Sunday, September 24, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

ठाणे जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Thane Jilha Mahiti

महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक उपराजधानी ठाणे मुंबईच्या उत्तरेला वसलेला एक जिल्हा ठाणे भारतात जेव्हा रेल्वेसेवा सुरू झाली तेव्हां सर्वात आधी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे धावलीमुंबई मधल्या मध्य रेल्वे उपनगरीय आणि हार्बर मार्गावरचे एक रेल्वेस्थानक ठाणे.

ठाणे शहर हे फार प्राचीन शहर असुन या शहराचा उल्लेख मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपटात आपल्याला सापडतो, आता मात्र ठाणे औद्योगिक दृष्टीकोनातुन एक विशाल शहर म्हणुन उदयाला आले आहे,ठाणे शहर मुंबईसारख्या महानगराला जोडले गेले असल्याने त्या महानगराची संस्कृती आता ठाण्याने आत्मसात केली आहे.

खरं तर ठाणे शहराची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ठ जोडलेली आहे.तरी देखील आता या शहरात उत्तर भारतीय, सिंधी, गुजराती, दक्षिण भारतीय, मुस्लीम, मारवाडी अश्यांसारखे कितीतरी समाजाचे लोक या ठिकाणी स्थलांतरीत झालेले आणि आपले उद्योग व्यवसाय मोठया प्रमाणात विस्तारीत केलेले पहायला मिळतात.

तलावांचा जिल्हा म्हणुन देखील ठाणे जिल्हा ओळखला जातो. जवळजवळ ३५ तलाव या शहरात आपल्याला पहायला मिळतात, त्यातला मासुंदा तलाव अधिक सुंदर आणि परिसर प्रसन्न आहे.शहरात अनेक हिरव्यागार निसर्गरम्य टेकडया व डोंगर बघायला मिळतात.

ठाणे जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Thane District Information in Marathi

Thane District Information in Marathi

ठाणे जिल्हयातील तालुके – Thane District Taluka List

या जिल्हयात एकुण ७ तालुके आहेत.

  1.   ठाणे
  2.  कल्याण
  3.  मुरबाड
  4.  भिवंडी
  5.  शहापुर
  6.  उल्हासनगर
  7.  अंबरनाथ

ठाणे जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Thane Jilha Chi Mahiti

  • लोकसंख्या १.११ करोड
  • क्षेत्रफळ ४,२१४ वर्ग कि.मी.
  • साक्षरता ८५%
  • १००० पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ८८०
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जिल्हयातुन गेला आहे.
  • जिल्हयाच्या पुर्वेला सहयाद्रिच्या पर्वतरांगा आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे, उत्तरेला गुजरात राज्यातील गर्द वनं आणि दक्षिणेला मुंबई शहर.
  • २०१४ साली ठाणे जिल्हयाचे विभाजन झाले आणि नवा पालघर जिल्हा उदयाला आला.
  • २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत हा जिल्हा राज्यातुन तिसरा जिल्हा आहे.
  • औद्योगिक विकासाच्या बाबतीत देखील ठाणे जिल्हा राज्यात तिसरा आहे.
  • वाढत्या औद्योगिकीकरणाचा या जिल्हयाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सिंहाचा वाटा आहे.
  • महाराष्ट्रात इचलकरंजी नंतर कापड उद्योगाकरता ठाणे जिल्हयातील भिवंडी तालुक्याचा क्रमांक लागतो.
  • ठाणे जिल्हयात मुंबई प्रमाणेच मत्स्य व्यवसाय मोठया प्रमाणात चालतो येथील मासे विदेशात आणि आखाती देशात देखील पाठवले जातात.
  • केंद्र सरकारच्या अधिकारा अंतर्गत असलेला दारू गोळा आणि शस्त्रास्त्र बनविण्याचा कारखाना ठाणे जिल्हयातील अंबरनाथ येथे आहे.
  • वाढत्या औद्योगिकरणामुळे कुशल आणि अकुशल कामगारांना मोठया प्रमाणावर रोजगार प्राप्त झाला आहे.
  • अंबरनाथ येथील शिव मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर असुन हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे ते फार प्राचीन असल्याचे लक्षात येते.
  • मासुंदा तलावाच्या किना.यावरचे कोपनेश्वर मंदिर ठाणे शहरातले सर्वात पुरातन मंदिर असुन तलावामुळे याच्या सौंदर्यात भर पडली आहे.
  • गडकरी रंगायतन, डॉ.काशीनाथ घाणेकर नाटयगृह या नाटय मंदिरांमुळे या शहरातील नागरिकांचे चांगल्या तऱ्हेने मनोरंजन होते, ठाणे शहरातील हे नाटयगृह फार प्रसिध्द आहे, नाटकांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे ते जणु माहेरघरच आहे.
  • मिल्टिप्लेक्स थियेटर्स, मोठमोठे शॉपिंग मॉल, बिग बाजार, करमणुकीकरता आणि खरेदीकरता नवनवी दालनं या शहरात सुरू झाली असुन त्याची शोभा सायंकाळी पाहण्यासारखी आणि अनुभवण्यासारखी आहे.
  • ठाणे शहराला राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हंटले जाते.
  • गणेशोत्सव व नवरात्रौत्सव ठाण्याचे महत्वाचे उत्सव आहेत.
  • शहरातला दही हंडी उत्सव फार लोकप्रिय असुन ठाणे, मुंबई आणि उपनगर येथुन गोविंदा पथक दहीहंडीत सहभागी होण्यासाठी येतात.

ठाणे जिल्हयातील तिर्थस्थळं आणि पर्यटन स्थळं – Places to Visit in Thane

माळशेज घाट – Malshej Ghat

  • पावसाळयांच्या दिवसांमधे निसर्ग कात टाकतो आणि संपुर्ण सृष्टी हिरवाईचा शालु नेसुन नवतरूणी सारखी सजते,  नटते आणि अश्या या हिरवाईला पाहाण्याकरता, अनुभवण्याकरता आपण सहलीचे आयोजन करतो.
  • शहरीकरणाला कंटाळलेले आणि थकले भागलेले आपण जीव निसर्गाला साद घालतो.
  • तुम्ही जर पावसाळी सहल काढण्याकरता ठिकाण शोधत असाल तर माळशेज घाट तुमच्याकरता एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
  • कल्याण नगर रोडवर हा माळशेज घाट लागतो, पावसाळयात तर येथील झरे, धबधबे ओसंडुन वाहात असतात तेव्हा येथील सृष्टी सौंदर्य अप्रतीम भासतं.
  • माळशेज ला आल्यानंतर अगदी हाताला ढग लागतील एवढया कमी अंतरावर आपल्याला ढग असल्याचा भास होतो, चोहोदुर सृष्टीने हिरवेगार गालीचे अंथरलेले असतात, हातभर अंतरावर धुक्याने पुढचा परिसर अगदी दिसेनासा होतो, अश्या धुंद करणाऱ्या वातावरणाला अनुभवण्याकरता माळशेजला यायलाच हवे.
  • येथे भेट देणाऱ्या पर्यटकांकरता आता सोयी केल्या जात आहेत, वेगवेगळे पॉईंट केले जातायेत आणि घाटात पार्कींग करता समस्या उद्भवु नये म्हणुन दोन ठिकाणी पार्कींगची व्यवस्था सुध्दा केली जात आहे.
  • पावसाळयात जरी येथे फार गर्दी असते तरी लवकरच हे ठिकाण माथेरान आणि महाबळेश्वर सारखे लोकप्रीय आणि विकसीत होत आहे.
  • वनविभाग आता संयुक्त रित्या या माळशेज घाटाला विकसीत करत असुन अनेक सोयी सुविधा आता पर्यटकांकरता उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

टिटवाळा येथील महागणपती मंदिर – Titwala Mahaganpati Mandir

  • कल्याण कसारा मार्गावरील टिटवाळा येथील सिध्दीविनायक महागणपती मंदिर फार प्रसीध्द असुन नवसाला पावणारा श्रीगणेश अशी त्याची महिमा सांगीतली जाते.
  • जागृत देवस्थान म्हणुन पंचक्रोशीत त्याची ख्याती पसरलेली आहे.
  • काळु नदीच्या तिरावर हे मंदिर असुन चिमाजी आप्पांनी पोर्तुगिजांविरूध्दची वसईची लढाई जिंकल्यानंतर या मंदिराचा जिर्णोध्दार केल्याचे सांगीतले जाते.
  • येथील महागणपती मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर पाहाण्यासारखे असुन येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते.
  • या मंदिराच्या जवळच कण्व ऋषींचा आश्रम होता.
  • शकुंतलेने या महागणपतीची आराधना केली असल्याची आख्यायिका आहे आणि तिच्यावर या गणेशाचा कृपा आशिर्वाद आहे म्हणुन या गणेशाला विवाह विनायक असे देखील म्हंटले जाते.
  • या मंदीरात दर्शनाकरता जायचे असल्यास कसारा आणि टिटवाळयाकरता श्री छत्रपती शिवाजी टर्मिनस् वरून लोकल ने जाता येते, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत.

अंबरनाथ शिवमंदीर –  Ambarnath Shiv Mandir 

  • ठाणे जिल्हयातील अंबरनाथ येथे अतिशय प्राचीन असे शिवमंदीर असुन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुन आहे.
  • इ.स.१०६० साली चित्रराज यानानी यांनी या मंदीराची निर्मीती केली असल्याचे येथे नमुद आहे.
  • युनेस्कोने आपल्या कलात्मक वास्तुंच्या २१८ ठिकाणांच्या यादीत या मंदीराचा समावेश केला आहे.
  • हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे, या मंदिरात आल्यानंतर अनेक मुर्तींचे दर्शन आपल्याला घडते. मंदिरात जमिनीवर वाघाचे कातडे अंथरले असल्याचे देखील पहावयास मिळते.
  • श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी पहावयास मिळते.
  • अंबरनाथ रेल्वेस्थानका पासुन पायीच्या अंतरावर हे मंदीर आहे.

वज्रेश्वरी मंदिर – Vajreshwari Temple

  • ठाणे जिल्हयातील भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी हे स्थळ भाविकांकरता फार लोकप्रिय ठिकाण आहे.
  • या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड असुन त्याचा उपयोग अनेक आजारांवर होत असल्याची येथील भाविकांची श्रध्दा आहे.
  • तानसा नदीच्या किनाऱ्यावर हे ठिकाण असुन येथे श्री निथानंद महाराजांची समाधि देखील आहे.
  • चिमाजी आप्पांनी या मंदिराची निर्मीती केली असल्याचे येथे नमुद आहे. गरम पाण्याचे कुंड येथे येणाऱ्या भाविकांकरता आकर्षणाचे केंद्र आहे.
  • येथे येण्याकरता नजिकचे रेल्वेस्थानक वसई आहे. ठाणे आणि वसई येथुन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस देखील या ठिकाणाकरता सुटतात.
  • तर असा आहे आपला विशिष्ठ ठाणे जिल्हा आपण महाराष्ट्रात असाल तर एक वेळ अवश्य भेट द्या या जिल्ह्याला.

आशा करतो आपल्याला ठाणे जिल्ह्याविषयी लिहिलेली माहिती आवडली असेल, या माहितीला आपल्या मित्रांसोबत शेयर करा तसेच आमच्या फेसबुक च्या पेज ला भेट द्यायला विसरू नका.

धन्यवाद!

Previous Post

जाणून घ्या १७ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Next Post

प्राणायामांपैकी एक फायदेशीर प्राणायाम… कपालभाती

Editorial team

Editorial team

Related Posts

विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Kapalbhati Pranayam in Marathi

प्राणायामांपैकी एक फायदेशीर प्राणायाम... कपालभाती

18 March History Information in Marathi

जाणून घ्या १८ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Sangli District Information in Marathi

सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

लातुर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

लातुर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Himachali Sabji

हिमाचली सब्जी रेसिपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved