• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information City Information

वर्धा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Wardha Jilha Mahiti

वर्धा या जिल्हयाला फार पुरातन असा इतिहासाचा वारसा लाभला आहे. वध्र्याला मौर्य, श्रृंग, सत्वाहन आणि वाकाटकांच्या साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले होते. पुढे वध्र्यावर चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, दिल्ली, बहामनी, बेरार चे मुस्लीम शासनकर्ते, गोंड आणि मराठयांनी राज्य केले.

1850 च्या दरम्यान वर्धा ब्रिटींशाच्या हाती आले. वर्धा आणि सेवाग्राम स्वातंत्र्य आंदोलना दरम्यान प्रमुख केंद्र होते विशेषतः 1934 ला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ची वार्षीक बैठक इथच महात्मा गांधींच्या आश्रमात झाली होती.

1862 पर्यंत वर्धा नागपुर जिल्हयाचाच एक भाग होता पुढे याच्या स्वतंत्र विकासाच्या दृष्टीने याला वेगळे करून वध्र्याचे मुख्यालय पुलगांव नजीक काठा इथं स्थापण्यात आले.

वर्धा शहर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पुर्व दिशेला स्थित आहे. याच्या उत्तर पश्चिमेकडे अमरावती, दक्षिणेकडे यवतमाळ, पुर्वेकडे नागपुर आणि दक्षिण पुर्वेकडे चंद्रपुर जिल्हा आहे.

वर्धा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Wardha District Information in Marathi

Wardha District Information In Marathi

वर्धा जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत – Wardha District Taluka List

  1. वर्धा
  2. देवळी
  3. सेलु
  4. आर्वी
  5. आष्टी
  6. कारंजा
  7. हिंगणघाट
  8. समुद्रपुर

वर्धा जिल्हयातील पर्यटन स्थळं – Places To Visit in Wardha

महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम, विनोबा भावेंचा आश्रम, विश्व शांती स्तुप, लक्ष्मीनारायण मंदीर, बोर अभयारण्य, पोथारा बांध, बोर बांध, फरीदबाबा दर्गा, हि ठीकाणं पहाण्यासारखी आणि अभ्यासपुर्ण देखील आहेत.

  • सेवाग्राम आश्रम – Sevagram Ashram

महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम वर्धा शहरापासुन 8 कि.मी. अंतरावर 300 एकरात विस्तीर्ण पसरलेला आत्मीक आणि मानसिक शांतता प्रदान करणारा आश्रम आहे. या आश्रमाची आणखीन एक विशेषतः म्हणजे महात्मा गांधींनी आपल्या आयुष्याची शेवटची 12 वर्ष इथेच व्यतीत केली.

या आश्रमात असतांना गांधीजींनी अनेक मोठमोठे निर्णय घेतले, कित्येकांना भेटले, अनेकांच्या जीवनाला नवी दिशा दिली.

सेवाग्राम चे पुर्वीचे नाव सेगाव असे होते, याच मार्गावर गजानन महाराजांचे देखील शेगाव आहे. महात्मा गांधी इथे वास्तव्याला असतांना पत्रव्यवहाराच्या दरम्यान दोन गावं एकाच नावाची असल्याने गोंधळ व्हायचा तेव्हां या अडचणी ला लक्षात घेता महात्मा गांधींनी 1940 ला गांधीजींच्या सल्ल्यानुसार सेगांव चे नाव बदलुन सेवाग्राम असे करण्यात आले.

आपण इथे आल्यानंतर ज्या शांततेचा, परंपरांचा अनुभव घेतो तेव्हांच लक्षात येतं की आपण अश्या महान विभुतीच्या सान्निध्यात आलो आहोत ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला. इथे आजही सुतकताई होते.

  • पवनार येथील विनोबा भावेंचा आश्रम – Vinoba Bhave Ashram

भुदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावेंचा आश्रम देखील वर्धा जिल्हयात आपल्याला पहायला मिळु शकतो. जवळपास 15 एकर जमीनीवर बनलेला हा आश्रम अवघ्या नैसर्गिकतेने व्यापलेला आहे. सिमेंट च्या जंगलाला, बेगडी आणि बनावटी जीवनाला कंटाळलेला माणुस संपुर्णतः निसर्गाने वेढलेल्या जागी येउन शांतीची अनुभुती घेतो.

म्हणुनच इथे भेट देणारे अधिकतर सुशिक्षीतच पहायला मिळतात. विनोबांनी स्वतः या आश्रमाची स्थापना केली आहे. त्यांनी विशेषतः संत मिराबाईंसारखे आयुष्य व्यतीत करणा.या महिलांकरता या आश्रमाची स्थापना केली. आश्रमातील महिला याला आपले ब्रम्ह विद्या मंदीर म्हणतात.

  • विश्व शांती स्तुप – Vishwa Shanti Stupa

गिताई मंदीराच्या बाजुला संपुर्णतः पांढ.या रंगाने बनलेला हा स्तुप वर्धा जिल्हयाचे आणखीन एक आकर्षण आहे. स्तुपाच्या चारही बाजुने बुध्दाच्या मुर्ती ठेवण्यात आल्या आहेत. मोठया बगिच्या समवेत इथे एक जापानी बौध्द मंदीर देखील आहे.

स्तुपा जवळ एक मंदीर आहे ज्यात सगळया जगातील शांतीकरता प्रार्थना केली जाते. जगभरात बनवण्यात आलेल्या शांती स्तुपामधील हे एक स्तुप आहे. महात्मा गांधीच्या कार्याने प्रेरित झालेल्या फुजी गुरूजींचे हे स्वप्न होते.

