• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti

शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत फार घट्ट जोडलेली पहायला मिळते.

बाळासाहेबांनी आपल्या व्यक्तीमत्वातून प्रत्येक शिवसैनिकात तसा विश्वास निर्माण केला. त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे पक्षाची जवाबदारी सांभाळताना दिसतात.

बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनची जवाबदारी आदित्य ठाकरे या त्यांच्या नातवाच्या मजबूत खांद्यावर येणार याचं भाकीत उद्धव ठाकरेंनी 2008 सालीच वर्तवलं होतं.
ज्यावेळी महाराष्ट्रात 2009 साली निवडणुका पार पडल्या त्यावेळी पक्षाच्या प्रचाराची जवाबदारी आदित्य ठाकरे र पाडतांना आपल्याला दिसले होते.

आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना उद्देशून एक भावनिक साद घातली होती ‘उद्धव आणि आदित्य ला मी तुमच्या हवाली करत आहे, त्यांना सांभाळून घ्या’…

बाळासाहेबांचा शब्द तमाम नागरिकांनी आज्ञा प्रमाण मानत आजवर फार निष्ठेने जपला आणि पुढेही पाळतीलच.

राज ठाकरे ज्या सुमारास शिवसेनेत होते त्यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेची जवाबदारी त्यांच्यावर होती, पण ज्यावेळी शिवसेना सोडून त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला त्यावेळी शिवसेनेने देखील विद्यार्थी सेना बदलून युवा सेना निर्माण करत त्याची सगळी सूत्र नव्या विचारांच्या, नव्या रक्ताच्या आदित्य ठाकरेंच्या हातात दिली.

आदित्य ठाकरेंना पक्षात येऊन जवळ-जवळ १० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, फार कमी वयात पक्षात आलेल्या आदित्य ठाकरें विषयी अनेक मतं व्यक्त करण्यात आली होती पण आपल्या कामाच्या पद्धतीने आणि सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याच्या वृत्तीने त्यांनी शिवसैनिकाच्या मनात जागा निर्माण केली.

शिवाय मधल्या काळात उद्धव ठाकरेंवर एक मोठी शस्त्रक्रिया पर पडली, त्या नंतर आदित्य यांच्यावर पक्षाची अधिकच जवाबदारी सोपविण्यात आली.

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते….. – Aditya Thackeray Biography in Marathi

चला तर जाणून घेऊया आदित्य ठाकरे यांचा अल्पपरिचय – Aditya Thackeray Information

नाव (Name):आदित्य उध्दव ठाकरे
जन्म (Birthday):13 जुन 1990
आजोबा (Grandfather): बाळासाहेब ठाकरे
वडिल (Father):उध्दव ठाकरे
आई (Mother):रश्मी ठाकरे
भाऊ (Brother):तेजस ठाकरे
पणजोबा प्रबोधनकार ठाकरे

आदित्य ठाकरे आज महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण, वातावरणीय बदल, आणि राजशिष्टाचार खात्याचे मंत्री म्हणून काम पहातायेत.
शिवसेनेचे ते कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत.

पदवी पर्यंत शिक्षण त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज मधून पूर्ण केलं आणि केसी लॉ कॉलेज मधून एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं.

आदित्य हे कवी मनाचे आहेत, त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि काका राज ठाकरे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील उद्धव ठाकरे उत्तम फोटोग्राफर आहेत.

कलेचा हा वारसा आदित्य यांना सुद्धा मिळाला असून त्यांना साहित्यात आवड आहे. त्यांचा कविता संग्रह मराठी आणि हिंदीतून प्रकाशित झाला असून ‘उम्मीद’ नावाचा अल्बम प्रकाशित झाला आहे.

या ‘उम्मीद’ अल्बम मधील गीतांना शंकर महादेवन, सुरेश वाडकर, सुनिधी चौहान, कैलाश खेर यांनी स्वरसाज चढवला आहे.

आदित्य यांचा ‘my thought in black and white’ हा इंग्रजी भाषेतील कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.

आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा 2019 साली विधानसभेची निवडणूक लढवली. निवडणूक लढवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले.

या निवडणुकीत आदित्य यांच्या विरुद्ध लढणाऱ्या एनसीपी च्या सुरेश मानेंना 67,427 मतांनी पराजय पत्करावा लागला होता.

निवडणूक जिंकल्यानंतर आदित्य यांना आपल्या वडलांच्या कॅबीनेट मध्ये स्थान मिळालं आणि पहिल्यांदा त्यांनी कॅबीनेट मंत्र्याची जवाबदारी सांभाळली.

आदित्य ठाकरेंनी केलेली आंदोलनं आणि उचलुन धरलेले मुद्दे

  •  2010 साली ’सच अ लाॅंग जर्नी’ पुस्तकाच्या प्रती जाळुन केलेले पहिले आंदोलन (या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा त्यांनी आरोप केला होता.)
  •  मुंबईतल्या प्रसिध्द राणी च्या बागेत पेंग्विन यावेत म्हणुन त्यांनी प्रयत्न केले.
  •  मुंबई विद्यापिठाचे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले  मुंबईतील ’नाईट लाईफ’ आणि ’रूफ टाॅप हाॅटेल’ हे मुद्दे उचलले.
  • शिवसेनेचा पुर्वी ’व्हॅलेण्टाईन डे’ ला असणारा विरोध आदित्य ठाकरेंमुळे मवाळ झाला.
  • 2011 साली ठाण्याजवळ असलेल्या जव्हार, मोखाडा येथील कुपोषणाचा आणि पाण्याचा मुद्दा त्यांनी उचलुन धरला.

शिवसेना पक्ष आणखीन मजबूत करण्यासाठी आज आदित्य जनसंपर्क वाढवण्यावर भर देतांना दिसतात. कुठलाही मुद्दा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या वर्तनात सुसंस्कृतपणा जाणवतो, शिक्षणाची साथ असल्याने विषयातले बारकावे ते जाणून असतात. राजकारणातील त्यांचे भवितव्य आणखीन उज्वल होवो याच माझी मराठीच्या सदिच्छा..!!

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
June 24, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती - Smt. Draupadi Murmu Information in Marathi पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून...

by Editorial team
June 23, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved