गायल्या जाणाऱ्या गाण्यांचे लिखाण केलं आहे.  तरी आपण या गीतांचे वाचन करून आपल्या लहान मुलीना देखील सांगा.

भुलाबाईचे संपूर्ण गाणे – Bhulabai Song Marathi

Bhulabai Song
Bhulabai Song

भुलाबाईची गाणी (पहिली गं भुलाबाई) – Pahili g Bhulabai 

पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे

साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा

खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी

अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी

गंगेच्या पाण्याने वेळवीला भात

जेविता कंठ राणा भुलाबाईचा.

ठोकीला राळा हनुमंत बाळा

हनुमंत बाळाचे लांब लांब झोके

टिकाऊचे डोळे हात पाय गोरे

भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी

झळकतीचे एकच पान

दुरून भुलाबाई नमस्कार

एवढीशी गंगा झुळझुळ वाहे

ताव्या पितळी नाय गं

हिरवी टोपी हाय गं

हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो

सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला

जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई

चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं

खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली

तळय़ा तळय़ा ठाकुरा

भुलाबाई जाते माहेरा

जाते तशी जाऊ द्या

तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या

बोटभर कुंकू लावू द्या

तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या

तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय

आउले पाऊल नागपूर गांव

नागपूर गावचे ठासे ठुसे

वरून भुलाबाईचे माहेर दिसे.

घरावर घर बत्तीस घर

इतका कारागीर कोणाचा

भुलोजी च्या राणीचा

भूलोजीची राणी

भरत होती पाणी

धावा धावा कोणी

धावतील तिचे दोनी

दोनी गेले ताकाला

विंचू चावला नाकाला

नदीच्या काठी राळा पेरला

बाई राळा पेरला

एके दिवशी काऊ आला

बाई काऊ आला

एकच कणीस तोडून नेल

बाई तोडून नेल

सईच्या अंगणात टाकून दिल

बाई टाकून दिल

सईन उचलून घरात नेल

बाई घरात नेल

कांडून कुंडून राळा केला

बाई राळा केला

राळा घेऊन बाजारात गेली

बाई बाजारात गेली

चार पैशाची घागर आणली

बाई घागर आणली

घागर घेऊन पाण्याला गेली

बाई पाण्याला गेली

मधल्या बोटाला विंचू चावला

बाई विंचू चावला

आला गं सासरचा वैद्दय

हातात काठी जळक लाकूड

पायात जोडा फाटका तुटका

नेसायचं धोतर फाटक तुटक

अंगात सदरा मळलेला

डोक्यात टोपी फाटकी तुटकी

तोंडात विडा शेणाचा

कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी

गं बाई म्हायरावाणी

आला गं माहेरचा वैद्दय

हातात काठी पंचरंगी

पायात जोडा पुण्यशाई

नेसायचं धोतर जरीकाठी

अंगात सदरा मलमलचा

डोक्यात टोपी भरजरी

तोंडात विडा लालेला

कसा गं दिसतो बाई राजावाणी

गं बाई राजावाणी

भुलाबाईची गाणी (सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली) – Bhulabai che Gane

सा बाई सु, सा बाई सु,

बेलाच्या झाडाखाली

महादेवा तू रे महादेवा तू

हार गुंफिला, विडा रंगीला

झेंडुची फुले माझ्या भुलाबाईला रे

माझ्या भुलाबाईला॥

सा बाई सु, सा बाई सु,

बेलाच्या झाडाखाली

महादेवा तू रे महादेवा तू

हार गुंफिला, विडा रंगीला

गुलाबाचे फूल माझ्या भुलाबाईला रे

माझ्या भुलाबाईला॥

सा बाई सु, सा बाई सु,

बेलाच्या झाडाखाली

महादेवा तू रे महादेवा तू

हार गुंफिला, विडा रंगीला

मोगऱ्याची फुले माझ्या भुलाबाईला रे

माझ्या भुलाबाईला॥

भुलाबाईची गाणी (यादवराया राणी घरास येईना कैसी)

