राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती

Mahatma Gandhi Mahiti

आपण या लेखात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज सरकारच्या विरूद्ध आपले अहिंसावादी या शास्त्राचा वापर करून त्यांना वठणीवर आणणारे महान क्रांतिकारक महात्मा गांधी यांच्या बद्दल आणि त्यांनी केलेल्या बहुमूल्य कामगिरी बद्दल आपण जाणून घेणार आहोत. कुठल्याही प्रकारची शरीर प्रकृती नसताना केवळ अहिंसेच्या बळावर त्यांनी कश्याप्रकारे इंग्रज शासनाला आपल्या देशातून परतून लावले.

तसचं, त्यांनी केलेली देशांतील सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतेचे निवारण  करण्यासाठी केलेली महत्वपूर्ण कामगिरी. त्याचप्रकारे त्यांनी घडवून आणलेली हिंदू-मुस्लीम एकजूट अश्या प्रकारच्या अनेक बाबी आपण या लेखाच्या मध्यमातून जाणून घेणार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक महात्मा गांधी यांचा जन्म सन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला होता.

Contents hide
1 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती – Mahatma Gandhi Information in Marathi
1.6 राष्ट्रपती महात्मा गांधी यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष – Mahatma Gandhi Aandolan

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते परंतु, लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत असतं. रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती. तसचं, सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती – Mahatma Gandhi Information in Marathi

Mahatma Gandhi

महात्मा गांधी यांचा अल्पपरिचय – Mahatma Gandhi History in Marathi

नाव (Name) मोहनदास करमचंद गांधी
जन्म (Birthday) २ ऑक्टोबर १८६९
जन्मस्थान (Birthplace) पोरबंदर, गुजरात
आई (Mother Name) पुतळाबाई करमचंद गांधी
वडील (Father Name) करमचंद उत्तमचंद गांधी
भावंडे लक्ष्मीदास, करसनदास आणि बहिण तेथेपोरबंदर, गुजरात
मृत्यु (Death) ३० जानेवारी १९४८
मृत्यूस्थान नवी दिल्ली, भारत

महात्मा गांधी यांचे सुरुवाती जीवन आणि कौटुंबिक माहिती – Mahatma Gandhi Biography and Family Information

महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई होतं. महात्मा गांधी यांचे वडिल करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतामधील पोरबंदर या ठिकाणी दिवाण म्हणून काम करीत असतं. करमचंद गांधी यांची चार लग्न झाली होती, पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या, त्यांच्या आधीच्या तीन पत्नींचे प्रसूतीदरम्यान निधन झाले होते.

करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी पुतळाबाई या महात्मा गांधी यांच्या आई होत. पुतळाबाई या खूपच धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्या सतत उपवास करीत असतं. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव त्यांच्या पुढील जीवनात दिसून येतो. मोहनदास यांच्या मनावर त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, व प्राणिमात्रांवर द्या करणे या सारखे अनेक संस्कार त्याच्या आईकडून गिरवण्यात आले होते.

गांधीजी यांच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असतं, यामुळे लहानपणापासून त्यांना उपवास करण्याची ओळ लागली होती. जैन धर्मातील संकल्प आणि प्रथांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला.

महात्मा गांधी स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथा श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला.

मोहनदास गांधी यांचा विवाह व शिक्षण – Mohandas Gandhi Education And Marriage 

स्वातंत्र्य पूर्व काळात देशात बालविवाह प्रथा अस्तित्वात होती. त्या प्रथेनुसार महात्मा गांधी यांचा विवाह इ.स.१८३३ साली वयाच्या तेराव्या वर्षी कस्तूरबा माखनजी कपाडिया यांच्या सोबत झाला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने “बा’ म्हणत. लग्नानंतर महात्मा गांधी यांच्या पत्नी प्रथेप्रमाणे बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच राहिल्या.

यामुळे गांधी यांच्या शालेय शिक्षणात देखील एका वर्षाचा खंड पडला होता.

इ.स. १८८५ साली गांधीजी पंधरा वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच वर्षी त्यांना एक अपत्य झाले होते परंतु, ते जास्त काळ जगू शकले नाही. यानंतर महात्मा गांधी यांना चार मुले झाली होती,  इ.स. १८८८ साली हरीलाल, इ.स. १८९२ साली मणिलाल, इ.स. १८९७ साली रामदास आणि इ.स. १९०० साली देवदास.

महात्मा गांधी यांनी शिक्षणा करिता केलेला प्रवास – Mahatma Gandhi Returned from England

महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती. ई.स. १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले.  उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी इनर टेंपल या गावी राहून भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला.

लंडन विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.  इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना तेथील रीतीरिवाज समजून घेण्यात त्यांचा काही वेळ गेला. इंग्लंडमध्ये सर्व मासाहारी पदार्थ मिळत असल्याने, त्यांना शाकाहारी पदार्थ मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने त्यांनी त्या ठिकाणी मासाहार,मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली आणि स्वत: ते त्या संघटनेचे अध्यक्ष बनले.

गांधीजी लंडन मध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक ही ‘थीयोसोफिकल सोसायटी’ चे सदस्य देखील होते. गांधीजीनी त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॅरिस्टर बनून सन १८९१ साली ते भारतात आले व येथे आल्यानंतर ते वकिली करू लागले. ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशा समोर एखादा मुद्दा मांडणे देखील अजिबात जमत नव्हतं. आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे ते कोर्टात फार बोलत नसत.

महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेतील प्रवास (१८९३-१९१४) – Mahatma Gandhi Visit to South Africa

सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली. त्याठिकाणी गांधीनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ययाचे बारकाईने धडे गिरविले.

महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असतांना समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली.

भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांनी तेथे राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीनी प्रयत्न केला. त्यांची अशी धारणा होती की, असं केल्याने आपण भारत देशाला समजून  घेऊ.

दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना करावा लागला. त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी अनुभवली.

एके दिवशी महात्मा गांधी रेल्वेचा प्रवास करीत असतांना त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असतांना सुद्धा त्यांना ‘पीटर मारित्झबर्ग’ येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवून तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले.

गांधीजीनी त्यांना नकार देताच त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले गांधीजी खाली पडले. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.

Mahatma Gandhi in South Africa

बापूंच्या मनात आलं असत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवू शकले असते परंतु, सुडाच्या भावनेतून कोणाला शिक्षा करणे असा त्यांचा कधीच हेतू नव्हता. गांधी अहिंसावादी असल्याने केवळ अन्यायकारक व्यवस्था बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. शिवाय त्यांना त्याठिकाणी समाजात असणाऱ्या समस्याचा देखील अनुभव आला. उदाहरणार्थ, प्रवाशांना वाट काढून न दिल्यामुळे महात्मा गांधी यांना मार देण्यात आला होता.

हॉटेल मध्ये वास्तव्यास असतांना त्यांना बाहेर काढून देण्यात आलं होत. याशिवाय, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील ‘डर्बन’ या शहरात वकिली करीत असतांना त्यांना न्यायाधीशांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्यांनी न्यायाधीशाचा आदेश अमान्य केला. अश्या प्रकारचे अनेक अनुभव घेतल्यानंतर गांधीजीनी एक सामाजिक नागरिक म्हणून ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांच्या समस्या विषयी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली.

भारतीय लोकांवर होणारे अत्याचार आणि आपलं सामाजिक स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. सन १९०६ साली ब्रिटीश सरकारने दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू केला होता. त्यावेळी गांधीजीनी आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपलं तेथील मुक्काम वाढवलं, आणि भारतीय नागरिकांना राजकीय व सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.

तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिटीश सरकारकडे भारतीय लोकांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळेस त्यांनी आपल्या अहिंसेच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला होता. सन १८९४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समाजात विखरलेल्या भारतीय नागरिकांना एकत्रित करून ‘नाताळ भारतीय कॉन्ग्रेस ‘ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला.

राष्ट्रपती महात्मा गांधी यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष – Mahatma Gandhi Aandolan

सन ९ जानेवारी १९१५ साली कॉन्ग्रेस चे उदारमतवादी नेता “गोपाळकृष्ण गोखले” यांच्या सल्ल्याने महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले.  महात्मा गाधी हे ‘गोपाळकृष्ण गोखले” यांना आपले राजकीय गुरु मानत असतं. ज्यावेळी महात्मा गांधी भारतात परत आले होते त्यावेळी ते एक राष्ट्रवादी नेता व संयोजक आणि संघटक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती.

