घनगड किल्ला माहिती

Ghangad Fort

जर तुम्ही ट्रेकिंगचे चाहते असाल तर तुम्ही एकदातरी भेट द्यावी असा हा किल्ला आणि त्या किल्ल्याचे नाव आहे घनगड किल्ला. दुर्लक्षित राहिलेला हा किल्ला निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. निसर्गाचं मोहक रूप तुम्ही या किल्ल्यावरून पाहू शकता.

घनगड किल्ल्याची माहिती – Ghangad Fort Information in Marathi

पुण्यापासून अंदाजे ९० की. मी. अंतरावर सहयाद्री डोंगररांगांमध्ये हा किल्ला आहे. घनगड किल्ला सुमारे ३००० फूट उंचिचा असून गिरिदुर्ग प्रकारातील आहे. इथल्या घाटवाटांचं रक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून घनगड किल्ला बांधण्यात आला होता. एकोली या गावातून किल्ल्यापर्यंत जाता येतं. आधी या किल्ल्यापर्यंत जाणे फार सोपे नव्हते पण इथल्या काही किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून किल्ल्याची वाट सुकर झाली आहे.

घनगड किल्ला वर ट्रेकिंग – Ghangad Fort Trek

हा किल्ला चढाई करण्यास फार कठीण आहे पण प्रयत्न केल्यास थोडा वेळ लागून चढाई करता येते.

ट्रेकर्सना मात्र किल्ला चढण्यास सोपे जाते. किल्ल्यावर जात असतांना सुरवातीलाच पुरातन शंकराच्या मंदिराचे अवशेष आपणास पहावयास मिळतात.

थोडे पुढे गेले असता गोरजाई देवीचे मंदिर वाटेत लागते. पुढे किल्ल्याचे महाद्वार आहे जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

किल्ल्यात प्रवेश करताच दगडात कोरलेल्या गुहेचं दर्शन होते. आणि बाजूला नैसर्गिकरीत्या तयार झालेली कमान आपल्याला दिसते आणि त्याच खाली एक छोटेसे गुहेचे मंदिर आहे.

किल्ल्याच्या वरच्या बाजूस जाणाऱ्या सुरवातीच्याच पायऱ्या इग्रजांनी त्यावेळी सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या होत्या. आता पायऱ्यांऐवजी एक लोखंडी शिडी लावण्यात आली आहे.

किल्ल्याच्या वरच्या बाजूस पोचल्यानंतर पाच-सहा पाण्याचे टाके आहेत ज्यातील गाळ आता तेथील किल्ले संवर्धन संस्थांनी काढला आहे.

तसेच या किल्ल्यावरून सुधागड आणि तैलबैलगडाची भिंत स्पष्ट दिसते.

कोकणच्या काही घाटवाटाही आपल्याला दिसतात. पावसाळ्याच्या वेळी तर सह्याद्रीचे अतिशय सुंदर आणि विलोभनीय असे रूप या किल्ल्यावरून आपल्याला पाहायला मिळते.

या किल्ल्याचे भग्नावशेष आपल्याला दिसतात पण तरी काही किल्ले संवर्धन संस्थांच्या माध्यमातून येथे डागडुजीचे बरचसे काम केले गेले आहे.

इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख फारसा आढळत नाही पण १८१८ पर्यंत हा किल्ला मराठ्यांकडे होता असे म्हणतात. इतिहासाचा साक्षीदार असलेला हा घनगड किल्ला.

तर एकदा तरी भेट द्यावी असा हा घनगड.

तर या लेखात आपण घनगड या किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

घनगड किल्ल्याविषयी विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Ghangad Fort

प्रश्न. घनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर. घनगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.

प्रश्न. घनगड किल्ला कोणत्या डोंगररांगांमध्ये आहे?

उत्तर. घनगड किल्ला सहयाद्री डोंगररांगांमध्ये आहे.

प्रश्न. घनगड किल्ल्यावरून आणखी कुठले दोन गड आपल्या नजरेस पडतात?

उत्तर. सुधागड व तैलबैल हे दोन गड घनगड किल्ल्यावरून नजरेस पडतात.

प्रश्न. घनगड किल्ला कोणत्या प्रकारातील आहे?

उत्तर. गिरिदुर्ग प्रकारातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here