गुरु वंदना

Guru Brahma Mantra

गुरु वंदना या लेखाचे लिखाण करण्यापूर्वी आपण गुरूंचे आपल्या जीवनांत असलेले महत्व किती महत्वाचे आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. गुरु शिष्य ही परंपरा आपल्या देशांत फार प्राचीन काळापासून चालत आली असून आज देखील या परंपरेचे पालन केले जाते.

गुरु वंदना – Guru Vandana in marathi

Guru Vandana
Guru Vandana

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देव परंब्रह्मः तस्मै श्री गुरवे नमः।
अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरौन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तदपदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः।
अनेकजन्म संप्राप्तं कर्मबन्ध विदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्री गुरवे नमः।
मन्नाथः श्री जगन्नाथा मदगुरु श्री जगदगुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः।

गुरु शिष्य यांचे नाते खूप बहुमूल्य असून गुरुविना मानवी जीवन निष्क्रिय आहे. अज्ञान रुपी अंधकार नाहीसा करून आपल्या डोक्यात ज्ञानरूपी किरणांचा भंडार साठवून ठेवण्याचे महत्वपूर्ण काम गुरु करीत असतात. त्यामुळे गुरुणा आपल्या जीवनांत अनन्य साधारण महत्व आहे.

गुरु हा शब्द जरी दोन अक्षरी असला तरी त्याचा अर्थ खूप महान आहे. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे अंधाराला नाहीसे करून प्रकाशित करणे. अर्थात आपल्या जीवनातील अंधार नष्ट करून ज्ञानरूपी दिवा लावण्याचे काम गुरु करीत असतात.

गुरूंची महिमा आपण लहानपणापासून गात आणि ऐकत आलो आहोत. त्यानुसार आपणास आपल्या गुरूंमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यास्वरुपात त्रीमुर्तीकार रूप दिसून येते.

मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपले पहिले गुरु असतात ते आपले आई वडिल. आपल्या जन्मापासून आपण सुदृढ ज्ञानी होईपर्यंत ते सतत आपल्या सोबत असतात. भावी आयुष्यात वावरतांना देखील ते आपणास मार्गदर्शन करीत असतात.

यानंतर आपले दुसरे गुरु असतात ते आपणास ज्ञानरूपी महासागरातून वाहत नेऊन या विश्वात जगण्यास आपणास कार्यक्षम बनवतात. अश्या गुरूंचे वर्णन करावे तितके कमीच. आपल्या लहान वयात शालेय जीवनांत या गुरुंनी आपल्यावर गिरवलेले संस्कार आपणास भावी आयुष्यात खूप कामी पडतात.

याचप्रमाणे, आपल्या जीवनांत अति महत्वपूर्ण असणारे तिसरे गुरु म्हणजे धार्मिक गुरु. धार्मिक गुरुंमुळेच आपणास चांगल्या आणि वाईट गोष्टीतील फरक समजतो. आपण आपला इतिहास वाचल्यास धार्मिक ग्रंथ वाचल्यास आपणास गुरूंचे आपल्या जीवनांत असलेल्या स्थानाचे महत्व कळेल.

गुरु म्हणजे काय तर, आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठे असणारे सर्व व्यक्ती ज्यांच्याकडून आपणास ज्ञान प्राप्त होत असते, अश्या सर्व व्यक्तींना आपण गुरु मानलं पाहिजे. गुरु विना मानवी जीवन व्यर्थ आहे.

आपण आपले पौराणिक धर्म ग्रंथ वाचल्यास आपणास गुरु शिष्य या नात्याचे महत्व समजेल. महर्षी व्यास रचित महाकाव्य महाभारतामध्ये त्यांनी गुरु द्रोणाचार्य आणि शिष्य अर्जुन यांच्या नात्याचे महत्व सांगितल आहे.

मित्रांनो, मानवाला जन्मापासून मरेपर्यंत गुरूंची आवश्यकता असते. जन्माच्या वेळी गुरूच्या रुपात आपले आईवडील आपली मदत करीत असतात तर शाळेत शिक्षण घेतांना शिक्षक हे गुरु म्हणून आपल्याला विद्या ग्रहण करीत असतात. तसचं, मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला धर्म गुरूंची आवश्यकता असते. म्हणून आपण जीवनाच्या अंत समयी मोक्ष प्राप्त व्हावा याकरिता आपण गुरु करीत असतो.

गुरु आपणास नाम स्वरूपी दीक्षा देऊन त्याचे नियमित पठन करायला सांगतात.  अश्या प्रकारे गुरूंचे मानवी जीवनांत विविध स्वरुपात स्थान असून त्यांचे महत्व देखील तितकेच महत्वाचे आहे. गुरु शिष्य या पवित्र नात्याचे महत्व म्हणून आपण दरवर्षी आषाढ शुक्लपक्ष पौर्णिमेच्या दिवशी गुरूची पूजा करीत असतो.

गुरु शिष्याचे महत्व संपादन करणारा हा दिवस पूर्ण देशांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंकडून आशीर्वाद घेऊन दक्षिणा स्वरूपी त्यांची सेवा करीत असतात.

मित्रांनो, गुरु शिष्य या नात्याविषयी माहिती सांगावी तितकी कमीच, म्हणून आपण देखील या नात्याचे महत्व समजून घेऊन नियमित आपल्या गुरूंची वंदना करावी. आश्या आहे आपणास गुरूंचे महत्व पाठवून देणारा हा लेख आवडला असेल. धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here