मुंबई जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Mumbai Jilha Mahiti

भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीकोनातुन सर्वात मोठे शहर मुंबई!

विशाल सागरी किनारा लाभलेले आणि सागरावर वसलेले शहर मुंबई, आयलंड सिटी आणि दक्षिण मुंबई या नावाने देखील हे शहर ओळखले जाते….. भारताची आर्थिक राजधानी अशी या शहराची आणखीन एक ओळख.

या मुंबईचे मुळ रहिवासी म्हणजे कोळी बांधव…. त्यांची आराध्य देवता मुंबा देवी…. त्यावरून या शहराचे नाव पडले मुंबई !

मुंबई… बंबई…  बॉम्बे… मुंबापुरी… अश्या कितीतरी नावाने ओळखल्या जाणा.या या शहराला 1995 साली अधिकृत असं नाव मिळालं…. मुंबई

हे शहर म्हणजे सात बेटांचा समुह…… पाषाणयुगापासुन येथे वस्ती असल्याचे दाखले सापडतात… अशी कित्येक नावं या शहराच्या इतिहासात सापडतात त्यांचे उल्लेख मिळतात

ग्रीक, सम्राट अशोक मौर्य, शिलाहार साम्राज्य, गुजरातचे मुस्लिम साम्राज्य, पोर्तृगीज, ईस्ट इंडिया कंपनी…. ही अशी नावे आहेत ज्यांनी कधीकाळी या मुंबईला मुंबई मेरी जान म्हंटले…

काळ बदलला तशी सत्ता बदलली… भारत स्वतंत्र झाला आणि मुंबई आपली जान झाली.

लाखो करोडो दिलोंकी धडकन मुंबई ! आज कितीजणांना रोजी-रोटी देणारे शहर बनले याची गिनती या मुंबई जवळ देखील नसावी.

मुंबई जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Mumbai Information in Marathi

Mumbai Information in Marathi

बॉम्बे जिल्हयातील तालुके – Mumbai Taluka List

बंबई जिल्हयात एकुण 3 तालुके आहेत

 1. अंधेरी
 2. बोरीवली
 3. कुर्ला

मुंबई जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Mumbai Jilha Chi Mahiti

 • क्षेत्रफळ 0 वर्ग कि.मी.
 • साक्षरतेचे प्रमाण 2%
 • एकुण गावं 87
 • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 832
 • मुंबईत मुख्यतः मराठी ही भाषा बोलली जाते त्याखालोखाल कोळी व कोकणी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा बोलणारे देखील आहेत.
 • मुंबई पुणे एक्सप्रेस वे, राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 ( आग्रा-मुंबई), राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 हे मुंबईतुन सुरू होतात.
 • भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे म्हणुन या शहराकडे पाहिले जाते या शहराची अंदाजे लोकसंख्या 3 कोटी 29 लाख ऐवढी आहे.
 • उपनगरांसह मंबई हे जगात 5 वे सर्वात विशाल शहर आहे.
 • ज्यावेळेस मुंबईचा विस्तार व्हायचा होता त्यापुर्वीपासुन कोळी लोक या ठिकाणी समुद्र किना.यावर वास्तव्यास आहेत, त्यांचा उदरनिर्वाह हा संपुर्णतः सागरावर अवलंबुन आहे,समुद्रातले मासे पकडायचे आणि ते ताजे असतांनाच विकायचे असा त्यांचा व्यवसाय आज मुंबईत या कोळी लोकांचे अनेक कोळीवाडे अस्तित्वात आहेत. (मांडवी, धारावी, शिवडी, वेसावे, वडाळा, कुलाबा, माहीम, शींव, वरळी, खार, गोराई, चिंबई, मालाड, मढ येथे या कोळयांचे कोळीवाडे आहेत)
 • आज मुंबई आपल्या देशाची आर्थिक आणि मनोरंजनाची राजधानी म्हणुन सर्वत्र ओळखली जाते.
 • मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व बॅंक अश्या आर्थिक आणि महत्वाच्या संस्था या शहरामधे आहे.
 • महात्मा गांधीजींनी चलेजाव चळवळ 1942 ला मुंबई येथुनच सुरू केली.
 • प्रत्येक माणसाला भुरळ पाडणारी चित्रनगरी अर्थात चित्रपट सृष्टीची पाळंमुळं या शहरात खोलवर रूजली असुन त्यामुळे या क्षेत्रात काम करणा.या कलाकारांना पाहण्याकरता देखील येथे लोक मोठया प्रमाणात मुंबईल येत असतात.
 • ही सिनेसृष्टी बॉलीवुड या नावाने जास्त प्रचलीत आहे.
 • चित्रीकरणाकरता महत्वाचे असे मोठमोठे स्टुडीओ या शहरात असुन चित्रपटांचे, मालिकांचे या ठिकाणी रोज चित्रीकरण होत असते.
 • मुंबईचे हृद्य समजली जाणारी येथील लोकल देखील या शहराचा अविभाज्य भाग आहे लाखो चाकरमानी रोज या लोकल मधुन ये.जा करत असतात.