आपल्या राजकीय कार्याला सुरुवात करण्याच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या मनावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करणे या सारख्या विचाराचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला होता. गोपाळ कृष्ण गोखले त्यावेळेला “भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसचे” अध्यक्ष होते. भारतात आल्यानंतर गांधीजीनी देशाच्या विविध भागात जावून तेथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले.

देशातील सर्वसामान्य लोकांचे दु:ख, दारिद्र्य पाहून गांधीजी दु:खी झाले. अहमदाबाद जवळील साबरमती नदीच्या काठी असलेल्या  आश्रमात महात्मा गांधी वास्तव्य करू लागले. भारतातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अहिंसावादी सत्याग्रह करण्याचा अभिनव तंत्र त्यांनी अंगिकारले.

 • चपारण्य सत्याग्रह – Chapparanya Satyagraha

सन १९१७ साली बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांवर इंग्रज मळेदाराकडून नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे आणि त्यांना मोजक्याच भावात ते पिक इंग्रजांना विकाव लागत असे. परिणामी त्यांना योग्य तो मोबदला मिळत नव्हता शिवाय, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सहन कराव लागत होत.

इंग्रजांच्या या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी सन १९१७ साली बापू चंपारण्यला गेले. गांधीजीनी तेथील जनतेला एकत्रित केलं व त्यांना अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करून न्याय मिळवून दिला. त्यांचा भारतातील अहिंसेचा पहिला प्रयोग यशस्वी झाला, परिणामी लोक त्यांना मानू लागले.

 • खेडा सत्याग्रह – Kheda Satyagraha

सन १९१८ साली गुजरात मधील खेडा या गावी सतत पडलेल्या पावसामुळे दुष्काळग्रस्त झालं  होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती. अशी परिस्थिती असतांना सुद्धा इंग्रज सरकार  शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वासूल करीत असतं. परिणामी तेथिल शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट बनली. महात्मा गांधी यांनी त्याठिकाणी एका आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.

गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना गांधीजीनी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेव्हा  सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधी यांना त्या चळवळीचे अध्यक्ष बनवले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली. ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून सर्व कैद्यांची सुटका केली. अश्या प्रकारे महात्मा गांधी यांची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली.

 • अहमदाबाद येथील कामगार लढा – Workers Fight In Ahmedabad

सन १९१४ साली झालेल्या पहिल्या युद्धानंतर देशात खूप महागाई वाढली होती. अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढी करीता गिरणी मालकांकडे विनंती केली. परंतु, त्याची मागणी मान्य करण्यात आली नाही.

गांधीजीनी त्या ठिकाणी स्वत: जावून संप पुकारला व उपोषणाला बसले. कामगार देखील गांधीजींसोबत उपोषणाला बसले. गांधीजींच्या अहिंसावादी आंदोलना समोर गिरणी मालकांनी हार पत्करली व कामगारांना वेतनवाढ दिली.

 • महात्मा गांधी यांचा खिलाफत चळवळीला पाठींबा – Khilafat Movement

खिलाफत चळवळ म्हणजे भारतीय मुस्लिमांनी खालीफाला पाठींबा देण्यासाठी सुरु केलेली चळवळ होय, तिला “खिलाफत चळवळ” असे म्हणतात. सन १९१४ साली झालेल्या पहिल्या युद्धाच्या वेळी तुर्कस्थान हा इंग्रजांच्या विरुद्ध गटात समाविष्ट होता. तुर्कस्थानचे सुल्तान हे जगभरातील मुस्लीमांचे धर्मप्रमुख म्हणजे होते.

भारतातील मुस्लीमांचे युद्धात आपल्याला सहकार्य मिळाव याकरिता इंग्लंडच्या पंतप्रधानानी त्यांना युद्ध समाप्तीनंतर तुर्कस्थानला धक्का लावणार नाही असे वचन दिले. परंतु, युद्ध समाप्तीनंतर ते आपल्या वाचनाशी वचनबद्ध राहिले नाहीत. त्यामुळे मुस्लीमांमध्ये संतापाची लाट उसळली.

यावरून हिंदू- मुस्लीम यांच्या ऐक्यावर आधारीत  राष्ट्रीय चळवळ सुरु केली तर, इंग्रज सरकार नक्कीच वठणीवर येईल अशी गांधीजीना वाटू लागले. त्यामुळे गांधीजीनी ‘खिलाफत चळवळीला’ पाठींबा दिला. या चळवळीची विशेषता म्हणजे या चळवळीत  हिंदू-मुस्लीम यांचे ऐक्य दिसून आलं होत.

 • असहकार चळवळ – Non-cooperation Movement

महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध हे तीन शास्त्र वापरले. सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकार बद्दल क्रोधाचा भडका उडाला. देशात जागोजागी मोर्चे निघू लगले, ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक करावी लागली.

महात्मा गांधी यांनी जालियानवाला बाग हत्याकांडा प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधी यांचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे. जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तर त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. या हेतूने त्यांनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितल.

सन १९२० साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यू नंतर राष्ट्रीय सभेचे सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. सन १९२० साली नागपुर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेत चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकार चळवळीच्या ठरवला मान्यता सभेच्या अध्यक्ष पदी विराजमान असणारे चक्रवर्ती विजयराघवाचार्य यांनी दिली. चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे देण्यात आलं होत.

असहकार चळवळी नुसार, देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील असे राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होत. परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही.

 • असहकार आंदोलना दरम्यान घडलेली चौराचोरी घटना – Chauri Chaura Kand

सन १९२२ साली उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा भागात एका शांततापूर्ण  चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी नागरिक खूप चिडले, त्यांनी प्रतिउत्तर म्हणून तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले.

या घटनेची माहिती गांधीजीना समजली तेव्हा त्यांना खुप वाईट वाटलं, ते एकदम अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं लोकांनी असे करायला नाही पाहिजे होत. अहिंसेच्या मार्गावर चालतांना असे प्रसंग उद्भवतातच.

गांधीना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही.

तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. चौरीचौरा घटना प्रकरणी महात्मा गांधी यांना मार्च १९२२ साली कैद करण्यात आलं.

तसेच, गांधीजीनी सुरु केलेल्या “यंग इंडिया” नावाच्या साप्ताहिक पत्रिकेत त्यांनी स्वत: तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिली आहेत अश्या प्रकारचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.

त्यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. गांधीजी कैदेत असतांना त्यांची तब्येत खराब झाली, त्या कारणास्तव त्यांची सन १९२४ सली तुरुंगातून सुटका करण्यात आली.

 • तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गांधींचे कार्य – Mahatma Gandhi Story

सन १९२४ साली आजारामुळे महात्मा गांधी यांची सुटका झाल्यानंतर गांधीजी सन १९२८ सालापर्यंत राजकारणापासून दूर राहिले. या काळादरम्यान त्यांनी स्वराज्य पक्षातील सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मधील सदस्य यांच्यातील मतभेद दूर करण्यावर भर दिला. तसचं, समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि देशातील गरिबी कमी करण्यासाठी त्यांनी  आपले प्रयत्न सुरु ठेवले. सन १९२८ साली महात्मा गांधी राजकरणात पुन्हा सक्रीय झाले.

महात्मा गांधी राजकारणापासून दूर असतांना सन १९२७ साली ब्रिटीश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासठी ‘सर जॉन सायमन’ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात पाठवली होती. ब्रिटीश शासनाच्या या समितीत एकही भारतीय नागरिक नसल्याने भारतीय पक्षांनी त्या कमिशनवर बहिष्कार टाकला.

सन १९२८ साली कलकत्ता मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस च्या सभेत एक ठराव पास करण्यात आला. या ठरावानुसार, ब्रिटीश सरकारने भारताला सार्वभौम देशाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, सरकारने राष्ट्रीय सभेची ही मागणी मान्य न केल्यास, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पुन्हा असहकार चळवळ सुरु करू असा संदेश सरकारला देण्यात आला.

राष्ट्रीय सभेतील सदस्य सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या अनेक तरुण सदस्यांची तर तात्काळ स्वातंत्र्य मागण्याची इच्छा होती. गांधीजींनी इंग्रज सरकारला उत्तराकरिता दिलेल्या कालावधीत इंग्रज सरकारने काहीच उत्तर दिले नाही. परिणामी, ३१ डिसेंबर १९२९ साली लाहोर शहरात जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवून संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

 • दांडी यात्रा – Dandi Yatra

इंग्रज सरकारने मिठावर कर लावल्याने त्याचा बोजा गरीब जनतेवर पडत असे. समुद्रात मीठ तयार करण्याचा भारतीयांना पूर्ण अधिकार आहे त्यावर इंग्रज सरकारला पायाबंदी करण्याचा कोणत्याच प्रकारचा अधिकार नाही.

आपलं हे वाक्य पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी यांनी १२ मार्च १९३० साली साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला सुरवात केली.

आश्रमातील आपल्या ७८ स्त्री-पुरुष अनुयायांव्यतिरिक्त अनेक लोक त्यांना येवून मिळाले. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला सुरुवात करण्याआधीच ब्रिटीश व्हाईसरॉयला याबद्दल माहिती दिली होती. इंग्रज सरकारचा अन्यायकारक कायदा मोडून काढण्याकरीता ही पदयात्रा होती. इंग्रज सरकारची अशी धारणा होती की, यांच्या पदयात्रेने काहीच फरक पडणार नाही.

महात्मा गांधी यांनी आपली पदयात्रा सुरूच ठेवली वाटेत त्यांना देशातील अनेक लोक येवून भेटली व त्यांच्या पदयात्रेत सहभागी झाली. ५ एप्रिल १९३० रोजी ३८८ किमी चे अंतर पूर्ण करून त्यांची पदयात्रा दांडी येथे पोहचली.  ६ एप्रिल च्या पहाटे महात्मा गांधी यांनी आपली नेहमीची प्रार्थना विधी आटोपून घेतल्यानंतर ते समुद्र किनाऱ्याकडे चालत गेले सकाळी ठीक आठ वाजून तीस मिनिटांनी त्यांनी मिठाचा खडा उचलून इंग्रज सरकारने लावलेला मिठाचा कायदा मोडून काढला. या प्रकरणी त्यांना पकडून कैद करण्यात आले, त्यामुळे संपूर्ण देशात हिंसात्मक रित्या आंदोलनाला सुरवात झाली.

परदेशी कपड्यांची होळी, दारूच्या दुकानांसमोर निर्दर्शन करणे,जंगल सत्याग्रह अश्या प्रकारचे आंदोलन देशभर करण्यात आले होते. महात्मा गांधी तुरुंगात असतांना त्यांच्यासोबत हजारो भारतीय नागरिकांना इंग्रज सरकारने कैद केलं होत.

गांधीजींना कैद केल्याप्रकरणी देशांत क्रांतिकारकांच्या चळवळीना आळा घालण्यासाठी इंग्रज सरकारने ‘लॉर्ड एडवर्ड आयर्विन’ यांच्या नेतृत्वाखाली  महात्मा गांधी यांच्या सोबत करार करण्याचे ठरवले.

मार्च १९३१ साली गांधी-आयर्विन यांच्यात झालेल्या करारानुसार सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करणे आणि त्याबद्दल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करणे असे ठरवण्यात आलं.

 • महात्मा गांधी यांनी केलेलं हरिजन आंदोलन – Mahatma Gandhi’s Harijan Movement

महत्मा गांधी यांना भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसचे प्रतिनिधी म्हणून लंडन मध्ये होणाऱ्या पहिल्या गोलमेज परिषदे करिता आमंत्रित करण्यात आलं होत.

पहिली गोलमेज परिषदे मध्ये केवळ राजे-राजवाडे आणि अल्पसंख्याक यांच्यावर जास्त भर दिल्याने गांधीजी नाराज झाले.

सन १९३२ साली झालेल्या गोलमेज परिषदे बाबासाहेबांनी मागणी केल्याप्रमाणे ब्रिटीश सरकारने दलितांना वेगळा मतदार संघ देणे मान्य केलं. महात्मा गांधी यांना आंबेडकर यांच्या वेगळ्या मतदार संघाच्या निर्णयाला विरोध दर्शविला. महात्मा गांधीनी याप्रसंगी पुण्याच्या येरवडा तुरुंगात सहा दिवसाचे उपोषण केलं.

पी.बाळू यांच्या मध्यस्तीने महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात “पुना करार” झाला. तेथून गांधीनी दलितांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ८ मे १९३३ साली आत्म शुद्धी करिता २१ दिवसांचे उपोषण केले.

 • महात्मा गांधी यांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय – Important Decisions Of Mahatma Gandhi In World War II

सन १९१८ साली संपलेल्या पहिल्या महायुद्धाच्या शेवटीच दुसऱ्या महायुद्धाचा पाया रचला गेला होता. कारण पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्राकडून झालेल्या पराभवामुळे अक्ष राष्ट्राचे बरेच नुकसान झाले होते.

पहिल्या महायुद्धानंतर सन १९१९ साली पॅरिस येथे शांतता परिषद पार पडली.

मित्र पक्ष आणि अक्ष पक्ष यांच्यात सन २८ जून १९१९ साली व्हर्सायचा तह झाला. या तहानुसार अक्ष पक्षांना मिळविलेल्या वसाहती गमवाव्या लागल्या.

यामुळे अक्ष पक्षाला आपल्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे वाटले.

परिणामी, सन १९३९ साली जर्मनीने पोलंडवर हल्ला केला व त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे मित्रपक्ष या नात्याने ब्रिटिशांनी सुधा त्या युद्धात भाग घेतला.

या युद्धात ब्रिटीश सरकारने देशातील लोकप्रतिनिधीना न जुमानता भारतीय जनतेला युद्धात खेचले. परिणामे देशातील राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या नेत्यांनी मंत्रिमंडळातून  समुदायीकपणे राजीनामे दिले.

महात्मा गांधीजीनी जाहीर केलं की, भारत देश या युद्धाचा भाग बनणार नाही.

गांधीजींची या युद्धा बद्द्ल अशी धारणा होती की,  हे युद्ध जरी लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढवले जात असेल परंतु, इंग्रज सरकार भारताला स्वातंत्र्य देणार नाही.

युद्धाला सुरुवात झाल्याच्या काही काळानंतर महात्मा गांधी यांनी आपले स्वातंत्र्याची मागणी मागण्याचे आंदोलन तीव्र केले.

या युद्धादरम्यान महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘भारत सोडा’ असा आदेश दिला.

त्यावेळी मंत्रिमंडळात इंग्रज सरकारचे समर्थन करणारे काही पक्ष होते त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केली.

परंतु, महात्मा गांधी त्यांची पर्वा न करता त्यांनी आपले आंदोलन अजून तीव्र केले.

 • भारत छोडो चळवळ – Quit India Movement

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान इंग्रज सरकारने भारतीय प्रतिनिधीना न जुमानता भारतीय नागरिकांना जबरदस्तीने युद्धात खेचले.

दुसरे महायुद्ध हे लोकशाही करिता झालेलं सर्वात मोठ युद्ध होत. परंतु हे युद्ध जरी लोकशाही विरोधी असले तरीसुद्धा, इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही.

हे गांधीजींना माहित होत, कारण इंग्रज सरकारने अश्या प्रकारचे कोणतेच आश्वासन दिले नव्हते.

इंग्रज सरकार युद्धात व्यस्त असल्याने महात्मा गांधी यांनी संधी समजून सन १९४२ साली ‘भारत छोडो’ हे आंदोलन सुरु केलं.

या आंदोलनातील सहभागी असणाऱ्या लाखो लोकांना इंग्रज सरकारने तुरुंगात टाकल. हजारो आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला.

गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की, जो पर्यंत स्वातंत्र्य मिळणार नाही, तो पर्यंत भारत देश महायुद्धात सहभागी होणार नाही.

महात्मा गांधी यांनी इंग्रजांना स्पष्ट शब्दात सांगितल की, या चळवळीला हिंसक वळण जरी लागले तरी ही चळवळ कोणत्याही प्रकारे थांबणार नाही.

महात्मा गांधी यानी या चळवळी दरम्यान आपल्या भारतीय जनतेला “करा किंवा मारा” असा मूलमंत्र दिला. ‘भारत छोडो’ चळवळ देश भर पसरली असतांना सन ९ ऑगस्ट १९४२ साली महात्मा गांधी आणि त्यांच्या राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या सदस्यांना मुंबई मध्ये अटक करण्यात आलं.

त्यावेळी महात्मा गांधी यांना दोन वर्ष पुण्यातील ‘आगाखान पॅलेस’ या ठिकाणी कैद ठेवण्यात आलं. सन २२ फेब्रुवारी १९४४ साली महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच निधन झालं.

महात्मा गांधी हे पुण्यात कैदेत असतांना त्यांना मलेरियाची लागण झाली, त्यामुळे त्यांची तब्येत खूप खराब झाली अश्या परिस्थितीत देखील इंग्रज सरकारने त्यांची सुटका केली नाही.

शेवटी सन ६ मी १९४४ साली उपचारासाठी त्यांनी सुटका करण्यात आली.

महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या ‘भारत छोडो’ चळवळीला मोठ्या प्रमाणात यश आले नसले तरी, त्यांनी त्या चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण भारताला एकत्रित करण्याच महत्त्वपूर्ण काम केलं होत.

या चळवळीचा वानवा देशभर पसरल्याने इंग्रजांनी सुद्धा महायुद्ध संपेपर्यंत भारत देशाची सत्ता भारतीयांच्या ताब्यात देण्याचे स्पष्ट संकेत दिले.

यानंतर महात्मा गांधी यांनी आपले ‘भारत छोडो’ आंदोलन थांबविले.

देशाची फाळणी व स्वातंत्र्य –  Country’s Partition And Independence

इंग्रज सरकारने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर भारतला स्वातंत्र्य देण्याचे ठरवण्यात आले होते.

परंतु, सन १९४० साली लाहोर येथे झालेल्या मुस्लीम लीगच्या सभेत मुस्लीम लीगने केलेल्या मागणीनुसार भारताचे दोन भाग करून मुस्लीम बहुल भाग मुस्लीम लीग ला देण्यात येऊन त्यांच एक नवीन राष्ट्र निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

मोहमद जिन्ना हे मुस्लीम लीगच्या अध्यक्ष स्थानी होते, त्यांची लीग नवीन राष्ट्र निर्माण करण्याच्या आपल्या मागणीला जोर देत होती.

महात्मा गांधी यांना देशाचे विभाजन नको होते.

सन १९४६ साली महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसला सूचित केलं की, त्यांनी ब्रिटीश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी मंजूर करू नयेत. परंतु, महात्मा गांधी यांच्या सल्ल्याकडे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळाने दुर्लक्ष केले.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांना माहिती होत की, आपण ब्रिटीशांच्या शिफारशी मान्य केल्या नाहीत तर राज्य कारभाराची सूत्रे मुस्लीम लीगकडे जातील. यानंतर संपूर्ण भारत भर दंगली उसळल्या, सन १९४६ ते सन १९४८ साला पर्यंत जवळपास पाच हजार लोकांचा या दंगलीमध्ये मृत्यू झाला होता.

याचा प्रभाव जास्तकरून पूर्वेकडील भागात जाणवला. सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान यांना स्वातंत्र्य देताना इंग्रज सरकारने केलेल्या करारानुसार भारत सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये  द्यायचे होते. परंतु सरदार पटेल यांना असे वाटत होते की, पाकिस्तान या पैशाचा वापर युद्धसामुग्री पुरवण्यासाठी करेल.

म्हणून त्यांनी ते पैशे त्यांना दिले नाहीत, यातून पुन्हा देशांत हिसाचार उसळला.

देशांत हिंदू-मुस्लीम यांच्यात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे गांधीजी खूपच अस्वस्थ झाले.

देशातील हिंसाचार थांबविण्यासाठी काटोक्याचे प्रयत्न सुरु असतांना सुद्धा हिंदू – मुस्लीम नेते एकमेकांना समजून घेण्यास असमर्थता दर्शवित होते.

