• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

अल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक

Albert Einstein History

जगात सर्वात बुद्धिमान आणि सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून प्रसिद्धी मिळविणारे अल्बर्ट आईनस्टाईन हे सर्व जगतालाच चांगल्या प्रकारे परिचित आहेत. जगात काहीच लोक असे असतील की जे यांना ओळखत नसतील.

त्यांनी केवळ विज्ञान क्षेत्रातच आपलं योगदान नाही दिल तर, आपल्या शोध कार्यातून अनेक कठीण गोष्टी सोप्या करून, आपल्या संशोधनातून विज्ञानाला एक नविन दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केलं.

अल्बर्ट आईनस्टाईन एका महान वैज्ञानिका बरोबर एक भौतिकशास्त्रज्ञ देखील होते. त्यांनी जगाला सर्वात महत्वाचं वस्तुमान आणि उर्जा यांच्या समीकरणाचे सूत्र दिले.

याशिवाय त्यांनी ३०० पेक्षा जास्त वैज्ञानिक संशोधन पत्रे प्रकाशित केली. तसचं त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना सर्वोच्च सम्मान नोबल पुरस्काराने देखील सम्मानित करण्यात आलं आहे.

अल्बर्ट आईनस्टाईन यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे अपयश आले होते,  तरीसुद्धा ते कधीच खचले नाहीत उलट ते निरंतर प्रयत्न करत राहिले आणि यशस्वी होऊन लोकांसाठी ते प्रेरणादायी बनले.

या लेखात आम्ही आपल्याला अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या जन्मापासून ते एक  महान वैज्ञानिक बनण्यापर्यंतच्या प्रवास बद्दल आपल्याला सांगणार आहोत.

याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात केल्या असलेल्या संघर्षा बद्दल चर्चा करणार आहोत. चला तर जाणून घेऊया………..

Albert Einstein

अल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक- Albert Einstein Information in Marathi

पूर्ण नाव (Name)अल्बर्ट हेर्मन्न आईनस्टाईन (Albert Einstein)
जन्म (Birthday)१४ मार्च १८७९
जन्मस्थान(Birthplace)उल्मा (जर्मनी)
वडिल (Father)हेर्मन्न आईनस्टाईन
आई (Mother)पौलिन कोच
शिक्षण(Education)स्वित्झर्लंड मधून त्यांनी आपल्या शिक्षणाला सुरवात केली होती.

ज्युरिच पॉलीटेक्निकल अ‍ॅकॅडमीत चार वर्षे शिक्षण घेतल्यानंतर,

१९०० साली ते पदवीधर झाले.

तसचं त्यांनी स्वित्झर्लंड चे नागरिकत्व स्वीकारले.

१९०५ साली त्यांनी ज्युरिच विश्वविद्यालयातून

पी. एच. डी. ची पदवी मिळवली.

विवाह (Wife)पहिला विवाह मरिअक यांच्या बरोबर तर दुसरा विवाह एलिसा लोवेंन थाल यांच्या बरोबर.
मृत्यू (Death)१८ एप्रिल १९९५

अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म – Albert Einstein Biography in Marathi

पूर्ण जगात एक महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळविणारे अल्बर्ट  आईनस्टाईन यांचा जन्म जर्मनीतील उल्मा शहरात एका यहुदी परिवारात १४ मार्च १८७९ साली झाला होता.

अल्बर्ट आईनस्टाईन हे हर्मन आईन्स्टाईन आणि पॉलिन कोच यांचे ते पुत्र होते. त्यांचे वडिल पेशाने इंजिनीअर आणि सेल्समन होते.

अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या जन्माच्या काही दिवसानंतर त्यांचा परिवार म्युनिच याठिकाणी स्थाईक झाला होता. त्यामुळे आईनस्टाईन यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणाला म्युनिच येथूनच सुरवात केली होती.

अल्बर्ट आईनस्टाईन यांचे शिक्षण – Albert  Einstein Education

आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की, अल्बर्ट आईनस्टाईन यांना सुरवातीपासूनच पुस्तकीज्ञानात काहीच रस नव्हता.

