महाराष्ट्राची संपूर्ण माहिती

Maharashtra Information in Marathi

“बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!”

आपण ज्या भागात राहातो म्हणजे ज्या राज्यात आपले वास्तव्य आहे तिथल्या राहाणीमानाची, तिथल्या संस्कृतिची, आसपासच्या लोकांची आपल्याला एक सवय होते आणि आपसुकच आपण त्या वातावरणाचा एक भाग कधी बनुन जातो ते कळत सुध्दा नाही.

उदा. आपण कोणत्याही राज्यात राहात असु तर तिथले सण, तिथले व्यवसाय, परिसर, सण समारंभ आपल्याला जवळचे वाटायला लागतात आणि जरी आपण त्या धर्माचे नसलो तरी तिथल्या संस्कृतीशी आपण इतके घट्ट बांधल्या जातो की आपल्या घरावर देखील त्या वातावरणाचा अमंल राहातोच राहातो.

भारतात भरपुर राज्य अस्तित्वात आहे, साधारणतः आपल्या संस्कृतिशी मेळ खात असलेल्या राज्यांमधे राहाणे आपण पसंत करतो कारण त्या राज्यात कुठेही फिरलो तरी ते ठिकाण, तेथील माणसं आपल्याला जवळची, कुटूंबाचाच एक भाग असल्यासारखी वाटतात आणि मनुष्य हा नेहमी मानवी स्वभावाप्रमाणे सुरक्षीत वातावरणात राहाणेच जास्त पसंत करतो.

महाराष्ट्र राज्य देखील त्याच्या वेगळेपणामुळे, आणि ब.याच वैशिष्टयांमुळे भारतातले लोकप्रिय राज्य आहे, या लेखात जाणुन घेऊया, काय आहेत या लोकप्रिय महाराष्ट्र राज्याची गुणवैशिष्टये!

Maharashtra Information in Marathi

महाराष्ट्राची संपूर्ण माहिती – Maharashtra Information in Marathi

मंडळी महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. 1960 ला जरी महाराष्ट्र राज्य म्हणुन अस्तित्वात आलं असलं तरी या राज्याला भरपुर मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक राजे महाराजे, समाजसुधारक आणि संतांच्या विभुती या राज्यात जन्माला आल्या हे या महाराष्ट्र राज्याचे सद्भाग्यच म्हणावे लागेल!

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहु महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याच मातीत जन्माला आलेत. यांच्या कर्तृत्वाने, कर्तबगारीने, त्यांच्या त्यागाने महाराष्ट्र राज्याला आजचा दीन पहाता आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याने महाराष्ट्र सजला आहे राज्याच्या नकाशावर हे किल्ले जणु माणिकमोत्यांप्रमाणे आजही दिमाखात लखलखतायेत!

महाराष्ट्र राज्याचा इतिहास  – Maharashtracha Itihas

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याला बराच राजकर्त्या शासकांचा वारसा हक्क लाभला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा  खूप प्रदीर्घ आहे. भारतीय इतिहासकालीन पुस्तकांमध्ये आढळून येत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उत्पत्ती संबंधीत माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा ई. स. पू. तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे.  कारण, या पूर्वीच्या कालखंडाबद्दल विशेष अशी माहिती कोठेच आढळून येत नाही.

महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाबाबत विशेष माहिती सांगयचं म्हणजे, विविध कालखंडानुसार राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या शासकाने राज्य केलं आहे. त्यामुळे, राजकीय कालखंडानुसार राज्याच्या  प्रत्येक भागात विविधता आढळून येते.  असे असले तरी, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासामध्ये बरेच साम्य दिसून येते. मगध, चालुक्य, वाकाटक आणि राष्ट्रकुट यासारख्या वंशावळाने महाराष्ट्र राज्यावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात राज्य केलं होते.

परंतु, यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि संस्कृती आदी गोष्टींचा फारसा विकास झाला नव्हता. या कालखंडानंतर सत्येवर आलेल्या सातवाहन, शालिवाहन आणि देवगिरीचे यादव यांच्या कार्यकाळात मराठी भाषा आणि संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला.

मौर्य साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर इ.स.पू. २३० ते २२५ कालखंडा पर्यंत सातवाहन शासकांनी महाराष्ट्र राज्यावर राज्य केलं.  या कालखंडा दरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक सुधारणा केली.  शिवाय, मराठी प्राकृत भाषा ही सातवाहनांची भाषा होती. तसचं, इ.स. ७८ साली सत्येवर आलेले राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी यांनी सुरु केलेले शक पंचांग आज देखील रूढ आहे.

सातकर्णी शासकानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर आपले राज्य प्रस्थापित केले. अश्या प्रकारे महाराष्ट्र राज्यावर अनेक वंशावळी राज्यकर्त्यांनी राज्य केलं. असे असले तरी, महाराष्ट्र राज्य इस्लामिक सत्येच्या अधिपतेखाली गेल ते, तेराव्या शतकात दिल्लीच्या गादीवर राज्य करीत असलेल्या अल्लाउद्दिन खिलजी आणि मुहम्मद बिन तुघलक यांनी आपल्या राज किर्दीत राज्याच्या दख्खन भागातील काही भाग बळकावून घेतला.  इ.स. १३४७ साली तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्यावर राज्य केलं.

सतराव्या शतकाच्या मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर राज्यांत मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून.  स्व: बळावर महाराष्ट्र राज्य स्थापन केले. इ.स. १६७४ साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची ‘अधिकृत’ सुरुवात झाली.

शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज सत्येवर आले. छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर मराठ्याची सत्ता पेशव्यांच्या हातात गेली. पेशव्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठ्यांची सत्ता पार भारताच्या सीमेपार प्रस्थापित केली होती. यानंतर इ.स. १७६१ साली झालेल्या मराठा अफगाण युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. यानंतर, महाराष्ट्राची सत्ता लयास गेली. परिणामी देशाच्या विविध भागांतील मराठ्यांचे साम्राज्य अनेक सरदारांनी वाटून घेतले.

यानंतर देशांत आलेल्या इंग्रज सरकारने मराठ्यांसोबत युद्ध करून त्यांनी सत्ता बळकावून घेतली. परिणामी राज्यांत इंग्रज सत्ता स्थापना झाली. यानंतर देशांत अनेक क्रांतिकारक, समाजसुधार घडले आणि त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आंदोलन उभारले. भारताला सन १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशांत राज्य स्थापन करण्याबाबत आंदोलन होवू लागले.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेकरीता सुमारे १०५ हुतात्म्यानी बलिदान दिले. सन १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. अश्या प्रकारे महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याबाबत ऐतिहासिक माहिती मिळते.

महाराष्ट्र राज्याबाबत मनोरंजक गोष्टी – Facts about Maharashtra

ऐतिहासिक माहिती प्रमाणे राज्यांत वास्तविक  काळात असलेल्या काही मनोरंजक तथ्य जाणून घेवूया.

 • महामार्गांचे जाळे:

भारतात असलेल्या एकूण महामार्गाच्या तुलनेने आपल्या महाराष्ट्र राज्यांत सर्वात जास्त महामार्गाचे जाळे पसरले असून, त्यांची लांबी सुमारे २,६७,५०० कि. मी. पर्यंत पसरली आहे. 

 • लोणार सरोवर:

महाराष्ट्र राज्यांतील बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार या गावी उल्कापातामुळे निर्माण झालेले खऱ्या पाण्याचे सरोवर हे देशांतील तिसरे सरोवर आहे. लोणार सरोवराची निर्मिती बेसाल्ट खडकात झाली असल्याने जगाच्या विविध भागांतील तज्ञ त्याठिकाणी संशोधन करण्यास येत असतात. त्यामुळे सरोवराचे जतनासाठी आणि संवर्धनासाठी लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानाच्या साह्याने काढलेल्या वयानुसार लोणार सरोवराचे वय सुमारे ५२००० वर्ष आहे.

 • शनि शिंगणापूर:

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वसलेले शनि शिंगणापूर हे गाव. या गावाची विशेषतः सांगायचं म्हणजे, शनि महाराज यांच्या प्रसिद्ध मंदिराकरिता आणि तेथील घरांकरिता प्रसिद्ध असलेले शनि शिंगणापूर गावातील घरांला खिडक्या दरवाजे नाहीत. याबाबत तेथील लोकांची धार्मिक भावना आहे.

 • नवापुर रेल्वे स्टेशन:

मुंबई रेल्वे मंडळात कार्यरत असलेले नवापुर रेल्वे स्टेशन याबाबत मनोरंजक तथ्य सांगायचं म्हणजे, ब्रिटीश काळात हे स्टेशन मुंबई प्रांतात होते. परंतु, महाराष्ट्र राज्याची विभागणी झाल्यानंतर मुंबई प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. पश्चिम रेल्वे अंतर्गत येत असलेले मुंबई-अहमदाबाद आणि सुरत-भुसावळ दोन्ही सेक्शन मुबंई मंडळात येतात. त्यामुळे या स्टेशनला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याच्या सीमा लागतात. तसचं, या स्टेशनाचा अर्धा भाग महाराष्ट्रील नंदुरबार जिल्ह्यात येतो तर अर्धा भाग गुजरात राज्यांतील तापी जिल्ह्यात येतो. तिकिट बुकींग स्टाफ महाराष्ट्र राज्यांत बसतो तर, प्रवाश्यांकरिता असलेले सिटींग स्टँड गुजरातमध्ये आहे.

 • मुंबईचे डबेवाले:

महाराष्ट्र राज्यांतील सर्वांना परिचित असलेले मनोरंजक तथ्य म्हणजे मुंबईचे डबेवाले. यांच्याबाबत विशेषतः माहिती सांगायची म्हणजे, आपल्या ग्राहकांना वेळेवर डबे पोचविण्याचे महत्वपूर्ण काम ते करीत असतात.

 • ५२ दरवाज्याचे शहर म्हणून ओळख असलेले औरंगाबाद शहर:

मुघल कालीन शैलीत निर्माण झालेले औरंगाबाद हे शहर पूर्वी मुघलांच्या साम्राज्यात होते. या शहराची विशेषता म्हणजे या शहराला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसचं, या शहराला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

 • प्रथम रेल्वेची स्थापना:

इ.स. १६ एप्रिल १८५७ साली ब्रिटीश काळात राज्यात मुंबई ते ठाणे शहरा दरम्यान वाफेच्या इंजिनाच्या साह्याने चालवण्यात आलेली रेल्वे ही जगातील पहिली रेल्वे होती.

 • धारावी झोपडपट्टी:

मुंबई शहरात असलेली धारावी झोपड पट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपड पट्टी आहे. 

महाराष्ट्र राज्याची संस्कृती – Maharashtra Culture

महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने मराठी माणुस राहातो हे जरी खरे असले तरीही राजधानी मुंबई आज आर्थिक राजधानी बनल्याने सर्व समाजाची माणसं मोठया संख्येने मुंबईत स्थायीक झालेली आपल्याला पहायला मिळतायेत. उद्योगांची भरभराट आणि प्रत्येक हाताला काम देणा.या या मुंबईने करोडो लोकांना आपल्यात सामावुन घेतले आहे.

औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आज अव्व्वल स्थानावर आहे.

ब.याच विदेशी कंपन्यांनी या राज्याकडे गुंतवणुकीकरता योग्य क्षेत्र असल्याची खात्री झाल्यामुळेच मोठया प्रमाणात गुंतवणुक केली आहे. अनुकुल वातावरण, भरपुर मोठे क्षेत्रफळ, सोयीची बाजारपेठ, आवश्यक गोष्टींची उपलब्धता, शैक्षणिक दृष्टया सक्षम असलेल्या महाराष्ट्राकडे आणखीनही बरेच उद्योजक उद्योग उभारण्याकरता धडपडत आहेत.

चित्रपटसृष्टी – Bollywood

आधीच म्हंटल्याप्रमाणे मुंबई ही महाराष्ट्र राज्याची किंबहुना भारताचीच आर्थिक राजधानी असल्याने रोज अरबो खरबो रूपयांची उलाढाल एकटया मुंबईत होत असते. आणि त्यातल्या त्यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु असलेली चित्रपटसृष्टी देखील या मुंबापुरीत वसल्याने हिला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.

चित्रीकरणाकरता उपलब्ध असलेले मोठे मोठे स्टुडिओ, पर्यटन केंद्र, समुद्र किनारा, आजुबाजुला असलेली निसर्गरम्य स्थळं यामुळे चित्रपटसृष्टी मुंबईला स्थिरावली आहे. मोठे मोठे कलाकार देखील या मुंबईला वास्तव्याला असल्याने पर्यटक त्यांची एक झलक पाहाण्याकरता देखील मुंबईला गर्दी करतांना आपल्याला दिसुन येतात.

महाराष्ट्र याकरता देखील लोकप्रीय आहे – Famous Places In Maharashtra

राज्यातले असे काही भाग, जिल्हे आहेत की ते त्या त्या गोष्टींकरता खुपच लोकप्रीय आणि आर्थिक बाजारपेठा मिळवते झाले आहेत.

पुणे – Pune

सांस्कृतिक वैभवाने नटलेले आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे शहर! या शहराला फार जुना इतिहास लाभलेला आहे. बाजीराव पेशव्यांची पर्वती आजही पर्यटकांना आणि इतिहास प्रेमींना खुणावत असते. नाटकप्रेमींकरता देखील पुण्यात नेहमीच वेगवेगळी नाटकं पाहाण्याकरता मिळु शकतात.

अनेक कॉलेजेस, मोठमोठी जुनी विद्यापीठं आणि विविध शिक्षणाचे पर्याय खुले असल्यानं विद्यार्थ्यांना ओढा पुण्याकडे जास्त असल्याचं दिसुन येतं.

नाशिक – Nashik

नाशिक जिल्हा हा द्राक्षांकरता आणि कांद्याकरता खुप प्रसिध्द आहे तिथले वातावरण या गोष्टींकरता अनुकुल असल्याने कांदा आणि द्राक्ष इतक्या विपुल प्रमाणात तयार होतात की हा माल संपुर्ण भारता सोबत विदेशात देखील पाठवला जातो.

नाशिकला सांस्कृतिक दृष्टया देखील खुप महत्व आहे, जवळच असलेले त्र्यंबकेश्वर (बारा ज्यार्तिलिंगापैकी एक) आणि वणी ची सप्तश्रृंगी शिवाय पंचवटी, रामकुंड यामुळे आध्यात्मीक महत्व देखील या शहराला लाभले आहे.

नागपुर – Nagpur

नागपुर या शहरात मिहान प्रकल्प आल्याने तेथील उद्योगाला फार मोठया प्रमाणात चालना मिळाली आहे. येत्या काही वर्षात हा प्रकल्प चांगल्या त.हेने उदयाला आल्यावर लाखो हातांना रोजगार आणि उद्योग क्षेत्रात देखील मोठी घडामोड बघायला मिळेल.

नागपुरची संत्री अतिशय लोकप्रीय असुन विदेशात देखील प्रचंड प्रमाणात यांची मागणी पहायला मिळते. संत्रा उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात उत्पन्न घेत असुन व्यवसायात वेळोवेळी बदल करतांना देखील दिसतात.

कोकण – Konkan

अमाप निसर्गसंपदा लाभलेला कोकण महाराष्ट्राच्या सौंदर्यात वाढ करणारा भाग आहे. कोकणातला आंबा जगभरात नावाजलेला आहे. कोकणातला आंबा जास्तीत जास्त विदेशात निर्यात केला जातो.

शिवाय नारळाचे, सुक्यामेव्याचे (काजु, बदाम, अक्रोड) देखील कोकणात फार मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. कोकणाला लाभलेल्या विस्तिर्ण समुद्रकिना.यामुळे पर्यटनाचा व्यवसाय देखील मोठया प्रमाणात इथे बघायला मिळतो.

अश्याच प्रकारे महाराष्ट्रातील नंदुरबार तिखटाकरता (लाल मिरची), अकोला कापसाकरता, चन्द्रपुर, गडचिरोली वनसंपदेकरता प्रसिध्द जिल्हे आहेत.

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं – Tourist Places In Maharashtra

महाराष्ट्रात फिरण्याकरता, भ्रमंतीसाठी भरपुर स्थळं आहेत. जर तुम्ही समुद्रप्रेमी आहात तर तुम्हाला कोकण खुणावतोय! रत्नागिरी, अलीबाग, सिंधुदुर्ग, दापोली, गणपतीपुळे, हरिहरेश्वर, अशी कितीतरी रमणीय आणि निसर्गाचं भरपुर दान लाभलेली स्थळ तुम्हाला कोकणात पहायला मिळु शकतात.

लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, विदर्भातले चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं देखील पहाण्यासारखी आणि रमणीय अशीच आहेत.

महाराष्ट्रातील तिर्थस्थळं – Religious Places In Maharashtra

महाराष्ट्र हे संतांचे राज्य असल्याने संतांची शिकवण या राज्याला लाभलेली आहे शिवाय इथे संस्कृती, परंपरा जपण्याचे संस्कार लोकांना मिळाल्याने भक्तीभाव देखील ओसंडुन वाहातांना दिसतो. महाराष्ट्रातील तिर्थस्थळं देखील बरीच प्रसीध्द आहेत.

देवीची साडेतिन शक्तीपीठं या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यातली माहुर, तुळजापुर, कोल्हापुर ही संपुर्ण आणि नाशिक जिल्हयातील वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ! अशी साडेतीन शक्तीपीठं भाविकांना बाराही महीने खुणावत असतात.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी पाच ज्योर्तिलिंग हे महाराष्ट्रात आहेत. नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर, पुणे जिल्हयातील भिमाशंकर, औरंगाबाद जिल्हयातील घृष्णेश्वर, हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ आणि बीड जिल्हयातील परळी वैजनाथ अशी पाच ज्योर्तिलिंग या राज्यात आहेत.

याशिवाय शिर्डी, शनिशिंगणापुर, शेगांव, पंढरपुर, अक्कलकोट, या ठिकाणी देखील भाविक श्रध्दापुर्वक मोठी गर्दी करतांना पहायला मिळतात.

महाराष्ट्र राज्याने जन्माला घातलेले कलाकार – Famous Personalities Of Maharashtra

या राज्याने अश्या अनेक कलाकारांना जन्माला घातले आहे ज्यांनी त्यांच्यातल्या अंगभुत कलागुणांनी महाराष्ट्र राज्याचे नाव साता समुद्रापार पोहोचवले आहे.

दादासाहेब फाळके, लता मंगेशकर, पंडीत भिमसेन जोशी, आशा भोसले, नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, अश्या अनेक कलाकारांनी राज्याचे नाव खुप मोठे केले.

सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर सारखे खेळाडु देखील याच राज्यात जन्माला आले ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र राज्याचे नाव सर्वदुर चमकवले.

समाजकार्यात मोलाची भुमीका पार पाडणा.या विभुती:

बाबा आमटे, साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सौ मंदाकिनी आमटे, डॉ. विकास आमटे या संपुर्ण परिवाराने प्रवाहापासुन शेकडो मैल दुर असलेल्या आदिवासींकरता कार्य करत आपलं आयुष्य वेचलं. या आदिवासींकरता शिक्षणाची, आरोग्यसेवेची सोय करत त्यांना समाजात स्थान मिळावं याकरता अविरत परिश्रम घेतले.

त्याचप्रमाणे अभय बंग आणि राणी बंग हे दाम्पत्य, डॉ. रविन्द्र आणि स्मिता कोल्हे हे देखील समाजाचे ऋण फेडत अविश्रांत परिश्रम घेत समाजसेवा करतायेत.

महाराष्ट्र राज्याविषयी काही महत्वाची माहिती – Maharashtra Information

 • महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960
 • राजधानी मुंबई, राज्यभाषा मराठी.
 • एकुण जिल्हे 36, एकुण तालुके 355, ग्रामपंचायत 28,813, पंचायत समित्या 355.
 • एकुण जिल्हापरिषद 34.
 • विधानसभा आमदार 288 , विधानपरिषद आमदार 78, महा. लोकसभा सदस्य 48.
 • लोकसंख्येच्या बाबतीत 2 रा क्रमांक, क्षेत्रफळात 3 रा क्रमांक.
 • देशातील 9.29: लोकसंख्या महाराष्ट्रात राहाते.
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या ‘पुणे’ ( 94.3 लाख)
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या ‘सिंधुदुर्ग’ (8.50 लाख)
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा गडचिरोली.
 • महाराष्ट्रातील कमी जंगल असलेला जिल्हा बीड.
 • महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा गोंदिया.
 • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर.
 • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर.
 • महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मी.
 • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी.
 • महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी.
 • जगातील 1 ले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपुर.
 • पहिला संपुर्ण डिजीटल जिल्हा नागपुर (ऑक्टोबर 2016)

महाराष्ट्र राज्याविषयी काही उत्साहवर्धक माहिती – Facts About Maharashtra

काय तुम्हाला माहिती आहे?

 • भारताला सर्वात जास्त जीडीपी महाराष्ट्र राज्यच देतो.
 • भारतात सर्वात जास्त औद्योगिकरण आजवर महाराष्ट्राचेच झाले आहे.
 • भारतात महाराष्ट्राची ओळख सर्वात श्रीमंत राज्य म्हणुन आहे, याची राजधानी मुंबई असुन हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे शिवाय देशाची आर्थिक राजधानी म्हणुन देखील ओळखल्या जाते.
 • मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरूध्द अविरत संघर्ष केला, 1680 पर्यंत एक महान योध्दा म्हणुन त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली होती, भारतात उत्तम शासनकत्र्यांमधे त्यांची गणना केली जाते.
 • महाराष्ट्र, भारतिय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश विदेशातुन करोडो रूपयांचा महसुल प्राप्त होतो.
 • देशातले सगळयात मोठे शेअर मार्केट महाराष्ट्रात मुंबईमधे स्थित आहे.
 • देशातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ महाराष्ट्रातील नाशिक जिल्हयात आहे शिवाय जगभरात लागणा.या एकुण कांदयापैकी जवळजवळ अध्र्या कांद्याचे उत्पादन फक्त नाशिक जिल्हयातच होते.
  भारतात रेल्वे सर्वात आधी महाराष्ट्रात 16 एप्रील 1853 ला मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती.
 • मुंबई मधे वाढत्या लोकसंख्येला पाहाता जगातील पहिले योजनाबध्द शहर नवी मुंबईत वसवल्या केले गेले आहे. नव्या मुंबईची निर्मीती 1972 साली करण्यात आली.
 • महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हयातील लोणार सरोवर खा.या पाण्याकरता प्रसिध्द आहे या सरोवराची निर्मीती एक उल्का पृथ्वीला धडकल्याने झाली आहे. अश्या पध्दतीने तयार झालेले हे बहुदा एकमेव सरोवर आहे.
 • महाराष्ट्रातील शनी शिंगणापुर असे तिर्थस्थळ आहे की या गावी कुणाच्याच घराला दरवाजे नाहीत. चोरी केल्यास चोराला शनीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल अशी मान्यता असल्याने इथे चोरी होत नाही.
 • मोठमोठया कंपन्यांची हेडक्वाॅर्टर्स सर्वात जास्त मुंबईत आहेत. मुंबई महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भारतातील 5 वे मोठे शहर आहे.
 • महाराष्ट्रात जवळपास 350 किल्ले आहेत आणि ही या राज्याकरता गौरवाची बाब आहे. यातले जास्तीत जास्त किल्ले महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत आहेत.
 • औरंगाबाद जिल्हयातील अजिंठा वेरूळ च्या लेण्या विश्वप्रसिध्द आहेत, या लेण्या नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु राहिल्या आहेत. येथील चित्रकला आणि मुत्र्या अतिशय सुबक आणि सुरेख आहेत.
 • चित्रपटसृष्टी मंुबईत असल्याने महाराष्ट्राला वेगळच वलय प्राप्त झालं आहे. बरेचसे कलाकार मुंबईत वास्तव्याला असल्याने देखील पर्यटकांना महाराष्ट्र कायम खुणावत असतो.
 • भारतात बनलेला पहिला चित्रपट महाराष्ट्रातील दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्हयात तयार केला होता.
 • महाराष्ट्र भारतातील एकमेव असे राज्य आहे ज्यात दोन मेट्रो सिटी आहेत एक मुंबई आणि दुसरे पुणे.
 • पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका एशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणुन प्रसिध्द आहे.
 • महाराष्ट्रातील नागपुर राज्याची राजधानी नसुनही येथे रिझर्व बॅंक आॅफ इंडियाची शाखा आहे.
 • गणेशचतुर्थी हा महाराष्ट्रातील महत्वपुर्ण उत्सव आहे. हा उत्सव संपुर्ण दहा दिवस मोठया भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here