ग्रॅजुएशन नंतर करण्यासाठी उत्तम असे कोर्सेस

Courses after Graduation

आजकाल शिक्षणाचा सर्वत्र प्रसार होत असल्यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या दृष्टीने अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवी (ग्रेजुएशन) प्राप्त केल्यानंतर कोणते कोर्स करावे ज्याने करून भविष्यात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

ग्रेजुएशन नंतर आपण जर व्यावसायिक कोर्स केले तर त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला जरी शासकीय किंवा खासगी क्षेत्रात नोकरी नाही लागली तरी आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. स्वतःचा व्यवसाय करून आपण चांगली कमाई करू शकतो

ग्रॅजुएशन नंतर करण्यासाठी उत्तम असे कोर्सेस – Courses after Graduation

कोर्सस का वर्गीकरण – Types of Courses after Graduation

  • ट्रेडिंग कोर्सस (Trending Courses)
  • व्यावसायिक कोर्सस (Vocational courses)

१. ट्रेडिंग कोर्सस (Trending Courses)

आजकाल जे कोर्स नोकरीची हमी देतात आणि त्यात वेतन सुद्धा चांगले मिळते अशा कोर्सला शिक्षणक्षेत्रात भरपूर मागणी असते आणि त्यांना ट्रेडिंग कोर्स असे म्हणतात. पदवी प्राप्त केल्या नंतर आपण जर हे कोर्स केले तर आपल्याला नक्कीच नौकरीच्या जास्त संधी उपलब्ध राहतील. चला तर मग अश्या काही ट्रेडिंग कोर्सची आपण माहिती करून घेऊ या.

पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनीरिंग (Post Graduate Diploma in Software Engineering)

  • कोर्ससाठी पात्रता: कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
  • कोर्सची पातळी: पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा/ सर्टिफिकेट
  • कोर्सचा कालावधी: १ वर्ष

संगणकाचे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी लागणारे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये तयार करणे हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. संगणकाचे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी लागणाऱ्या programming language या अभ्यासक्रमात शिकवले जातात. हा कोर्स पूर्ण केल्या नंतर तुम्हाला IT क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपण पदवीधर असणे आवश्यक आहे.

टैली (Tally)

  • कोर्सचा कालावधी: ३ महिने

लहान पातळीवर कार्यरत राहणारी कंपनी आणि खासगी कार्यालय जिथे SAP सॉफ्टवेअरची गरज पण नसते आणि त्या कंपनीत किंवा कार्यालयात SAP सारखा महागडा सॉफ्टवेअर घेण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे आर्थिक सामर्थ्य पण नसते. अशा कार्यालयात टैली सॉफ्टवेअर मध्ये पारंगत असणाऱ्या विद्यार्थांची विशेष गरज असते.

हा कोर्स शिकण्यासाठी खूप कमी खर्च येते. या मध्ये तुम्हाला अकाउंटिंग, बिलींग, पे रोल, बँकिंग, कर इत्यादी विषय शिकवले जातात. ज्या विद्यार्थ्यानी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे त्याला हा कोर्स करणे खूप लाभ कारक आहे.

डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)

आजकाळ प्रत्येक वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी- विक्री केली जाते. ऑनलाईन खरेदी-विक्री केलेल्या मालाची माहिती सर्व लोकांपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून पोहचवणे यालाच डिजिटल मार्केटिंग म्हणतात. प्रत्येक इ-कॉमर्स कंपनी आपल्या मालाचे मार्केटिंग इंटरनेटच्या माध्यमातून करते.

पदवी प्राप्त केल्या नंतर जर आपण डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला तर आपल्याला सर्च इंजिन ऑटोमायझेशन सारखे कौशल्य शिकायला मिळते आणि हा कौशल्य शिकल्यावर आपल्याला नामांकित कंपनी मध्ये डिजिटल मार्केटिंग एक्सझिकिटिव्ह या पदावर नोकरी मिळण्याची चांगली संधी उपलब्ध आहे.

पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन इवेन्ट मैनेजमेंट अँड एक्टिवेशन (Post Graduate Diploma In Event Management and Activation)

आपल्या समाज मध्ये आपण विविध संस्कृती, समाजी आणि पारिवारिक कार्यक्रम आपण पाहतो आणि ते हर्ष आणि उत्साहाने मानवले जातात. लग्न किंवा वाढदिवसाचे कार्यक्रमाचे आयोगाने करायचे असेल. तर विविध इव्हेंट मॅनॅजमेण्ट कंपनी या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यासाठी उपलब्ध आहेत.

जर आपण पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन ईव्हेन्ट मॅनेजमेंट अँड ऍक्टिव्हशन हा कोर्स केला तर आपल्याला या कंपनीन मध्ये सहज नौकरी मिळू शकते. या कोर्स मध्ये तुम्हाला कार्यक्रमाची सजावट कशी करावी, बसण्याची व्यवस्था आणि फुलांची सजावट हे सर्व शिकवले जाते.

२. व्यावसायिक कोर्स (Vocational Course)

व्यावसायिक कोर्सस या हेतू ने तयार केले जातात की हे कोर्स पूर्ण केल्या नंतर विद्यार्थी एखाद्या मोठ्या व्यावसायिकी क्षेत्रात नोकरी करू शकतो किंवा स्वतःच व्यवसाय टाकू शकतो. अश्याच काही महत्वपूर्ण व्यावसायिक कोर्सची आपण खाली माहिती घेणार आहोत.

सर्टिफिकेट इन ग्राफिक डिजाईन अँड वेब डिजाईनिंग (Certificate In Graphic Design And Web Designing)

  • कोर्स साठी पात्रता: बी. टेक (आय.टी/ सी.एस .ई)/एम . सी .ए /कोणत्या पण शाखेतून ग्रॅजुएट
  • वय: किमान वय २० वर्ष असणे अनिवार्य आहे.

हा व्यवसायिक कोर्स फार महत्वाचा आहे. हे युग इंटरनेटचे युग आहे इंटरनेट आणि संकेतस्थळ हे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. इंटरनेटच्या माध्यमाने कोंतीपण माहिती आपण सहज मिळवू शकतो.

आपल्याला जर वेब डिजाईन येत असेल तर आपल्याला सहज चांगल्या वेतनाची नौकरी एखाद्या खासगी क्षेत्रात सहज मिळू शकते. आपल्याला जरी नौकरी नाही मिळाली तर आपण स्वतःची साईट तयार करू शकतो आणि त्यावर उपयुक्त माहिती अपलोड करून आपण चांगला पैस कमाऊ शकतो.

सर्टिफिकेट कोर्स इन लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मैनेजमेंट (Certificate Course In Logistics And Supply Chain Management)

  • कोर्स साठी पात्रता: कोणत्या ही शाखेची पदवी
  • वय: किमान २० वर्ष

आधुनिक जगात प्रत्येक गाव प्रत्येक शहर हे रस्त्यानी एकमेकाशी जोडले गेले आहे. कच्च्या मालाचा पुरवठा गवांकडून शहराकडे आणि पक्या मालाचा पुरवठा शहराकडून गाव कडे होताना आपल्याला दिसतो. पण या परिवहनाच्या व्यवस्थापन कोण करते आणि कशे करते.

मालाच्या परिवहनाच्या व्यवस्थापन काही खासगी कंपनी करतात. परिवहनाच्या व्यवस्थापनाला लॉजिस्टिक आणि सप्लाय चैन मानजमेंट म्हणतात. आपल्याला जर या क्षेत्रात नौकरी करायची असेल तर आपण सर्टिफिकेट कोर्स इन लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मैनेजमेंट हा कोर्स केलाच पाहिजे.

मोबाईल ऍप्स डेवलपमेंट (Mobile Apps Development)

आज काल प्रत्येक व्यक्ती जवळ स्मार्ट फोन असते आणि त्यामध्ये भरपूर APP पण असतात. जर तुम्ही मोबाइल अँप डेव्हलोपमेंटचा कोर्स केला. तर अँप डेव्हलोपमेंट कंपनी मध्ये आपल्याला चांगल्या वेतनाची नौकरी मिळू शकते. भविष्यात या क्षेत्रात असंखय नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. म्हणून हा कोर्स एक उपयुक्त व्यावसायिक कोर्स म्हणून ओळखला जातो.

ग्रॅजुएशन नंतर करण्यात येणाऱ्या कोर्स बद्दल विचारल्या जाणारे प्रश्न – Quiz Question about Courses after Graduation

१. ग्रेजुएशन नंतर कमी कालावधी असणारे कोणते कोर्स उलब्ध आहेत?
उत्तर: पोस्ट ग्रेज्यूएशन डिप्लोमा इन मैनेजमेंट, टैली, डिजिटल मार्केटिंग, डाटा विज्युलायजेशन इत्यादी.

२. आज काळ कोणता कोर्ससची लोकप्रियता जास्त आहे.?
उत्तर: सॉफ्टवेयर डेवलपमेंट, प्रोजेक्ट मैनेजमेंट, आय.टी सर्विस मैनेजमेंट, प्रोग्रामिंग, डाटा एनालिटिक्स अँड डाटा साइंस, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग इत्यादी कोर्सस.

३. रोजगाराच्या दृष्टीने कोणते कोर्सस जास्त महत्वपूर्ण आहे?
उत्तर: प्रोडक्ट मैनेजमेंट सर्टिफिकेशन प्रोग्राम, बिजनेस एनालिटिक्स सर्टिफिकेशन प्रोग्राम,फुल स्टैक डेवलपमेंट, पोस्ट ग्रेजुएशन इन डाटा साइंस, डिजिटल मार्केटिंग, सर्टिफिकेट कोर्स इन लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मैनेजमेंट इत्यादी कोर्सस रोजगाराच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

४. ३ महिन्याच्या कालावधी साठी कोणते सर्टिफिकेट कोर्सस उपलब्ध आहेत.
उत्तर: मेडिकल बिलिंग अँड कोडींग स्पेशालीस्ट, वेब डिजाईनर, एच.व्ही.ए.सी टेक्नीशियन, आय.टी सपोर्ट, ट्रक ड्राईव्हर, पर्सनल ट्रेनर हे सर्व सर्टिफिकेट कोर्सस ३ महिन्याच्या कालावधी साठी उपलब्ध आहेत.

५. लॉकडाउन मध्ये भारत सरकारने कोणते कोर्सस विनाशुल्क नागरिकांना उपलब्ध करून दिले होते?
उत्तर: नॅसकॉम कडून ए. आय आणि डेटा ससान्स कोर्स, स्वयम कडून हुमान रेसॉरस कोर्स, आय. सी. टी कडून हुमान रेसॉरस कोर्स हे सर्व कोर्सस लॉकडाउन मध्ये भारत सरकारने को विनाशुल्क नागरिकांना उपलब्ध करून दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here