श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti

महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..!

शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन विधिमंडळ, विधान परिषद आणि संसदेपर्यंत पाठविले. त्यातील अनेकजण मंत्रिपदापर्यंतही पोचले.

शिवसेनेत आज बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे एकनाथ शिंदे.

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती – Eknath Shinde Information in Marathi

पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे
जन्म 9 फेब्रुवारी 1964 (महाराष्ट्र)
पक्ष शिवसेना
मतदारसंघ कोपरी पाचपाखडी, ठाणे, महाराष्ट्र
पत्नीचे नाव लता एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे माहिती –  Eknath Shinde Biography in Marathi

एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 ला झाला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव.

मात्र त्यांचे बालपण ठाणे शहरात गेले आणि राजकीय कारकिर्दीची सुरुवातही ठाण्यातच झाली.

घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी शिक्षण सोडून ते एका मासळी विकणाऱ्या कंपनीत काम करू लागले. पण हवी तशी मिळकत न मिळाल्यामुळे त्यांनी ती नौकरी सोडली व प्रवासी रिक्षा चालवण्याचे काम ते करू लागले.

70 च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तृत्वाने अनेक युवक शिवसेनेशी जोडले गेले. त्याचवेळी ठाण्याचे आनंद दिघे शिवसेनेशी जुळले. त्यावेळी आनंद दिघेंच्या नेतृत्वात ठाण्यामध्ये शिवसेनेचे काम अगदी जोमात होते.

80 च्या दशकात एकनाथ शिंदें हे आनंद दिघे यांच्या संपर्कात आले आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला राजकीय वळण भेटले.

ठाण्यात आनंद दिघेंच्या नेतृत्वात एकनाथ शिंदेनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या आंदोलनात तर पोलिसांच्या लाठीमारासह त्यांनी कारावासही भोगला.

ठाण्यातील शिवसेनेच्या प्रत्येकच आंदोलनात समोर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे आनंद दिघे फार प्रभावित झाले.

त्यांनी एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख केले.

About Eknath Shinde

1997 मध्ये दिघेंनी त्यांना ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे तिकीट दिले. या निवडणुकीत ते बहुमतांनी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले. पुढे ते ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहाचे नेतेही झाले.

त्यानंतर मात्र शिंदे यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. ते राजकारणात वरची पायरी चढतच गेले.

2004 साली ठाणे विधानसभेचे तिकीट त्यांना मिळाले. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले.

त्यानंतर ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून 2009, 2014, 2019 ची निवडणूक जिंकून, सलग चार वेळा ते विधानसभेवर निवडून गेले.

यादरम्यान ते 2014 साली 14 दिवसांसाठी शिवसेनेचे गटनेतेही झाले होते. 2015 ते 2019 मध्ये भाजप-शिवसेनेच्या युती सरकारमध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वादावरून भाजप-शिवसेना युती तुटली आणि त्यावेळी एक नवीन पर्याय समोर आला, ‘महाविकास आघाडी’.

यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार बनविले.

मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांना नगरविकास मंत्री म्हणून पद देण्यात आले.

प्रचंड मेहनत, चिकाटी, पक्षसंघटन, कार्यकर्त्यांशी संवाद, बैठका आणि जनतेच्या प्रश्नांवर विचारमंथन करून त्यांचा निपटारा करणे ह्या एकनाथ शिंदे यांच्या जमेच्या बाजू राहिल्या आहेत.

याबरोबरच कितीही अडचणीचा, संकटांचा सामना करून पुढे जात राहणं हि एक त्यांची वेगळी ओळख आहे. 

शिक्षण अपूर्ण राहिल्याचे शल्य त्यांना नेहमीच बोचत राहिले त्यामुळे मंत्री असतांना त्यांनी वयाच्या 56व्या वर्षी ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या माध्यमातून त्यांनी इतर काही अशिशिक्षित किंवा कमी शिकलेल्या मंत्र्यांसाठी  हा एक आदर्शच ठेवला.

आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यातीलच नव्हे तर नाशिक पर्यंत त्यांनी शिवसेनेचे जाळे विणले.

आनंद दिघेंना ते आपले गुरु मानत असत. आजही त्यांच्या राजकीय यशाचे श्रेय ते आनंद दिघेंना देतात.

श्री. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Eknath Shinde

प्रश्न. श्री. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात?

उत्तर: शिवसेना.

प्रश्न. एकनाथ शिंदे म.न.पा. ची पहिली निवडणूक केंव्हा आणि कुठून लढले?

उत्तर: 1997 साली. ठाणे महानगरपालिका.

प्रश्न. एकनाथ शिंदे पहिली विधानसभा निवडणूक केंव्हा आणि कुठून लढले?

उत्तर: 2004 साली. ठाणे मतदारसंघ.

प्रश्न. एकनाथ शिंदे हे 2004 ते 2019 पर्यंत कितीदा विधानसभा निवडणूक जिंकले?

उत्तर: सलग चार वेळा.

प्रश्न. एकनाथ शिंदे हे कुणाला आपले गुरु मानतात?

उत्तर: दिवंगत आनंद दिघे यांना.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top