निबंध कसा लिहावा

Essay Writing in Marathi

आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण विषयावरती निबंध येऊ शकतो जसे कि राजकारण, नेत्यांबद्दल माहिती आणि अशे बर्याच प्रकारचे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये निबंध लिहण्यासाठी येऊ शकतात. तर प्रत्येक निबंध कसा लिहावा, त्या मध्ये कोणत्या गोष्टी बदल सांगाव निबंधाची लांबी किती असावी या सर्व गोष्टी निबंधाच्या विषयावरती अवलंबून असतात.

स्पर्धा परीक्षा आणि शालेय निबंध या मध्ये खूप जास्त फरक आहे. शालेय निबंधामध्ये तुम्हाला फक्त दिलेल्या विषयावरती २०० ते २५० ओळी लिहाव्या लागतात. आणि त्या मध्ये पण ठराविक माहिती. पण जर स्पर्धा परीक्षांच्या निबंधाबद्ल बोलायचे म्हटले तर या मध्ये खूप साऱ्या गोष्टीचा समावेश असतो. या मध्ये तुम्हाला परीस्थितीचे आकलन, उपाययोजना, समस्येचे आकलन या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत काही खास टिप्स ज्या तुम्हाला तुमचा निबंध आणखी सुंदर बनवण्यास मदत करतील. चला तर मग सुरु करूया.

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

How to Write Essay in Marathi
How to Write Essay in Marathi
  • निबंधाचा विषय किंवा मुद्दा जाणून घ्या

आपल्याला कोणत्या विषयावरती लिहायचा आहे ,त्या बदल आपल्याला काय काय माहिती आहे . आपण कोणत्या गोष्टी त्या मध्ये लिहू शकतो या सर्व गोष्टी आपल्याला निबंध लिहण्याआधी जाणून घ्यायच्या आहेत .

  • निबंधाची सुरवात आकर्षक असावी

जेव्हा पण तुम्ही निबंध लिहण्यासाठी सुरवात करतात तेव्हा त्याची सुरवात आकर्षक असायला हवी जेणेकरून समोरील व्यक्तीच्या मनात समोरील निबंध वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे . सुरवातील जास्त खोडतोड करू नये, निबंध लिहताना तुमचे अक्षर सुंदर आणि आकर्षक असले पाहिजे .

  • पुढील भागात निबंधाच्या विषयाची सुरवात करावी

या मध्ये तुम्हाला दिलेल्या विषयावरती तुम्हाला असलेली सर्व माहिती व्यस्तीत रित्या मांडायची आहे .
या भागाला “The body of an easy ” असे म्हटले जाते कारण इथूनच तुमच्या निबधातील विषयाला खरी सुरवात केली जाते. या मध्ये तुम्हाला सर्व माहिती तुमच्या पद्धतीने मांडायची असते . या मध्ये तुम्हाला किती प्याराग्राफ लिहावे याची मर्यादा नसते तुम्हाला प्रत्येक नवीन विचारासाठी एक स्वतंत्र प्यारा तयार करू शकता .

  • निबंधाचा शेवट नेहमी चांगला ठेवावा

तुम्ही संपूर्ण निबंधात काय लिहल आहे त्याचा आशय हा शेवटी तुमचा शब्दात लिहायला हवा त्या मध्ये ठळक गोष्टी बदल माहिती भरपूर आणि महत्वाचा आशय या मध्ये लिहायला हवा कारण निबंधाचा शेवट आणि सुरवात याला खूप बारकाईने वाचले जाते .

  • निबंधाची लांबी वाढवण्यासाठी चुकीची माहिती लिहू नये

तुम्हाला जे लिहायचे आहे त्या बदल योग्य माहिती नसेल तर ते लिहू नका या मुळे तुम्हाला कमी मार्क भेटू शकतात . तुम्हाला असलेली सर्व माहिती बरोबर आहे याची आधी खात्री असेल तरच ती माहिती तुम्ही लिहा .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top