काय असतात शारीरिक हाव-भाव | Impact of body language in success

शारीरिक हावभाव – Body Language सुद्धा तुमच्या यशाला प्रभावित करते. शारीरिक हावभावांची यशात महत्वाची भूमिका असते.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर अनुवंशिकता आणि वातावरणाचा प्रभाव नक्कीच पडतो परंतू यासोबतहि व्यक्तीला स्वतः वाटलं तर अनेक गुणवैशिष्ट्ये स्वतःमध्ये विकसित करू शकतो. तुम्ही कधीना कधी हे अनुभवले असेल कि, काही लोकांशी संवाद साधण्यात फार आनंद वाटतो. हसरा चेहरा सर्वांनाच हवा हवा असतो.

चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यामधील चमक अशा प्रकारच्या शारीरिक हावभाव प्रसन्न व्यक्तित्व तर दाखवतातच सोबत आपल्याला भेटनाऱ्या प्रत्येकाला आनंदी ठेवतो.

हासल्याने काही जात नाही पण यातून अनेक गोष्टीचे मुल्यांकन केला जाऊ शकते ज्याप्रकारे स्वच्छ परिधान चांगल्या सवयीचे प्रतिक मानले जाते. त्याच प्रकारे चांगले शारीरिक हावभाव हे तुमच्या यशाचे प्रतिक बनू शकतात.

Impact of body language in success

काय असतात शारीरिक हाव-भाव – Impact of Body Language in success

तुम्ही बघितलं असेल खेळाडू, विद्यार्थी, राजनेता किंवा तरुण असो, दोन बोटे उभी करून ते काय सांगताहेत हे काही न बोलता आपण जाणतो कि ते म्हणताहेत “आम्ही जिंकतोय“ किंवा आम्ही जिंकलो.

एका प्रकारे हे लोक शारीरिक हावभाव चा वापर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतात. शारीरिक हावभाव खरतर शारीरिक संकेतांची आणि विविध भावतरंगाची भाषा आहे आणि हि तितकीच महत्वाची आहे. जेवढी बोलण्यास शब्दांचा वापर करावा लागतो.

मी एक शिक्षिका आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना शारीरिक हावभावांचा योग्यरीत्या वापर करते. जेव्हा मी विद्यार्थ्यांना विचारते कि, समजावून सांगितलेला मुद्दा समजला काय तेव्हा विद्यार्थी खोट बोलतात कि खरं हे मी त्यांच्या शारीरिक हावभावावरून समजते.

जेव्हा मूल तोंडांनी “हो “ म्हणतात त्याचवेळी त्यांची डोके “नाही” च्या मुद्रेत हालतात.

शारीरिक हावभाव समजणे हि सुद्धा एक कला –

साधारणतः जेव्हा लोक साक्षात्कार द्यायला जातात. त्यांचे यश हे त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या खरया उत्तरापेक्षा त्या उत्तरांपेक्षा त्या उत्तरांना कशा प्रकारे व्यक्त केले यावर अधिक अवलंबून असते.

कधी-कधी अस हि होत कि लेखी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होणारा साक्षात्कारात नापास होतो. खरं सांगाव तर अशा लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी असते. जी त्यांच्या शारीरिक हावभावाने दिसून येते.

याकरिता हि बाब लक्ष्यात ठेवावी कि, साक्षात्कारात खऱ्या उत्तरांपेक्षा त्यांना व्यक्त करण्याच्या पद्धतीवर यश अवलंबून आहे. साक्षात्कार घेणारा तुमच्या हावभाव तरंगांना पकडून खर काय ते जाणून घेतो.

*बोलणारा वक्ता तेव्हा यशस्वी होऊ शकतो जेव्हा तो ऐकणारयाचा मूड समजून त्याला साजेसा आत्मविश्वासाने बोलतो.

उस्ताद बिस्मिल्लाह खान त्यांच्या विषयी विलक्षण गोष्ट अशी कि, त्यांच्या कार्यक्रमात ते काय ऐकवतील ते आधी न ठरवता अगदी वेळेवर कार्यक्रमात श्रोत्यांचा मूड पाहूनच ठरवायचे कि काय ऐकवायचे आहे.

*शारीरिक हावभावात डोळ्याचे सर्वात जास्त महत्व आहे. दोन व्यक्तींमधील संबंध त्यांचे डोळे अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करतात. सत्य हे पण आहे कि, दोन व्यक्ती एकमेकांना जेवढ काही बोलतात.

त्याच्या १०-२० पतीने जास्त ते डोळ्यांनी हावभावाद्वारे बोलतात. दोन व्यक्ती एक दुसरयाला हातांच्या इशारयाने अभिवादन हे बरेच दा जरुरी नसते कारण फक्त डोळ्यांनी हावभावाद्वारे लोक आपले अभिवादन देतात आणि घेतात हि ,त्यासाठी तोंडातून एकही शब्द बोलायची गरज नाही.

आपण कधी कधी जे बोलतो ते दुसरयाला तोपर्यंत समजत नाही. जोपर्यंत आपण ते योग्य हावभावाने योग्य अभिनय कोशल्यासह अभिप्रेत करीत नाही. कारण साधारणतः मानल्या जाते कि, आपल्या मस्तीष्कामध्ये एखादी गोष्ट तिचे एक चित्र बनविल्याशिवाय ती समजत नाही.

त्यामुळे जेव्हा आपण एखादा शब्द बोलतो त्याचवेळी आपल्या अंतर्मनात त्याचे चित्र बनलेले असते. त्यामुळे आपल्या मनातील त्या चित्राद्वारे त्याला अनुसरून आपण बोलण्याचा प्रयत्न करतो.

शारीरिक हावभावाच्या प्रभावाचा अंदाज आपण या गोष्टीवरून लाऊ शकतो कि जेव्हा आपण तांत्रिकदृष्ट्या म्हणू शकतो कि एखाद्या व्यक्ती चे म्हणणे असे आहे कि तसे आहे यावेळी आपण खऱ्या अर्थाने समोरच्या व्यक्तीच्या हावभावांचा निष्कर्ष काढत असतो.

साधारणतः हावभावांना समजण्याची क्षमता हि प्रत्येक व्यक्तीमध्ये असते पण याचा स्तर हा प्रत्येकात वेगवेगळा असतो. जो व्यक्ती एखाद्याचे न बोलता फक्त हावभावाने त्या व्यक्तीचे म्हणणे समजतो तोच व्यक्ती आपल्या जीवनात तसेच व्यावसायिक जीवनात हि यशस्वी होतो.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी काय असतात शारीरिक हाव-भाव  या  बद्दल आणखी टिप्स असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा काय असतात शारीरिक हाव-भाव / Impact of body language in successतुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here