Mumbai Jilha Mahiti

 • बांद्रा वरळी सी लिंक हा मुंबई येथील एक महत्वाचा रस्ता असुन संपुर्णतः समुद्रावर बांधलेला हा रस्ता आहे. 5 वर्ष कालावधी आणि 660 कोटी अंदाजे खर्च अपेक्षीत असतांना अनेक अडचणी आणि अडथळे पार करत हा रस्ता बांधणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे काम होते. हा रस्ता बांधण्याकरता 10 वर्ष आणि 1600 कोटी खर्च आला. आता हा रस्ता वाहतुकीकरता उपलब्ध करून देण्यात आला असुन या मार्गावरून ये जा करणा.यांचा बराच वेळ या रस्त्यामुळे आता वाचतो.
 • जलमार्गाने वा वायुमार्गाने येणारे युरोप, अमेरिका, अफ्रीका अश्या पश्चिमी देशातले नागरिक आधी मुंबईला येतात आणि त्यामुळे या शहराला भारताचे प्रवेशव्दार देखील म्हंटले जाते.
 • छत्रपती शिवाजी टर्मिनस (रेल्वे स्थानक), E.S.T. (बस सेवा), छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानसेवा, या नावाने ओळखल्या जातात
 • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात व्यस्त विमानतळ म्हणुन ओळखलं जातं.
 • युनेस्को या वैश्विक संस्थेने मुंबई येथील दोन स्थळांना आपल्या यादित मानाचे स्थान दिले आहे 1) छत्रपती शिवाजी टर्मिनस 2) एलिफंटा येथील गुफा
 • मुंबई नाटकांकरता देखील फार प्रसिध्द आहे. पुणे आणि मुंबई येथे सर्वाधीक मराठी नाटकं तयार होतात आणि सादर देखील होतात. येथे अनेक प्रसिध्द नाटयागृह देखील आहेत
 • सर्वधर्माचे सण या मुंबईत मोठया आनंदात आणि उत्साहात साजरे होतांना दिसतात. येथील गणेशोत्सवात गणेशाच्या उंचच उंच मुर्ती जगाचे लक्ष आपल्याकडे वेधतात, त्याचप्रमाणे या शहरात साजरा होणारा दहीहंडी उत्सव तर जगभरात प्रसिध्द आहे तो त्या उंचच उंच मानवी मनो.यांमुळे.
 • प्रत्येक पावसाळयात सरासरी वर्षाला 2000 मि.मी. एवढा पाउस मुंबईला पडतो.
 • मुंबईला 26 जुलै 2005 साली एकाच दिवसात 944 मि.मी. एवढा विक्रमी पाउस पडला त्यामुळे संपुर्ण मुंबई त्या दिवशी जलमय झाली होती, अनेकांना जीव गमवावा लागला ज्या लोकांनी तो दिवस अनुभवला ते आज देखील त्या दिवसाच्या आठवणीने हादरून जातात.
 • वाढत्या नागरिकरणाचा ताण मुंबईला कायम सहन करावा लागतो आहे त्यामुळे उद्भवणाया समस्या देखील आहेत, धारावी ही झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणुन प्रचलीत आहे.