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

सासूबाई गेल्या समजावयाला

चल चल सूनबाई अपुल्या घराला

अर्धा संसार देते तुजला

मी नाही यायची अपुल्या घराला

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

सासरे गेले समजावयाला

चल चल सूनबाई अपुल्या घराला

तिजोरीची चावी देतो तुजला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

दीर गेले समजावयाला

चला चला वहिनी अपुल्या घराला

नवीन कपाट देतो तुम्हाला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

जाऊ गेली समजावयाला

चला चला जाऊबाई अपुल्या घराला

जरीची साडी देते तुम्हाला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

नणंद गेली समजावयाला

चल चल वहिनी अपुल्या घराला

चांदीचा मेखला देते तुजला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

पती गेला समजावयाला

चल चल राणी अपुल्या घराला

लाल चाबूक देतो तुजला

मी येते अपुल्या घराला

यादवराया राणी घरास आली कैसी

सासूरवाशीण सून घरास आली कैसी

भुलाबाईची गाणी (आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय) – Bhondla Gani

आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,

लेकी भुलाबाई साखऱ्या लेवून जाय

कशी लेवून जाय, कशी लेवू दादा,

घरी नंदा जावा, करतील माझा हेवा

नंदाचा बैल येईल डोलत,

सोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीरं

नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,

शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी

तेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी,

आता माझे दादा येतील गं, येतील गं,

दादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं,

दादा तुमची बायको चोट्टी चोट्टी

असू दे माझी चोट्टी चोट्टी

घे काठी लगाव पाठी

घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥

भुलाबाईची गाणी (अडकित जाऊ, खिडकीत जाऊ) – Bhondla Song

खिडकीत होतं ताम्हन

भुलोजीला मुलगा झाला

नाव ठेवा वामन

अडकित जाऊ

खिडकीत जाऊ

खिडकीत होता बत्ता

भुलोजीला मुलगा झाला

नाव ठेवा दत्ता

अडकित जाऊ

खिडकीत जाऊ

खिडकीत होती वांगी

भुलोजीला मुलगी झाली

नाव ठेवा हेमांगी

अडकित जाऊ

खिडकीत जाऊ

खिडकीत होती दोरी

भुलोजीला मुलगी झाली

नाव ठेवा गौरी

अडकित जाऊ

खिडकीत जाऊ

खिडकीत होती पणती

भुलोजीला मुलगी झाली

नाव ठेवा मालती

अडकित जाऊ

खिडकीत जाऊ

खिडकीत होती घागर

भुलोजीला मुलगा झाला

नाव ठेवा सागर

भुलाबाईची गाणी (अक्कण माती चिक्कण माती) – Bhondla Songs in Marathi

अक्कण माती चिक्कण माती

अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं

अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी

अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या

अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या

अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं

अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा

अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी

अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं

अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं.

भुलाबाईची गाणी (ऐलमा पैलमा) – Bhondlyachi Gaani

ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी पारवा घुमतोय पारावरी

गोदावरी काठच्या उमाजी नायका

आमच्या गावच्या भुलोजी बायका

एविनी गा तेविनी गा

आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे

दुधोंड्याची लागली टाळी आयुष्य देरे भामाळी

माळी गेला शेताभाता पाऊस पडला येताजाता

पडपड पावसा थेंबोथेंबी,

थेंबोथेंबी आडव्या लोंबी

लोंब्या लोंबती अंगणी

अंगणा तुझी सात वर्ष भोंडल्या तुझी सोळा वर्ष

अतुल्या मातुल्या चरणी चातुल्या

चरणी चारचोंडे हातपाय खणखणीत गोंडे

एकेक गोंडा वीसवीसाचा साड्या डोंगर नेसायचा

नेसा ग नेसा बाहुल्यांनो अडीचशे पावल्यांनो

भुलाबाईची गाणी (एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू) – Ek Limbu Zelu Bai (Bhulabai Song)

एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू

दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू

तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू

चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू

पाचा लिंबाचा पानोठा,

माळ घालू हनुमंता

हनुमंताची निळी होडी

येता जाता कमळ तोडी

कमळाच्या पाठीमागे लपली राणी

अग अग राणी इथे कुठे पाणी

पाणी नव्हे यमुना जमुना

यमुना जमुनाची बारीक वाळू

तेथे खेळे चिल्लार बाळू

चिल्लार बाळाला भूक लागली

मी तर जाते सोनार वाडा

सोनार दादा सोनार दादा

गौरीचे मोती झाले का नाही

गौरीच्या घरी तांब्याच्या चुली

भोजन घातले आवळीखाली

उष्टया पत्रावळी चिंचेखाली

पान सुपारी उद्या दुपारी……

भुलाबाईची गाणी – 

एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू

दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू

तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू

चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू

पाचाचा पानोडा माय गेली हन्मंता

हन्मंताचे ————————–

—————येता जाता कंबर मोडी

नीज रे नीज रे तान्ह्या बाळा

मी तर जातो सोनार वाडा

सोनार वाड्यातून काय काय आणले

—————————————-

एक गेला खारीला एक गेला खोबरीला

खारी खोबऱ्याच आल जीऱ्या मिऱ्याच काही नाही आल

आपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची

बाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची

पार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई

तामण बाई तामण अस कस तामण

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती वांगी

भुलोजीला लेक झाली नाव ठेवा हेमांगी

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी

भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा गौरी

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती पणती

भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा मालती

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती घागर

भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा सागर

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला

भूलोजीला लेक झाला साखरपाना विसरला

आणा आणा पारीस उगळा उगळा काथ

आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस

शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे

बाणा बाई बाणा सुरेख बाणा

गाणे संपले खिरापत आणा

आणा आणा लवकर,

वेळ होतो आम्हाला

जाऊ द्या आम्हाला,

भुलाबाईचे गाणे म्हणायला ॥

या ठिकाणी भुलाबाई या शब्दाचा अर्थ होतो पार्वती आणि भूलोबा म्हणजे भगवान शंकर. माता पार्वती भिल्लीणीचा वेश परिधान करून भिल्लरूपी शंकराला भूलवायला आलेल्या पार्वती मातेला भुलाबाई असे म्हटल जाते.

लहान मुली आपल्या मैत्रिणींसोबत मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करतात. भुलाबाई यांच्यासाठी गायली जाणारी गाणी ही जलद स्वरुपाची असून ती टाळ्यांच्या स्वरावर किंवा टिपऱ्यांच्या तालावर म्हटली जातात.  गाणी गाऊन झाल्यानंतर आरती म्हटली जाते. यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून खिरापतीचा वाटप केला जातो. एक महिना चालणारा हा उत्सव कधी संपतो माहितच पडत नाही.

या उत्सवानिमित्त ज्या घरी भुलाबाई बसतात ते घर म्हणजे भुलाबाई यांचे माहेर असून ज्या मुली गाणी गातात त्या मुली आपल्या गाण्याच्या रूपाने एक प्रकारे भुलाबाई यांच्या सासरकडील सर्व सुख दुःखाच्या घटनांचे वर्णन करीत आहेत.

जमलेल्या मुली भुलाबाई यांच्या प्रतिनिधी म्हणून गीतांच्या माध्यमातून आपले भाव व्यक्त करीत असतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवाची समाप्ती करण्यात येते.

शरद पौर्णिमेच्या दिवशी सर्वांच्या घरी ज्वारीच्या धांड्याची खोपडी (झोपडी) बनवून त्यात बाहुल्याची पूजा केली जाते.  तसचं, लहान मुला मुलीं एकत्रित येवून सामुहिकरित्या भुलाबाईची  गाणी गातात. यानंतर त्यांना खाऊचा वाटप करण्यात येतो.

शरद पोर्णिमे निमित्त घरातील मंडळी रात्रीच्या वेळी आपल्या घरांच्या अंगणात दुध घोट्तात यालाच आपण कोजागिरी पोर्णिमा देखील म्हणतो. भुलाबाई हा अश्या स्वरूपाचा उत्सव आहे ज्यात लहान बालकांसोबत मोठे देखील सहभागी होवून जातात.

Editorial team

Editorial team

Related Posts

Mantra

श्री गणपति नामावली (गणपतीची 108 नावे)

108 Ganpati Names in Marathi अनेक प्राचीन हिंदू ग्रंथ आणि धर्मग्रंथांमध्ये 108 ही संख्या अनेक वेळा आढळते. सनातन धर्मात 108...

by Editorial team
April 15, 2022
Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics in Marathi
Mantra

“धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची” दत्त गुरूंची प्रदक्षिणा

Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics आपण नेहमी मंदिरात गेल्यानंतर आपली आजी, आई किवा वडीलधारे लोक आपल्याला नेहमी प्रदक्षिणा घालायला सांगतात...

by Editorial team
April 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved