D Pharmacy Information in Marathi
१२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या समोर खूप पर्याय असतात. यांतील काही पर्याय हे अभियांत्रिकीकडे तर काही वैद्यकीय विभागाकडे वळतात. शिवाय काही पर्याय हे पदवीचे आणि काही असतात पदविकेचे. परंतु एखादा कोर्स करायचा असल्यास त्या बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे.
१२ वी नंतर पदविकेचा कोर्स करायचा झाल्यास D. Pharmacy किंवा D. Pharm (Diploma in Pharmacy) (डिप्लोमा इन फार्मसी) हा एक उत्तम पर्याय आपल्या समोर आहे. यामध्ये आपल्याला औषध शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कमी कालावधी आणि काळाची मागणी असलेला हा कोर्स आहे. ज्यांना रसायनशास्त्र हा विषय आवडतो, असे विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.
भविष्यात चांगल्या नोकरीची किंवा व्यवसायाची संधी या क्षेत्रात उपलब्ध होऊ शकते. चला तर मग या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती बघुयात :
D. Pharmacy (डिप्लोमा इन फार्मसी) कोर्स बद्दल संपूर्ण माहिती – D Pharmacy Information in Marathi
अभ्यासक्रमाचे नाव (Name of Course) : | D. Pharmacy (Diploma in Pharmacy) (डिप्लोमा इन फार्मसी) |
अभ्यासक्रमाचे स्वरूप (Type of Course) : | पदविका (Diploma) |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): | १२ वी पास. (कमीत कमी ५०% गुणांसह)
(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा गणित विषयांसह) |
कालावधी (Duration) : | २ वर्षे. |
प्रवेश प्रक्रिया – D Pharmacy Admission Process
१२वी नंतर आपल्याला प्रवेश परीक्षा (Entrance Exam) द्यावी लागेल. काही विद्यापीठांमध्ये ही परीक्षा न देता गुणवत्ता आधारावर (Merit Basis) सुद्धा प्रवेश घेता येतो. प्रवेश परीक्षा दोन प्रकारच्या असतात, राज्य प्रवेश परीक्षा (State Entrance Exam) आणि विद्यापीठ प्रवेश परीक्षा (University Entrance Exam).
प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम हा १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतो.
प्रवेशासाठी लागणारी कागपत्रे – Documents Required for D Pharmacy Admission)
- १० वी आणि १२वी ची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र. (SSC and HSC Marksheets and Board Certificate)
- शाळा सोडल्याचा दाखल (T. C.)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- आधार कार्ड (Aadhar Card)
- प्रवेश परीक्षा गुणपत्रिका (Entrance Exam Result) (If Applicable).
- उत्पन्न दाखल (Income Certificate).
- पासपोर्ट फोटो (Passport Size Photo) इ.
अभ्यासक्रमाचे विषय – D Pharmacy Subjects
१. प्रथम वर्ष : 1st year
- औषधनिर्माणशास्त्र १ (Pharmaceutics 1)
- आरोग्य शिक्षण आणि समुदाय फार्मसी (Health Education and Community Pharmacy)
- बायोकेमिस्ट्री क्लिनिकल पॅथालॉजि (Biochemistry Clinical Pathology)
- औषध रसायनशास्त्र १ (Pharmaceutical Chemistry 1)
- मानवी शरीरशास्त्र शरीरविज्ञान (Human Anatomy Physiology)
२. द्वितीय वर्ष : 2nd year
- रुग्णालय क्लिनिकल फार्मसी (Hospital Clinical Pharmacy)
- औषधनिर्माणशास्त्र २ (Pharmaceutics 2)
- औषध रसायनशास्त्र २ (Pharmaceutical Chemistry 2)
- औषधनिर्माणशास्त्र आणि विषशास्त्र (Pharmacology and Toxicology)
- औषध दुकान व्ययसाय व्ययस्थापन (Drug Store Business Management)
- औषधोपचार न्यायशास्त्र (Pharmaceutical Jurisprudence).
अभ्यासक्रमाची फी : (Course Fee)
१०,००० ते १,००,००० (वार्षिक)
करियर – after d pharmacy
- हा कोर्स केल्यानंतर आपण समोर बी. फार्म (Bachelor in Pharmacy) या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो.
- औषध सल्लागार, औषध सहायक या पदांवर कार्य करू शकतो.
- स्वतःचे औषधाचे दुकान टाकू शकतो.
- शासकीय दवाखाने किंवा आरोग्य विगाभात नोकरीची संधी.
डी. फार्मसी साठी महाराष्ट्रातील उत्कृष्ट महाविद्यालये : Top Colleges of Pharmacy in Maharashtra
- पूणा कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे
- शासकीय फार्मसी कॉलेज, औरंगाबाद.
- इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे
- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर
- सरस्वती इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, हिंगोली
अशाप्रकारे आपण डी. फार्मसी हा कोर्स करून एक चांगलं करियर आपण घडवू शकतो.
डिप्लोमा इन फार्मसी साठी नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न : FAQ about D. Pharmacy
उत्तर : कमीत कमी ५०% गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा गणित हे विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण.
उत्तर : २ वर्षे.
उत्तर : होय. डी. फार्मसी नंतर आपण अनेक क्षेत्रांत काम करू शकतो. आपण स्वतःचे औषधी दुकान टाकू शकतो, शासकीय वैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग, तसेच खाजगी रुग्णालयांतही आपण काम करू शकतो.
उत्तर : याचे उत्तर तुम्ही कोणत्या विभागात काम करता यावर आधारित असेल. सरासरी ३.५ लक्ष ते १० लक्ष रु. प्रति वर्ष आपण कमाऊ शकता.