संपूर्ण गुरुचरित्र

Sampurna Guru Charitra in Marathi

दत्त संप्रदायातील प्रसिद्ध ग्रंथ ‘श्री गुरुचरित्र’ ग्रंथाची रचना इ.स. १४८० साली सरस्वती गंगाधर यांनी केली असून या ग्रंथामध्ये श्री दत्तात्रेय यांचे अवतार मानले जाणारे संत श्री नृसिंह सरस्वती यांच्या चरित्राचे वर्णन करण्यात आलं आहे. या ग्रंथाला दत्त संप्रदायिकांनी वेदाची मान्यता दिली असून या ग्रंथाचे पारायण हे उपासना स्वरुपात केले जाते.

सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण ५२ अध्याय असून ओवीसंख्या ही ७४९१ इतकी आहे. तसचं, काही ग्रंथांमध्ये ५३ अध्यायांचा उल्लेख करण्यात आला असून त्याची विभागणी ‘‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ या स्वरुपात केली आहे.

या ग्रंथातील कथांच्या माध्यमातून, ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा व्यवस्थितपणे समन्वय बांधला गेला असून, या तिनी गोष्टीच्या प्राप्तीसाठी जीवनांत गुरूंचे मार्गदर्शन किती महत्वाचे आहे याचे अतिशय सुरेख पणे आणि मर्मग्राही विवेचन सरस्वती गंगाधर यांनी या ग्रंथांत केलं आहे.

मित्रांनो, ईश्वर प्राप्तीसाठी मानवी आचरण कश्याप्रकारे असायला पाहिजे आणि ते आचरण आपण कश्याप्रकारे अंगिकारु शकतो, याबद्दल माहिती सांगणाऱ्या गुरुंना मानवी जीवनांत किती महत्व आहे. अश्या प्रकारच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देणाऱ्या महान चरित्र ग्रंथाचे लिखाण आज आपण या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत. तरी, आपण या लेखाचे महत्व समजून आवश्य वाचन करावे.

गुरु चरित्र – Guru Charitra Marathi

Guru Charitra
Guru Charitra

श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु चरित्राचे पठन करू शकता.

संपूर्ण गुरुचरित्र (१ ते ५२ अध्याय)

श्री नृसिंहसरस्वती यांचे शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीचे शिष्य सरस्वती गंगाधर यांना ‘श्री चरित्र ग्रंथाची’ रचना करण्याचा आदेश खुद श्री नृसिंह सरस्वती यांनी दिला होता, अशी माहिती या चरित्र ग्रंथात नमूद करण्यात आली असून, दत्त संप्रदायाची तशी श्रद्धा देखील आहे.

गुरूंचे मानवी जीवनांत असेलेल महत्वपूर्ण स्थान पटवून देतांना गंगाधर सरस्वतींनी दत्तात्रेय यांचे अवतार असलेले संत श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलं आहे. तसचं, भगवंतांची उपासना करण्याचे महत्व सांगून, व्रत वैकल्ये तसचं, यात्रांचे वर्णन करण्यात आलं आहे.

तसचं, ब्राह्मणाचे आचरण कसे असावे या संबंधी या ग्रंथात उल्लेख करण्यात आला आहे. दत्त संप्रदायात पवित्र मानल्या जाणाऱ्या अश्वथ्य, औदुंबर आणि भस्म इत्यादी गोष्टींचे महत्व सांगून ‘पतिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे अशी शिकवण देण्यात आली आहे. अश्या प्रकारे मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या अनेक बाबींचे वर्णन या ग्रंथात करण्यात आलं  आहे.

दत्त संप्रदाय हा आपल्या मानवी समाजातील एक श्रेष्ठ संप्रदाय असून या संप्रदायाचा प्रसार जास्त करून महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि कर्नाटक राज्यात विशेष दिसून येतो.  दत्तसंप्रदायिक बांधव या गुरुचरित्र ग्रंथांचे नियमित पारायण स्वरूपी वाचन करीत असतात.

तसचं, या ग्रंथामध्ये ग्रंथाचा पारायण काळ हा ७ दिवस/ १८ दिवस/ २८ दिवस/ ३४ दिवस/ ३७ दिवस/ ४३ दिवस/ ५१ दिवस अश्या प्रकारे दिला असून दत्त सांप्रदायिक बांधव दिलेल्या काळानुसार या ग्रंथाचे पारायण करतात.

श्री गुरुचरित्र  पारायण कसे करावे? – Guru Charitra Parayan Rules in Marathi

श्री चरित्र ग्रंथात वर्णीत पारायण करण्यासंबंधी बाळगायची काळजी

  • पारायण करण्याआधी दरोरोज सकाळी आंघोळ करावी आणि नंतरच पारायणाला सुरुवात करावी.
  • संध्याकाळी संध्या करून मनात संकल्प करावा.
  • पारायण करण्यासाठी कायम एकच आसन वापरावे.
  • पारायण करणाऱ्या व्यक्तीने नियमित सात्विक अन्न ग्रहण करावे.
  • पारायण करणाऱ्या व्यक्तीने पारायण कालादरम्यान नेहमी झोपण्यासाठी जमिनीवर झोपावे याकरिता त्यांनी खाली पांघरण्या करिता घोंगडीचा वापर करावा.
  • पारायण काळात व्यक्तीने आपले मन, बुद्धी, आणि शरीर याची शुद्धता पाळावी.
  • पारायण वाचून झाल्यानंतर ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन या पारायणाची समाप्ती करावी.

अश्याप्रकारे पारायण करण्याची विधी आणि त्यासंबंधी पाळण्याचे कठोर नियम याबद्दल या चरित्र ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. तरी आपण या श्री चरित्र ग्रंथाचे महत्व समजून आपल्या घरी देखील या ग्रंथाचे पारायण करावे. आश्या आहे आपणास ‘श्री चरित्र ग्रंथाची’ माहिती देणारा आमचा हा लेख आवडला असेल. धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top