दंगल थांबविण्यासाठी आणि पाकिस्तानला सरकारने ५५ कोटी रुपये द्यावे याकरिता महात्मा गांधी आमरण उपोषणाला बसले.

महात्मा गांधी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खूप समजविण्याचा प्रयत्न केला परंतु महात्मा गांधी यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही.

ते शेवट पर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. गांधीजींनी केलेल्या उपोषणापुढे सरकारचे काहीच चाले नाही, शेवटी सरकारने आपला निर्णय बदलला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले.

यानंतर महात्मा गांधी यांनी आपले आमरण उपोषण बंद केलं.

महात्मा गांधी यांचे निधन – Mahatma Gandhi Death

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी दिल्ली येथील बिर्ला बागेत आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरत असतांना त्यांना ‘नथुराम गोडसे’ यानी त्यांच्यावर गोळीबार केला. महात्मा गांधी यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले. लोकांची अशी धारणा आहे की, महात्मा गांधी यांनी मृत्युपूर्वी आपल्या मुखातून ‘हे राम’ असे उद्गार काढले होते.

सन १९४९ साली महात्मा गांधी यांचा मारेकरी आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले व त्यांच्यावर खटला चालविण्यात आला, नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी, जातीभेदेची दरी कमी करण्यासाठी या महामानवाने खरच खूप  मोलाची कामगिरी केली होती.

म्हणूनच आज सुद्धा भारतीय जनतेच्या प्रती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल भरपूर आदर आहे.

त्यांनी केलेल्या कामगिरी करता ते भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात ओळखले जातात. महात्मा गांधी यांच्या जन्मदिन अहिंसादिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. अश्या या महान क्रांतीकारकाला माझी मराठीच्या संपूर्ण टीमकडून शत शत प्रणाम.

महात्मा गांधी यांनी लिहिलेली पुस्तके – Mahatma Gandhi’s Books

 • इंडिअन होम रूल (हिंद स्वराज्य)
 • गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
 • गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
 • गांधी विचार दर्शन: अहिंसाविचार
 • गांधी विचार दर्शन: राजकारण
 • गांधी विचार दर्शन: सत्याग्रह प्रयोग
 • गांधी विचार दर्शन: सत्याग्रह विचार
 • गांधी विचार दर्शन: सत्याग्रहाची जन्मकथा
 • गांधी विचार दर्शन: हरिजन
 • नैतिक धर्म
 • माझ्या स्वप्नांचा भारत

FAQ About Mahatma Gandhi

प्रश्न. महात्मा गांधीचा जन्म कुठे झाला? (Where was Gandhi born?)

उत्तर: पोरबंदर, गुजरात

प्रश्न. महात्मा गांधीचा केव्हा झाला? (when was mahatma gandhi born?)

उत्तर: २ ऑक्टोबर १८६९

प्रश्न. महात्मा गांधींनी कोणकोणते कार्य केले? (what did mahatma gandhi do?)

उत्तर: सामाजिक न्यायासाठी आणि ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी वकील, राजकारणी आणि स्वतंत्रता सेनानी म्हणून काम केले.

प्रश्न. महात्मा गांधीचे संपूर्ण नाव काय आहे? (what is mahatma gandhi full name?)

उत्तर: मोहनदास करमचंद गांधी

प्रश्न. महात्मा गांधी च्या पत्नीचे नाव काय होते? (what is mahatma gandhi wife name?)

उत्तर: कस्तुरबा गांधी

प्रश्न. महात्मा गांधीच्या आईचे नाव काय होते? (what is mahatma gandhi mother name?)

उत्तर: पुतळीबाई गांधी

प्रश्न. गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली? (Who gave the title Mahatma to Gandhi?)

उत्तर: रवींद्रनाथ टागोर

प्रश्न. महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? (who gave the title father of nation to mahatma gandhi?)

उत्तर: नेताजी सुभाषचंद्र बोस

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. माझ शिक्षण बि.सी.ए. कम्प्युटर क्षेत्रांत झालं असून, मला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड असल्याने मी माझा छंद जोपासण्यासाठी या क्षेत्राकडे वळलो आहे. "माझी मराठी" या वेबसाईट च्या माध्यमातून लिखाण करून मी माझा छंद जोपासत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here