मुंबई चे पर्यटनस्थळं आणि तिर्थस्थळं –  Tourist Places In Mumbai

20 व्या शतकात भारतात गेट वे ऑफ इंडिया या भव्य वास्तुकलेची निर्मीती करण्यात आली आहे.

किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या स्वागताकरता या गेट च्या बांधकामाचा निर्णय घेण्यात आला होता.

जलमार्गाने वा वायुमार्गाने येणारे युरोप, अमेरिका, अफ्रीका अश्या पश्चिमी देशातले नागरिक आधी मुंबईला येतात त्यावेळेस हे भव्य प्रवेशव्दार त्यांच्या नजरेस पडते.

आणि त्यामुळे या शहराला भारताचे प्रवेशव्दार देखील म्हंटले जाते. गेट वे ऑफ इंडिया समोर भव्य असे पंचतारांकीत हॉटेल ताज आपल्या दृष्टीस पडते.

भव्य असा समुद्रकिनारा आणि गेट वे आॅफ इंडिया, हाॅटेल ताज पाहाण्याकरता मुंबईला पर्यटक फार गर्दी करतात.

या गेट समोर फोटा काढण्याचा आनंद घेतात. देशी परदेशी पर्यटक मोठया प्रमाणात येथे घोडयावरून सैर, टांगा सफारीचा देखील आनंद घेतांना दिसतात.

येथे बोटीतुन सैर करण्याचा आनंद देखील तुम्ही घेउ शकता. बोटीतुन 7 कि.मी. अंतरावर घारापुरी बेट आहे तेथील एलिफंटा लेण्या पाहाण्याचा आनंद देखील तुम्ही घेउ शकता.

 • सिध्दीविनायक मंदिर – Siddhivinayak Temple

मुंबईच्या प्रभादेवी भागातील सिध्दीविनायकाचे मंदिर फार प्राचीन आणि प्रसिध्द असे गणेशाचे मंदिर आहे.

उजव्या सोंडेच्या गणपतीचे धार्मीक महत्व आगळेवेगळे समजल्या जाते, या स्थळाला सिध्दपिठ समजल्या जाते, असा गणेश नवसाला लवकर पावतो आणि लवकर रागवतो देखील अशी मान्यता आहे.

चर्तुभुज असलेल्या या गणेशाच्या चार हातांमध्ये कमळ, अंकुश, मोत्यांची माळा, आणि मोदकांनी भरलेली वाटी आहे.

गणेशाच्या आजुबाजुला त्याच्या पत्नी रिध्दी आणि सिध्दी देखील आहेत.

अष्टविनायकापैकी हा गणेश नसुन देखील हिंदु धर्मीयांत या गणपतीचे फार महत्व आहे.

पुर्वी हे मंदिर फार छोटया स्वरूपात होते पण या गणेशाप्रती भाविकांची दिवसेंदिवस वाढणारी श्रध्दा आणि येत असलेल्या देणग्यांमधुन हे मंदिर आता फार भव्य स्वरूपात जवळजवळ 5 मजली उभे राहिले आहे.

Siddhivinayak Mandir

हिंदु धर्मीयांव्यतिरीक्त इतर धर्माचे लोक देखील या मंदिरात गणेशाच्या दर्शनाकरता येत असतात.

चित्रपटसृष्टीतील मोठमोठे कलाकार मंडळी देखील सिध्दीविनायकाची भक्त असुन ब.याचवेळा हे कलाकार आपल्या घरापासुन पायी पायी या ठिकाणी दर्शनाकरता येतांना दिसतात.

मुंबईवासियांचे आराध्यदैवत असलेल्या या मंदिरात पर्यटक देखील मुंबईला आल्यावर दर्शनाकरता येतातच.

 • हाजीअली दर्गा – Haji Ali Dargah

वरळी च्या समुद्रात हाजी अली दर्गा असुन मुस्लिम धर्मीयांव्यतिरीक्त इतर धर्मीयांची देखील या धार्मिक स्थळावर अपार श्रध्दा आहे.

मुंबई येथील हे अतिशय महत्वपुर्ण धार्मिक आणि पर्यटनस्थळ असुन सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ या दग्र्याची निर्मीती 1431 मधे करण्यात आली आहे.

हाजी अली ट्रस्ट ने सांगितल्या नुसार हाजी अली उज्बेकिस्तान येथील बुखारा प्रान्तातुन जगभ्रमंती करून भारतात आले होते

वरळीच्या खाडीत ही दर्गा असुन मुख्य सडकेपासुन 400 मीटर आत छोटयाश्या टापुवर बनवण्यात आली आहे

मुख्य सडकेपासुन आत जाण्याकरता जो रस्ता तयार करण्यात आला आहे त्याची उंची कमी असल्यामुळे ओहोटी असतांनाच तेथे जाता येते, इतर वेळेला हा रस्ता समुद्रात गुडुप होतो.

कुली, फिजा या सारख्या अनेक चित्रपटांचे येथे चित्रीकरण देखील करण्यात आले आहे

आजुबाजुला समुद्र असल्यामुळे येथील दृश्य विहंगम दिसते.

 • महालक्ष्मी मंदिर – Mahalaxmi Temple Mumbai

वरळीच्या समुद्रकिना.यावर हाजी अली दग्र्याच्या जवळच फार प्राचीन आणि जागुत देवस्थान म्हणुन देवी महालक्ष्मी मंदिराची ख्याती आहे.

फार जागृत देवस्थान असुन मंदिराच्या निर्मीतीची कथा देखील रोचक आहे

वरळी आणि मलबार हिल (ब्रीच कॅंडी) या दोन्ही ठिकाणांना जोडण्याचे कार्य सुरू होते पण वारंवार या दोन्हींना जोडणारी भिंत कोसळत होती.  ब्रिटीश इंजिनियर्स लोकांचे सारे प्रयत्न विफल ठरत होते,

प्रोजेक्ट इंजिनियर भारतिय होते त्यांच्या स्वप्नात महालक्ष्मी देवीने येउन दृष्टांत दिला आणि सांगितले की वरळी समुद्रात माझी मुर्ती आहे.

देवीने सांगितल्या ठिकाणीच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती च्या मुर्त्या आढळल्या. त्या इंजिनियर ने त्याच ठिकाणी मातेची विधीवत पुजा करून स्थापना केली त्यामुळे या देवस्थानाला जागृत देवस्थान मानल्या जाते.

मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती देवीच्या मुर्ती खुप सजवलेल्या असतात नाकात नथ, सोन्याच्या बांगडया, हार फुले आणि अनेक अलंकारांनी देवींना सुशोभीत केल्या जाते.

नवरात्रात आणि बाराही महिने या ठिकाणी दर्शनाकरता भाविकांची आणि पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी दिसुन येते.

समुद्र किना.याला लागुनच मंदिर असल्याने मंदिराच्या सौंदर्यात भरच पडते.

 • मुंबादेवीदेवी – Mumbadevi

मुंबई येथील मुंबादेवी मंदिर फार प्रसिध्द असुन भाविकांकरता महत्वाचे श्रध्दास्थान म्हणुन गणले जाते.

या मंदिरात मातेची भव्य मुर्ती स्थापीत असुन अतिशय विलोभनिय असे मातेचे रूप आहे.

मुंबई ही प्रारंभी कोळी लोकांची वस्ती होती त्या लोकांनीच या मंदिरात मातेची स्थापना केली.

मंुबा म्हणजे मुंबई आणि देवी म्हणजे आई, मुंबईची आई म्हणुन मुंबादेवी असे या देवीचे नाव ठेवले आहे.

त्यांच्या मानण्यानुसार मातेने नेहमी कोळी लोकांचे समुद्रापासुन रक्षण केले आहे.

Mumbadevi Mandir

या मंदिरात दर्शनाकरता भाविकांची नेहमीच गर्दी पहायला मिळते परंतु दर मंगळवारी भाविक मोठया प्रमाणात येथे दर्शनाकरता येतात.

सोन्या चांदिच्या आणि मोत्यांच्या दागिन्यांनी मातेची अतिशय सुरेख पुजा मांडली जाते.

नवसाला पावणारी देवी अशी या मुंबादेवीची ख्याती असुन येथे लाकडावर नाणी खिळयाने ठोकण्याची प्रथा देखील पहावयास मिळते.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ मुंबई जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया मुंबई जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Mumbai District Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here