चंद्रदेव मंत्र – Chandra Mantra

Chandra Dev Mantra

देवी देवतांची आराधना करण्यासाठी मंत्र उच्चारण करणे ही हिंदू धर्मांतील फार प्राचीन प्रथा  असून,  ग्रंथांमधून सुद्धा याबाबत माहिती मिळते. त्यामुळे संत महंतापासून चालत आलेली ही प्रथा आज देखील जोपासली जाते. मंत्र उच्चारण करण्याचे अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक फायदे असून आपण नियमित त्यांचे उच्चारण केले पाहिजे.

मित्रांनो,  आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून चंद्रदेव यांची उपासना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या चंद्र मंत्राचे लिखाण करणार आहोत. तसचं, मंत्र उच्चारण करण्याचे फायदे देखील सांगणार आहोत.

चंद्रदेव मंत्र – Chandra Mantra

Chandra Mantra
Chandra Mantra

ॐ इमं देवा असपत्नं ग्वं सुवध्यं।

महते क्षत्राय महते ज्यैश्ठाय महते जानराज्यायेन्दस्येन्द्रियाय इमममुध्य पुत्रममुध्यै

पुत्रमस्यै विश वोsमी राज: सोमोsस्माकं ब्राह्माणाना ग्वं राजा।

हिंदू धर्मात सूर्य आणि चंद्र या ग्रहांना ईश्वर मानलं जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा सूर्य देव आणि चंद्र देव यांच्या उत्पत्तीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. त्यामुळे हिंदू धार्मिक या देवतेची दरोरोज पूजा करीत असतात.

चंद्र देव यांची आराधना केल्याने मिळत असलेल्या लाभाचे वर्णन ग्रंथ कथांमधून मिळते. तसचं, या देवतांची आराधना करण्यासाठी उच्चारण करण्यात येत असलेले मंत्र, आणि आरती आपणास आपल्या धार्मिक ग्रंथांतून मिळतील. परंतु,  भौगोलिक दृष्टीनुसार चंद्र देव हे सूर्य देवासमान एक ग्रह असून, सूर्य देवाप्रमाणे चंद्र देवाचे सुद्धा पृथ्वीवर विशेष महत्व आहे.

ज्याप्रमाणे वातावरणाची निगा राखण्यासाठी सूर्य देवाची गरज असते त्याचं प्रमाणे चंद्र देवाची सुद्धा गरज असते. चंद्र देवाला लागत असलेल्या ग्रहणामुळे समुद्राला भरती आणि आहोटी येत असते. अनेक देशाचे वैज्ञानिक या ग्रहांचे संशोधन करीत आहेत. आधुनिक काळातील लोकांची या देवतांबाबत कोणतीही धारणा असली तरी हिंदू धर्मात त्यांना ईश्वरच मानलं जाते.

धार्मिक ग्रंथांनुसार ज्योतिष शास्त्रात सुद्धा चंद्र देवाचे विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. राशींमध्ये असलेल्या नऊ ग्रहांपैकी एक ग्रह असून ते आपल्या कुंडलीला विशेष महत्व प्रदान करतात.

भगवान महादेव यांना प्रिय असलेल्या सोमवार दिवसानुसार भगवान चंद्र देव यांना सुद्धा सोमवार हा दिवस प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी यांची पूजा करण्यास विशेष महत्व आहे. बऱ्याच लोकांना भगवान चंद्र देव यांना प्रिय असलेल्या या दिवसाबद्दल आणि त्यांची पूजा या  दिवशी केल्याने मिळत असेलेल्या लाभा विषयी माहिती नाही आहे.

जे भाविक सोमवार या दिवशी चंद्र देवाची पूजा करतात त्यांच्या कुंडलीतील चंद्र दोष नष्ट होतो. तसचं, चंद्र देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना प्रिय असलेल्या मंत्राचे उच्चारण करण्यात येते. परंतु बऱ्याच लोकांना चंद्र देव यांना प्रिय असलेल्या मंत्राबद्दल माहिती नाही आहे.

ज्योतिष शास्त्रात चंद्र देव यांना प्रसन्न करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या मंत्राचे लिखाण करण्यात आलं आहे. ज्योतिष शास्त्रात चंद्र देवाला ईश्वर म्हटल आहे. तसचं,त्यांची आराधना करण्यास सोमवार या दिवसाला विशेष महत्व दिल आहे. या दिवशी चंद्र देव यांची  पूजा करून प्रसाद म्हणून खीर खावी. चंद्र देव यांच्याबाबत विशेष माहिती सांगायची म्हणजे अमावस्या सोडून चंद्रदेव आपल्या सोळा कलेचे पूर्णपणे दर्शन देत असतात.

ज्योतिष शास्त्रानुसार मोती रत्न हा चंद्र देवाचा रत्न असून, या रत्नाला चांदीच्या अंगठीत गाठून करंगळी मध्ये घालावी. अश्या प्रकारे चंद्र देव यांच्या बाबत धर्म ग्रंथांत, ज्योतिष शास्त्रात आणि भौगोलिक पुस्तकात माहिती नमूद करण्यात आली आहे.

मित्रांनो, चंद्र देव हे आपल्याला पूजनीय असल्याने आपण नियमित त्यांचे पूजन करावे. त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या मंत्राचा जप करावा, जेणेकरून आपणास त्याचा लाभ होईल.

चंद्र मंत्राचे उच्चारण करण्याबाबत सांगायचं म्हणजे या मंत्राचा जप किमान अकरा वेळा करावा. वरील लेखात लिखाण करण्यात आलेली संपूर्ण माहिती आम्ही इंटरनेटवरून मिळवली असून, चंद्र देव आणि त्यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या मंत्राचे लिखाण करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here