लहान पणापासून त्यांची गणती जिद्दी आणि ‘ढ’ मुलांमध्ये होत होती.  इतकेच नाही तर, त्यांच्या काही हरकतीमुळे काही शिक्षकांनी त्यांना शारीरिकदृष्ट्या विकलांग आहे असं देखील म्हटलं होत.

अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या बाबतीत असं देखील म्हटलं जाते की, वयाची ९ वर्ष होईपर्यंत त्यांना व्यवस्थित बोलता सुद्धा येत नव्हतं.

अस असलं तरी ते लहानपणापासूनच काहीना काही प्रयोग करून पाहत असत. त्यांचे मन होकायंत्राच्या सुईच्या दिशेत आणि निसर्गाच्या नियमात रमत असे.

अल्बर्ट आईनस्टाईन यांना लहानपणापासून संगीता बद्दल खूप आकर्षण होते. याच आकर्षणामुळे त्यांनी आपल्या वयाच्या ६ वर्षीच वायलीन वाजवायला शिकले होते. आपल्या आयुष्यात मिळलेल्या रिकाम्या वेळी ते वायलीन वाजवत असत.

याशिवाय आईनस्टाईन यांनी वयाच्या १२ वर्षीच भूमितीचा शोध लावला होता. त्यांची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती की, त्यांनी विदयार्थी दशेत असतांना केवळ १६ वर्षाच्या वयात कठीणाहून कठीण गणित अगदी चुटकीसरशी सोडवत असत.

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी वयाच्या १६ वर्षी आपले १२ वी चे शिक्षण पूर्ण केल होतं. यानंतर स्वित्झर्लंड च्या ज्युरिच शहरातील “फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” मध्ये प्रवेश घेण्याची त्यांची इच्छा होती.

याकरिता त्यांनी परीक्षा सुद्धा दिली होती परंतु ते त्यात यशस्वी होऊ नाही  शकले.

यानंतर त्यांनी आपल्या शिक्षकाच्या सल्ल्यानुसार स्वित्झर्लंडच्या आरौ शहरातील “कैनटोनल शाळेत” डिप्लोमा केला.

सण १९०० साली अल्बर्ट आईनस्टाईन यांनी स्विज फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्याच वेळेस त्यांनी स्वित्झर्लंड चे नागरिकत्व स्वीकारले होते. याच्या ५ वर्षानंतर १९०५ साली त्यांनी पी. एच. डी. ची पदवी मिळवली.

अल्बर्ट आईनस्टाईन याचं कारकीर्द – Albert Einstein Career

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी पी. एच. डी. ची पदवी ग्रहण केल्यानंतर त्यांची नियुक्ती ज्युरिक विद्यापीठामध्ये प्राध्यापक पदी करण्यात आली होती.

यादरम्यान त्यांनी आपला पहिला क्रांतीकारी विज्ञान संबंधित लेख(डॉक्युमेंट) सुद्धा लिहिला होता.

यानंतर अल्बर्ट आईनस्टाईन यांची नियुक्ती क्ज़ेकोस्लोवाकिया मधील प्राग शहरातील जर्मन विद्यापीठाच्या कुलगुरू पदी करण्यात आली होती. यानंतर ते परत एकदा फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चे कुलगुरू म्हणून सुद्धा नियुक्त झाले होते.

सण १९१३ साली महान वैज्ञानिक मैक्स फ्लांक आणि वाल्थेर नेर्न्स्ट यांनी अल्बर्ट आईनस्टाईन यांना बर्लिन मधील एका विद्यापीठात करण्यात येणाऱ्या संशोधना करिता आमंत्रित केलं होत. यामुळे ते बर्लिनला गेले होते.

सण १९२० साली त्यांना हॉलंड मधील लंडनच्या विद्यापीठातर्फे आजीवन संशोधन करण्याकरिता आणि व्याख्यान देण्याकरिता प्रस्ताव देण्यात आला होता.

याच ठिकाणी त्यांच्याद्वारे विज्ञान क्षेत्रात अनेक संशोधन करण्यात आले होते. याकरता त्यांना अनेक पुरस्काने सन्मानित देखील करण्यात आले होते.

ज्यावेळेस अल्बर्ट आईनस्टाईन “कैलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी” सोबत जोडले गेले होते, त्यावेळेला त्यांची कारकीर्द खूप उंच पदावर पोहचली होती.

त्यांनी आपल्या प्रयोगात अनेक आविष्कार करून विज्ञान क्षेत्राला  एक नविन दिशा दिली होती.

अल्बर्ट आईनस्टाईन यांचे शोध –  Inventions of Albert  Einstein

  • प्रकाशाच्या पुंजाचा(क्वांटम) सिद्धांत –

प्रकाशाच्या पुंजाचा(क्वांटम) सिद्धांतात आईनस्टाईन यांनी उर्जेच्या छोट्या थैली ला फोटोन म्हटलं आणि त्याच्या तरंगाचे वैशिष्ट्य सांगितले. याचबरोबर त्यांनी काही धातूंचे इलेक्ट्रॉनिक उत्सर्जन आणि फोटो इलेक्ट्रिक च्या परिणामाची रचना समजावून सांगितली. याच संशोधनाच्या आधारावर दूरदर्शन चा शोध करण्यात आला होता.

  • E = Mc 2

सण १९०५ साली आईनस्टाईन यांनी वस्तुमान आणि ऊर्जा यांच्यात एक सूत्र बनवलं होत. जे पूर्ण जगात प्रसिद्ध झाल होत.

  • रेफ्रिजरेटर चा शोध – Invention Refrigerator

आईनस्टाईन यांनी शीतगृहा चा शोध खूप कमी वेळेत लावला होता. या प्रयोगात त्यांनी अमोनिया, ब्युटेन, पाणी आणि ऊर्जा यांचा जास्तीत जास्त वापर केला होता.

  • सापेक्षतावादाचा विशिष्ट सिद्धांत –

आईनस्टाईन यांनी आपल्या या सिद्धांतात वेग आणि वेळ यांचा संबंध समजावून सागण्याचा प्रयत्न केला आहे.

  • आकाशाचा रंग निळा असतो –

याच्यात आईनस्टाईन यांनी प्रकाशाच्या प्रकीर्णान(Light Scattering)  बद्दल माहिती सांगितली आहे, जेव्हा प्रकाश एखाद्या माध्यमातून प्रवास करत असतो, त्या माध्यमात धुळीचे कण तसेच पदार्थांचे अत्यंत सूक्ष्म कण देखील असतात.

यांच्यामुळे प्रकाश सर्व दिशेने प्रकाशित होत जातो. त्याला प्रकाशाचे प्रकीर्णन म्हणतात.

एखाद्या रंगाचे प्रकीर्णन त्याच्या तरंगलांबीवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे एखाद्या रंगाच्या प्रकाश प्रकीर्णनाची तरंगलांबी कमी असते, त्याच्या रंगाचे प्रकीर्ण सर्वात जास्त आणि ज्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात अधिक असते त्या रंगाची प्रकीरणे सर्वात कमी असतात. उदाहरणार्थ आकाशाचा रंग, जो सूर्याच्या प्रकाश किरणांमुळे आपल्याला निळा रंगाचा दिसतो.

याव्यतिरिक्त अल्बर्ट आईनस्टाईन यांनी आपल्या अद्भुत संशोधनातून विज्ञानाच्या विकासाला गती मिळून दिली.

अल्बर्ट आईनस्टाईन यांचा विवाह – Albert  Einstein Marriage

जगप्रसिद्ध असणारे वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांच्या जीवनात दोन वेळा लग्न केलं होत. त्यांचा पहिला विवाह सण १९०३ साली त्यांच्या शाळेतील मैत्रीण मरीअक यांच्याबरोबर झाला होता. आईनस्टाईन यांना पहिल्या पत्नी पासून तीन मूल झाली होती.

