स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी काही टिप्स

सरकारी नोकरी कोणाला नको पण सरकारी नोकरी मिळवन खूप कठीण आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागणार. स्पर्धा परीक्षा पास करणे खूप कठीण आहे पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचे काही नियम आहेत जर आपण या नियमाचे पालन केले तर नक्कीच आपण स्पर्धा परीक्षेत यश संपादन करू शकतो. या लेखात आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काय करावे याचा आपण आढावा घेणार आहोत.

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी काही टिप्स – How to Prepare for Competitive Exams

How to Prepare for Competitive Exams
How to Prepare for Competitive Exams

१. अभ्यासाचे योग्य नियोजन:

आपल्याला एखाद्या गोष्टीत यश पाहिजे असेल तर आपण त्याचे योग्य नियोजन करणे अनिवार्य आहे. अभ्यासाचे सुद्धा तशेच आहे. जास्त गुण मिळवायचे असतील तर अभ्यासक्रमातील सोपा सोपा भाग आपण पहिले संपवायला हवा आणि नंतर कठीण भागाकडे वळायला हवे. कोणत्या विषयाच्या कोणत्या पाठाला आपण किती वेळ दिला पाहिजे ज्याने करून कमी वेळेत आपला जास्त अभ्यास होणार हे आपण निर्धारित केले पाहिजे.

२. वेळेचे व्यवस्थापन:

एका विद्यार्थीसाठी वेळ ही सर्वात मूल्यवान वस्तू आहे. अभ्यासात जर यश पाहिजे असेल तर आपण वेळेचे व्यवस्थापण केले पाहिजे. आपण कधी अभ्यास करतो किती वेळ अभ्यास करतो त्याचा सरावाला किती वेळ देतो हे फार महत्वाचे असते. दिवसभर अशी कोणती कामे आहेत की ती आपल्याला टाळता येतील म्हणजे आपण तो वेळ अभ्यासाला देऊ शकतो याचा सुद्धा आपण आढावा घेतला पाहिजे. वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण अभ्यासाचे वेळापत्रक बनवले पाहिजे आणि त्याचे कठोर पालन केले पाहिजे .

३. अभ्यासाची संसाधने:

अभ्यास करण्यासाठी आपण जी संसाधने वापरतो जसे कि पुस्तक, नोटस, इंटरनेट वरचे विडीओ हे उच्च आणि विश्वासार्य श्रेणीचे असले पाहिजे. आजकाल पाहिजे तेवढे अभ्यासाचे संसाधने उपलब्ध आहेत पण ते सर्वच चांगली आणि अचूक आहेत असे नाही. अभ्यासाची संसाधने निवडताना आपण आपल्या शिक्षकांचे तसेच माजी विध्यार्थींचे सहकार्य घ्यावे.

४. इंटरनेटचा वापर फक्त अभ्यासासाठी करा:

एकेकाळी जेसे मुलांना टीवीचे वेळ होते तसे आता मोबाईलचा वेळ होत आहे. मोबाईल मधल्या इंटरनेटचा वापर फक्त अभ्यासाठीच करा. सोअल नेटवर्किंग साईटचा किवा अप्पचा वापर कमीत कमी किवा करूच नये.

५. कमी अभ्यास करा पण चांगला अभ्यास करा:

दिवसाचे २४ तास कोणी अभ्यास करू शकत नाही. दिवसाचे किती तास अभ्यास करतो त्यापेक्षा किती चांगला अभ्यास करतो ते महत्वाचे आहे. अभ्यास करताना आपले मन अभ्यासात रमले पाहिजे नाहीतर जबरदस्तीने स्वताकडून अभ्यास करून घेण्यात काही अर्थ नाही. एकाच दिवशी जास्त अभ्यास न करता रोज थोडा थोडा आणि नियमित अभ्यास करा तरच तुम्हाला यश मिळेल.

६. आपल्या आरोग्यकाळे लक्ष द्या:

आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य. आरोग्य हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक पण असते. यश हवे असेल तर निरोगी शरीरात निरोगी मन असणे हे फार आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला नियमित योगा, व्यायाम, ध्यान केले पाहिजे. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी आपण पोषक आहार घेतले पाहिजे.