फुजी गुरूजी 1935 च्या दरम्यान जापानहुन वध्र्याला आले होते आणि असे विश्व शांती स्तुप बनवण्याची ईच्छा त्यांनी गांधीजींना बोलुन दाखवली होती.

  • लक्ष्मीनारायण मंदीर – Shri Lakshmi Narayan Mandir

अतिशय पुरातन असे हे मंदीर विष्णु आणि लक्ष्मी या भगवंताचे असुन या मंदीराचा लोकार्पण सोहळा 19 जुलै 1928 ला जमनालाल बजाज यांच्या हस्ते करण्यात आला.

या मंदीराची स्थापना हरिजनांकरता करण्यात आली कारण त्या काळी समाजात जातीभेद आणि स्पृश्यअस्पृश्यता वाढल्यामुळे हरिजनांना मंदीर प्रवेश बंद होता त्यामुळे विशेषतः हरिजनांकरता या मंदराची निर्मीती करण्यात आली होती.

या ठिकाणी एक ग्रंथालय देखील ओ जिथे वेगवेगळया भाषेतील पुस्तकांचा संग्रह करण्यात आला आहे. संस्कृत, प्राकृत, हिंदी या भाषेतील पुस्तकांव्यतीरीक्त वेद उपनिषदांचे ज्ञाने देणारी पुस्तकं देखील इथं उपलब्ध आहेत.

  • मगन संग्रहालय – Magan Sangrahalaya

मगन संग्रहालयाचे उद्घाटन 30 सप्टेंबर 1938 ला स्वतः महात्मा गांधींनी केले होते. हे संग्रहालय मगनवाडीत विज्ञान केंद्रा नजिक आहे. या संग्रहालयाचा विकास गांधीवादी अर्थव्यवस्थेचे आर्यनायकम आणि डॉ. जे.सी. कुमारप्पा यांनी केला.

ग्रामीण उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेती व्यवसायाप्रती जागरूकता या सगळयाचा प्रचार प्रसार करण्याकरता या संग्रहालयाची निर्मीती करण्यात आली जेणेकरून याबाबतीत नवनवे संशोधनं आणि त्यांच्या विकासावर विशेष लक्ष दिल्या जाईल.

स्वदेशी आंदोलनाला प्रोत्साहन देणा.या, ग्रामीण कारागिरांनी बनवलेल्या खादी, चरखा, आणि हस्तशिल्पांचे विविध प्रकार यांचे प्रदर्शन देखील भरवल्या जाते.

  • बोर अभयारण्य – Bor Wildlife Sanctuary

जर तुम्हाला व्याघ्र दर्शन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्यायला हवी. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने 1 जुलै 2014 ला खास वाघांकरता हा भाग आरक्षीत केला, त्यामुळे बोर वन्यजीव अभयारण्य भारतातील 47 वे आणि महाराष्ट्रातील सहावे वाघांचे आरक्षीत अभयारण्य बनले.

हे अभयारण्य नागपुर आणि वध्र्याच्या सिमेवर आहे. या अभयारण्याला वाघांकरता आरक्षीत करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडुन पाठवण्यात आला होता. या व्यतीरीक्त महाराष्ट्रात मेळघाट, पेंच, ताडोबा, नागजीरा, आणि सहयाद्री ही अभयारण्य वाघांकरता आरक्षीत करण्यात आली आहेत. हे अभयारण्य 138 कि.मी. मधे पसरलेले आहे.

या जंगलात बंगाल टायगर, चित्ता, हरिण, मोर, भुंकणारे हरिण, माकड, जंगली डुक्कर, अस्वल, पहायला मिळतात. सापांच्या वेगवेगळया प्रजाती जसे भारतीय कोबरा, रसेल वाइपर, राॅक पायथन, चेकर्ड किलबॅक इत्यादी पाहायला मिळतात. जवळजवळ पक्ष्यांच्या 160 प्रजाती या अभयारण्यात विहार करतात.

वर्धा जिल्हयाविषयी विशेष माहीती – Wardha Zilla Chi Mahiti

  • वर्धा हे मुंबई नागपुर रेल्वेमार्गावरचे महत्वाचे जंक्शन असुन सर्व रेल्वेगाडया या ठिकाणी थांबतात.
  • बसेस आणि वाहतुकीची इतरही साधनं असल्याने वध्र्याला पोहोचणे सहज शक्य आहे.
  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 या शहरातुन गेला आहे.
  • वर्धा जिल्हयाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 1,300,774 आहे ज्यात शहराचे प्रमाण 28% इतके आहे.
  • क्षेत्रफळ एकुण 6310 कि.मी.
  • साक्षरतेचे प्रमाण 37%
  • एकुण 507 ग्रामपंचायत, आणि 1387 गावे आहेत.
  • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 946 इतके आहे.

वर्धा जिल्हयातील काही महत्वाच्या व्यक्ती – Famous People in Wardha

  • थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांचा जन्म हिंगणघाट इथं 24 डिसेंबर
  • विनोबा भावे स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्ते
  • जमनालाल बजाज स्वातंत्र्य सेनानी
  • सामाजिक कार्यकर्ता अभय आणि राणी बंग (गडचिरोली जिल्हयात गरीब आदिवासींना वैद्यकिय सेवा पुरवतात)
  • महात्मा गांधीचे वध्र्याला लाभलेले सान्निध्य
  • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे वरिष्ठ राजनेता अब्दुल शाफी

लक्ष्य दया: तुमच्या जवळ वर्धा जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया वर्धा जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Wardha District Information In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि Majhimarathi.Com चे Facebook Page लाइक करायला सुध्दा.

Editorial team

Editorial team

Related Posts

Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
June 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
June 17, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved