Vinoba Bhave Information
आचार्य विनोबा भावे यांची बायोग्राफी – Vinoba Bhave Information in Marathi
पुर्ण नाव: | विनायक नरहरी भावे |
जन्म: | 11 सप्टेंबर 1895 |
जन्मस्थान: | गागोदे (जि. रायगड) |
वडिल: | नरहरी भावे |
आई: | रूक्मिणी भावे |
भारतीय संस्कृतीतील ऋषी परंपरेचा दुवा म्हणजे आचार्य विनोबा भावे. अनेक धर्मातील तत्वज्ञानाचा अभ्यास, सर्वोदय व अहिंसेच्या विस्ताराची रचना आणि विज्ञानाला अध्यात्माशी जोडणारे विनोबा. भगवत्गीतेच्या भाष्यकारापासुन ते स्वातंत्र्य सेनानी अश्या अनेक भुमिका विनोबांनी त्यांच्या जीवनात जगल्या आहेत.
रायगड जिल्हयातील गागोदे या छोटयाश्या गावात 11 सप्टेंबर 1895 ला विनोबांचा जन्म झाला वाईच्या प्राज्ञपाठ विद्यालयात त्यांनी भारतीय परंपरेचा व वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला. विनोबांचे वैशिष्टय म्हणजे फक्त ज्ञान न मिळवता प्रत्यक्ष कृतीवर त्यांचा विश्वास होता. स्वातंत्र्य पुर्व काळातील सविनय सत्याग्रहाच्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणुन महात्मा गांधींनी आचार्य विनोबा भावेंची निवड केली होती.विनोबांचा आधुनिक राजकीय विचारांचा चांगला अभ्यास होता, भारतिय संस्कृती आणि जीवन जगण्याच्या पध्दतीचे त्यांना विशेष आकर्षण होते.
या आवडीमुळेचे विनोबांनी धुळयातील कारागृहात कैदयांना भगवत्गितेवर प्रवचन दिले होते. महात्मा गांधींप्रमाणेच विनोबांना देखील प्राचीन भारतात अस्तित्वात असलेल्या आश्रमातील जीवनात विशेष आस्था होती. महात्मा गांधींनी वर्धा येथे ज्या सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली होती त्यात सुरूवातीच्या काळात विनोबा भावे वास्तव्याला होते.पुढे वध्र्यालाच विनोबांनी पवनार येथे आश्रम स्थापीत केला आणि अखेरपर्यंत तेथेच राहिले.
विनोबा भावेंचा “सब भूमी गोपाल की” हा नारा त्या काळी भारतात सर्वदुर पोहोचला आणि गर्जला देखील.ते स्वतःला विश्वनागरिक समजत असत आणि म्हणुन आपल्या प्रत्येक लिखाणात किंवा संदेशात ते अखेरीस ‘जय जगत्’ असे आठवणीने लिहीत असत. हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द या सोबतच सर्वधर्मातील लोकांना त्यांनी प्रेम, बंधुभाव आणि शांततेची शिकवण दिली.
या दृष्टीकोनातुनच विनोबांनी हिंदु धर्माव्यतिरीक्त मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मग्रंथाचे देखील अध्ययन केले. लोकांमधली जातीधर्माची दरी दुर करून शांती आणि प्रेमाचा मार्ग दाखवणा. या विश्वधर्माची स्थापना व्हावयास हवी म्हणुन विनोबांनी सर्वोदय योजना तयार केली.
आचार्य विनोबा भावेंची स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वपुर्ण कामगिरी म्हणजे “भुदान चळवळ” या चळवळीचा उद्देश म्हणजे श्रीमंतांनी आणि जमिनदारांनी आपल्या जमिनीतील सहावा भाग अश्या लोकांना दान द्यावा ज्यांच्याजवळ जमिन नाही.विनोबांनी या करता चळवळ उभी केली. 1951 ला नक्षलवाद्यांनी आंध्रप्रदेश व तेलंगाणा भागात जमिनदारांविरोधात संघर्ष उभा केल्यानंतर विनोबांनी आपली “भुदान चळवळ” अधिक व्यापक केली.
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना भेटण्याकरता विनोबा दिल्लीला पायी चालत गेले. पुढे उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक, महाराष्ट्र अश्या अनेक राज्यांमधे 1951 ते 1964 अश्या 14 वर्षांमधे विनोबा भावेंनी ग्रामदाना च्या आंदोलनासाठी भारतभर पदयात्रा केली.
आपल्या वयाच्या 55 वर्षांपासुन ते 68 वर्षांपर्यंत 40 हजार मैल पायी चालत देशातील या महत्वाच्या प्रश्नाला लोकांपर्यंत पोहोचवुन सोडवण्याचा प्रयत्न केला दृ ग्रामदान, संपत्तीदान अशी आंदोलनं चालवली आणि एकीकडे कंचनमुक्ती, ऋषीशेती सारखे शेतीविषयी प्रयोग देखील केलेत.
परंतु 1975 ला जेव्हां देशात आणीबाणी घोषीत करण्यात आली तेव्हां त्या घटनेला विनोबांनी ‘अनुशासन पर्व’ म्हणुन समर्थन दिले. यावेळी त्यांची ही भुमिका वादग्रस्त ठरली. भुदान चळवळीची संकल्पना आणि त्याला मिळणारे यश ही बाब ऐतिहासीक ठरली. कायम सर्वोदयाचा विचार ठेवणा.या विनोबांनी त्यांच्या ‘मधुकर’ या पत्रिकेत या विषयावर आपले विचार मांडलेत. बायबल आणि कुराण वर भाष्य करणारा त्यांचा ग्रंथ देखील विव्दत्तापुर्ण समजला जातो.
धुळे येथील कारागृहात विनोबांनी भगवत्गीतेवर जे प्रवचन केले त्याचे शब्दांकन सानेगुरूजींनी केले. ‘गिताप्रवचने’ नावाने ते प्रसिध्द आहेत. ‘गीताई’ ही विनोबा भावेंची साहित्यकृती फार लोकप्रीय आहे. 1982 साली विनोबा भावेंनी स्वेच्छा मरण स्विकारले. भारत सरकारनं 1983 ला आचार्य विनोबा भावेंना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
आचार्य विनोबा भावेंची ग्रंथ संपदा – Vinoba Bhave Books
- ऋग्वेद्सार
- ईशावास्य वृत्ती
- वेदान्तसुधा
- गुरूबोधसार
- भागवतधर्मप्रसार
जर आपल्याजवळ About Vinoba Bhave in Marathi मध्ये अधिक Information असेल तर किंवा दिलेल्या माहितीत काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट किंवा ईमेल करावा, आम्ही त्या माहितीला अपडेट करू. विनोबा भावेंची काही महात्वपुर्ण माहिती Wikipedia मधुन देखील घेण्यात आली आहे. जर आपल्याला Life history of Vinoba Bhave in Marathi Language आवडली असेल तर आम्हाला नक्की whatsapp आणि facebook वर share करा.
E-MAIL Subscription करा आणि मिळवा Essay With Short Biography About Vinoba Bhave in Marathi and more new article. . . . . आपल्या ईमेल वर.