राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती

Rashtra Sant Tukdoji Maharaj

भारत देशातील महाराष्ट्र राज्यातले एक आध्यात्मिक संत… तुकडोजी महाराज! ते पुर्णतः आध्यात्मिक जीवनात लीन होते. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत हा सन्मान मिळाला. त्यांचे पुर्ण जीवन जात, धर्म, पंथ, यापासुन कोसो दुर समाजाच्या सेवेला समर्पित होते. Sant Tukdoji Maharaj Information In Marathi

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती – Sant Tukdoji Maharaj Information in Marathi

पुर्ण नाव (Name): माणिक बंडोजी इंगळे
जन्म (Birthday): 1909
जन्मगाव (Birthplace): यावली जि. अमरावती
मृत्यु (Death): 11 ऑक्टोबर 1968

तुकडोजी महाराजांचा सुरूवातीचा काळ रामटेक, सालबर्डी, रामदिघी आणि गोंदोडा या घनदाट जंगलांमधे व्यतीत झाला. ते आडकोजी महाराजांचे शिष्य होते. तुकडोजी महाराजांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या निर्माणासोबत, सामाजिक सुधारणांमधे देखील सहभाग घेतला. त्यांनी “ग्रामगीता’’ देखील लिहीली.

या ग्रामगीतेत महाराजांनी गावाच्या विकासाकरता लागणा.या साधनांचे वर्णन केले आहे. त्यांच्या व्दारे सुरू झालेली अनेक विकासांची कामं आज देखील उत्तम रितीने सुरू आहेत. भारतीय डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ तिकीट प्रकाशित करून त्यांना सन्मानित देखील केले आहे. त्यांच्या सन्मानार्थ नागपुर विद्यापीठाचे नामकरण “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ’’ असे ठेवण्यात आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य – Sant Tukdoji Maharaj Work

1941 साली महाराजांनी व्यक्तिगत सत्याग्रह केला. ’भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. ब्रिटिशांनी त्यावेळी जी अमानविय मुस्कटदाबी चालवली होती त्याचा त्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे तुकडोजी महाराजांना 1942 साली अटक करून नागपुर व रायपुर येथील कारागृहात कैदी म्हणुन ठेवण्यात आले होते.

तुकडोजी महाराजांनी नागपुर पासुन 120 कि.मी. अंतरावर असलेल्या मोझरी या गावी गुरूकुंज आश्रमाची स्थापना केली. या ठिकाणी महाराजांचे अनुयायी सक्रिय सहभागातुन अनेक समाजोपयोगी कार्य करीत असत. आश्रमाच्या प्रवेशव्दारावरच महाराजांचे सिध्दांत लिहीलेले आपल्याला दिसतात. “या मंदिराचे दरवाजे सर्वांकरता खुले आहेत”, “प्रत्येक धर्म आणि पंथातील व्यक्तिचे येथे स्वागत आहे”, देश विदेशातील प्रत्येक व्यक्तिचे या ठिकाणी स्वागत आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी ग्रामिण भागाच्या पुर्ननिर्माणावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी ‘अखिल भारतिय श्री गुरूदेव सेवा मंडळाची’ स्थापना केली व एकीकृत ग्रामिण विकासा करीता अनेक कार्यक्रम विकसीत केले. महाराजांची क्रियाशिलता, आणि वैचारिकता एवढी प्रभावशाली होती की त्या वेळेचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ’राष्ट्रसंत’ या उपाधीने सन्मानित केले.

तुकडोजी महाराज विश्व हिंदु परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. त्यांनी राष्ट्रीय हितासाठी अनेक स्तरावर कार्य केलं जसे बंगाल येथील दुष्काळ (1945 ), चीन युध्द (1962 ), पाकीस्तान हमला (1965 ), कोयना भुकंपामुळे उडालेला हाहाकार (1962 ). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभावित आणि व्यवस्थित रचनात्मक मदत कार्याकरता या सगळया मोहिमांवर गेले होते.

तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावेंच्या भुदान आंदोलनात देखील सहभाग घेतला, या शिवाय 1955 मध्ये जापान येथे धर्म आणि विश्वशांती च्या विश्व सम्मेलनात भाग घेतला. या यात्रेदरम्यान त्यांनी जापान यात्रेवर पुस्तक देखील लिहीले. महाराजांच्या अखेरच्या दिवसांत त्यांना कर्करोगाने ग्रासले.

अनेक प्रयत्नांनंतर देखील सर्व प्रयत्नं निष्फळ ठरले आणि अखेरीस 11 ऑक्टोबर 1968 रोजी तुकडोजी महाराजांनी आपला नश्वर देह ठेवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती दरवर्षी 30 एप्रील ला साजरी करण्यात येते.

आम्ही अंतःकरणापासुन तुकडोजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करतो ज्यांनी समाजात परिवर्तन घडवुन आणण्याकरता भक्ति आणि कर्माला एकमेकांशी जोडण्याचे अवघड कार्य करून दाखविले.

तुकडोजी महाराजांनी लिहीलेले ग्रंथ – Tukdoji Maharaj Abhang and books

  • ग्रामगिता (Gramgeeta)
  • सार्थ आनंदामृत (Sartha Anandamrut)
  • सार्थ आत्मप्रभाव (Sartha Atmaprabhav)
  • गीताप्रसाद (Geeta Prasad)
  • बोधामृत (Bodhamrut)
  • लाहर्की बरखा भाग 1, 2 आणि 3 (Laharki Barkha Part 1 ,2 & 3)
  • अनुभव प्रकाश भाग 1 आणि 2 (Anubhav Prakash Part 1 & 2)

Read More:

आम्हाला आशा आहे की ही “संत तुकडोजी महाराजांची माहिती” तुम्हाला आवडेल. तुम्हाला ही “तुकडोजी महाराज माहिती” आवडली असेल तर कृपया आमच्या फेसबुक पेज लाईक करा आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here