“पाणी अडवा पाणी जिरवा” मराठी निबंध

Pani Adva Pani Jirva Essay in Marathi 

पृथ्वीवर आजपासून लाखो वर्षा पूर्वी कोणत्याही प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते, सगळीकडे पृथ्वीवर फक्त गरम लावा आणि आगीचे साम्राज्य होते. कारण बिग बँग थेरी नंतर अंतरिक्षात अनेक मोठ मोठे आगीचे गोळे सूर्यापासून एका विशिष्ट अंतरावर फिरू लागले आणि त्या आगीच्या गोळ्यांमधला एक गोळा म्हणजे आपली पृथ्वी, काही शेकडो वर्षे गेल्यानंतर आगीचा गोळा हा थंड होऊ लागला त्यामध्ये होणाऱ्या काही रासायनिक क्रियांमुळे त्या आगीच्या गोळ्यांमध्ये असलेली आग ही हळूहळू कमी होऊन वातावरणाची निर्मिती झाली, नंतर किती तरी वर्ष फक्त आणि फक्त पाण्याची वर्षा त्या आगीच्या गोळ्यावर झाली.

त्यामुळे निर्माण झालेला ताप हा कमी झाला आणि सगळीकडे पाणीच पाणी निर्माण झाले त्यांनंतर जेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पाणी असताना आणि सगळीकडे वातावरण शांत असताना सर्वात आधी पाण्याच्या माध्यमातून एका जीवाची निर्मिती झाली. सूर्याच्या प्रकाशाच्या साहाय्याने तो जीव प्रकाश संश्लेषणाची क्रिया करत त्याचे अन्न तयार करू लागला. आणि असे करत करत लाखो आणि करोडो वर्षानंतर या पृथ्वीवर मानवाची निर्मिती झाली.

“पाणी अडवा पाणी जिरवा” मराठी निबंध – Essay on Save Water in Marathi

Essay on Save Water in Marathi
Essay on Save Water in Marathi

सांगायचा अर्थ असा की या पृथ्वीतलावर सर्वात आधी जीवाची निर्मिती ही पाण्या पासूनच झाली आणि पाण्यातून निर्मिती झाल्यामुळे आपण विचार करू शकता की आपल्यासाठी पाणी किती आवश्यक आहे ते. पाण्याचे महत्व प्रत्येकाला माहिती आहे पण तरीही लोकांना जागरूक करावे लागते की बाबांनो पाण्याचा वापर कमी करा. पाणी आपले जीवन आहे. हे समजावून सांगण्यासाठी बरेचदा रॅली निघतात, आणि त्या रॅलीमध्ये  विविध प्रकारचे नारे हि देतात. जसे

“पाणी अडवा,पाणी जिरवा”

पाण्याचे महत्व प्रत्येकालाच माहिती आहे, की पाणी आपल्या साठी किती महत्वाचे आहे. जर पाण्याविना जीवनाचा विचार केला तर आपले जीवन कवडीमोल आहे. आपण पाहतोय की दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. आणि असेच जर आणखी वर्ष चालत राहिले तर जमिनीतील पाणीच एक दिवस संपून जाईल.

मग अश्या परिस्थिती वर मात करण्यासाठी काय करावे लागेल तर दरवर्षी कितीही पावसाळा झाला तरीही त्या पावसाचे पाणी जमिनीत खड्डे करून साचवले पाहिजे. जेणेकरून पावसाचे पाणी जमिनीवरून वाहत न जाता जमिनीमध्ये जाईल. त्यानंतर आणखी एक महत्वाची बाब ती म्हणजे रासायनिक खतांचा वापर हा जमिनीत सुरुवातीला कमी प्रमाणात करून आणि काही काळानंतर बंदच करावा कारण त्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे आणि जमिन खूप कडक बनत आहे.

ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीमध्ये न साचता त्यावरून वाहून जात आहे, आणि हे फक्त रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे होत आहे. त्याऐवजी आपण आपल्या शेतांमध्ये जैविक खतांचा, तसेच गांढुळ खताचा वापर करू शकतो.  सुरुवातीला एकदम पूर्वीसारखे सारखे उत्पन्न होणार नाही कारण एवढे दिवस जमीन रासायनिक खत खात आहे. हळूहळू आपल्याला फरक पाहायला मिळणार आणि उत्पन्नही चांगले येणार.

जर आज आपण पाण्याचे योग्य रित्या व्यवस्थापन केले तर आपल्या येणाऱ्या पिढींना पाण्याचा वारसा देता येईल जर आपण योग्य रित्या पाण्याचे व्यवस्थापन केले नाही तर मग त्यांच्या साठी पाणी म्हणजे कठीण होऊन जाईल. म्हणून पाण्याला अडवा, पाण्याला जिरवा. आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करा. जेणेकरून पाणी पाणी करण्याची वेळ आपल्या कुणावर येणार नाही.

आशा करतो हा लेख नक्कीच आवडला असेल, आणि आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करून पाणी वाचवण्यासाठी जनजागृती करा. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here