घोरकष्टोद्धारण स्तोत्र

Ghorkashtodharan Stotra Lyrics

हिंदू धार्मिक धर्म ग्रंथांमध्ये तसचं पुराणांमध्ये अनेक प्रकारच्या स्तोत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक स्तोत्राचे विशेष महत्व सांगून त्यांचे उच्चारण करण्यास सांगितले आहे. स्तोत्र हे देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी उच्चारण्यात येत असून फार पूर्वी पासून ही प्रथा हिंदू धर्मात चालत आली आहे.

स्तोत्र ही विविध प्रकारची असून प्रत्येक स्तोत्र विशेष कार्यासाठी उच्चारला जातो. ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रांमध्ये मंत्र उच्चारण करण्यास जास्त प्रावधान दिल जाते. त्याचप्रमाणे ग्रंथांमध्ये स्तोत्राचे उच्चारण करण्यास जास्त महत्व दिल आहे. स्तोत्रांमध्ये ईश्वराची विविध स्वरुपात स्तुती केली जात असून ईश्वराला प्रसन्न करण्यासाठीचा सरळ सोपा मार्ग आहे.

आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या “घोरकष्टोद्धारण स्तोत्राचे” लिखाण करणार आहोत. हा स्तोत्र मानवी जीवनाशी संबंधित सर्व घटनांशी निगडीत असून आपण या स्तोत्राचे नियमित पठन केलं पाहिजे.

घोरकष्टोद्धारण स्तोत्र – Ghorkashtodharan Stotra in Marathi

Ghorkashtodharan Stotra in Marathi
Ghorkashtodharan Stotra in Marathi

 || घोरकष्टोधरणस्तोत्रम ||

श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।।

भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। १।।

त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।।

त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। २।।

पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् । भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।।

त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ३।।

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वम् शरण्योऽकहर्ता ।।

कुर्वात्रेयानुग्रहम् पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ४।।

धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम् । सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम् ।

भावासक्तिम् चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ५।।

श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ ६॥

इति परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामीमहाराज विरचितं घोरकष्टोधरणस्तोत्रम सम्पूर्णम् ।।

“घोरकष्टोद्धारण स्तोत्र” दत्त संप्रदायातील अति प्रसिद्ध स्तोत्र असून, दत्त सांप्रदायिक नेहमीच या स्तोत्राचे पठन करीत असतात. या स्तोत्राच्या माध्यमातून भाविक श्री दत्ताना विनंती करतात की, हे प्रभू मला या जीवन मरणाच्या जाचातून मुक्त कर. मानवी जीवन हे जन्म मरणाच्या बंधनात गुंतले असून त्यातून माझी सुटका कर.

प्रत्येक मानवाला त्याच्या जीवनांत जीवन जगतांना येत असलेल्या चांगल्या वाईट अनुभवापासून बोध घेत तो ईश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतो की, परमेश्वरा हे जीवन नश्वर आहे मला यातून मुक्त कर.अश्या प्रकारची विनवणी भक्त श्री दत्त यांना या स्तोत्राच्या माध्यमातून करीत आहे. “घोरकष्टोद्धारण स्तोत्र” या  नावामध्येच या स्तोत्राचा पूर्ण अर्थ दडला आहे.

घोरकष्टोद्धारणस्तोत्र या शब्दाची घोर+कष्ट+उद्धार अश्या शब्दांत फोड केल्यास आपल्या निर्दर्शनात येईल की, मनुष्य जन्म हा पाप आणि पुण्य याच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी मिळाला असून यापासून आपली सुटका झाल्यानंतरच आपणास मोक्ष प्राप्त होईल. मानवी जीवन हे अनेक प्रकारच्या दुखाने भरले असून, त्यामुळे यापासून आपली सुटका व्हावी याकरिता मानव खूप तडफडत आहे.

मानव जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी करीत असलेले प्रयत्न पाहून प.पू. श्री सद्गुरू भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री टेंबेस्वामी यांनी मिळून या “घोरकष्टोद्धारण स्तोत्राची” रचना केली आहे.  या स्तोत्राचे पठन केल्याने आपले मानवी जीवनाशी संबंधित अनेक अनेक प्रकारच्या संकटापासून सुटका होवून भक्ती मार्गावर चालण्याचा आपणास लाभ मिळतो.

श्री मुखातून मिळालेल्या या स्तोत्राच्या पठणाने सद- धर्माविषयी प्रेम, सु-मती, भक्ती, सत-संगती यांची प्राप्ती होते. त्यामुळे शेवटी याच देहात सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पूर्तता होते. परिणामी आपणास मुक्ती या चतुर्थ पुरुषार्थाचा लाभ होतो. धर्म, कर्म, अर्थ आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची पूर्तता झाल्यानंतर भक्ती या पाचव्या पुरुषार्थाची प्राप्ती होते.

अश्या प्रकारे या पाच श्लोकांचे नित्य पठन करणाऱ्या व्यक्तीचे सर्वार्थाने मंगल होते. शिवाय, असा भक्त श्री दत्तात्रेय यांना प्रिय होतो. मित्रांनो, वरील लेखातील घोरकष्टोद्धारण स्तोत्राबाबत संपूर्ण माहिती इंटरनेट वरून मिळवली असून आपणास या स्तोत्राची माहिती मिळावी याकरिता या लेखाचे लिखाण केलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top