Birsa Munda – बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते.
आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.
आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा – Birsa Munda History In Marathi
बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.
बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरीशींही होता. त्यांची प्रतिभा पाहुन एका पारधी नेत्यांनी शाळेत टाकण्याचा सल्ला दिला.
परंतू त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागणार होता त्यांच्या वडीलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्याचे नाव डेविड केले त्याचा दाखला जर्मन मिशन स्कुल येथे झाला परंतू तेथे धार्मीक सक्तीमुळे त्यांनी शाळा सोडली व ते प्रसिध्द वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले.
वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळया धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा.
बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले ‘‘ आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला, बिरसा मुंडास पकडून देणा-यास 500 रूपये बक्षिस जाहीर केले.
बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली.
9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.
3 फेब्रुवारी 1900 रोजी त्यांना इंग्रजांनी अटक केली होती. 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडाची जयंती साजरी केली जाते. सध्याचे झारखंड राज्यात रांची येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. तेथे दरवर्षी जयंती निमित्त कार्यक्रम होतात.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ बिरसा मूंडा बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा “आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा – Birsa Munda History In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुधा.
नोट: Birsa Munda – बिरसा मूंडा यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Please send topic vise like child life ,education, social work, fight etc
Please send topic vise like child life, education, social work and fight etc. About birsa munda in marathi
What is birsa munda father name
Very nice information, we want more information