“होळी” या सणावर निबंध

 

Essay on Holi in Marathi

होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी होळीचे दहन केले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण येतो. मौजमजेचा हा सण आपल्याला वाईट विचारांचा त्याग करावा असा मोलाचा संदेश सुद्धा देऊन जातो.

रंगांचा उत्सव “होळी” या सणावर निबंध – Holi Essay in Marathi

Holi Essay in Marathi
Holi Essay in Marathi

भारत देश म्हणजे सण आणि महोत्सवांचा देश. आपल्या देशात अनेक सण मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. परंतु मला यांपैकी सर्वात जास्त आवडणारा सण म्हणजे होळी. होळीचा सण संपूर्ण भारतात हर्षोल्लासात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देतात.

होळीच्या दिवशी चांगल्या गोष्टींचा वाईटावर होणारा विजय म्हणून होलिका दहन करण्यात येते. या सणाला परिवार आणि आप्तजण एकत्र येऊन होळी दहन करतात. सोबतच घरामध्ये पुरण आणि इतर पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते.

होलिका दहना ची कथा – Holika Dahan Story in Marathi

होळीला पौराणिक महत्व देखील आहे. भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूचे निस्सीम भक्त होते. परंतु त्यांचे पिता म्हणजेच हिरण्यकश्यपू यांना प्रल्हादची ही भक्ती मान्य नव्हती.

वारंवार प्रल्हादला समज देऊनही ते ऐकत नव्हते. शेवटी क्रोधीत होऊन हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादला आपली बहिण होलिकाच्या मांडीवर बसवून अग्नीत बसविले. होलिकाला मिळालेल्या वरदानानुसार तिला अग्नी स्पर्श करू शकत नव्हता.

परंतु जेव्हा ती भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीत बसली तेव्हा मात्र आश्चर्यच झाले. अग्नीत होलिका जळून भस्म झाली पण भक्त प्रल्हाद मात्र सुरक्षित राहिले. अशा प्रकारे दृष्टाचा पराजय झाला.

होळीचा दुसरा दिवस रंगपंचमी म्हणजेच धुलीवंदन – Dhulivandan Information in Marathi

होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी म्हणजेच धुलीवंदन. या दिवशी सर्वजण मतभेद विसरून एकमेकांना रंग लावतात. लहान मुले पिचकारी आणि फुग्यांमध्ये रंग भरून एकमेकांना रंगवितात.

एकंदरीत पहायचे झाले तर होळीचा सणम्हणजे आनंद आणि प्रेमाचा सण. म्हणून मला होळीचा सण खूप आवडतो.

Holi Nibandh in Marathi
Holi Nibandh in Marathi

“माझा आवडता सण होळी” निबंध मराठी – Holi Nibandh in Marathi

होळी म्हणजे रंगांचा सण. तसे पहिले तर हा सण दोन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी होळी आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात होळीचा सणसर्वत्र साजरा केल्या जातो.

विशेषतः उत्तर भारतात हा सण अतिउत्साहात साजरा केला जातो. होळीचा सण ‘शिमगा’, ‘होलिकादहन’, ‘हुताशनी पौर्णिमा’, ‘दोलायात्रा’ इ. नावांनी भारताच्या विविध भागांत साजरा केला जातो.

होळीचा सण साधारणतः मार्च महिन्यामध्ये येतो. या दिवशी ज्या ठिकाणी होलिका दहनाचा कार्यक्रम असतो त्या जागेची साफसफाई केल्या जाते.

तेथे लाकूड, गवत आणि शेणाच्या गोवऱ्यांची रास करून सायंकाळी होळी पेटविण्यात येते.

होळीला पुरणपोळीचा आणि गोड पदार्थांचा नैवैद्य अर्पण केला जातो.

नंतर होळीला प्रदक्षिणा घालून तिच्या भोवती पाणी वाहतात. शेवटी नारळ फोडून सर्वांना प्रसाद म्हणून खोबरं आणि गाठीचा वाटप केला जातो.

चांगल्याचा वाईटावर झालेला विजय म्हणून होळी सण ओळखला जातो. हिंदू पुराणामध्ये होळीची कथा पाहायला मिळते. भगवान विष्णूचा परम भक्त प्रल्हाद हा सतत देवाचे नाम जपत होता. हे असुरराज हिरण्यकश्यपूला सहन होत नव्हते. यावर क्रोधीत होऊन तो प्रल्हादला होलीकाच्या मांडीवर बसवून जाळण्याचा प्रयत्न करतो.

परंतु देवाचे नाम जप करत असल्याने प्रल्हादला काहीच होत नाही. याउलट होलिका जळते. म्हणून या दिवशी आपण होलिका दहन करतो. या दिवशी आपण आपल्यामधील सर्व वाईट गुण होळीत जाळून टाकले पाहिजे.

Holi Puja Marathi

होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी. या दिवशी सर्वजण एकमेकांना रंग लावतात. सर्व मतभेद बाजूला ठेऊन रंगपंचमी साजरी केली जाते.

अबालवृद्ध सर्वच रंग उधळतात. तरुण मंडळी डीजेच्या तालावर नाचत आनंद लुटतात. हल्ली होळीसाठी कोरडे रंगाचा उपयोग सर्वत्र होत आहे. काही ठिकाणी तर फुलांच्या पाकळ्या उधळून होळी साजरी केली जाते. बच्चे कंपनीची रंगपंचमी तर जवळपास आठवड्या अगोदरच सुरु होते.

कुणी पिचकारी साठी हट्ट धरतात तर कुणी रंगांसाठी. रंगांनी कपडे भरवून आईच्या हातचा खाल्लेला मार सर्वांना नक्कीच आठवत असेल.

मानवी जीवनात होळीचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या मनातील वाईट विचारांची होळी करावी असा एक संदेश हा सण देऊन जातो.

रंगपंचमीच्या दिवशी आपण आपल्यामधील सर्व रुसवे-फुगवे बाजूला ठेऊन एकमेकांना रंग लावला पाहिजे. ‘बुरा न मानो, होली है’ असे म्हणून सर्वांना रंगवले जाते. मात्र त्यापासून कुणाला इजा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here