लोकसंख्या वाढ देशाची भावी समस्या मराठी निबंध

Population Essay in Marathi

एका गावात काही घरे राहत होती त्यापैकी दोन घरं असे होते, पहिल्या घरी नवरा बायको आणि त्यांचे चार मुले राहत होती. आणि दुसऱ्या घरी नवरा बायको आणि त्यांच्या सोबत त्यांचा एकुलता एक मुलगा राहत होता, जेव्हा पण त्या पहिल्या घरात काही नवीन गोष्ट यायची मग ती खाण्याची गोष्ट असो की आणखी काही त्या गोष्टीला चार भागांमध्ये विभागल्या जायचं.

परंतु तेच दुसऱ्या घरी अश्या प्रकारची कोणतीही समस्या नव्हती, आणि जे दुसरं कुटुंब होत ते चांगल्या प्रकारे आपल्या परिवाराचे पालन पोषण करत होत. आणि दुसरीकडच्या परिवारात नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता भासत होती.

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम निबंध – Essay on Population in Marathi

Essay on Population in Marathi
Essay on Population in Marathi

वरील उदाहरणातून आपल्याला एकच सांगण्याचे तात्पर्य आहे की, मोठा परिवार असला तर त्या परिवाराच्या गरजा अधिक असतील आणि एक वेळ अशी येईल की परिवारातील सदस्यांना कुठल्याही गोष्टींची मोठ्या प्रमाणात कमतरता भासेल. परंतु तेच जर परिवार लहान असला तर मग कोणत्याही प्रकारच्या गोष्टीची कमतरता न भासता सर्वांच्या मूलभूत गरजा योग्य रित्या पूर्ण होतील.

आपण या उदाहरणाला जागतिक दर्जावर सुध्दा लागू करू शकतो, एक असा देश आहे ज्या देशात लोकसंख्येच प्रमाण हे खूप जास्त आहे, आणि एक देश असा आहे ज्या देशात लोकसंख्येच प्रमाण कमी आहे. ज्या देशाची लोकसंख्या ही अधिक प्रमाणात आहे त्या देशात बेरोजगारी, उपासमारी आणि अनेक समस्यांचा सामना त्या देशाला करावा लागेल, कारण एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी जागाही निघाल्या तरी सुध्दा तेथील सरकार प्रत्येक व्यक्तीला नोकरी देऊ शकत नाही, त्यामुळे त्या देशात बेरोजगारीची समस्या उद्भवणारच आहे.

परंतु तेच जर एखाद्या देशाची लोकसंख्या सीमित आहे तर तेथील लोकांना सर्व सुविधा ह्या योग्यरीत्या पुरवू शकतात. सोबतच बेरोजगाराची समस्या त्या देशात उभी राहू शकत नाही.

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम – Effects of population growth

लोकसंख्या वाढीमुळे नोकरी किंवा एखादे काम शोधण्यासाठी स्थलांतर करावे लागते,स्थलांतर केल्याने शहरांची जोरात वाढ होते त्यांनंतर तेथील यंत्रणेवर त्याचा ताण पडून कारखाने, अधिकच्या वाहनांची आवाजावी ह्या सर्व गोष्टींमुळे वातावरणातील प्रदूषणही वाढते.

लोकसंख्या वाढ जर झाली तर त्यामुळे गुन्हेगारी वाढणार कारण समाजात बेरोजगार व्यक्ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील आणि त्यांना कोणताही रोजगार न मिळाल्याने ते गुन्हेगारी कडे वळतील.

एवढेच नाही तर लोकसंख्या वाढीमुळे जागेचा तुटवडा पडेल कारण अनेक कुटुंब वाढल्याने त्यांना राहण्यासाठी जागा लागेल आणि जमिनीवर अधिकांश भागात घरे बांधले जातील अश्या वेळी पीक काढणाऱ्या जमिनी ह्या घरांमध्ये निर्मित होतील आणि एक दिवस जमिनीचा तुटवडा सुध्दा पडेल.

लोकसंख्या वाढीचे खूप सारे दुष्परिणाम आहेत, त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये आपल्याला यावर काही उपयोजना काढाव्या लागतील नाहीतर आपल्या देशाला या गंभीर समस्येचे परिणाम भोगावे लागतील.

आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच प्रकारच्या नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here