महाभारतातील महान असे पात्र…..एकलव्य यांची कथा

Eklavya Story

भारतातील सर्वात जुने आणि महान असे महाकाव्य म्हणजे महाभारत! याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. महाभारतातील प्रत्येक कथेमध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रांची स्वत:ची अशी एक विशेष ओळख करून दिली आहे.

असे असले तरी सुद्धा महाभारतात काही पात्रे अशी आहेत की, ज्यांना विशेष असे महत्व देण्यात आले नाही. यामुळे अश्या दुर्लक्षित राहिलेल्या पात्रांना कमी लोक ओळखतात.

महाभारतात असणारे असेच एक महान व्यक्तीमत्व म्हणजे एकलव्य हे होय!

Eklavya

महाभारतातील महान असे पात्र…..एकलव्य यांची कथा – Eklavya Story in Marathi

जेव्हा जेव्हा गुरु-शिष्य यांच्या नात्या संबंधी चर्चा केली जाते, तेव्हा आपण सर्वप्रथम गुरु द्रोणाचार्य आणि त्यांचा शिष्य अर्जुन यांची नावे घेत असतो.

असे असले तरी जेव्हा एका आदर्श शिष्याबदल चर्चा केली जाते तेव्हा मात्र नेहमीच शिष्य एकलव्य यांची आठवण केली जाते.

महाभारतातील एक महान व्यक्तीमत्व असलेले महत्वपूर्ण असे पात्र म्हणजेच एकलव्य होय.  अश्या महान शिष्याच्या व्यक्तीमत्वातून आपल्याला कुठल्याना कुठल्या प्रकारची शिकवण ही मिळतेच.

कोण होते एकलव्य – Who is Eklavya Information in Marathi

महाभारतात असणाऱ्या कथेनुसार एकलव्य हे एक भिल्ल पुत्र होते. त्यांचे वडिल राजा हिरण्यधनू हे भिल्लांच्या कुळाचे राजा होते. एका शिकाऱ्याचा मुलगा असल्या कारणामुळे एकलव्यांना त्यांच्या लहानपणा पासूनच धनुष्यबाणा प्रती खूप आवड निर्माण झाली होती.

ते त्यांच्या वडिलांसोबत लहानपणापासूनच धनुष्यबाण चालवत असल्यामुळे ते धनुष्यबाण चालवण्यात खूपच तरबेज झाले होते.

एके दिवशी एकलव्य हे बांबूपासून बनवलेल्या धनुष्यावर लाकडापासून बनवलेलला बाण लाऊन आपले लक्ष्य केंद्रित करून शिकार करीत होते. हे सर्व दृश्य पुलक मुनी दूर उभे राहून पाहत होते.

एका लहान मुलात असलेला आत्मविश्वास पाहून पुलक मुनी खूपच आश्चर्य चकीत झाले. पुलक मुनी यांनी एकलव्याला विचारले की, आपले वडिल हे कोण आहेत?

पुलक मुनी यांचा प्रश्न ऐकताच एकलव्य मुनींना आपले वडिल राजा हिरण्यधनू यांच्याकडे घेऊन गेले.

तेव्हा पुलक मुनी यांनी राजा हिरण्यधनू यांना सांगीतल की, तुमचा मुलगा हा उत्कृष्ट धनुर्धर होण्यासाठी योग्यरित्या तयार झाला आहे.

मुनीचे बोलणे ऐकल्यानंतर हिरण्यधनू यांच्या मनात सुद्धा आपल्या मुलाला एकलव्याला एक उत्कृष्ट प्रकारचा धनुर्धर बनवण्याची इच्छा जागृत झाली.

त्यावेळेस गुरु द्रोणाचार्य हे त्यांच्याकडे असलेल्या धनुर विदयेसाठी पूर्ण देशात प्रसिद्ध होते. हिरण्यधनू यांची सुद्धा इच्छा होती की, आपल्या मुलाला गुरु द्रोणाचार्य यांच्याकडून शिक्षा मिळावी.

एके दिवशी हिरण्यधनू आणि एकलव्य हे गुरु द्रोणाचार्य यांच्या आश्रमात पोहचले आणि त्यांनी त्याठिकाणी गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे पुत्र एकलव्याला धनुर्विद्या शिकवण्याची याचना केली.

राजा हिरण्यधनू यांनी जेव्हा आपला परिचय देण्यास सुरवात केली, त्यावेळेस त्यांनी सांगीतल की मी भिल्लांच्या जमातीचा राजा आहे.

यावर गुरु द्रोणाचार्य यांनी हास्यपूर्वक विधान केले की, भिल्ललोक हे धनुर्विद्या शिकून सुद्धा धनुष्य आणि बाणांचा वापर फक्त शिकार करण्यासाठी करू शकतात, लढाई लढण्यास नाही.

राजा हिरण्यधनू यांना हे ऐकल्यानंतर खूप अपमानित झाल्या सारखं वाटलं.  परंतु त्यांनी आपल्या मुलाला एकलव्याला गुरु द्रोणाचार्य यांच्या आश्रमात त्यांची सेवा करण्याकरिता तिथेच ठेऊन ते निघून गेले.

गुरु द्रोणाचार्यांनी यापूर्वीच भीष्मपितामह यांना वचन दिले होते की, मी कौरव घराण्याशिवाय दुसऱ्या कोणालाही धनुर्विद्येचे प्रशिक्षण देणार नाही.

गुरु द्रोणाचार्य यांनी आपल्या आश्रमात एकलव्य यांना राहण्यासाठी एक झोपडी दिली. जसजसे दिवस पुढे जात होते त्याप्रमाणे एकलव्य हे गुरु द्रोणाचार्य यांची एका सेवकाप्रमाणे सेवा करीत असत.

ते त्यांची सेवा करण्यात कुठल्याच प्रकारची कमतरता ठेवत नसत. एकलव्यांना आश्रमात दररोज राजकुमारांनी धनुर्विद्येचा सराव केल्यानंतर त्यांच्या बाणांना गोळा करण्याच काम मिळाल होत.

ज्यावेळेला गुरु द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडव या राजकुमारांना धनुर्विद्येचे  शिक्षण देत असत, त्यावेळेला एकलव्य हे दूर उभे राहून त्यांचे बोलणे लक्ष्य देऊन ऐकत असत.

कधी कधी सर्व राजकुमार आपला सराव लवकर संपवून लवकर जात असत, अश्यावेळी एकलव्याना धनुर्विद्येचा सराव करायला काही वेळ मिळत असे.

एकलव्य यांच्याकडे असलेली तीव्र स्मरण शक्ती आणि त्यांची धनुर्विद्या  शिकण्या संबंधी असलेली तीव्र इच्छेमुळे ते इतर राजकुमारांच्या तुलनेने खूप चांगल्या प्रकारे तिरंदाजी करीत असत. एके दिवशी एकलव्य यांना धनुष्यबाण चालवितांना दुर्योधनाने बघीतल आणि गुरु द्रोणाचार्य यांना जाऊन सांगीतल.

गुरु द्रोणाचार्य यांना जेव्हा दुर्योधनाकडून ही बातमी समजली तेव्हा ते स्वत: एकलव्याना भेटायला निघाले. त्यांनी एकलव्याला बाण चालवितांना बघितल तेव्हा ते आश्चर्यचकीत झाले. गुरु द्रोणाचार्य हे आपल्या वचनात बांधले गेले असल्याने त्यांनी लगेचच एकलव्याला आश्रम सोडण्यास सांगीतला.

त्यांनी भीष्मपितामह यांना यापूर्वीच वचन दिले होते की, धनुर्विद्येचे शिक्षण हे फक्त राज्कुमारानाच देण्यात येईल.

गुरु द्रोणाचार्य यांचा संदेश ऐकताच एकलव्य आश्रम सोडून घराकडे रवाना झाले.

घराकडे जात असताना वाटेतच त्यांना जाणीव झाली की,  घरी जाऊन आपल्याला आपले धनुर्धारी होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही.

एकलव्य यांनी त्याच जंगलात राहत असलेल्या जमातीचा आश्रय घेतला.  त्याठिकाणी त्यांनी गुरु द्रोणाचार्य यांचा मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्या समोर ते रोज धनुर्विद्येचा सराव करू लागले.

जसजसे दिवस पुढे जात गेले तसे सर्वच राजकुमार हे हळूहळू मोठे होऊ लागले.

दुसरीकडे जंगलामध्ये राहत असलेले एकलव्य देखील मोठे होत होते, तसेच धनुर्विदयेत देखील खूपच पारंगत होत होते.

गुरु द्रोणाचार्य यांच्या आश्रमात धनुर्विद्याचे शिक्षण घेत असलेल्या राजकुमारांपैकी फक्त अर्जुनच खरा धनुर्धारी होता. याच कारणामुळे अर्जुनाच्या प्रती गुरु द्रोणाचार्यांचे विशेष प्रेम होते.

गुरु द्रोणाचार्यांनी आपला शिष्य अर्जुनाला असे वचन दिले होते की, त्याला ते जगातील सर्वात मोठा धनुर्धारी योद्धा बनवणार.

परंतु द्रोणाचार्यांचे असणारे हे स्वप्न फार काळ टिकणार नव्हते, लवकरच त्यांचा हा गैरसमज दूर होणार होता.

एका दिवशी एकलव्य जंगलामध्ये धनुर्विद्येचा सराव करीत असतांना, त्याठिकाणी एक कुत्र आल आणि त्या कुत्र्याने जोर जोराने भुंकूण्यास सुरवात केली.

त्या कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजामुळे त्यांची एकाग्रता भंग पावत होती त्यांचे लक्ष्य केंद्रित होत नव्हते.

एकाग्रता भंग पावत असल्याने त्यांनी आपल्या बाणांच्या साह्याने त्या कुत्र्याचे तोंड बंद करण्यासाठी काही बाण त्या कुत्र्याच्या तोंडात मारले, त्यांनी ते बाण अश्या पद्धतीने मारले होते की जेणेकरून, त्या कुत्र्याचे तोंडच फक्त बाणानी बंद झाले पाहिजे त्या  कुत्र्याला कुठल्याच प्रकारची इजा ही झाली नाही पाहिजे.

एकलव्यांनी ज्या कुत्र्याच्या तोंडात बाण मारले होते तो कुत्रा कौरवांचा होता.

यामुळे तो कुत्रा जेव्हा तश्याच अवस्थेत आश्रमात पोहचला तेव्हा त्या कुत्र्याला पाहून गुरु द्रोणाचार्या बरोबर त्यांचे शिक्षण घेत असलेले शिष्य (राजकुमार) आश्चर्यचकित झाले.

तेव्हा ते सर्व जण त्याच क्षणाला विचार करीत बसले की असा कोण धनुर्धारी असेल ज्याने इतक्या बाणाचा प्रहार कुत्र्याच्या तोंडात करून सुद्धा कुत्र्याच्या तोंडातून रक्ताचा एक थेंबसुद्धा पडला नाही.

याचा शोध घेण्यासाठी ते सर्व एकलव्य सराव करीत असलेल्या जंगलात गेले,  तेथे गुरु द्रोणाचार्याना पाहताच क्षणी एकलव्य त्यांना प्रणाम करण्याकरता समोर आले.

गुरु द्रोणाचार्यांनी त्यांची मूर्ती त्या जंगलात पाहताच त्यांच्या लक्षात आले की,  हा धनुर्धारी दुसरा कोणी नसून एकलव्यच आहे.

गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्यांना विचारले की, त्यांनी राजकुमाराच्या कुत्र्यांची अशी अवस्था का केली?  तेव्हा यावर एकलव्यांनी त्यांना घडलेली पूर्ण कथा सांगीतली.

त्याच बरोबर एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना सांगीतल की, तुम्ही शिकविल्या प्रमाणेच मी कुत्र्याचे तोंड बाणांच्या साह्याने बंद केले.

ह्यामुळे कुत्र्याला कुठल्याही प्रकारची इजा ही झाली नाही.

एकलव्याचे कथन ऐकताच गुरु द्रोणाचार्य विचाराधीन झाले.

कारण त्यांना आपल्या प्रिय शिष्य अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवायचे होते. गुरु द्रोणाचार्यांच्या मनात एक कल्पना आली.

गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला सांगितले की, तू मला न विचारता मला गुरु केले आणि चोरून माझ्याकडून धनुर्विद्येचे शिक्षण घेतले.

तसेच त्यांनी एकलव्याला गुरुदक्षिणा सुद्धा मागीतली.

त्यांनी गुरु दक्षिणेत एकलव्याला आपल्या उजव्या हाताचा अंगठा मागितला, जेणेकरून याच्या पुढे तो धनुष्य चालवणार नाही.

एकलव्य आपल्या गुरूंचा खूप आदर करीत असे. त्यामुळे कुठलाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून त्याने गुरु दक्षिणा म्हणून तो गुरूसमोर अर्पण केला.

आपल्या सोबत एवढे सर्व होऊन सुद्धा त्याच्या मनात कधीच निराशेची भावना आली नाही, याउलट त्याने आपल्या चार बोटांनी धनुष्य चालवणे सुरूच ठेवले.

एकलव्याचा मृत्यू – Eklavya Death

पौराणिक कथांनुसार, एकलव्य जेव्हा राजा बनला तेव्हा त्याने जरासंधाने मथुरेवर केलेल्या आक्रमणात त्याला साथ दिली आणि एकट्याच्या बळावर यादव वंशाचे हजारो सैन्य ठार मारले.

ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या लढाईत उतरले तेव्हा त्यांना माहित झाल की, आपल्या सैन्यांचा वध करणारा धनुर्धारी हा चार बोटांनी धनुष्य चालविणारा एकलव्य आहे.

याच युद्धात एकलव्याला भगवान श्रीकृष्णाकडून वीरगती प्राप्त  झाली.

यावरून असा बोध होतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण खचून न जाता आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा आत्मविश्वासाने सामना करायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here