भारताचे माजी राष्ट्रपती… प्रणव मुखर्जी

Pranab Mukherjee Information in Marathi

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन १९५० साली देशांत सर्वप्रथम राष्ट्रपती पदाकरिता निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तेंव्हापासून आज पर्यंत दर पाच वर्षानंतर या निवडणुका घेण्यात येतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशांत आज पर्यंत १४ राष्ट्रपती झाले असून त्यांपैकी प्रणव मुखर्जी हे सुद्धा एक आहेत.

भारताचे माजी राष्ट्रपती… प्रणव मुखर्जी – Pranab Mukherjee Information in Marathi

Pranab Mukherjee
Pranab Mukherjee

सन २०१२ साली राष्ट्रपती पदाकरिता झालेल्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपती पदाकरिता नियुक्ती करण्यात आली होती. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदावर विराजमान होण्यापूर्वी ते पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये केंद्रीय वित्त मंत्री होते.

मुळात प्रणव मुखर्जी हे कॉंग्रेस पक्षातील एक वरिष्ठ नेता असून त्यांनी सन १९६९ साली राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. तेंव्हापासून ते कॉंग्रेस पक्षासोबत जोडल्या गेल्या आहेत. कॉंग्रेस पक्षांत राहून त्यांनी अनेक महत्वपूर्ण पदाचा कार्यभार सांभाळला आहे. राष्ट्रपती पदा च्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी त्यांनी कॉंग्रेस पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

प्रणव मुखर्जी यांचे सुरुवाती जीवन – Pranab Mukherjee Biography in Marathi

प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल राज्यांतील वीरभूम जील्याच्या किरनाहर शहरालगत असलेल्या मिराती या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. प्रणव मुखर्जी यांचे वडिल कामदा किंकर मुखर्जी हे सन १९२० साली कॉंग्रेस पक्षाचे सक्रीय सदस्य होते. त्यांनी सन १९५२ ते सन १९६४ सालापर्यंत पश्चिम बंगाल विधान परिषदेचे सदस्य व वीरभूमी जिल्ह्याचे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सांभाळले होते. त्याचप्रमाणे प्रणव मुखर्जी यांचे वडिल थोर स्वातंत्र्य सेनानी होते. ज्यांना ब्रिटीश काळात अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता.

प्रणव मुखर्जी यांची शैक्षणिक कारकीर्द – Pranab Mukherjee Education

प्रणव मुखर्जी यांनी वीरभूमी जिल्ह्यातील सुरी विद्यासागर महाविद्यालयामधून आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी कलकत्ता विश्वविद्यालयामधून इतिहास आणि राजनीतिक विज्ञान क्षेत्रांत पदवी ग्रहण केली. तसचं, त्यांनी एक वकील आणि प्राध्यापक म्हणून सुद्धा काम पाहिलं होत. प्राध्यापक बरोबर बांग्ला प्रकाशन संस्थान देशेर डाक विभागात पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होत. प्रणव मुखर्जी हे बंगाल साहित्य परिषदेचे ट्रस्टी आणि अखिल भारतीय बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत.

प्रणव मुखर्जी यांची राजनीतिक कारकीर्द – Pranab Mukherjee Political Life

प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती पद भूषवण्या आधी कॉंग्रेस पक्षांतील अनेक महत्वपूर्ण खाती सांभाळली आहेत. त्यांची संसदीय कारकीर्द सुमारे पाच दशक जुनी आहे. सन १९६९ साली प्रणव मुखर्जी यांनी आपली राजनैतिक कारकीर्द सुरु केली होती. त्यावेळेस ते सर्वप्रथम कॉंग्रेस पक्षा तर्फे राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.

यानंतर सन १९७५,१९८१,१९९३ आणि सन १९९९ साली ते कॉंग्रेस पक्षातर्फे राज्यसभेवर निवडून आले होते. सन १९७३ साली केंद्रीय औद्योगिक विकास विभागाचे केंद्रीय उपमंत्री म्हणून प्रणव मुखर्जी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

सन १९८२ ते १९८४ च्या कार्यकाळादरम्यान त्यांची अनेक महत्वपूर्ण केंद्रीय मंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सन १९८४ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्वपूर्ण खाते वित्त मंत्री पद सांभाळले होते. यावेळेस युरोमनी पत्रिकेने केलेल्या सर्वेक्षणानानुसार विश्वातील सर्वोत्कृष्ट वित्त मंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.

प्रणव मुखर्जी वित्त मंत्री पद सांभाळत असतांना भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. मनमोहनसिंग हे होते. प्रणव मुखर्जी यांच्या वित्त मंत्री पदा बाबत विशेष सांगायचं म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत भारतीय अंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आय एम एफ) चे ऋण १.१ अब्ज अमेरिकन डॉलरचा शेवटचा हप्ता भारताला द्यावा नव्हता लागला.

असे असले तरी, कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्षांतील राजीव गांधी सामार्थाकांसोबत मतभेद झाल्याने प्रणव मुखर्जी यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. तसचं, काही काळाकरिता त्यांना कॉंग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात आलं होत. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांनी कॉंग्रेस पक्षातून बाहेर निघाल्यानंतर स्वत:चा राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली.

परंतु, सन १९८९ साली राजीव गांधी यांच्यासोबत समझोता झाल्याने प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रीय समजवादी कॉंग्रेस पक्षाचे विलीनीकरण कॉंग्रेस पक्षांत केले. प्रणव मुखर्जी यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा नियुक्ती करण्यात आली ती, पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असतांना प्रणव मुखर्जी यांची नियुक्ती योजना आयोगाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली. त्यांनी सन १९९५ ते १९९६ साली पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात विदेश मंत्री भूषविले. तसचं, सन १९९७ साली सर्वोत्कृष्ट संसद पटू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

याव्यतिरिक्त, प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेचे सभागृह नेतेपद, बंगाल प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, व मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत त्यांनी वित्त मंत्री पद सांभाळले होते. प्रणव मुखर्जी यांचे राजनीतिक कारकीर्द खूपच प्रशासनीय आहे.

मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना त्यांनी लोकसभा निवडणुकी पूर्वी आपली बायपास सर्जरी केली होती. त्यावेळेस प्रणव मुखर्जी यांच्याकडे केंद्रीय विदेश मंत्रीपदाचा पदभार होता. असे असतांना सुद्धा त्यांनी राजकीय व्यवहार विषयक केंद्रीय समितीचे अध्यक्षपद व केंद्रीय वित्त मंत्री पदाचा अतिरिक्त पदभार व्यवस्थितपणे सांभाळला होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यभार:

सन १० ऑक्टोबर २००८ साली प्रणव मुखर्जी आणि अमेरिकन विदेश सचिव कोंडोलिजा राइस यांच्यात कलम 123 करारावर हस्ताक्षर करण्यात आले. याशिवाय, प्रणव मुखर्जी हे जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आफ्रिकन विकास बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य होते.

सन १९८४ साली त्यांनी आईएमएफ आणि विश्व बँक यांच्यासोबत जुडल्या असलेल्या ग्रुप-२४ बैठकीचे अध्यक्षपद भूषविले होते. तसचं, सन १९९५ साली त्यांनी सार्क मंत्रीपरिषेद संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

प्रणव मुखर्जी यांची कॉंग्रेस पक्षांतील महत्वपूर्ण भूमिका:

प्रणव मुखर्जी यांना पक्षा प्रमाणे इतर सामाजिक क्षेत्रांत सुद्धा सन्मान मिळाला आहे. सोनिया गांधी यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध राजकारणात आणण्यास त्यांनी खूप मोलाची भूमिका बजावली होती. आपल्या अंगी असलेली प्रबळ निष्ठा आणि योग्यतेच्या आधारे प्रणव मुखर्जी यांना सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्या जवळ आणले आहे.

यामुळेच सन २००४ साली कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर प्रणव मुखर्जी यांना रक्षा मंत्री पद मिळाले होते. यापूर्वी सुद्धा सन १९९१ ते सन १९९६ सालापर्यंत योजना आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान होते.

विदेश मंत्री म्हणून कामकाज:

सन २००६ साली विदेश मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्याजवळ असलेले रक्षा मंत्रालय पद ए. के. एंटनी यांना बहाल करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांनी विदेश मंत्री म्हणून अमेरिका सारख्या बलाढ्य देशासोबत नागरी अणु करारावर यशस्वीरित्या हस्ताक्षर केले.

तसचं, अणुप्रसार करारावर हस्ताक्षर न करता नागरी अणु व्यापारात भाग घेण्यासाठी नागरी अणु व्यापारी गटासोबत हस्ताकक्षर करण्यात आले आहेत. विदेश मंत्री पदाचा योग्य प्रकारे कार्यभार सांभाळत असतांना सन २००७ साली त्यांना भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

वित्त मंत्री:

मनमोहनसिंग यांची दुसऱ्यांदा सत्ता आली असता प्रणव मुखर्जी यांना वित्त मंत्री पद देण्यात आलं होत. या पदाचा कारभार त्यांनी सन १९८० साली देखील सांभाळला होता.

प्रणव मुखर्जी यांचे स्वाभाविक जीवन – Pranab Mukherjee Life Story

प्रणव मुखर्जी यांना सुरुवातीपासून लिहिण्या वाचण्यासोबातच, बागवानी आणि संगीत ऐकण्याचा खूप छंद आहे. त्यांनी आपल्या जीवनांत अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे लिखाण केलं आहे. त्यांपैकी काही पुस्तके खालील प्रमाणे आहेत.

  • मिडटर्म पोल
  • इमर्जिंग डाइमेंशन्स ऑफ इंडियन इकोनॉमी
  • ऑफ द ट्रैक
  • सागा ऑफ स्ट्रगल एंड सैक्रिफाइस
  • चैलेंज बिफोर दी नेशन

प्रणव मुखर्जी यांना मिळालेले पुरस्कार – Pranab Mukherjee Award

  • सन १९९७ साली सर्वश्रेष्ठ संसदपटू पुरस्कार देण्यात आला.
  • सन २००७ साली भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
  • सन २०१० साली रिसर्च केल्याप्रकरणी ‘फाइनेंस मिनिस्टर ऑफ़ दी इयर फॉर एशिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
  • सन २०११ साली वोल्वरहैम्टन विश्वविद्यालय द्वारा प्रणव मुखर्जी यांना डॉक्टरेट उपाधी देऊन सन्मानित करण्यात आलं.
  • सन २०१९ साली त्यांच्या राजनैतिक कारकीर्दीचा सन्मान म्हणून त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रणब मुखर्जी यांचे निधन – Pranab Mukherjee Death

१० ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना दिल्लीच्या आर्मी रिसर्च अंड रेफरल हॉस्पिटल मध्ये मेंदूमध्ये झालेल्या गाठीला काढण्यासाठी त्यांना भर्ती केल्या गेले, ज्या दिवशी त्यांना भर्ती केल्या गेले त्याच दिवशी त्यांचे ऑपरेशन केल्या गेले, ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले. पण तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली.

त्यातच वयाच्या ८४ साली दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी दिल्लीच्या आर्मी रिसर्च अंड रेफरल हॉस्पिटल मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती आणि सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न प्राप्त झालेले माननीय श्री प्रणब मुखर्जी यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची प्रकृती स्थिर नव्हती.

३१ ऑगस्ट च्या सकाळी डॉक्टरांना त्यांच्या फुफुसामध्ये इन्फेक्शन असल्याचे समजले, आणि या इन्फेक्शन मुळे त्यांचा मृत्यू झाला. असे डॉक्टरांचे म्हणणे होते.

प्रणव मुखर्जी यांच्या रूपातील एक अनमोल हिरा अनंतात विलीन झाला. अश्या महान व्यक्तिमत्वाला माझी मराठीच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

ओम शांती !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here