Monday, June 16, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

चारमीनार चा इतिहास आणि वास्तुकला

Charminar Hyderabad Information in Marathi

‘चारमिनार’ ही भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि सांस्कृतिक इमारतींमधील एक इमारत आहे. ही इमारत भारताच्या मुख्य आकर्षणापैकी एक असून हैद्राबाद पर्यटनाच्या दृष्टीने देखील महत्वपूर्ण आहे. चारमिनारमुळे हैद्राबादला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

हैद्राबादला मुसी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या चारमिनारचा भारतातील प्रमुख 10 ऐतिहासिक स्मारकांमधे समावेश करण्यात आला आहे. ही ऐतिहासिक इमारत उत्कृष्ट वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहे. भारतातील प्रमुख इमारतींमधील एक असलेल्या चारमिनार विषयी अधिक जाणून घेऊया.

इतिहास हैदराबादच्या चारमिनारचा – Charminar Information in Marathi

Charminar Information in Marathi
Charminar Information in Marathi

चारमिनार विषयी संक्षिप्त माहिती – Information about Charminar in Marathi

चारमिनार कुठे आहे (Charminar Kuthe Aahe)हैद्राबाद तेलंगाणा
चारमिनार ची स्थापना कधी झाली ई.स. 1591
चारमिनार ची निर्मिती कुणी करून घेतली मोहम्मद कुली कुतुबशाह
चारमिनार ची उंची किती आहे (Charminar Height)48.7 मीटर (159.77 फुट उंच)

चारमिनार ची निर्मिती केंव्हा आणि कुणी केली – Charminar History in Marathi

हैद्राबाद येथे असलेल्या या विशाल आणि प्रभावशाली ऐतिहासिक इमारतीची निर्मिती ई.स. 1591 ला कुतुबशाही राजवंशाचे पाचवे शासक सुल्तान मोहोम्मद कुली कुतुब शाह यांच्या कार्यकाळात करण्यात आली. मोहोम्मद कुली कुतुबशाह हे इब्राहीम कुली कुतुबशहांचे तिसरे चिरंजीव होते, गोलकोंडा वर त्यांनी 31 वर्ष राज्य केलं होतं. कुतुबशाह ने ज्यावेळी आपली राजधानी गोलकोंडा वरून हैद्राबाद ला आणली त्यावेळी या भव्य आणि प्राचीन अश्या चारमिनारची निर्मिती करण्यात आली. गोलकोंडा आणि पोर्ट शहर मछलीपट्टनम च्या व्यापारी मार्गाला जोडण्यासाठी कुतुबशहाने या चारमिनारची निर्मिती केल्याचे देखील सांगितल्या जाते. चारमिनारच्या निर्मितीमागे अनेक कथा देखील सांगण्यात येतात.

चारमिनार ची निर्मिती का करण्यात आली –  History of Charminar in Marathi

या भव्य आणि ऐतिहासिक चारमिनार मुळे हैद्राबाद शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. चारमिनार ची निर्मिती ई.स.1591 मधे कुतुबशाही वंशाचे पाचवे शासक सुल्तान मोहोम्मद कुली कुतुबशाह यांनी केली होती. ज्यावेळी त्यांनी आपली राजधानी गोलकोंडा वरून हैद्राबादला स्थानांतरीत केली त्यावेळी भव्य अश्या चारमिनार ची निर्मिती करण्यात आली होती.

या ऐतिहासिक वास्तू बद्दल असे देखील म्हंटल्या जाते की मोहोम्मद कुली कुतुबशहा ची राजधानी गोलकोंडा येथे पाण्याच्या कमतरते मुळे प्लेग/महामारी पसरली होती त्यावेळी या रोगाला मुळापासून नष्ट करण्याकरता आणि लोकांची पिडा कमी करण्यासाठी अल्लाह ला साकडे घातले आणि मशीद बांधण्याचा संकल्प केला.

आणि जेंव्हा प्लेग/महामारी पूर्णपणे नष्ट झाली त्यावेळी मोहोम्मद कुली कुतुबशहाने मोठ्या आनंदात हैद्राबाद इथं ऐतिहासिक अश्या चारमिनार ची निर्मिती केली होती. चारमिनार ची निर्मिती मशीद आणि मदरश्याच्या रुपात लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. या शिवाय काही इतिहासकारांच्या मते चारमिनार ची निर्मिती या करता करण्यात आली होती की गोलकोंडा च्या बाजारपेठेला आणि मछलीपट्टणम च्या बंदराला शहराच्या व्यापारी मार्गाशी व्यवस्थित जोडल्या जावे.

चारमिनार च्या निर्मितीमागे एक प्रेमकथा देखील सांगितली जाते…सुल्तान मोहोम्मद कुली कुतुबशहांनी आपली रूपवान पत्नी भागमती ला पहिल्यांदा याच ठिकाणी पाहीले होते, आणि राणी ने इस्लाम धर्म स्वीकारल्या नंतर त्यांनी या शहराचे नाव हैद्राबाद असे ठेवले. आपल्या अतूट आणि शाश्वत प्रेमाचे प्रतिक म्हणून त्यांनी या विशाल अश्या  प्रभावशाली ऐतिहासिक स्मारकाची निर्मिती केली होती.

चारमिनार च्या आत बनविली भव्य मक्का मशीद – Makkah Masjid Hyderabad

जवळपास 48 मीटर उंच अश्या शानदार चारमिनार च्या आत एक भव्य मशीद बनविण्यात आली आहे, ही मशीद मक्का मशीद म्हणून ओळखली जाते. ज्यावेळी गोलकोंडा महामारी पासून मुक्त झाला होता त्यावेळी मोहोम्मद कुली कुतुबशहाने चारमिनार ची निर्मिती एका मशिदीच्या रुपात केली होती. येथे लोक मोठ्या भक्तिभावाने अल्लाहची इबादत करत असत आणि आपल्या सुखाची कामना करीत असत.

चारमिनार चे प्रसिद्ध बांगड्या आणि मोत्यांचे मार्केट – Charminar Market

हैद्रबाद येथील या ऐतिहासिक चारमिनार स्मारकाजवळ वेगवेगळ्या गोष्टींचे मार्केट फार प्रसिद्ध असून फार दुरून-दुरून लोक याठिकाणी खरेदी करण्या करता येत असतात. सुरेख बांगड्या, हैद्राबादी कांजीवरम साड्या, डिझायनर ओढणी, आकर्षक दागिने, गोलकोंडा पेंटिंग, कलामकारी चित्र, गोंगुरा लोणचे, या गोष्टी या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहेत.

या चारमिनार जवळच असलेला पथेर गट्टी बाजार खास तऱ्हेच्या मोत्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे फक्त भारतातूनच नव्हे तर विदेशातून देखील पर्यटक मोती खरेदी साठी या ठिकाणी येतात. चारमिनार च्या चारी बाजूंना विशाल मार्केट पसरलेले असून जवळ-जवळ 14,000 पेक्षा जास्त दुकाने सजलेली दिसतात.

चारमिनार संबंधित काही विशेष तथ्य – Facts about Charminar

  • कुतुबशाही साम्राज्याचे पाचवे शासक सुल्तान मोहोम्मद कुली कुतुबशाह यांनी बनवून घेतलेल्या चारमिनारच्या निर्मितीचा मुख्य उद्देश मशीद आणि मदरश्याच्या रुपात सेवा करणे हा होता.
  • चारमिनार च्या निर्मितीत इंडो-इस्लामिक वास्तुशैलीचा वापर करण्यात आला आहे. शिवाय फारशी वास्तुशिल्प तत्वांचा देखील उपयोग केलेला आढळतो.
  • या वास्तुकलेत काही वेगळे शिल्प देखील दिसतात, मक्का मशीद, तौली मशीद, चारमिनार, जामी मशीद, आणि हैद्राबाद चे प्रभावशाली चिन्ह देखील अंकित करण्यात आले आहे.
  • या ऐतिहासिक इमारतीत दगडी बांधकामात केलेले सज्जे, छत, आणि वर्हांडे देखील आपल्याला दिसतात, या मिनार मधे चार चमकणाऱ्या मिनार आढळतात.
  • भारतातील या प्रसिद्ध इमारतीतील चार मिनार, इस्लाम च्या पहिल्या चार खलीफांचे प्रतिक मानण्यात येतात.
  • जगातील प्रसिद्ध असे हे ऐतिहासिक स्मारक ‘चारमिनार’ जुन्या हैद्राबाद मधे असून कुतुबशाही युगाचे मानचिन्ह देखील आहे.
  • या भव्य चारमिनार आणि गोलकोंडा यांच्या मधे एक गुप्त सुरंग बनविण्यात आली आहे, त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे याविषयी फार कमी लोकांना माहिती होती.
  • या विशाल ऐतिहासिक इमारतीमुळे हैद्राबाद शहराला स्वतःची अशी एक वेगळी ओळख मिळाली आहे.
  • हैद्राबाद येथील या आकर्षक चारमिनार वर रोज सायंकाळी चित्ताकर्षक दिव्यांनी झगमगाट करण्यात येतो, त्यामुळे याच्या सौंदर्यात अधिकच भर पडते.
  • या भव्य ऐतिहासिक इमारतीला आकर्षक बनविण्यासाठी पर्शियन आर्कीटेक्ट ला बोलाविण्यात आले होते.
  • चारमिनार चा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. 2010 साली युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट मधे चारमिनारचा समावेश केला आहे.
  • चारमिनार च्या प्रत्येक मिनार ला वेगळ्या तऱ्हेच्या रिंग ने अंकित केले गेले आहे, त्यामुळे दुरून देखील चारमिनार ला ओळखता येते.
  • या ऐतिहासिक चारमिनार स्मारकाचे नाव एका ट्रेन ला देखील देण्यात आले असून ही ट्रेन हैद्राबाद-चेन्नई दरम्यान धावते.

कसे पोहोचाल चारमिनार पाहायला – How To Reach Charminar

हैद्राबाद येथे असलेल्या या ऐतिहासिक चारमिनार ला पाहण्यासाठी अवघ्या जगातून लोक या ठिकाणी येत असतात. हैद्राबाद रस्ते, वायू, आणि रेल्वे या तिन्ही मार्गांनी चांगल्या पद्धतीने जोडले गेले आहे. हैद्राबाद रेल्वे स्थानकापासून चारमिनार 7 की.मी. अंतरावर आहे. बस स्थानकापासून चारमिनार 5 की.मी. अंतरावर आहे, आणि जर आपण विमानाने येत असाल तर विमानतळ ते चारमिनार हे अंतर 15 की.मी. एवढे आहे.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved