बाळासाहेब ठाकरे यांची माहिती

Balasaheb Thackeray in Marathi

बाळ केशव ठाकरे! एक भारतीय  राजकारणी! बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली.

मराठी ला ते जास्त प्राधान्य द्यायचे. त्यांचा पक्ष पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय स्वरूपात कार्य करीत आहे. त्यांचे सहकारी त्यांना ’’बाळासाहेब’’ या नावाने हाक मारीत तर त्यांना मानणारे त्यांना हिंदु हृदय  सम्राट म्हणतात.

बाळासाहेबांचा जन्म पुण्यात २३ जानेवारी १९२६ ला रमाबाई आणि केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार ठाकरे या नावाने देखील सुपरीचीत आहेत) या दाम्पत्याच्या पोटी झाला. आपल्या नऊ भावंडामध्ये ते सर्वात मोठे होते. केशव ठाकरे एक सामाजिक कार्यकर्ता होते. १९५० साली झालेल्या संयुक्त महाराष्ट्र अभियानात देखील ते सहभागी होते व भारताची राजधानी मुंबई व्हावी याकरता ते सतत प्रयत्नशील राहीले.

बाळासाहेबांचे वडिल आपल्या अभियानाला यशस्वी करण्याकरीता सामाजिक हिंसेला महत्व देत असत, परंतु ज्यासुमारास त्यांच्यावर पक्षपाताचा आरोप होऊ लागला त्यावेळी त्यांनी आपले अभियान मागे घेतले. बाळासाहेबांनी मीनाताई ठाकरेंशी विवाह केला. त्यांना तीन मुलं झालीत बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उध्दव ठाकरे.

बाळासाहेब ठाकरे यांची माहिती- Balasaheb Thackeray Information Marathi

Balasaheb Thackeray

मराठी राजनेता बाळासाहेब ठाकरे यांचा अल्पपरिचय – Balasaheb Thackeray Information

नाव: बाळ केशव ठाकरे
जन्म: २३ जानेवारी १९२६
जन्मस्थान: पुणे महाराष्ट्र
वडिल: केशव सिताराम ठाकरे
आई: रमाबाई केशव ठाकरे
विवाह: मीना ठाकरे

बाळासाहेब ठाकरेंची प्रारंभीची कारकिर्द – Balasaheb Thackeray’s Career

बाळासाहेब ठाकरेंनी आपली कारकिर्द फ्री प्रेस जर्नल, मुंबईत इंग्रजी भाषेतील व्यंगचित्रकार म्हणुन (कार्टुनिस्ट) म्हणुन सुरू केली. त्यांची ही व्यंगचित्र टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवार च्या अंकात छापली जात असत. १९६० ला त्यांनी हे काम सोडले आणि स्वतःचे एक ’’मार्मिक’’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले.

मार्मिक च्या माध्यमातुन बाळासाहेब गैरमराठी लोकांच्या मुंबईतील आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील वाढत्या लोकसंख्येच्या विरोधात भाष्य करीत असत.

बाळासाहेब ज्या सुमारास फ्री प्रेस जर्नल मधुन वेगळे झाले त्यावेळी त्यांच्यासमवेत आणखीन ३ ते ४ लोकं होते त्यातल्याच जॉर्ज फर्नांडिस यांनी देखील स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले. ते १ ते २ महिने चालले.

बाळासाहेबांच्या राजनैतिक सिध्दांतांमधे त्यांच्या वडिलांचा फार मोठा हात होता. ते संयुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख होते. महाराष्ट्राच्या विभाजनाचा त्यांनी प्रखर विरोध केला होता.

मार्मिक च्या माध्यमातुन ते आपल्या अभियाना अंतर्गत मुंबईत वाढत चाललेल्या गैर मराठी लोकांच्या लोकसंख्येवर टिका करीत असत.

१९६६ साली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली जेणेकरून महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत मराठी लोकांची संख्या वाढवावी आणि मराठी लोकांना राजकारणात आणता यावे.

१९६० च्या अखेरीस आणि १९७० च्या सुरूवातीला ठाकरेंनी आपल्या अल्प सहकार्यांसमवेत संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या पक्षाची स्थापना केली.

पक्षाची स्थापना करताच त्यांनी मराठी वृत्तपत्र सामना आणि हिंदी वृत्तपत्र दोपहर का सामना सुरू केले. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक अभियान राबविले आणि सदैव मराठी लोकांच्या हक्काकरीता लढत राहीले.

राजकारण- Politics

१९ जुन १९६६ साली महाराष्ट्रातील लोकांच्या हक्काकरीता बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली.

पुढे १९७० मधे मराठी साहित्याचे इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे आणि महाराष्ट्र ट्रेड युनियन चे मुख्य अधिकारी माधव मेहरे यांचा पक्षात समावेश झाल्यानंतर शिवसेना पक्षाचे बळ अधिकच वाढत गेले.

शिवसेना महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाल्यानंतर पक्षाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रात गैर मराठी लोकांच्या तुलनेत मराठी लोकांकरीता जास्त रोजगार निर्माण करणे हा होता. म्हणुन १९८९ साली शिवसेनेने सामना या वृत्तपत्राची निर्मीती केली.

राजनैतिक दृष्टया पाहता शिवसेना कुण्या एका समुदायाचा पक्ष नव्हता. त्यांनी मुंबईत भाजपा (भारतीय जनता पक्ष) सोबत युती केली.

१९९५ साली महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचा मोठया मताधिक्याने विजय झाला.

आणि १९९५ ते १९९९ दरम्यान बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःला ’’रिमोट कण्ट्रोल’’ मुख्यमंत्री घोषीत केले.

धर्माच्या नावावर मतं मागण्याचा आरोप ठेवत २८ जुलै १९९९ ला निवडणुक आयोगाने बाळासाहेबांच्या मतदानाच्या अधिकारावर ६ वर्षांपर्यंत प्रतिबंध लावला व ११ डिसेंबर १९९९ ते १०  डिसेंबर २००५ या ६ वर्षांदरम्यान कोणत्याही निवडणुकीत सहभागी होण्यावर देखील निर्बंध लावले.

निर्बंध हटवल्यानंतर पहिल्यांदा बाळासाहेबांनी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदान केले होते.

शिवसेना कायम मुंबईतील मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहील अशी बाळासाहेब ठाकरेंची कायम घोषणा होती.

ते म्हणायचे जे लोक आमच्या धर्माच्या विरोधात आहेत त्यांना भारतातुन हाकलुन द्यायला हवे.

विशेषतः जेव्हां कुणी हिंदु धर्माच्या विरोधात वक्तव्य करतं तेव्हां त्याला चांगलेच प्रत्युत्तर द्यायला हवे.

ज्या काळात महाराष्ट्रात मोठया प्रमाणात बेराजगारी निर्माण झाली होती त्याच वेळी बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा विकास करण्याकरीता धुरा हाती घेतली आणि महाराष्ट्रातील जनतेकरीता अनेक रोजगार उपलब्ध करून दिले.

बाळासाहेबांचा मृत्यु – Balasaheb Thackeray Death

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी अचानक आलेल्या हृदय विकाराच्या तिव्र धक्क्याने बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच ऐरवी वेगाने धावणारी मुंबई क्षणात स्तब्ध झाली.

पुर्ण मुंबईकरांनी स्वयंस्फुर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद केली. संपुर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला.

महाराष्ट्र पोलिसांनी संपुर्ण महाराष्ट्रात २०००० पोलिस आणि १५ रिझर्व पोलिसांच्या तुकडीला शांतता स्थापित करण्याकरता तैनात केले होते.

बाळासाहेबांच्या प्रती जनतेचे प्रेम पाहाता त्यावेळेचे भारताचे प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील बाळासाहेबांच्या प्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

१८ नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेबांच्या पार्थिवाला शिवाजी पार्कला नेण्यात आले.

त्यांच्या अंत्यसंस्कार शिवाजी पार्क येथे करण्यात आला. याच ठिकाणी शिवसेनेने आपले अनेक अभियान यशस्वी केले होते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नंतर सार्वजनीक ठिकाणी हे पहिले अंत्यसंस्कार होते. लाखो लोकांचा जनसमुदाय या समयी शिवाजीपार्क येथे जमला होता.

वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार त्यावेळी उपस्थित लोकांची संख्या जवळपास दिड ते दोन लाख होती.

त्यांच्या अंत्यसंस्काराचे वृत्त त्यावेळी सगळयाच प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केले होते.

लोकसभा आणि विधानसभेचे कोणत्याही प्रकारचे सदस्यत्व नसतांना देखील त्यांना एवढा सन्मान मिळाला.

कुठलीही कार्यालयीन पदवी नसतांना देखील त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. असा सन्मान फार कमी लोकांना देण्यात येतो.

बिहार मधील दोन्ही मुख्य सभागृहांमधे बाळासाहेबांना श्रध्दांजली देण्यात आली.

मराठी भाषेवर बाळासाहेबांचे नितांत प्रेम होते. मराठीला त्यांना उच्चस्थानावर पोहोचलेले पहायचे होते.

मराठी माणसांकरीता, त्यांच्या हक्काकरता त्यांनी अनेक आंदोलनं देखील केलीत.

रोजगाराच्या क्षेत्रात मराठी माणसाच्या आरक्षणाकरीता त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

महाराष्ट्रातील जनता त्यांना ’’टायगर ऑफ मराठा’’ म्हणुन ओळखायची.

ते पहिले असे व्यक्ति होते की त्यांच्या मृत्युच्या बातमीने लोकांनी कोणत्याही आदेशाविना स्वयंस्फुर्तीने बंद पाळला होता.

महाराष्ट्रातील या महान नेत्याला मानाचा मुजरा! या लेखामध्ये काही कमतरता आढळल्यास आम्हाला कळवा, अश्या या महाराष्ट्राच्या वाघाला माझी मराठी चा मनाचा मुजरा आशा करतो आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका. धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top