• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
How to Control Anger in Marathi

लवकर राग येतो का? ह्या टिप्स पाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा.

April 2, 2020
23 January History Information in Marathi

जाणून घ्या 23 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 23, 2021
How Astronauts Live In Space

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

January 22, 2021
22 January History Information in Marathi

जाणून घ्या 22 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 22, 2021
What to Know Before Investing

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

January 21, 2021
21 January History Information in Marathi

जाणून घ्या 21 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 21, 2021
Ramacha Palna

प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा संग्रह

January 20, 2021
20 January History Information in Marathi

जाणून घ्या 20 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 20, 2021
Good thoughts in Marathi

100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार

January 19, 2021
19 January History Information in Marathi

जाणून घ्या 19 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 19, 2021
Dattacha Palana

दत्ताचा पाळणा संग्रह

January 18, 2021
Morning Habits to Start the Day Right

या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम

January 18, 2021
18 January History Information in Marathi

जाणून घ्या 18 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 18, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, January 23, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

लवकर राग येतो का? ह्या टिप्स पाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा.

Ragavar Control Kasa Karava

राग ही एक फार वाईट गोष्ट आहे ज्यामुळे तुमचा सर्वनाशही होऊ शकतो त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा तुमचा उत्कर्षच होईल. चला तर जाणुन घेऊया रागाबद्दल,

राग कोणत्याही गोष्टीचे उत्तर असु शकत नाही.ही गोष्ट खरीच आहे, राग म्हणजेच व्देष ही एक सामान्य व प्राकृतिक भावना आहे जी मानवास येणाऱ्या सर्व प्रमुख भावनांपैकी एक मानली जाते ही एक शारिरिक प्रक्रिया आहे. जसं की असे म्हंटले की राग हा आनंद व दुःखा समान एक भाव आहे तर खोट ठरणार नाही.

परंतु कोणाकोणाचा राग इतका वाढतो की त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या जीवनावर पडू लागतो, काही लोक त्यांना कधी राग येतो हे मान्यच करत नाहीत आणि त्यांना जेव्हां राग येतो तो नियंत्रणाबाहेर होऊन जातो अशातच ते आपल्या जवळच्या लोकांना नुकसान पोहोचवतात. आपल्यामधील काहीच मान्य करतात की त्यांचा स्वभाव रागीट आहे. आज आपण जाणणार आहोत की राग येण्यास कसे ओळखावे.

राग कसा नियंत्रित करावा यासाठी टिप्स – Tips For How to Control Anger in Marathi

How to Control Anger in Marathi

राग येण्याचे संकेत – Signs of Anger

जीवनात प्रत्येक क्षण समान नसतो. कधी आनंद तर कधी दुःख सुध्दा येतात जेव्हां नात्यांच्या धाग्यांना रागाने ओढतोड केली जाते त्यात अनेक नात्यांची धागी मात्र तुटून जातात. ती जोडण्यास बराच वेळ लागतो. नातं जितकं मजबुत तितकाच वेळ लागतो तो जोडण्यासाठी.

रागाची लक्षणे – Symptoms Of Anger

  • धैर्याचा बांध तुटणे.
  • चिडचिडेपणा.
  • अस्वस्थता वाढणे.
  • शंका व संशयी भाव वाढणे.
  • प्रत्येक कारणास दुसऱ्यांना दोषी ठरविणे.
  • अपमान करणे.
  • संबधीत व्यक्तीस कमी लेखणे.
  • वर्तमानात सभोवतालचे भान नसणे.
  • पत्नी मूलबाळ आणि नातेवाईक तुमच्याशी बोलण्यास घाबरतात.

हे राग येण्याची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय परिस्थितीनुरूप अनेक कारणांनी राग वाढू शकतो, आपला परिवार, मित्रसंघ, कार्यक्षेत्र आणि आपल्या जवळच्या लोकांमुळे काही विशेष कारणास्तव रागाची निर्मीती होऊ शकते. रागाच्या उत्पत्तीचे मुळ हे स्वभावात म्हणजेच आपल्या मानसिक तारतम्यांवर अवलंबून असते.

त्यामुळे जर तुम्हाला असे वाटते की तूम्हाला राग येतो आहे यासाठी तुम्हास स्वतःच स्वतःवर नियंत्रणासाठी विशेष पाउलं उचलावी लागतील. तर मग हा प्रश्न उठतो की रागाचे नियंत्रण कसे करावे.

राग नियंत्रित करण्याचे काही महत्वाचे उपाय – Some Important Tips to Control Anger

१) १० पर्यंत अंकांची गणना – Count 10 Number

जर तुम्हास समोरच्या व्यक्तीवर राग येत असल्यास त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात १० पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा.आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. बघा तुमचा राग शांत हातो की नाही यामुळे तुम्हाला रागाबाबत योग्य निर्णय घेण्यास वेळ मिळेल.

२) एक ब्रेक घ्यावा – Take break

जर तूम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जावे व शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसेल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा वाटत असेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा.

३) प्राणायाम करून राग घालवा – Do Pranayam

प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो, प्राणायामात मन केंद्रीत करण्याचा सराव होतो. तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव आपणांस राग घालवण्यास मदत करेल. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चां मुळे तुमचा राग येण्यास बऱ्याच प्रमाणात आळा बसतो.

४) निवांत झोप – Take Sleep

कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते त्यामुळे राग लवकर येणे साहजिकच आहे, पण त्याचा फायदा कोणताच नाही सर्व नुकसानच आहे. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदूला शांत करणे फार जरूरी आहे.

त्याकरीता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामूळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार ही होतो किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक मानली जाते.

रागीट स्वभाव सर्वांनाच अप्रिय आणि व्देषाचा भागी बनतो. रागास दाबून ठेवणे हे फार चुकीचे ठरते व त्यामुळे कोणत्याच समस्येचा उपाय निघत नाही त्याकरीता स्वतःच्या मनातील विचार सर्वांशी जुळवून घ्या तरच रागाचे प्रमाण कमी होईल. प्रत्येकाचे बोलणे ऐका व त्यास आपली बाजू प्रेमाने समजावून सांगा, न पटल्यास चर्चा करा त्याने नक्कीच कोणता ना कोणता योग्य पर्याय समोर येईल.

तर ह्या काही सोप्या आणि छोट्याश्या टिप्स जे आपल्याला मदत करतील रागावर नियंत्रण ठेवायला,अश्याच आणखी टिप्स साठी माझीमराठी सोबत जुळलेले रहा.

धन्यवाद!

Editorial team

Editorial team

Related Posts

Habits of Mentally Strong People
Self Help

ह्या गोष्टी तुमच्यात असतील तर तुम्ही आहात मानसिक रित्या मजबूत

About Mentally Strong People मित्रांनो तुम्ही नेहमी मानसिक रूपानं स्वस्थं कसं असावं हे शोधण्याच्या प्रयत्नात असता किंवा हे तरी जाणण्याकरता...

by Editorial team
April 2, 2020
Impact of body language in success
Self Help

काय असतात शारीरिक हाव-भाव | Impact of body language in success

शारीरिक हावभाव - Body Language सुद्धा तुमच्या यशाला प्रभावित करते. शारीरिक हावभावांची यशात महत्वाची भूमिका असते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर अनुवंशिकता आणि...

by Editorial team
January 8, 2020
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2020 MajhiMarathi.Com

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2020 MajhiMarathi.Com