७. प्रेरणा घ्या:

तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर तुम्ही चांगल्या लोकांकडून प्रेरणा घेऊन आपला आत्माविश्वास वाढवला पाहिजे. टापर मुलं मुलींचे मुलाखत वाचा इंटरनेट वर त्यांचे विडीओ पहा. तुम्हाला प्रेरणा मिळेल अशा लोकांची जीवनचरित्र वाचा. नेहमी अशे मित्राच्या सहवासात राहाजे तुम्हाला प्रेरणा देतील.

८. सराव प्रश्नपत्रिका सोडवा आणि स्वताचे मूल्यमापन करा:

आजकाल बाजारात बरेच प्रश्नसंच मिळतात. एकदा तुमचा अभ्यास चांगला झाला की जास्तीत जास्त प्रश्नसंच सोडवा. त्याने तुमचा आत्मविश्वास ही वळेल आणि तुम्हाला परीक्षेची ओळख ही होणार. प्रश्नसंच सोडवून तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेत वेळेचे नियोजन कसे करावे हे पण कळणार. तसेच सराव परीक्षेत जास्त गुण मिळाले तर तुमचा परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास सुधा वाढणार.

९. वृत्तपत्र रोज वाचा:

प्रत्येक स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी वर बरेच प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे आपण तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण स्वतःला अपडेट ठेवू त्यासाठी वृत्तपत्राचे वाचन फार महत्वाचे असते.

१०. तज्ञांचे मार्गदर्शन घ्या:

बरेच पदवीधर आजकाल स्पर्धापरीक्षेची तयारी करतात यामध्ये लाखातून काही शंभर लोक शासकीय सेवेसाठी निवडले जातात त्यामुळे स्पर्धा परीक्षेत स्पर्धा पुष्क आहे म्हणून तुम्हाला जर या परीक्षेत यश संपादन करायचं असेल तर तुम्ही तज्ञांचे मार्गदर्शन घेतलेच पाहिजे. तुमच्या परिसरात सर्वात प्रतिष्ठित अशा कोचिंग कालासेस मध्ये तुम्ही तज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे

११. स्पर्धा परिषेचे स्वरूप समजून घ्या:

ज्या पण स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असू त्या परीक्षेचे स्वरूप निट समजून घ्या. परीक्षेत कशा प्रकारची प्रश्न येतात त्यांना किती गुण असतात. परीक्षेत कोणत्या विषयाला किती मार्क असतात. चुकीच्या उत्तर साठी किती गुण वजा होतात. ही सर्व माहिती तुमच्या कडे असली पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे.

स्पर्धा परीक्षेबद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – Quiz for Competitive Exams

१) स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे नियोजन कशे करावे?
उत्तर: स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम आधी माहित करून घ्यावे. अभ्यासक्रमचा जो भाग सोपा आहे त्याची आधी तयारी करावी नंतर कठीण भागाची तयारी करावी.

२) स्पर्धा परीक्षेच्या विध्यार्थ्याने इंटरनेटचा उपयोग कसा करावा?
उत्तर: स्पर्धा परीक्षेच्या विध्यार्थ्याने इंटरनेटचा उपयोग फक्त अभ्यासासाठी करावा. तुम्ही youtube वर विडीओ पाहून अभ्यास करू शकता किवा तुम्ही इतर शैक्षणिक संकेत स्थळाला भेट देऊ शकता. मात्र सोअल नेटवर्किंग साईटचा वापर आपण टाळला पाहिजे.

३) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थीने चालू घडामोळी वरील प्रश्नांसाठी काय करावे?
उत्तर: स्पर्धा परीक्षेच्या विध्यार्थाने चालू घडमोळी साठी रोज वृत्तपत्राचे वाचन करावे.

४) स्पर्धा परीक्षेच्या विध्यार्थ्यांच्या जीवनात आरोग्याचे काय महत्त्व आहे?
उत्तर: जीवनात कोणत्या पण क्षेत्रात यश पाहिजे असेल तर त्याची गुरु किल्ली म्हणजे चांगले आरोग्य. स्पर्धा परीक्षा मध्ये जर तुम्हाला यश संपादन करायचे असेल तर तुम्हाला तुमचे मन आणि शरीर निरोगी ठेवाव लागणार. त्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे.

५) स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीची तयारी कशी करावी?
उत्तर: स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपण इंटरनेट वर मुलाखत कशी देली पाहिजे यावर माहिती वाचावी विडीओ पाहावे तसेच तज्ञांचे मार्दर्शन घ्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here