श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu

पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू
जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य)
राजकीय कारकीर्द 1997 ते 2015
राज्यपालपदाचा कार्यकाल 2015 ते 2021 (झारखंड राज्य)

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती – Draupadi Murmu Information in Marathi

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडीशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा येथे झाला.

त्या आदिवासीमधील संथाल जमातीचे प्रतिनिधित्व करतात.

त्यांच्या वडिलांचे नाव आहे बिरंची नारायण टूडू.

त्यांच्या कारकिर्दीची सुरवात ओडीशातील सिंचन आणि उर्जा विभागात नौकरीने झाली. तेथे त्यांनी कनिष्ठ सहायक म्हणून काम केले.

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच शिक्षण – Draupadi Murmu Educational Qualification

त्या आधी भुवनेश्वर येथील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

1994 ते 1997 त्यांनी अरबिंदो इंटीग्रल एजुकेशन सेंटर येथे सहायक शिक्षक म्हणून त्यांनी नौकरी केली.

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा परिवार – Draupadi Murmu Family

त्यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्यासोबत झाला.

पती-पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार होता. अल्पावधीतच त्यांचे पती आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या आपल्या मुलीसोबत राहू लागल्या.

1997 साली ओडीशातील रायरंगपूर नगरपंचायतींच्या निवडणुकीत त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली.

2000 साली त्याच मतदार संघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर त्या आमदार झाल्या.

या मतदारसंघातून त्या दोनदा आमदार म्हणून निवडून गेल्या.

भाजप आणि बिजू जनता दल या युती सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषविले.

परिवहन, वाणिज्य, मत्स्यपालन व पशुपालन विभागाच्या मंत्री म्हणून त्यांचा अनुभव राहिला.

2007 साली त्यांना सर्वश्रेष्ठ विधानसभा सदस्याचा ‘नीलकंठ’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

या दरम्यान त्या ओडिशामधील भाजप च्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली होती

2009 साली बिजू जनता दलाने विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजप सोबतची युती तोडली. त्या निवडणुकीतही श्रीमती मुर्मू या भाजप कडून निवडून आल्या.

2015 मध्ये ज्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल संपला होता त्यावेळी श्रीमती मुर्मू यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी चर्चेत होते. पण त्यावेळी रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.

2015 मध्ये, मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

त्यानंतर 2015-2021 या काळात त्यांनी झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पहिले.

या काळात त्यांनी झारखंडमधील अनेक विद्यापीठांचे प्रश्न मार्गी लावले. यांनी राज्यपाल असतांना उच्च शिक्षणाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली.

कुलपती पोर्टल सुरू करणे ही त्यांची मोठी कामगिरी होती, ज्यामध्ये सर्व विद्यापीठांना एकाच व्यासपीठावर आणून नोंदणी आणि परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठांमध्ये गुणवान आणि अनुभवी कुलगुरू आणि अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Draupadi Murmu

प्रश्न. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म कोठे झाला?

उत्तर: ओडीशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा येथे झाला.

प्रश्न. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकीर्द केंव्हा सुरु झाली?

उत्तर: 1997 साली ओडीशातील रायरंगपूर नगरपंचायतींच्या निवडणुकीत त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या तेव्हापासून.

प्रश्न. श्रीमती मुर्मू या 2000 साली पहिल्यांदा कोणत्या पक्षातर्फे विधानसभेवर निवडून आल्या?

उत्तर: भारतीय जनता पक्ष.

प्रश्न. श्रीमती मुर्मू या कोणत्या राज्याच्या राज्यपाल राहिल्या होत्या?

उत्तर: झारखंड राज्य.

प्रश्न. त्यांच्या राज्यपालपदाचा कार्यकाल कोणता होता?

उत्तर: 2015 ते 2021

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top