परंतु, त्यांचा विवाह फार काळ टिकू नाही शकला. सण १९१९ साली त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता.

यानंतर आईनस्टाईन यांनी आपला दुसरं विवाह एलिसा लोवेस बरोबर केला.

अल्बर्ट आईनस्टाईन यांना मिळालेले पुरस्कार- Albert  Einstein Awards

विज्ञान क्षेत्रात दिलेले आपले महत्वपूर्ण योगदान आणि केले असलेले उत्कृष्ट संशोधन याकरता महान वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

ते खालील प्रमाणे आहेत…..

  • सन १९२१ साली आईन्स्टाईन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.
  • सन १९२१ साली त्यांना मत्तयूक्की पदक देण्यात आलं.
  • सन १९२५ साली आईनस्टाईन यांना कोपले पदक देऊन गौरविण्यात आलं होत.
  • सन १९२९ साली त्यांना मैक्स प्लांक पदकाने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे.
  • सन १९९९ साली त्यांना शतकातील व्यक्तिमत्व पुरस्कार मिळाला आहे.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे निधन- Albert  Einstein Death

ज्यावेळी जर्मनी मध्ये हिटलर चे शासन आलं होत, त्यावेळेला त्याने आपल्या देशातील सर्व यहुदी लोकांना देशाबाहेर काढले.

अल्बर्ट आईनस्टाईन हे जर्मनीचे रहवासी आणि विशेष म्हणजे ते सुद्धा याहुदीच असल्यामुळे त्यांना सुद्धा जर्मनीच्या बाहेर जाव लागलं.

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी जर्मनी सोडल्यानंतर अमेरिकेच्या न्यूजर्सीत येऊन स्थायिक झाले होते. याच ठिकाणी “प्रिस्टन” महाविद्यालयात काम करीत असतांना १८ एप्रिल १९५५ साली त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी केल्या असलेल्या महान संशोधनांमुळे विज्ञान क्षेत्रात एका नविन प्रकारची क्रांती आणली होती.

त्यांनी कठीणाहून कठीण गोष्टी खूप सोपी बनवल्या आहेत.

बऱ्याच वेळेला अल्बर्ट आईनस्टाईन प्रात्याक्षित करत असतांना अपयशी होत असत. अपयश आला असला तरी ते कधीच खचून गेले नाहीत.

त्यांनी आपल्या प्रयत्नातून सर्व जगासमोर स्वत:ला सिद्ध करून दाखवून ते लोकांसाठी प्रेरणादायी बनले.

अल्बर्ट आईनस्टाईन यांचे सुविचार- Albert Einstein Quotes

  1. “विश्वात दोन गोष्टी अगणित आहेत, ब्रह्मांड आणि मानवाची मूर्खता. परंतु ब्रह्मांडा बद्दल मी निश्चित सांगू शकत नाही.”
  2. “ज्या माणसाने आपल्या आयुष्यात चुका कधीच केल्या नाहीत,  त्याने जीवनात काही नविन करण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही.”
  3. “सर्व मानव हे ईश्वरांच्या नजरेने एक समान आहेत, कोणीच जास्त बुद्धिमान नाही आणि मूर्ख सुद्धा नाही.”

लक्ष्य दया: तुमच्या जवळ अल्बर्ट आईनस्टाईन बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :-आम्हाला आशा आहे की हा अल्बर्ट आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक  – Albert Einstein Biography तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook Page लाइक करायला सुधा.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

वि.स. खांडेकर – मराठी साहित्यिक

V.S. Khandekar Mahiti मराठी कथा, कादंबरीकार म्हणून सर्वांनाच परिचित असणारं नाव वि.स. खांडेकर. भारतात साहित्य क्षेत्रात सर्वोच्च असा समजला जाणारा...

by Editorial team
May 19, 2022
Marathi Biography

बहिणाबाई चौधरी माहिती

Bahinabai Chaudhari Biography in Marathi अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,आधी हाताले चटके तवा मियते भाकर. बहिणाबाई चौधरी यांच्या या...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved