• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information City Information

नागपुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Nagpur Jilha Mahiti

ऑरेंजसिटी अर्थात संत्रानगरी अशी ओळख मिळवलेला नागपुर जिल्हा !

नागपुर हे शहर भारतातील 13 वे आणि जगातील 114 वे सर्वात मोठे शहर म्हणुन ओळखले जाते.

नुकतच या शहराला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहराचा पुरस्कार मिळाला.

Nagpur Information In Marathi

नागपुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Nagpur Information in Marathi

महाराष्ट्रातल्या विदर्भ प्रांतातील सर्वात मोठे शहर म्हणुन देखील नागपुर ओळखल्या जातं.

भारतातील दुस.या क्रमांकाचे हरित शहर म्हणुन देखील या शहरानं गौरव मिळवलेला आहे.

वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नागपुर लवकरच महानगरांमधे गणल्या जाईल.

शहरातल्या जुन्या भागातुन ’नाग’ नदी वाहाते, यावरूनच या शहराला नागपुर असे नाव पडले शिवाय या शहरात मोठया प्रमाणात नाग आणि साप निघायचे त्यामुळे देखील शहराचे नाव नागपुर पडले असावे असे देखील म्हंटल्या जातं.

देवगड चे गोंड राजा बख्त बुलंद शहांनी 1703 साली या शहराची स्थापना केल्याचे सांगण्यात येते

पुढे 1960 ला वाढत्या लोकसंख्येमुळे या शहराला महाराष्ट्रातील जिल्हा म्हणुन घोषीत करण्यात आले.

नुकतचं काही वर्षांआधी या शहराचा 300 वा वर्धापनदिन देखील साजरा करण्यात आला.

नागपुर जिल्हयातील तालुके – Nagpur District Taluka List

नागपुर जिल्हयात एकुण 14 तालुके आहेत

  1. नागपुर
  2. नागपुर ग्रामीण
  3. उमरेड
  4. कळमेश्वर
  5. काटोल
  6. कामठी
  7. कुही
  8. नरखेड
  9. पारशिवणी
  10. भिवापुर
  11. मौदा
  12. रामटेक
  13. सावनेर
  14. हिंगणा

नागपुर जिल्हयाविषयी काही उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Nagpur Zilla Chi Mahiti

  • लोकसंख्या 46,53,570
  • क्षेत्रफळ 9,892 वर्ग कि.मी.
  • साक्षरतेचे प्रमाण 50%
  • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 948
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आणि 7 या जिल्हयातुन गेला आहे.
  • मुख्य मातृभाषा मराठी असुन हिंदी देखील मोठया प्रमाणात बोलली जाते.
  • एकुण 14 तालुके या जिल्हयात आहेत
  • एकुण गावे 1969
  • विधानसभेचे अधिवेशन या शहरात घेतले जाते
  • भौगोलिक दृष्टीकोनातुन देशाच्या मध्य भागात वसलेल्या नागपुर शहरात भारताचा शुन्य मैलाचा दगड आहे.
  • येथील संत्र्याची मोठी बाजारापेठ प्रसिध्द असुन या संपुर्ण जिल्हयात मोठया प्रमाणावर संत्र्याचे उत्पन्न घेतले जाते.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदु परिषदे सारख्या राष्ट्रवादी संघटनांचे हे एक प्रमुख केंद्र आहे.
  • विमानसेवा, रेल्वेसेवा, आणि बस सेवेने हे शहर सर्वदुर जोडल्या गेले आहे
  • सरासरी पर्जन्यमान 1205 मि.मि.
  • उन्हाळा जास्त प्रमाणात असुन मे महिन्यात तापमान 45 अंशाला पार करते.
  • हिवाळा हा ऋतु सुखावह असला तरी कधी कधी तापमान 10 सेल्सियसच्या खाली उतरते.
  • रमण विज्ञान केंद्र या ठिकाणी असुन बरेच वैज्ञानिक चमत्कार आणि विज्ञानासंबधी माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपीठ देखील या ठिकाणी आहे.
  • अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या सरकारी वैज्ञानिक संस्था या ठिकाणी आहेत.
  • नागपुर शहरात मेट्रो ट्रेन आल्याने आता हे शहर पुर्वीपेक्षा अधिक गतिमान झाले आहे.
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ महाराष्ट्रातील मोठे विद्यापीठ या ठिकाणी आहे.
  • व्ही सी ए (विदर्भ क्रिकेट असोसिएशन) हे वर्धा रोड जामठा येथील क्रिकेट स्टेडियम या ठिकाणी असुन भारतातील मोठया स्टेडीयम पैकी एक आहे.
  • हल्दीराम, विको, दिनशा सारख्या मोठया कंपन्या या शहरात आहेत.
  • नागपुरची संत्रा बर्फी प्रसिध्द आहे.
  • नागपुर येथे मोठे मोठे खाजगी हॉस्पीटल्स देखील आहेत
  • पर्यटनाच्या आणि तिर्थस्थळांमुळे देखील नागपुर जिल्हयाला वेगळी ओळख मिळाली आहे.

नागपुर येथील पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places To Visit In Nagpur

  • अंबाझरी तलाव – Ambazari Lake

नागपुर वासीयांचे आवडते आणि शहराच्या मध्यभागी स्थित असलेले हे ठिकाण पर्यटनाकरता एक उत्तम स्थळ आहे

नागपुरातील 11 तलावांपैकी एक आणि शहरातील सर्वात मोठा तलाव म्हणुन याची ओळख आहे आजुबाजुला आंब्याची बरीच झाडे असल्याने आणि या आंब्याच्या झाडांनी वेढलेला हा तलाव म्हणुन याला अंबाझरी तलाव असे नाव पडले.

पुर्वी या तलावातुन शहराला पाणी पुरवठा केला जायचा पण आता हे पाणी प्रदुषीत झाल्याने याचा उपयोग केवळ पर्यटनाकरता सिमीत ठेवण्यात आला आहे.

नौका विहाराचा आनंद या ठिकाणी घेता येतो.  पावसाळयात हा तलाव काठोकाठ भरल्यानंतर वाहायला लागतो तेव्हा या ठिकाणी मोठया प्रमाणात पावसाचा आणि पाण्याचा आनंद घेण्याकरता शहरातील नागरिक एकत्र येतात.

अंबाझरी तलावाच्या जवळच एक बाग आहे या ठिकाणी म्युझीकल कारंजे, ईलेक्ट्राॅनिक खेळणी, फिरण्याकरता खेळण्याकरता सोय करण्यात आली आहे त्यामुळे सकाळच्या वेळेस माॅर्निंग वाॅक करणा.यांची आणि सायंकाळच्या वेळेस बालगोपाळांची या ठिकाणी खुप गर्दी असते.

  • टेकडीचा गणपती – Shri Ganesh Mandir Tekdi

शहरातील सिताबर्डी परिसरातील टेकडीचा गणपती नागपुर वासीयांचे आराध्य दैवत आहे.

दरवर्षी या ठिकाणी पर्यटक मोठया संख्येने दर्शनाकरता येथे येतात, दर चतुर्थीला तर भाविकांची खुप गर्दी श्री गणेशाच्या दर्शनाकरता येथे होते.

येथील श्री गणेशाची ही मुर्ती स्वयंभु असुन जवळपास 200 ते 250 वर्षांपासुन या ठिकाणी ही मुर्ती विराजमान असल्याचे पुरावे मिळतात.

संपुर्ण विश्वात ही एकमेव मुर्ती अशी आहे जी पिंपळाच्या झाडातुन निघालेली आहे आणि त्याच ठिकाणी स्थित आहे.

ब्रम्हसुत्रात सांगितल्या प्रमाणे अदस्य मुनींनी त्यांच्या ग्रंथात टेकडी गणेशाचा उल्लेख केलेला असुन तो गणपती हाच असल्याचे सांगितल्या जाते.

या ठिकाणी फार पुर्वी मोठी टेकडी होती इंग्रजांनी ज्यावेळेस या ठिकाणी रेल्वे लाईन टाकण्यास सुरूवात केली तेव्हां या टेकडीला तोडण्यात आले तेव्हां पिंपळाच्या झाडात वसलेली ही श्री गणेशाची मुर्ती भाविकांच्या दृष्टीस पडली.

इंग्रजांनी देखील या श्री गणेशाची पुजा केली आणि पुढे पुढे भाविकांची या गणेशाप्रती आस्था वाढतच गेली आणि आता तर भाविकांच्या लांबच लांब रांगा नित्य सदोदित येथे पहायला मिळतात.

या मंदीरात दर्शनाकरता लाखो भाविक येत असतात पण विशेष म्हणजे प्रसिध्द क्रिकेट प्लेयर सचिन तेंडुलकर जेव्हां ही या शहरात येतात ते आवर्जुन टेकडी गणेशाच्या दर्शनाकरता येथे येतातच.

शिवाय इतर भक्तांकडुन असे देखील म्हंटल्या जाते की सचिन जेव्हां येथे दर्शन घेउन क्रिकेट सामना खेळतात तो सामना भारतिय टिम जिंकते पण जेव्हां दर्शन न घेता खेळतात तो सामना इंडियन टिम हरते.

नवसाला पावणारा हा गणेश आणि त्याची महिमा अपरंपार असुन भाविक प्रत्येक शुभकार्य त्याला स्मरूनच करतात.

  • आदासा गणपती – Adasa Ganesh Mandir Nagpur

नागपुर पासुन जवळपास 50 कि.मी. अंतरावर आदासा गणेशाचे तिर्थक्षेत्र भाविकांचे श्रध्दास्थान असुन श्री गणेशाची भव्य मुर्ती या ठिकाणी विराजमान आहे.

असंख्य पाय.या चढुन जेव्हां भाविक सभामंडपात पोहोचतात तेव्हां दृष्टीस पडते ती गणेशाची भव्य मुर्ती! वाटतं की एक राजा आपल्या भव्य दरबारात सिहांसनावर विराजमान आहे.

11 फुट उंच आणि 7 फुट रूंद प्रतीमा बघताच क्षणी देहभान हरपुन जातं.  ही मुर्ती स्वयंभु असुन संपुर्ण एकाच पाषाणात बनलेली आहे.

आदासा गावापेक्षा श्री गणेशाचे हे स्थान 200 फुट उंचावर आहे या मंदीरा व्यतीरीक्त प्राचीन शिवलिंग, माता भैरवी, हनुमान यांची देखील मंदीर येथे आहेत.

टेकडीच्या पायथ्याशी गणेशकुंड नावाचे तिर्थ आहे, आदासा गणेशाला शमी गणपती देखील म्हंटल्या जातं.

असं म्हंटल्या जातं की वामन अवतारात भगवान विष्णुंनी गणेशाच्या याच रूपाची आराधना केली होती.

  • दिक्षाभुमी – Deekshabhoomi

दिक्षाभुमी भारतातील बौध्द धर्मीयांचे एक प्रमुख केंद्र आहे या ठिकाणी बौध्द धर्माचे पुनरूत्थान झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी स्वतः बौध्द धर्माची दिक्षा घेतल्या नंतर आपल्या 5 लाखांपेक्षा अधिक अनुयायांना बौध्द धर्माची दिक्षा दिली.

त्यानंतर दुस.या दिवशी 15 ऑक्टोबरला 3 लाख अनयायांना बौध्द धर्माची दिक्षा दिली आणि स्वतः देखील पुन्हा दिक्षीत झाले.

दरवर्षी या ठिकाणी 25 लाखांपेक्षा अधिक बौध्द अनुयायी येत असतात, महाराष्ट्र सरकार ने दिक्षाभुमी ला ’अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे.

नागपुर शहरातील सर्व धार्मीक आणि पर्यटन स्थळांपैकी हे पहिले असे स्थळ आहे ज्याला ’ए’ क्लास चा दर्जा प्राप्त झाला.

दिक्षाभुमी भारतात बौध्द धर्माचे तिर्थस्थळ म्हणुन मानल्या जाते लाखो तिर्थयात्री दरवर्षी दिक्षाभुमीला येतात विशेषतः धम्म चक्र प्रवर्तन दिनाला लाखो अनुयायांचा समुदाय या ठिकाणी येत असतो.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ नागपुर जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया नागपुरजिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Nagpur District Information In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि Majhimarathi.Com चे Facebook Page लाइक करायला सुध्दा.

Editorial team

Editorial team

Related Posts

Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
June 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
June 17, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved