Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

चेतन भगत यांची पुस्तके

Chetan Bhagat Books in Marathi

चेतन भगत, पुस्तकांच्या दुनियेत क्रांती घडवून आणणारे हे नाव. यांच्या पुस्तकांवर अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आलेले आहेत. भारतातील एक सर्वात जास्त वाचला जाणारा लेखक म्हणून त्यांचा उल्लेख होतो.

चेतन भगत यांची पुस्तके – Chetan Bhagat Books in Marathi

Chetan Bhagat Books in Marathi
Chetan Bhagat Books in Marathi

१. फाईव्ह पॉइंट समवन : (Five Point Someone)

हि कथा आहे ३ मित्रांची. असे मित्र जे भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. ते जे काही करतात होते त्याच्या विरूद्धच. या संस्थेमध्ये शिक्षण घेणारे काही तरी जगावेगळे करून दाखवतात असा समज आहे. परंतु या तिघांच्या बाबतीत हो गोष्ट खोटी ठरते असे वाटते. शिवाय परीक्षेमध्ये त्यांना १० पैकी फक्त ५ पूर्णांक काही गुण (GPA) मिळतात. हे गुण म्हणजे त्यांना लागलेला डाग. प्रत्येक वेळी त्यांना या गुणांवरून हिणवल्या जाते.

मग काय होते त्या तिघांचं ? ते जीवनात काही करू शकतात कि नाही ? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला हे पुस्तक वाचावे लागेल.

२. वन अरेंज्ड मर्डर : (One Arranged Murder)

हि गोष्ट आहे एका जोडप्याची. सौरभ आणि प्रेरणा असे त्या दोघांचे नाव. त्यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम असतं. प्रेरणा सौरभ साठी करवा चौथ चे व्रत करते. पूर्ण दिवस काहीही न खाता पिता राहते. सौरभ ला फोन करून लवकर घरी यायला सांगते. तो लवकर येतो आणि धावत पळत प्रेरणाला भेटायला तिसऱ्या मजल्यावर जातो. आणि……………….

त्याला काय दिसते ? प्रेरणाचं काय होत ? कथेमधील केशव नावाच्या पात्राचा येथे काही संबंध आहे का ? असा एकंदरीत चित्त थरारक अनुभव देणारं हे पुस्तक. शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवणारी गोष्ट नक्की वाचली पाहिजे.

३. थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ : (Three Mistakes of My Life)

Three Mistakes of My Life
Three Mistakes of My Life

हि कहाणी आहे तीन मित्रांची. ज्यांची स्वप्ने खूप मोठी आहेत, व ती पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड येथे पाहायला मिळते. सुरुवातीला ते मिळून एक खेळाच्या साहित्याची दुकान सुरु करतात. परंतु भूकंप, जाती-धर्माचे दंगे आणि इतर अडचणी त्यांच्या मार्गात येतात.

ते त्यांचे स्वप्ने पूर्ण करू शकतात का ? त्या तीन चुका कोणत्या कि ज्यांचा उल्लेख कथेच्या शीर्षकात आहे ? असे हे पुस्तक, अतिशय रोचक आणि मनोरंजक.

४. इंडिया पॉझीटीव्ह : (India Positive)

या पुस्तकात लेखक विविध विषयांना तपासत आहेत जसे कि, GST पद्धत, भ्रष्टाचार, जातीभेद, शिक्षण आणि नोकऱ्या इ. समानता कशी निर्माण करायची ? जागतिक दर्जाची शिक्षण प्रणाली कशी तयार होणार ? देशावर कुठल्या पक्षाची सरकार आहे, याचा सामान्य नागरिकांना काही फरक पडतो का ? देशातील तरुणाला रोजगार कसा उपलब्ध होणार इ. प्रश्नांना येथे वाचा फोडण्यात आली आहे.

५. टू स्टेट्स : (Two States)

प्रेम विवाह म्हटला कि कुटुंबियांचा होणारा विरोध काही नवीन गोष्ट नाही. अशाच एका जोडप्याची कहाणी आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळणार. यावर एक हिंदी चित्रपट देखील आलेला आहे.

६. द गर्ल इन रूम १०५ : (The Girl in Room 105)

हि कहाणी आहे झारा आणि केशवची. दोघांचे एकमेकांवर प्रेम असते. पण काही कारणास्तव त्यांच्या मध्ये भांडणे होतात. पण काही वर्षांनी झाराचा एक संदेश येतो. त्या नंतर असे काही होते कि केशवचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. अशी काहीशी कहाणी आहे या पुस्तकाची. यांशिवाय,

  • मेकिंग इंडिया ओसम (Making India Awesome)
  • हाफ गर्लफ्रेंड (Half Girlfriend)
  • वन नाइट एट कॉल सेंटर (One Night @ Call Centre)
  • रीव्होलुशन २०२० (Revolution 2020)
  • व्हाट यंग इंडिया वॉन्ट्स (What Young India Wants)
  • वन इंडिअन गर्ल (One Indian Girl)

आणि अशी बरीच प्रसिद्ध पुस्तके त्यांनी लिहली आहेत.

काही महत्वाचे प्रश्न : (FAQs)

१. चेतन भगतचे पहिले पुस्तक कोणते ?

उत्तर : फाईव्ह पॉइंट समवन.

२. चेतन भगत यांचे शिक्षण काय झाले आहे ?

उत्तर : बी. टेक. आणि एम.बी.ए.

३. चेतन भगत यांच्या पत्नीचे नाव काय ?

उत्तर : अनुषा भगत.

४. चेतन भगत यांची एकूण संपत्ती किती आहे ?

उत्तर : जवळपास ५० दशलक्ष डॉलर.

५. चेतन भगत यांच्या किती पुस्तकांवर चित्रपट तयार झालेले आहेत ?

उत्तर : ५ पुस्तकांवर.

Previous Post

जाणून घ्या 22 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Next Post

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Editorial team

Editorial team

Related Posts

Books

मराठी समानार्थी शब्द

Samanarthi Shabd Marathi Mein प्रत्येक भाषेत समानार्थी शब्दाला फार महत्व असते मग ती मराठी असो, हिंदी असो, किवां कुठलीही. म्हणूनच...

by Editorial team
August 15, 2022
मराठी बाराखडी
Books

मराठी बाराखडी

Marathi Barakhadi नमस्कार मित्रांनो, आपल्याला अगदी लहान असल्या पासून शब्दांची ओळख आपले पालक करून देतात. शब्द म्हणजे काय तर आपल्याला...

by Editorial team
December 10, 2021
Next Post
23 February History Information in Marathi

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Marie Curie Information in Marathi

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

24 February History Information in Marathi

जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Vijaya Lakshmi pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

25 February History Information in Marathi

जाणून घ्या 25 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved