महाराष्ट्रातील प्रखर नेतृत्व राजसाहेब ठाकरे

Raj Thackeray Jeevan Parichay

महाराष्ट्रातील प्रमुख राजकारणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकिय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष राज ठाकरे. राजकारणातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व राज ठाकरे! हे एक असे राजकारणी आहेत ज्यांच्याभवती प्रसिध्दीचं वलय नेहमी फिरत असतं.

महाराष्ट्रात येणारे परप्रांतियांचे लोंढे राज ठाकरेंना कदापीही मान्य नाहीत. या परप्रांतियांमुळे महाराष्ट्रातील तरूणांवर उपासमारीची पाळी येत असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि म्हणुन ते आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या आंदोलनामुळे कायम वादाच्या भवऱ्यात सापडते.

राज ठाकरे यांचे राजकारण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मराठी भाषा या भवती फिरतांना दिसते या विषयांना मुख्यतः त्यांनी केंद्रस्थानी ठेवले आहे.

राज ठाकरे यांच्याविषयीची माहिती – Raj Thackeray Information in Marathi

Raj Thackeray

राज ठाकरे यांचा अल्पपरिचय – Raj Thackeray Biography in Marathi 

नाव: राज श्रीकांत ठाकरे (स्वरराज)
जन्म: १४ जुन १९६८
जन्मस्थान:  बालमोहन विद्यालय दादर
महाविद्यालयीन शिक्षण:  सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट
पक्ष: महाराष्ट्र नवनिर्माण सेना
काका:  बाळासाहेब ठाकरे
वडिल:  श्रीकांत केशव ठाकरे
आई: मधुवंती श्रीकांत ठाकरे
पत्नी:  शर्मिला ठाकरे
अपत्य: अमित आणि उर्वशी
चुलतभाऊ: उध्दव ठाकरे 

राज ठाकरे यांचे राजकारण – Raj Thackeray Political Career

राज ठाकरेंची तरुणांमध्ये फार लोकप्रियता आहे. विशेषतः त्यांच्या भाषणांना ऐकण्याकरीता मोठया प्रमाणात गर्दी होते.

गुगलवर देखील सर्व नेत्यांमधे महाराष्ट्रातील राज ठाकरेंना सर्वाधिक सर्च केल्या जाते. इंटरनेट च्या विश्वात देखील त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

“जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय’’ हे राज ठाकरेंचे ब्रिद आहे. राज ठाकरे हे एक उत्कृष्ट ‘व्यंगचित्रकार’ असुन हा गुण त्यांनी आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडुन घेतला आहे.

राजकारणात आलो नसतो तर वॉल्ट डिस्नेसारखी कार्टृन फिल्मस् तयार करणे आवडले असते असे राज ठाकरे नेहमी म्हणतात. वॉल्ट डिस्नी त्यांचे प्रेरणास्थान आहे. फोटोग्राफी आणि चित्रपट निर्मीतीत देखील त्यांना आवड आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच नेर्तृत्व आणि वक्र्तृत्व गुण राजठाकरेंकडे असल्याने त्यांच्यानंतर सुत्र राज ठाकरेंकडेच येणार असे बऱ्याच जणांना वाटायचे परंतु बाळासाहेबांनी कार्याध्यक्षपदाची सुत्र उध्दव ठाकरेंकडे सोपविल्याने राज समर्थक मोठया प्रमाणात दुखावले गेले पुढे या गोष्टींमधे अधिकच भर पडत गेल्याने अखेरीस वैमनस्य वाढत गेले आणि राज ठाकरे आपल्या समर्थकांसमवेत शिवसेनेतुन बाहेर पडले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नविन पक्ष काढल्यानंतर त्याची जडणघडण करण्यात त्यांचा बराच वेळ गेला परंतु म्हणावे तसे यश मनसेला मिळतांना दिसले नाही.

परप्रांतियांचा मुद्दा, टोल नाके, मराठीचा मुद्दा मनसेने कायम उचलुन धरला. मुंबईत येणारे उत्तरप्रदेशी आणि बिहारी लोकांवर त्यांनी कायम टिका केली.

२००८ साली मनसे आणि समाजवादी पार्टीत झालेला संघर्ष चांगलाच चिघळला. मुंबईमधे चिटकवलेले अनेक पोस्टर्स आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी केलेली प्रक्षोभक भाषणे या संघर्षाचे महत्वाचे कारण ठरले.

या संघर्षाने दंग्यांचे, जाळपोळीचे स्वरूप घेतल्याने राज ठाकरे आणि अबु आझमींना अटक देखील झाली. राज ठाकरेंना अटक झाल्याने मनसे समर्थक अधिकच उग्र झाले आणि त्या दरम्यान मोठया प्रमाणात जाळपोळीच्या घटना घडल्या.

Raj Thackeray Mahiti

पुढे रेल्वेच्या परिक्षांमधे युपी आणि बिहारी लोकांनाच का घेतले हा मुद्दा देखील मनसे आणि शिवसेनेने उचलला. या दरम्यान तर महाराष्ट्रा बाहेर देखील मोठया प्रमाणात दंगे आणि जाळपोळ झाली. मराठी अस्मितेचा विचार राज यांनी केला म्हणुन त्यांना त्या दरम्यान मोठया प्रमाणात समर्थन मिळाले.

जेट ऐअरवेज मधील कार्माच्यार्यांना जेव्हां कामावरून कमी करण्यात आले त्यावेळी हे सर्व कर्मचारी राज ठाकरेंना भेटले.

राज ठाकरेंनी या सर्व कार्माच्यार्यांना पुन्हा कामावर रूजु करून घेण्यास फर्मावल्याने या सर्वाची नौकरी वाचली होती.

रेल्वे भरतीमधले परप्रांतियांचे आंदोलन राज यांच्या कारकिर्दीमधील महत्वाचे आंदोलन समजल्या जाते. हे आंदोलन झाल्याने अनेक मराठी युवकांना रेल्वेत त्या दरम्यान नोकऱ्या मिळाल्या.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या आपल्या काकांसारखे व्यक्तिमत्व लाभलेले राज ठाकरे त्यांच्यासारखीच बोलण्याची पध्दत, आक्रमकता असल्याने काकांचे वारसदार मानले गेले. शिवसेनेत असतांना बाळासाहेबांनी राज यांच्यावर भारतीय विद्यार्थी सेनेची जवाबदारी टाकली.

ही विदयार्थी सेना अवघ्या महाराष्ट्रात पोहोचविण्यात राज ठाकरेंचा मोठा वाटा होता.

एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला लाभलेले एक दमदार नेते म्हणजे राज ठाकरे.

आशा करतो या लेखाला वाचून आपल्याला राज ठाकरे यांच्या विषयी अधिक माहिती मिळाली असेल, आपल्याला हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here