“पर्यावरण रक्षण…काळाची गरज”

Pradushan Nibandh in Marathi

आज पर्यावरण प्रदूषणाची समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून ही समस्या संपूर्ण विश्वाला भेडसावते आहे. आज प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना प्रदूषणाचे विविध प्रकार, प्रदूषणाची कारण, त्यावरचे उपाय याविषयी अवगत करायला हवे.

आज आपण रहातो त्या जगाची सर्वात मोठी समस्या प्रदूषण ही झाली आहे. आपल्या आसपास जे घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यातून हे प्रदूषण जन्मास येते. या प्रदूषणाच्या विळख्यात केवळ मनुष्य प्राणी अडकलाय असे नव्हे तर समस्त जीवजंतू आणि अवघी जीवसृष्टी याच्या दुष्परिणामांचा सामना करते आहे.

गेल्या काही दशकांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढले आहे की मानवी जीवनच संकटात सापडले आहे. या समस्येवर गांभीर्याने विचार केला गेला नाही तर तो दिवस दूर नाही जेंव्हा दररोज प्रदूषणामुळे कुणा न कुणाचा मृत्यू होईल आणि एक दिवस या जगाचे अस्तित्वच नामशेष होईल.

“या मित्रांनो प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधूया…प्रदूषणाला हद्दपार करूया” – Essay on Environmental Pollution in Marathi

Essay on Pollution in Marathi
Essay on Pollution in Marathi

प्रदूषण म्हणजे काय? – Definition of Pollution

जेंव्हा दुषित तत्व प्रकृतीच्या परिघात प्रवेश करतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात, त्यामुळे नैसर्गिक संतुलन पूर्णतः बिघडून मनुष्याला शुद्ध वायू, शुद्ध पाणी आणि शांत वातावरण मिळत नाही तेंव्हा त्याला प्रदूषण असं म्हंटलं जातं.

या प्रदुषणामुळे अनेक गंभीर समस्या जन्म घेतात. याचा दुष्परिणाम केवळ आपल्या दैनंदिन जीवनावरच होतो असे नव्हे तर अनेक गंभीर आजार प्रदुषणामुळे निर्माण होतात. ग्लोबल वार्मिंग सारखी समस्या यातूनच निर्माण झाली आहे. आज मनुष्य आपल्या सुखासीन जीवना करता अनेक आरामदायक, सुखसुविधा  देणाऱ्या उपकरणांचा वापर करतो आहे, परंतु त्यामुळे निसर्गाचे संतुलन ढासळते आहे आणि प्रदूषण आपल्या चरमसिमे पर्यंत पोहोचले आहे.

आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मनुष्य या उपकरणांच्या सुखसुविधेत गुरफटला गेला आहे. त्याला या क्षणिक सुख देणाऱ्या उपकरणांची इतकी सवय झाली आहे की याच्याशिवाय तो आपल्या आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही.

परंतु या मानव निर्मित उपकरणांमुळे निसर्गाची अपरिमित हानी होत असून प्रदूषणाची समस्या निरंतर वाढते आहे. त्यामुळे आज या प्रदूषणाच्या समस्येवर अंकुश निर्माण करण्याची आणि समाजाचे लक्ष याकडे केंद्रित करण्याची नितांत आवश्यकता आहे.

स्वच्छ शुद्ध वातावरणात राहिल्याने केवळ मनुष्याचा विकास होतो असे नव्हे तर स्वस्थ समाजाची देखील निर्मिती होते. शुद्ध वातावरण म्हणजे-प्रदूषण रहित वातावरण होय!

आपण सर्वजण मिळून जोवर वातावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत केवळ अस्वच्छता आणि प्रदूषण पसरत राहील. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी याचे दुष्परिणाम आणि त्यापासून वाचण्याचे उपाय याविषयी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तेंव्हाच या प्रदूषणाच्या समस्येवर आळा बसू शकेल.

खरंतर आपण काहीही विचार न करता आपल्या प्राकृतिक साधन संपत्तीचे हनन करत असतो, त्यामुळे प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्याला आपले ज्ञान वाढवावयास हवे आणि विचारांची व्याप्ती वाढवायला हवी. विविध प्रकारचे प्रदूषण, त्याची कारणं आणि मानवी जीवनावर आणि निसर्गावर त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

प्रदूषणाचे प्रमुख प्रकार – Types of Pollution in Marathi

 • वायू प्रदूषण – Air Pollution
 • जल प्रदूषण – Water Pollution
 • ध्वनी प्रदूषण – Sound Pollution (Noise pollution)
 • रेडीयोधर्मी प्रदूषण – Radioactive Pollution
 • रासायनिक प्रदूषण – Chemical Pollution
 • प्रकाश प्रदूषण – Light Pollution
 • दृश्य प्रदूषण – Visual pollution
 • थर्मल प्रदूषण – Thermal Pollution

काही प्रमुख प्रदुषणाबद्दल आपण विस्तृत माहिती घेऊया – Main types of Pollution

 • वायू प्रदूषण – Air pollution

आज पूर्ण पृथ्वीवर वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वायू प्रदुषणामुळे मानवाला शुद्ध हवा मिळत नाही आणि परिणामी दमा, अस्थमा, सारख्या श्वसना संबंधित अनेक आजारांचा त्याला सामना करावा लागतो. वास्तविक जेंव्हा आपल्या वायुमंडलात जैविक, रासायनिक, सूक्ष्म असे अनेक तऱ्हेचे विषारी पदार्थ प्रवेश करतात तेंव्हा त्याला वायू प्रदूषण असं म्हंटल्या  जातं.

या दुषित तत्वांमुळे वायू दुषित होतो, आपल्या वायुमंडलात एका निश्चित मात्रेत अनेक गैस असतात पण जेंव्हा दुषित तत्व या वायुमंडलात प्रवेश करतात तेंव्हा या गैसचे संतुलन बिघडते, आणि त्यामुळे वायूप्रदूषण होण्यास सुरुवात होते.  वाढते औद्योगिकीकरण, अनियंत्रित लोकसंख्या, कमी होत जाणारे जंगल आणि वाहनांचा अत्याधिक वापर यामुळे वायुप्रदूषणाची समस्या  सतत वाढते आहे.

 • जल प्रदूषण – Water pollution

जल प्रदुषणामुळे केवळ मानवी जीवनच नव्हे तर सागरी जीव-जंतू आणि असंख्य वनस्पती देखील प्रभावित झाल्या आहेत. ज्यावेळी नैसर्गिक जल-स्त्रोतांमध्ये विविध प्रकारचे दुषित पदार्थ मिसळले जातात तेंव्हा जल प्रदुषणाची समस्या उग्र रूप धारण करते.

मोठमोठ्या उद्योगक्षेत्रांमधून निघणारा कचरा, रसायन जलस्त्रोतांमध्ये फेकण्यात येतो तेंव्हा पूर्ण पाणी विषारी होऊन जाते. अनेक सागरी जीवजंतू त्यामुळे मृत्युमुखी पडतात. या दुषित पाण्याच्या सेवनाने मनुष्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. जल प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. या समस्येवर गंभीर प्रयत्नांची खूप आवश्यकता आहे.

 • ध्वनी प्रदूषण – Sound Pollution (Noise pollution)

मोठ्या आवाजाने होणाऱ्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण म्हंटल्या जातं. वाहने, यंत्र, रेडियो, डीजे, लाउडस्पीकर, टेलीविजन सारख्या असंख्य उपकरणांमधून ध्वनी प्रदूषण होते.या ध्वनी प्रदूषणामुळे माणसाची ऐकण्याची क्षमता कमी होते.

कित्येकदा या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा, हार्ट अटैक, तणाव, यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत असतात. याविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. तेंव्हाच या समस्येचे निराकरण होऊ शकते.

निष्कर्ष – Conclusion 

 • कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असो, ते हानिकारकच असते. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येवर चिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि हे तेंव्हाच संभव होईल जेंव्हा संपूर्ण समाज एकजुटीने पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करेल आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपल्या पृथ्वीला हिरवीगार करेल.
 • वाहनांचा वापर शक्य तितक्या कमी प्रमाणात करणे देखील आवश्यक आहे.
 • मोठमोठे उद्योग कारखाने शहराच्या जवळ सुरु न करता शहरा बाहेर उभारले जावे जेणे करून नगर वासियांना प्रदूषणाच्या समस्येला कमी प्रमाणात तोंड द्यावे लागेल.
 • आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून ते वृक्ष मोठे होईपर्यंत त्याची काळजी घ्या.
 • कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावणे देखील फार गरजेचे आहे.
 • कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्यास शेतकरी बांधवाना प्रोत्साहीत करा.
 • पर्यावरणाला स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा.
 • मोठमोठ्या उद्योगांकरता कठोर नियम (पर्यावरणाला अनुसरून) बनवावे.

प्रदूषण ही आजच्या युगाची सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. पिण्याचे जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही तर येणाऱ्या काळात फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल.

त्यामुळे वेळ असता सजग सावध होऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून लोकांना एकत्र करून जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रोत्साहीत करा. वातावरण स्वच्छ ठेवा, आपल्या पृथ्वीला निरामय करा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top