Saturday, June 10, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १७ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

17 October Dinvishes

मित्रांनो, प्रत्येक दिवस हा त्या दिवशी घडलेल्या घटनेचा साक्षीदार बनत असतो. जी कुठली चांगली वाईट घटना त्या दिवशी घडत असते त्या घटनेचे महत्व त्या दिवसाला प्राप्त होत असते. चला तर मग आपण जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहास कुठल्या कुठल्या घटना घडल्या होत्या. तसचं, आजच्या दिवशी कुठल्या महान व्यक्तींचा जन्मदिन आहे. तसचं, आजच्या दिवशी निधन पावणारे महान व्यक्ती याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो, आज जागतिक गरिबी निर्मुलन दिवस आहे.  या दिनाचे महत्व सांगायचे म्हणजे जगातील गरिबी कमी करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे होय. याची सुरुवात सर्वप्रथम सन १९८७ साली पॅरिस देशांत झाली होती. परंतु, तेव्हापासून आतापर्यंत जगात गरीबीचे प्रमाण कमी झालेलं नाही. दिवसान दिवस हे प्रमाण वाढतच चालले आहे. भारतात सुमारे २१.८ करोड गरीब नागरिक राहतात. तसचं, भारतात जगाच्या तुलनेने सुमारे ३१ टक्के गरीब मुले आहेत. जर आपण संपूर्ण जगाचा विचार केल्यास सुमारे तीन अरब नागरिक गरिबीच्या रेषेखाली आहेत.

जाणून घ्या १७ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 17 October Today Historical Events in Marathi

17 October History Information in Marathi
17 October History Information in Marathi

१७ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 October Historical Event

  • सन १९१७ साली पहिल्या महायुद्धात इंग्लंडने जर्मनीवर बॉम हल्ला केला.
  • सन १९३३ साली नाझी लोकांचा प्रभाव वाढल्यामुळे जर्मन वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन हे जर्मनी सोडून अमेरिकेला गेले.
  • सन १९४३ साली बर्मा रेल्वे रंगून ते बँकॉक दरम्यान रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले.
  • सन १९७९ साली मदर टेरेसा यांना शांततेचा नोबल पुरस्कार बहाल करण्यात आला.
  • सन १९९६ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागु  यांना मध्य प्रदेश सरकारचा ”कालिदास सन्मान” जाहीर करण्यात आला.

१७ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८१७ साली भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, आणि तत्त्ववेता तसचं, अलीगढ मुस्लीम विद्यालयाचे संस्थापक सैयद अहमद खान यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६९ साली अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान हिंदुस्थानी संगीत परंपरेतील गायक, संगीतकार तसचं, ‘भारत गायन समाज’ संस्थेचे संस्थापक गायनचार्य पं. भास्कर बुवा बखले यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८७ साली भारतीय राष्ट्रवादी क्रांतिकारक आणि ओरिसा राजकारणी सारंगधर दास यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली भारतीय हिंदी भाषिक लेखक, समीक्षक आणि कवी दूधनाथ सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९५५ साली पद्मश्री पुरस्कार तसचं, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री व रंगमंच कलाकार स्मिता पाटील यांचा जन्मदिन.
  • सन १९६५ साली माजी श्रीलंकन क्रिकेटपटू व कर्णधार अरविंद डी सिल्वा(Aravinda de Silva) यांचा जन्मदिन.
  • सन १९७० साली आपल्या फिरकी गोलंदाजी मुळे भल्या भल्या फलंदाजांना मैदानात चित्त करणारे उत्कृष्ट  माजी भारतीय क्रिकेटपटू, विद्यमान प्रशिक्षक व समालोचक अनिल कुंबळे यांचा जन्मदिन.

१७ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 October Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८८२ साली महाराष्ट्रीयन इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार, धर्मसुधारक तसचं, संस्कृत व इंग्रजी भाषिक व्याकरणाचे अभ्यासक महाराष्ट्रीयन मराठी व्याकरणाचे पणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन.
  • इ.स. १८८७ साली ब्लॅक-बॉडी रेडिएशन या शब्दाची रचना करणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव्ह रॉबर्ट किरचॉफ(Gustav Kirchhoff) यांचे निधन.
  • सन १९०६ साली प्रख्यात भारतीय हिंदू धार्मिक नेते , महान तत्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली.
  • सन १९९३ साली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात चित्रपट निर्माता-दिग्दर्शक व पटकथा लेखक तसचं, ‘फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य व प्रकाश पिक्चर्स चित्रपट निर्मित कंपनी व प्रकाश स्टुडीओ चे संस्थापक विजय भट्ट यांचे निधन.
  • सन २००८ साली महाराष्ट्रीयन ललित लेखक रविंद्र पिंगे यांचे निधन.
Previous Post

जगातील एक अनोखं गाव जेथे राहते फक्त एकच महिला

Next Post

दुर्गा मातेने महिषासुराला का मारले? हे होते त्यामागील कारण

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Story of Mahishasura

दुर्गा मातेने महिषासुराला का मारले? हे होते त्यामागील कारण

18 October History Information in Marathi

जाणून घ्या १८ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Lake Natron Mystery

...याला हाथ लावला तर मिनिटात बनू शकते आपले शरीर दगडाचे, अजबच आहे ना.

19 October History Information in Marathi

जाणून घ्या १९ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Unique Villages

जगातील पाच आगळे वेगळे गावं, पहा काय वेगळ आहे या गावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved